पूर्वेच्या समुद्रात - १७

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
20 Feb 2016 - 11:57 am

पूर्वेच्या समुद्रात - १७
विशाखापटणमला रुग्णालयात काम करत असताना सकाळी १० वाजता बातमी आली कि नौदलाचे किरण हे विमान कोसळले आहे आणि त्याचा वैमानिक मात्र विमानातून बाहेर पडला आहे आणि त्याचा शोध जारी आहे. साधारण एक तासाने त्या वैमानिकाला घेऊन एक रुग्णवाहिका आमच्या रुग्णालयात आली. हा वैमानिक व्यवस्थित शुद्धीवर असून स्पष्टपणे बोलत होता. त्याची प्राथमिक तपासणी झाली तेंव्हा त्याने पाठ दुखते आहे हे सांगितले होते त्यामुळे त्याची रवानगी माझ्या विभागात( क्षकिरण) एक्स रे काढण्यासाठी झाली. हा वैमानिक मराठी होता नाव* संदीप टिपणीस(* नाव बदलले आहे). एक्स रे झाले आणि त्याची फिल्म येईपर्यंत आम्ही वाट पाहत होतो. फिल्म येईपर्यंत मी त्याला काय होते आहे ते विचारले त्यावर तो म्हणाला सर पाठ जोरात दुखते आहे.
यावरून मला माझ्या एका वायुदलातील एरो स्पेस मेडिसिन तज्ञाने सांगितलेल्या गोष्टीची आठवण झाली. त्याने केलेल्या अपघाताच्या चौकशांच्या दरम्यान त्याला असे आढळले होते कि किरण या विमानातून उसळी घेणार्या सीटमुळे (मार्टिन बेकर मार्क ४) त्यातून उडी मारणाऱ्या वैमानिकांच्या पाठीच्या मणक्यांना फ़्रैक्चर होत असे. संदीपचे एक्स रे आले तेंव्हा हि गोष्ट आठवल्यामुळे मी त्या भागात बारकाईने पहिले तेंव्हा मला असे वाटले कि त्याच्या पण मणक्याला चीर गेली आहे. मी लगेच त्याच्या पाठीच्या एम आर आय ची शिफारस केली. माझ्या मित्राने केलेले हे संशोधन नंतर मान्य झाले आणी यानंतर विमानातून इजेक्ट झालेल्या प्रत्येक वैमानिकाचा आता एम आर आय करणे हा आता नियम झाला आहे.
त्याच दिवशी दुपारी विशाखापटणमच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात त्याचा एम आर आय केला गेला. त्यात त्याच्या पाठीच्या मणक्याला फ़्रैक्चर आहे याची खात्री झाली.त्यामुळे त्याला अति दक्षता विभागात हलवण्यात आले.हि बातमी अर्थात लगेच सर्व नौदलाच्या तळांवर पसरली.
यावेळेस पूर्व विभागाचे नौदलप्रमुख एडमिरल विनोद पसरिचा त्याला भेटायला आले होते. त्यांनी पहिली गोष्ट काय केली तर संदीप ला विचारले तू घरी कळवले आहेस का? त्यावर तो म्हणाला सर मी तर उठू सुद्धा शकत नाही एस टी डी करायला कुठून जाणार? त्यावर त्यांनी स्वतःच्या भ्रमण ध्वनिवरून संदीपच्या घरी मुंबईत फोन लावला. (त्या वेळेस १९९८-९९ साली मोबाईल हि एक चैनीची वस्तू होती. आणि तेंव्हा मिनिटाला सोळा रुपये असा लोकल कॉलचा दर होता.) संदीपच्या बायकोशी त्याचे संभाषण करून दिले. आपल्या नवर्याच्या विमानाला अपघात झाला आहे हि बातमी तिला पश्चिम नौदलाच्या मुख्यालयातून कळली होती त्यामुळे तिचा जीव टांगणीवर लागलेला होता. या परिस्थितीत प्रत्यक्ष नवर्याचा आवाज ऐकल्यावर त्याची पत्नी फक्त ओक्साबोक्शी रडली. एक शब्दही तिला बोलता आला नाही. संदीपने तिची कितीही समजूत घातली तरीही तिच्या तोंडून शब्द आला नाही. पूर्व नौदल प्रमुखांचे हे छोटेसे काम त्या कुटूम्बाला किती दिलासा देणारे होते.
यानंतर त्याला चार आठवडे संपूर्ण बेड रेस्ट दिली गेली. संदीपचे आई वडील, पत्नी आणि दोन्ही मुलांना घेऊन त्याला भेटायला आले. दोन दिवसांनी जेंव्हा सगळे स्थिर स्थावर झाले त्यानंतर मी त्याच्याशी रिकाम्या वेळात आय सी यु मध्ये जाऊन गप्पा मारल्या. तेंव्हा त्याने सांगितलेली हकीकत अशी होती.
आय एन एस डेगा या विशाखापटणम मधील हवाई तळावरून त्याने सकाळी नउ वाजता उड्डाण केले बंगालच्या उपसागरावर टेहळणी साठी जाण्याच्या रोजच्या कामगिरीपैकी एक कामगिरी होती. संदीप QFI (QUALIFIED FLIGHT INSTRUCTOR) होता. म्हणजे वैमानिकांना प्रशिक्षण देणारा अनुभवी प्रशिक्षक होता. आणी त्याला किरण या विमानावर हजार पेक्षा जास्त तासांचा अनुभव होता.तो विशाखापटणम शहरावरून साधारण ३५०० फुटांवर उडत असताना त्याला इंजिन मधील शक्ती एकदम कमी झाल्यासारखे जाणवले आणि एकदम इंजिन बंद पडले. (याला इंजिन फ्लेम आउट असे म्हणतात). आणि आता विमान खाली यायला लागले. संदीपने हि गोष्ट डेगाच्या विमानतळ नियंत्रण कक्षाला कळवली. आणि आता मी विमानातून इजेक्ट करतो आहे असेही कळवले. इजेक्षनची त्याने तयारी केली आणी कळ ओढणार तर त्याला असे जाणवले कि हे विमान शहराच्या दाट वस्ती असलेल्या भागात कोसळेल आणि त्यामुळे बरीच जीवित हानी होण्याची शक्यता आहे. लगेच त्याने आजूबाजूची सर्व जागेची टेहळणी केली आणि त्याच्या लक्षात आली कि उजवीकडे रेल्वेचे यार्ड आहे जेथे काही मालगाड्या उभ्या आहेत परंतु माणसे जवळ जवळ नाहीतच. त्या क्षणार्धात त्याने निर्णय घेतला आणि विमान उजवीकडे वळवले. आतापर्यंत त्यामानाने सरळ तरंगत जाणारे विमान उजवीकडे वळवले गेल्याने झपाट्याने खाली येऊ लागले आणि त्याचे तोंड जमिनीकडे येऊ लागले. आता त्याने इजेक्ट करण्याची कळ दाबली परंतु प्रत्यक्ष सीट हवेत उडवली गेली तोवर विमान त्या यार्डाकडे खाली तोंड करून झेपावत होते. संदीपची सीट हवेत वर उडण्याऐवजी जमिनीला समांतर अशी आडवी उडाली. त्याने हवेत लगेच आपले पैराशूट उघडले आणि तो हवेत तरंगू लागला. दुर्दैवाने जसा तो खाली येऊ लागला त्याचे पैराशूट एका २२ ००० व्होल्टच्या अति उच्च दाबाच्या विजेच्या तारांमध्ये अडकले आणि तो पैराशूट च्या दोर्यांनी जमिनीपासून ७-८ फुटांवर लटकत होता. विमान काही अंतर जाऊन त्या यार्डात कोसळले होते. ते पाहणाऱ्या लोकांनी रेल्वेच्या यार्डात येउन काय झाले याची पाहणी सुरु केली. तेंव्हा त्यांना संदीप अति उच्च दाबाच्या विजेच्या तारांमधून लटकत असलेला आढळला. त्याच्या भोवती लोकांचा मोठा घोळका जमा झाला पण विजेच्या तारांपासून लटकत असल्यामुळे कुणीच त्याला खाली उतरवायला तयार होईना.सुमारे ३५-४० मिनिटे तो असाच हवेत लटकत होता आणी जमा झालेला घोळका तमाशा पाहत होता. एवढ्या वेळात आय एन एस डेगाची रुग्णवाहिका त्याचा अदमास घेत तेथ पर्यंत पोहोचली. त्यातील वैद्यकीय सहाय्यकांनी त्याला हळूच खाली उतरवले. तेंव्हा तो म्हणाला मला आडवे पडू द्या. माझी पाठ भयानक दुखते आहे. बहुतेक इजेक्शनच्या वेळेस पाठीला झटका बसला आहे. त्याला तसेच स्ट्रेचर वर आडवे टाकून त्यांनी आमच्या कल्याणी रुग्णालयात आणले आणी मग वर म्हटल्याप्रमाणे त्याचे पुढचे उपचार झाले. चार आठवड्यानंतर त्याला हळूहळू उठायला आणी चालायला परवानगी मिळाली. पुढे मी गोव्याला असताना संदीपपण गोव्यात होता आणी मी तेथून जाईपर्यंत त्यःच्या कुटुंबाबरोबर आमची चांगली मैत्री होती.
या सर्व अपघाताची आणी विमानाच्या बिघाडाची मधल्या काळात पूर्ण चौकशी झाली.त्याच्या विमानाने अचानक उजवीकडे घेतलेले वळण रडारवर पाहणाऱ्या माणसाना विचित्र वाटले होते. त्यात शेवटच्या काही क्षणात संदीपने दाखवलेले अतुलनीय प्रसंगावधान आणी त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मानवी वस्तीपासून दूर विमान नेल्याने टळलेली जीवितहानीची दखल घेतली गेली. त्याला या अतुलनीय शौर्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते नौसेना पदक बहाल केले गेले.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

नौदलाच्या या वैमानिकाने दाखवलेले प्रसंगावधान स्पृहणीय आहे! त्याच्या धाडसाला सलाम!

एकूणच या प्रसंगात सहभागी असणार्‍या प्रत्येकाला सलाम!

पुभाप्र!

तुषार काळभोर's picture

20 Feb 2016 - 12:22 pm | तुषार काळभोर

सलाम!

टवाळ कार्टा's picture

20 Feb 2016 - 12:27 pm | टवाळ कार्टा

+१

पिलीयन रायडर's picture

20 Feb 2016 - 1:30 pm | पिलीयन रायडर

+१

मुक्त विहारि's picture

20 Feb 2016 - 3:09 pm | मुक्त विहारि

+१

उगा काहितरीच's picture

21 Feb 2016 - 12:38 am | उगा काहितरीच

+१

जातवेद's picture

21 Feb 2016 - 12:11 pm | जातवेद

+१

नाखु's picture

20 Feb 2016 - 12:27 pm | नाखु

धैर्याला आणि तत्पर धाडसाला सलाम

मृत्युन्जय's picture

20 Feb 2016 - 12:34 pm | मृत्युन्जय

वैमानिकाच्या धाडसाला सलाम. मात्र त्याचे नाव का बदलले?

मन१'s picture

21 Feb 2016 - 12:56 pm | मन१

वैमानिकाच्या धाडसाला सलाम.

+१

मात्र त्याचे नाव का बदलले?

मलाही हीच शंका आहे.

तुषार काळभोर's picture

21 Feb 2016 - 10:01 pm | तुषार काळभोर

कदाचित तो अजूनही कार्यरत असेल. (इथे प्रतिष्ठेपेक्षा व्यावसायिक गोपनीयता जास्त महत्वाची).

बोका-ए-आझम's picture

20 Feb 2016 - 12:39 pm | बोका-ए-आझम

वैमानिकानं दाखवलेली समयसूचकता __/\__

प्रदीप's picture

20 Feb 2016 - 1:30 pm | प्रदीप

अतिशय सुंदर लेख. धन्यवाद.

नेहमीप्रमाणेच थरारक आवडला..

स्वाती दिनेश's picture

20 Feb 2016 - 2:31 pm | स्वाती दिनेश

वाचताना अंगावर काटा आला.
एक समयसूचक धाडसी अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद,
स्वाती

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Feb 2016 - 12:04 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेख ! स्वत:च्या जीवावर बेतले असतानाही वैमानिकाने दाखवलेल्या समयसूचकतेला सलाम !

अभ्या..'s picture

21 Feb 2016 - 12:27 am | अभ्या..

अर्थात. अत्यल्प वेळेत आणिबाणीप्रसंगी असे निर्णय घेणे अन अंमलात आणणे म्हण्जे सोपे काम नाही.
धाडस अन समयसूचतेला सलाम.

इशा१२३'s picture

22 Feb 2016 - 3:43 pm | इशा१२३

+१

अगम्य's picture

21 Feb 2016 - 12:42 am | अगम्य

सलाम त्यांच्या शौर्याला.

"किरण या विमानातून उसळी घेणार्या सीटमुळे (मार्टिन बेकर मार्क ४) त्यातून उडी मारणाऱ्या वैमानिकांच्या पाठीच्या मणक्यांना फ़्रैक्चर होत असे. "

हे माहिती झाल्यावर त्या सीट किंवा उसळी घेण्याच्या तंत्रामध्ये काही सुधारणा केली गेली का?

वर वाचताना हाच प्रश्न मनात आला.

गौरवास्पद कामगिरी करणार्‍या धाडसी वैमानिकास सलाम!
तुमचे लेखन आवडले.

वैमानिकाच्या धाडसाला सलाम...

सलाम त्या वैमानिकाच्या धाडसाला.

राघवेंद्र's picture

22 Feb 2016 - 3:25 am | राघवेंद्र

पु. भा. प्र.

श्रीरंग_जोशी's picture

22 Feb 2016 - 5:27 am | श्रीरंग_जोशी

या भागातल्या प्रत्यक्ष जीवनातल्या नायकाच्या कामगिरीला दंडवत. नेहमीप्रमाणे हाही भाग खिळवून ठेवणारा.

जगप्रवासी's picture

22 Feb 2016 - 6:47 pm | जगप्रवासी

सलाम..