बेधुंद (भाग ६ )
पुढच्याच रात्री अजीत नित्याच्या रूम वर आला . आदित्य अन रवी पण बरोबर होते . आतून दरवाजा बंद केल्याने आत काय चाललं आहे हे बाकीच्या विद्यार्थ्यांना कळायला मार्ग नव्हता . तसही भीतीने किंवा 'उगीच लफड्यात का पडायचे !' म्हणून आधीच बाकीचे विद्यार्थी आपापल्या रूममध्ये जाऊन बसले होते .
रूम मध्ये नित्या , सुऱ्या , तात्या , चंद्या अन अक्षा हे सारे होते . अजीत खाली बसला होता अन त्याची मान त्याच्या गुडघ्यामध्ये होती . 'मेस' मध्ये पिसाळलेल्या जनावरासारखा अजित आता एखाद्या लहान मुलासारखा बसला होता . 'करीयर' पण काय भयानक गोष्ठ असतें नाही ! त्याच्या समोर सुऱ्या उभा होता .