बेधुंद (भाग १२)
हर्षलाच्या वेडेपणात नित्याची तिसरी सेमिस्टर कशीबशी सरली . त्यातच ज्याने नित्यासाठी हर्षला चा बायो डाटा आणला होता तो निलेश अन हर्षला चांगले मित्र झाले होते . देखणा निलेश सगळ्यातच पुढे होता , अभ्यास , खेळ अन त्याच व्यक्तिमत्व अन त्याची 'हेअर स्टाईल ' कोणत्याही मुलीला आकर्षित करायला पुरेशी होती . त्याची उंची जरा नितेश पेक्षा कमी होती पण हर्षला पेक्षा थोडी जास्त होती . नित्या निलेशला काही बोलत नव्हता अन बोलणार तरी कसं ? एखाद्या पोरीला माझ्यावरच प्रेम कर अस कोण सांगू शकेल ?