✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बेधुंद (भाग १२)

अ
अविनाश लोंढे. यांनी
Sat, 06/11/2016 - 00:50  ·  लेख
लेख
हर्षलाच्या वेडेपणात नित्याची तिसरी सेमिस्टर कशीबशी सरली . त्यातच ज्याने नित्यासाठी हर्षला चा बायो डाटा आणला होता तो निलेश अन हर्षला चांगले मित्र झाले होते . देखणा निलेश सगळ्यातच पुढे होता , अभ्यास , खेळ अन त्याच व्यक्तिमत्व अन त्याची 'हेअर स्टाईल ' कोणत्याही मुलीला आकर्षित करायला पुरेशी होती . त्याची उंची जरा नितेश पेक्षा कमी होती पण हर्षला पेक्षा थोडी जास्त होती . नित्या निलेशला काही बोलत नव्हता अन बोलणार तरी कसं ? एखाद्या पोरीला माझ्यावरच प्रेम कर अस कोण सांगू शकेल ? नित्या सुट्टीवरून पुन्हा कॉलेज मध्ये आला , बघता बघता चोथी सेमिस्टर सुरु झाली .घरी बागायत असल्याने सुट्टीचा जास्तीत जास्त वेळ शेतात काम करून जात होता . शेतात काम करून शरीर आपोआपच पिळदार झालं होत . घरी असताना हि त्याला कुठेतरी काहीतरी चुकतंय असच वाटत होत , कितीतरी वेळा स्वप्नात हर्षला ला नको तिथं अन नको तसं बघून झालं होत , हर्षला ला विसरणे त्याला खरच अवघड जात होत . ' खरच आपण एवढे का मागे लागलोय हर्षला च्या , आधी एवढं कधीच कुणाच्या मागे लागलो नव्हतो ! खरंच आपण हर्षला वर प्रेम करतोय की फक्त ही वासना आहे ? कळायला मार्ग नव्हता ! हे प्रेम आहे की नाही हे माहित नाही पण वासना तर नक्कीच नाही ! की आहे ? तो विचारात पडला , प्रेम जर समजायला एवढ सोप्प असत तर एवढ्या बॉलीवूड मुव्हीस कशा काय आल्या असत्या ! काहीही झालं तरी तिसरी सेमिस्टर कुणाशी काही भांडणाशिवाय गेली होती . खूप दिवसाने त्याने आज हर्षलाला बघितले ! वेळ ही व्यक्तीसापेक्ष असते , सुट्टीचा एक महिना त्याला १० वर्षासारखा भासला होता . हर्षला आता त्याच्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघायची , कधी कधी चालताना नित्या समोरून गेला तर त्याच्याकडून बघून हसत असे , अन नित्याला तो दोन बाजूत तुटत आहे अस वाटत असे ! नित्याने हर्षलालाच्या विचारांना खूप टाळायचा खूप प्रयन्त केला पण मन हे वेड असत ! त्याच मन त्याच ऐकत नव्हत ! जेव्हा तो हर्षलाला बघत असे तेव्हा तेव्हा तो अजूनच बेचैन होत असे ! जस की स्वतःवर काहीच नियंत्रण राहील नाही त्याच ! हर्षलाच्या नावेत तो वाहवत होता . अक्षा अन सुऱ्याला ते दिसत होत , आपल्या मित्राला अस बघन त्यांना झेपत नव्हत ! पण काय करणार ? तिला मैदानावर बघताच नित्या पुन्हा हर्षलाला भेटला ! ' तुला कळत नाही का , मी काय बोलले ते - हर्षला रागाने ओरडली . आजूबाजूच्या सगळ्या पोरांचं लक्ष तिच्या आवाजाकडे गेला . ' मला नाही कळत , पण तुला कळत नाही का ? - नित्या रागाने ओरडला . ' ओरडू नकोस माझ्यावर ! तुझी प्रोपर्टी नाहीये मी - हर्षला पण ओरडली . ' तुला काय वाटले की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही , अरे तुझ्यापेक्षा कोणीतरी असेल चांगली माझ्यासाठी , एवढा मागे लागलोय म्हणून तू अशी मुद्दाम वागतेस ना - नित्याच्या संयमतेचा बांध फुटला होता होईल ते होईल पण तिलाही कळायला पाहिजेच की माझ्यावर काय बेतली आहे ! वेडेपणाचा कळस ! ' हे बघ नितेश , मला तू आवडत नाही , मग उगीच का मागे लागलाय ? - हर्षला ' बर , आजपासून नाही , काय समजतेस स्वतःला ' - नित्या ची आता सटकली होती , वाट्टेल ते बरळत होता . ' बर , चल जा आत्ता - अन हर्षला निघून गेली . आजूबाजूला असलेल्या HD च्या मित्राने त्याला हर्षला ला बोलताना बघितलं होत . ३-४ जन दांडगे गडी नित्याच्या जवळ आले . ' ये ह्रितिक … मराठी कळत नाही का तुला ? मागे सांगितलं होत ना तिला बोलू नको म्हणून ? एका सिनिअरला मारले तर काय तू स्वतःला 'दादा' समजायला लागला ' - ' नित्या आता थोडा घाबरला होता , शरीराने अन ताकदीने एकेक जन त्याच्यापेक्षा वरचढ होता . जवळ जवळ सगळेच पहिलवान होते . एकाने त्याची कॉलर पकडली , जास्त उडू नकोस , नाहीतर हे दोन्ही पाय कापून गळ्यात बांधेन ! अन त्याला ढकलून दिले . xxx , दादा झाला हा लगेच , तुझी ही दादागीरी तुझ्या 'ब्याच ' पुरती ठेव कळाल , चल जा भोसडीच्या ! त्यातील एकाने नित्याच्या कानाखाली सनकन वाजवून दिली . मैदानावर झालेला हा अपमान कुणाला सांगणार तो ? अन तक्रार करायला तो आता जुनिअर नव्हता . अन त्याने नित्याला ढकलून दिले . आधीच मनातून तुटलेला नित्या आता अजून बाहेरून पण तुटला . नित्या तावातावाने होस्टेलवर आला, शारीरिक वेदनेने नाही पण त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले . हर्षलाचा एकेक शब्द त्याला सतवत होता . अन HD या च्या मित्रांची धमकी अन केलेला अपमान सतावत होता . मनात कसला तरी दुरावा , कसली तरी भीती ! अशी भीती त्याला आधी कधीच वाटली नव्हती . तो रूम मध्ये आला , सुऱ्या बाहेर गेला होता . सगळीकडे त्याला हर्षलाच 'कुत्सित 'हसन दिसू लागलं . समोर असलेल्या आरशात पण त्याला हसताना हर्षला दिसू लागली , अन त्याने जोराने आरशावर 'बुक्की' मारली . आरसा फुटला अन काही काचा त्याच्या हातात घुसल्या . रक्त जमिनीवर पडू लागलं . का काय माहित पण आज त्याला अजिबात दुखत नव्हत .पडलेली एक काच त्याने हातात घेतली अन आपल्या डाव्या मनगटावर H हे अक्षर कोरले , कोरताना तो हसत होता . कदाचित मनातील जखम जर मोठी असेल तर मग शरीराच्या जखमेला काही महत्व उरत नाही . त्याने रागाने खिडकीच्या काचा फोडायला सुरुवात केली . तेवढ्यात सुऱ्या रूम मध्ये आला . जमिनीवरच रक्त बघून तो वैतागून गेला . xxx येडाबिडा झालायेस काय ? बस कर - अन त्याने नित्याला धरले .अन त्याला मिठी मारली . नित्या लहान मुलासारखा सुऱ्याच्या कुशीत पडून रडत होता . आवाज ऐकून अक्षा अन शेजारीच रूम असलेला चंद्या रूम वर आले . बाकीचे कोण येण्याआधी अन काय झालाय हे बघण्याआधी त्यांनी आतून दरवाजा बंद केला . अक्षाने तात्याला फोन केला . तात्या झपाझप पावले टाकत होस्टेलकडे चालू लागला . रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या 'लाईटस' चकाकत होत्या . रस्त्याच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडावर लहान मोठे आंबे वाऱ्यावर आनंदात डुलत होते . पण तात्याच्या मनात एक काहूर माजलं होत . ' विश्वेश्वरय्या होस्टेल ' च्या पायऱ्या कापत तो वरती लॉबी मध्ये आला . समोरच NTS होल्डर विनोद तात्याला दिसला . त्याने आपल्या उजव्या हाताचे एक बोट डाव्या हाताच्या मनगटावर ठेवून ' नित्याने त्याच्या हाताची नस कापली आहे अस दाखवलं ' , अन नित्या वेडा झाला आहे अस खुणेनच सांगितलं . तात्याच्या काळजात एक धसका उडाला . तो नित्याच्या रूम समोर आला . ' सुऱ्या , रूम उघड ' दरवाजावर ठोठावत तो ओरडला . 'कोण ? - अक्षा 'तात्या ' अक्षा ने रूम उघडली , नित्या सुऱ्याच्या मांडीवर होता डोके ठेऊन पडला होता . रूममध्ये फ्लोरवरती काचा पडल्या होत्या . कॉट वर अक्षा बसला होता . ' काय झालाय , नित्या , काय चालवलंय काय तू ? आयला प्रत्येक सेमिस्टर मध्ये लफडे करयचं ठरवलंय का ? - तात्या रागाने बोलला . ' तुला कुणी यायला सांगितल इकडे यायला ? तू आपला जा लायब्ररी मध्ये - नित्या तात्यावर ओरडला . ' हो , आम्ही येडझवेच ना ! फर्स्ट सेमिस्टर च्या ' नितेश नोट्स ' कुठे गेल्या लxx ? सगळी ब्याच तुझ्या नोट्स झेरोक्स मारून पास झाले , एवढं पण पोरीसाठी वेड होन चांगला नाही रे ! - तात्या आपली भडास काढत होता . फाईव्ह स्टार्स मध्ये तात्याच्या बोलण्याला वजन होतं . चूक तिथे चूक अन बरोबर तिथे बरोबर असं त्याच गणित होत ! नित्या पण तात्या जे सांगेल त्याचा मान ठेवत होता . काही वेळ रूम मध्ये अशीच शांतता पसरली . कोणी काही बोलायला तयार नव्हते . काय झालं - सांगशील आता की असाच रडत बसशील ? -तात्या ' काय नाय रे ! ' नित्या सुऱ्या अन अक्षा असेच रिकामे बसले होते ! काय कराव , काय बोलाव कुणाला सुचत नव्हते . अन बोलणार तरी काय म्हणा ? अक्षा , फोन केलास का तू ' चिंटू भाई ' ला ? त्याची जीप पाठवून दे म्हणाव - तात्या हो रे केला फोन ,येतोय तो आता ! - अक्षा 'सेकंड एअर सुरु झालं आता , नित्या त्या हर्षलाचा नाद सोडून दे रे , मोठ्या घराची मोठी लेक आहे ती ! त्यात तुमची जात पण वेगळी , कस शक्य आहे, सगळ ! जर तू तिला पटवलं तरी पुढ काही होन शक्य आहे का xxx - तात्या नित्याला समजावत बोलला . ' मी नाही रे विसरू शकत तिला ! - नित्या थोडासा रडत बोलला . जखमेवर आधीच सुऱ्याने रुमाल बांधला होता . तरीही रक्त रुमालातून बाहेर येत होत . ' अरे पण xxx , विसरण्यासाठी आधी काहीतरी झालं पाहिजे ना दोघांत का असंच , इथ 'लैलाच' भाव देत नाही अन 'मजनू' जीव द्यायला चालला , च्या मारी त्या शिवेका च्या किस्स्यात मला ज्ञान पाझरत होता अन आता काय गेलं का सगळ गाढवाच्या xxx ? - अक्षा रागाने बोलाला . ' त्या HDया च्या लोकल मित्राने घेरलं याला , गुंड आहेत ते साले , वाजवली ह्याच्या कानाखाली ! HDया ची सेटिंग लय वरती हाय , ह्याला कधी कळणार काय माहित ! - सुऱ्या रागाने सगळ्यावर ओरडत होता - 'झक मार यार तू पण इथून पुढे मी असल्या किस्स्स्यात पडणार नाही' . - सुऱ्या आग ओकत होता . ' चला रे , जीप आलीये - अक्षा बोलला . रूम च्या बाहेर सगळे आले तरी गर्दी जमा होती . नित्याच्या हातातून रक्त अजून वाहत होत , तेवढ्यात चंद्या होस्टेलवर आला अन त्याने नित्याला पकडले . सेकंड एअर बघत होत पण कोणी काही बोलत नव्हत ! फाईव्ह स्टार्स आज मुरझलेले होते . त्यांनी नित्याला जीप मध्ये बसवलं अन सरळ ते हॉस्पिटल मध्ये गेले ! हातावर ३-४ टाके टाकल्यानंतर नित्या झोपला . बाहेर तात्या , सुऱ्या , अक्षा अन चंद्या उभे होते . रात्रीचे १० वाजले होते . तात्याने अश्विनीला फोन केला . 'अक्षा बोल रे , कळाल आम्हाला नित्याने काय राडा केला तो - सुऱ्याने मोबाईल अक्षाकडे दिला . ' अशे , तो नित्या पागल झालाय यार , त्या हर्षला साठी , काचा फोडल्या त्याने रूम च्या , त्या हर्षला ला सांग काहीतरी - अक्षा रागात बोलला . ' अक्षा , पाहिलं म्हणजे ओरडून बोलू नको , अन दुसर म्हणजे मी काही सांगणार नाही त्या हर्षलाला , तुम्ही सगळी पोर सारखीच ! आज नाटकी करतोय नित्या , उद्या करेल सगळ हर्षला बरोबर अन देईल सोडून , मग काय ? - अश्विनी तिकडून बोलली ' अशे , सगळीच मुल तुझ्या त्या अमीर सारखी नसतात ग ! वाटलं तर तू मला तसं बोल , पण माझ्या हातात कधी शिवेकासाठी काचा घुसल्या नाहीत किंवा तुझ्या त्या अमीरच्या ! पण नित्याच्या घूसल्यात , ४ टाके पडलेत अशे ! घरी सांगितलं त्याच्या तर अजूनच उलट काहीतरी होईल ' - अक्षा अश्विनीला समजावत होता . अक्षाला मुलींशी कोणत्या वेळी कसं बोलायचं ह्याच गणित बरोबर माहित होत किंवा ते तसं जन्मजात होत ! अश्विनीला कदाचित पटल असाव . ' बर मी काय करू ? - काहीही झालं तरी मैत्री शेवटी मैत्रीकडेच धावते . काही नको , त्या हर्षलाला फक्त सांग काय झालंय आज ते ! - अक्षा 'माहितेय तिला , तुम्हाला काय वाटले , पोरींचे कनेक्शन आहेत बोइज होस्टेल वर , सगळ्या खबरा येतात इकडे ! - अश्विनी थोडीशी ओरडत बोलली . ' मग हे ' पण मग हे पण माहितच असेल ना की मागच्या काही दिवसापासून नित्या किती वेड्यासारखा करतोय ते ? ' बर, एक काम कर तूच सांग त्या हर्षलाला , मला अस तिच्याशी बोलणं बर नाही रे वाटत , एक तर ती जुनिअर अन अस कुणावर कुणाशी प्रेम कर कसं सांगणार ? अन नितेश ची काळजी घ्या रे , मला अजिबात करमत नाहीये , खूप काळजी वाटते तुमच्या सगळ्यांची ! अश्विनी आता रडायला आली होती ! तू नको काळजी करू - समजतंय मला , राहू दे मी कॉल करतो हर्षलाला - अक्षाने फोन कट केला . 'हर्षला , काय समजतेस तू स्वतःला ? त्या नित्याने हातावर काचेने तुझे नाव टाकलंय ? प्रेम नाही तर साधी मैत्रीतरी कर , तो टाईमपास नाही ग करत - हर्षलाला रागाने बोलाव की शांत बोलावं अक्षाला काही कळत नव्हत ! बस फक्त तो बरळत होता ! ' हे बघ अक्षय , त्याने नाव हातावर काय पण गळ्यावर जरी टाकले ना तरी काही फरक नाही पडत मला ' अन हर्षलाने फोन कट केला . दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता हॉस्पिटल मध्ये शिवेका अन अश्विनी आल्या . अक्षा, सुऱ्या , तात्या अन चंद्या बसले होते . मागोमाग हर्षला पण आत आली ! कसे काय ? - कुणाला काही माहित कळत नव्हत ! हर्षलाने झोपलेल्या नित्याकडे बघितलं अन का काय माहित पण तिने रडायला सुरवात केली . मुलींना समजन अवघड आहे बाबा ! अक्षाने नित्याला उठवलं , हर्षलाने नित्याच्या हातावर तिचा रुमाल ठेवला . ' हे काय ? - नित्या हर्षलाच्या रडणाऱ्या चेहऱ्या कडे बघत बोलला . त्याला विश्वास बसत नव्हता की हर्षला त्याच्यासाठी रडत आहे ते ! ' काही नाही , तू पण ना ! मारणारेस मला ! सगळ्यांना चुकवून आले आहे मी ! माझ्यासाठी स्वतःला नको रे काही करू ! खूप स्वार्थी आहे मी - चल शिवेका ' - हर्षला डोळे पुसत शिवेकाकडे बघत बोलली . सुजलेले तिचे डोळे सांगत होते की हर्षला रात्रभर झोपली नव्हती . शिवेका ने अक्षा कडे बघितलं पण अक्षाने शिवेकाकडे ! नजरेत दुरावा होता की आपलेपणा ? दोघानाही नाही कळाल !. शिवेका अन हर्षला दोघीही जनी सर्वासाठी नाश्ता घेऊन आल्या होत्या . त्यांनी तो टेबल वरती ठेवला अन बाहेर गेल्या . नित्याने दुसऱ्या हाताने त्या रुमालाचा वास घेतला ! हर्षला त्या रुमालात भासत होती - अन तो रुमाल त्यान उघडला . ' I AM SORRY ' रुमालाच्या कोपऱ्यात लिहिलेले वाचून त्याची सगळी जखम दूर झाली . (क्रमश :) बेधुंद - भाग १ : http://www.misalpav.com/node/34768 बेधुंद - भाग २ : http://www.misalpav.com/node/34925 बेधुंद - भाग ३ : http://www.misalpav.com/node/35006 बेधुंद - भाग ४ : http://www.misalpav.com/node/35777 बेधुंद - भाग ५ : http://www.misalpav.com/node/35798 बेधुंद - भाग ६ : http://www.misalpav.com/node/35832 बेधुंद - भाग ७ : http://www.misalpav.com/node/35859 बेधुंद - भाग ८ : http://www.misalpav.com/node/35885#new बेधुंद - भाग ९ : http://www.misalpav.com/node/35937 'बेधुंद - भाग १० :http://www.misalpav.com/node/36003 बेधुंद भाग ११ : http://www.misalpav.com/node/36353
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
1627 वाचन

💬 प्रतिसाद

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा