बादलीयुद्ध १३
"तुझ्या कॉलेजवर कँपुस येत न्हाय का रं?" असे म्हणणारे एक सदगृहस्थ गावाकडे भेटले होते. येणेप्रमाणे पुढच्याच महिन्यात कँपुस आले पण. शुद्ध भाषेत आम्ही त्याला कँपस म्हणतो. 'INFOSYS' नावाची एक सॉफ्टवेअर कंपनी कँपस इंटरव्हीव्यू घ्यायला कॉलेजवर दाखल झाली. आजूबाजूचे जवळपास तीन-चार कॉलेजेस त्यात सामील होते. ' software की manufacturing?' यावर उच्च वर्तुळात बरीच चर्चा चालत असे. शेवटी manufacturing इज बेस्ट हा आम्ही स्वत:साठी निकाल लावून घेतला. बऱ्याच जणांच मत होतं की software मध्ये 'पर्सनल आयुष्य' नावाची गोष्ट नसते. एका विशिष्ट कंपूचं असं मत होतं की " software वाल्यांची सेक्स लाईफ पण ढेपाळलेली असते".