सवाल...
सवाल
लालचुटुक ओठ तिचे
मऊसूत गाल
पापण्यांआड दडलेले
डोळे तिचे कमाल
नजरेत तिच्या तलवार
अन नजरेतच ढाल
तिरपा एक कटाक्ष
होतो मी हलाल
गाली गुलाब फुलतो
उधळीत सुगंधी गुलाल
कुरळ्या केसात फिरतो कर
करी शांतता बहाल
रोज झोपतो मी हि
ओढून स्वप्नाची शाल
सत्यात कधी उतरेल
हाच नशिबाला सवाल
राजेंद्र देवी
तीर्थरुपांच्या काही आठवणी!
आमचे देशपांडे बोलायला फार खडूस होते. खरं तर आई जास्त तिरकस बोलायची पण देशपांडे कधी हि भीड न ठेवता समोरच्याला काय वाटेल याचा विचार न करता बोलत , आई तस करत नसे आणि कधी बोललीच तर ज्याला उद्देशून ती बोलली आहे त्याला हि त्यातली खोच पटकन लक्षात येत नसे आणि त्याला लगेच प्रत्युत्तर देणे तर अजिबात जमत नसे. पण दोघाही समोरच्याचा किमान शब्दात कमाल पाणउतारा करत.
उंबरठा!
उंबरठा!
गंजल्या ओठांस माझ्या, धार वज्राची मिळूदे
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे ...
शिक्षण: धोरण, उद्दिष्ट आणि गफलती! भाग २
२. समाजाभिमुखता (सामाजिक उद्दिष्ट )
द कॅमब्रियन पट्रोल
जगातल्या सर्वोत्तम आर्मी सर्वोत्तम कश्या ठरतात ? त्यांना पहिली किंवा दुसरी जागा कशी दिली जाते, कुठल्या क्षेत्रात दिली जाते? हे मानांकन कसे ठरते, ह्या संबंधी आपल्याला खूप कुतूहल असते, कारण कोण्या एकाला सर्वोत्तम म्हणावे तर त्याची दुसऱ्या सोबत झोंबी व्हायला हवी, आर्मीच्या बाबतीत अशी झोंबी म्हणजे युद्ध, ते पैसा मानवी जीवन अन वेळ तीनही मोर्चांवर खर्चिक अन भयप्रद असते, मग एखादी फौज सर्वोत्तम आहे हे कसे ठरवतात ?
शिक्षण: धोरण, उद्दिष्ट आणि गफलती!
मी काही शिक्षणतज्ञ नाही. माझा लौकिकार्थाने शिक्षणक्षेत्र अथवा शिक्षकीपेशाशी काहीही संबंध नाही. शालेय, महाविद्यालीन शिक्षणानंतर माझा या क्षेत्राशी गेली १५-१६ वर्षे काहीही संपर्क नाही. पण माझ्यासारखे अनेक जण, ज्यांची मुलं आताशा शाळेत जाऊ लागली आहेत अशांचा, या ना त्या कारणाने शिक्षणाच्या सद्यस्थितीशी आणि एकंदर शिक्षण नावाच्या ह्या कमालीच्या गुंतागुंतीच्या आणि जराशा भीतीदायक अशा गोष्टीशी, मनात इच्छा असो वा नसो संबंध येतोच. त्यात जे मध्यम किंवा उच्च मध्यमवर्गीय गटातील पालक आहेत ते तर या बाबत जास्तच हळवे/ संवेदनशील असतात.
माहेर
असे माहेराचे घर
नसे कसली कसर
नुरे कसलाही भार
डोक्यावर
माहेराचे गणगोत
भला नात्यांचा हा पोत
प्रेम बहर भरात
ओतप्रोत
माहेराचे हे सदन
माझे स्वीकारे वंदन
असे माझाही राखून
एक-कोन
अरे माझिया माहेरा
राहो कितीही मी दूरा
फिटे दुःखाचाही भारा
मोदसारा
जन्मभर
नेसत्या वस्त्रानिशी मी
हा असा आता निघालो
ना कळे जन्मामध्ये या
काय मी कमवुन गेलो?
झाकण्या लाखो उणिवा
केवढी केली शिकस्त
दाटले आभाळ होते
मी दिखाव्यात व्यस्त
ल्यायलो रेशीम वस्त्रे
घ्यावया सन्मान खोटा
भाळलो का मी कळेणा
पाहता त्या चोरवाटा
जे मुळी नव्हतेच माझे
वाहिले आयुष्य त्यांना
वंदिले समजुन सूर्य
त्या भ्रमाच्या काजव्यांना
जाहला सूर्यास्त जेव्हा
पांगले सारे घरोघर
मग जणू मिटताच डोळे
जाणिला गुंता खरोखर
कातर वेळ
कातर वेळी आभाळ भरुन
येणं फार वाईट असतं
----
संध्याकाळची ती वेळ
एकटाच खिडकीत उभा राहून
नुकत्याच अवतरलेल्या चंद्राकडे
पहात उभा होतो
कशी कोण जाणे पण
तुझी आठवण
त्या भरून आलेल्या
ढगांबरोबर वाहत आली
---
कातर वेळी आभाळ भरुन
येणं फार वाईट असतं
----
आभाळ इतकं भरलं
ढगांनी इतकी दाटीवाटी केली की
त्यांना आभाळ पुरेना
कोणता ढग कोणत्या ढगात
विलीन होतोय तेच कळेनास झालं
आणि मग गडगडाटाने सारा
आसमंत भरुन गेला
या सगळ्या गोंधळात
तो चंद्र दिसेनासा झाला
अन्