जन्मभर
लेखनविषय:
काव्यरस
नेसत्या वस्त्रानिशी मी
हा असा आता निघालो
ना कळे जन्मामध्ये या
काय मी कमवुन गेलो?
झाकण्या लाखो उणिवा
केवढी केली शिकस्त
दाटले आभाळ होते
मी दिखाव्यात व्यस्त
ल्यायलो रेशीम वस्त्रे
घ्यावया सन्मान खोटा
भाळलो का मी कळेणा
पाहता त्या चोरवाटा
जे मुळी नव्हतेच माझे
वाहिले आयुष्य त्यांना
वंदिले समजुन सूर्य
त्या भ्रमाच्या काजव्यांना
जाहला सूर्यास्त जेव्हा
पांगले सारे घरोघर
मग जणू मिटताच डोळे
जाणिला गुंता खरोखर
जन्मभर केला दिखावा
मानुनी आयुष्य त्याला
खेळ सारा जीवनाचा
तो चितेवर ज्ञात झाला
- शार्दुल हातोळकर
वाचने
1972
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
फार
मनापासुन आभार __/\__
In reply to मनापासुन आभार __/\__ by शार्दुल_हातोळकर
प्रत्येक कवी हा बोलका रसिक
छान कविता!
@जे मुळी नव्हतेच माझे
खुप सुंदर काव्य ! कवी तूम्ही
क्या बात है ! सर्वांना दंडवत !
अप्रतीम...आवडली..
खुप
खुप
सुंदर कविता !
मनापासुन धन्यवाद मंडळी !