...लहान दिवा लवकर विझतो!
खूप दिवसांपासून लिहायचे होतेया विषयावर, पण राहून जात होते. कालच्या प्रसंगाने मात्र मला लिहायची इच्छा आवरता आली नाही.
खूप दिवसांपासून लिहायचे होतेया विषयावर, पण राहून जात होते. कालच्या प्रसंगाने मात्र मला लिहायची इच्छा आवरता आली नाही.
मराठी विकिपीडियावरील येथील नोंदीनुसार खालील साहित्यिकांचे मृत्यू सुमारे ६० वर्षां पुर्वी इ.स. १९५६ या वर्षात झाले होते म्हणून भारतीय कॉपीराईट कायद्यानुसार त्यांचे लेखन १ जानेवारी २०१७ पासून कॉपीराईट मुक्त होणे अभिप्रेत आहे.
(मूळ कविता, त्यातल्या कल्पना सुरेख आहेत. उगाच टैमपास म्हणून हे विडम्बन. अजून बरे होऊ शकले असते..)
नाक गळतंय माझं
तसं ते नेहमीच गळतं
पण पाऊस आला की
येतात जोराच्या
दोन चार शिंका
अन नाक येते
कफही होतो जरासा
नाक गळतंय माझं
रुमाल ओलागिच्च झालाय
केंव्हाचं तुंबलंय
वाट पाहतेय निचरा होण्याची
हाताशी व्हिक्स आहेच
पण विकोरील मिळेना..
जौदे ,निचरेल ... आपोआप
टेस्ट मॅच आणि तसं पाहयला गेलं तर फर्स्ट क्लासची कोणतीही मॅच जिंकण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या गोष्टी कोणत्या?
या प्रश्नाचं उत्तर खरंतर अगदी साधं आहे ते म्हणजे भरपूर रन्स करणारे बॅट्समन, २० विकेट्स घेऊ शकणारे बॉलर्स, बर्यापैकी विकेटकीपर आणि फिल्डर्स... आणि महत्वाचं म्हणजे नशिब!
माझ्या वाचनाचं कौतुक
तुमच्या डोळ्यांत दिसायचं
आता अक्षरंच तरंगतात अश्रूंवर
आता कसं वाचायचं?
आपण सगळेच जाणतो की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या आईवडिलांची भूमिका फार फार महत्वाची असते. आयुष्य चालत राहतं,काळ वाहत राहतो आणि एक दिवस आपल्याला आई किंवा वडिलांचा कायमचा वियोग सहन करावा लागतो.
NRI वेल्फेअर कमेटी,
आहार आणि आरोग्य विभाग,
ब्रँच पटाया (थायलंड).
बैठक ठिकाण :- हॉटेल दुसितथानी, नॉर्थ पटाया, चोनबुरी प्रोव्हिन्स.
दिनांक :- ०४ सप्टेंबर २०१६ (रविवार)
वेळ :- सायंकाळी ७ वाजता.
नमस्कार,
फेब्रुवारीमधे कन्याकुमारी येथे जाणार आहोत. तर सोबत मदुराई, रामेश्वरम ही करावे असा मानस आहे.
बरोबर ज्येष्ठ नागरिक आहेत. लेडीज फक्त. तीर्थाटनाचाच उद्देश आहे. ट्रेन व बसनेच प्रवास करणार आहोत. शक्य झाले तर एका बाजुने विमानप्रवास होउ शकतो.
कुणाला या स्थळांचा म्हणजे मदुराई, रामेश्वरचा काही अनुभव, तसेच राहण्या/खाण्यापिण्याची व्यवस्था, जवळपासची मन्दिरे, कुठ्ला रुट सोपा पडेल इ माहिती असल्यास मार्गदर्शन करावे.
धन्यवाद!
बेडसे लेणी म्हणजे खरच कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार. अतिशय सुंदर आणि रेखीव लेणी बघुन मनाला खुप छान वाटत।
दरवर्षी बुद्धपोर्णिमेदरम्यान वनविभागातर्फे घेतली जाणारी वन्यजीवगणना वन्यजीव प्रेमींसाठी पर्वणीचं असते. वर्षभर वन्यजीवप्रेमी ह्या गणनेची आतुरतेने वाट पाहत असतात. मी देखील त्याला अपवाद नाही. ह्या गणनेमुळे वन्यजीव प्रेमींना खरया अर्थाने जंगल जवळुन बघायला व अनुभवायला मिळते.