वृंदा१ in जे न देखे रवी... 27 Dec 2016 - 11:13 pm माझ्या वाचनाचं कौतुक तुमच्या डोळ्यांत दिसायचं आता अक्षरंच तरंगतात अश्रूंवर आता कसं वाचायचं? वाङ्मय प्रतिक्रिया फार सुरेख लिहिलंय. 29 Dec 2016 - 2:58 pm | पद्मावति फार सुरेख लिहिलंय. धन्यवाद पद्मावतिजी. 30 Dec 2016 - 1:41 pm | वृंदा१ धन्यवाद पद्मावतिजी. वडील 30 Dec 2016 - 1:44 pm | वृंदा१ डोळे उघडे असोत वा मिटलेले तुम्ही दिसता समोर थेट जीव कोसळतो कणाकणानं साहवत नाही हो अशी भेट अप्रतिम लिहिता तुम्ही. एक 30 Dec 2016 - 7:26 pm | पद्मावति अप्रतिम लिहिता तुम्ही. एक सजेस्ट करू का? या तुमच्या लघु कविता एकेका थीम प्रमाणे ( उदाहरणार्थ वडील ) कंपाइल केल्या तर वाचायला सोपं जाईल. लिहीत राहा. वडील 1 Jan 2017 - 1:29 pm | वृंदा१ उठल्यावर पहिला नमस्कार तुम्हाला तो पोहोचला हे लगेच कळतं त्याशिवाय का डोळ्यांत पाणी जमत माझ्या वाचनाचं कौतुक तुमच्या डोळ्यांत दिसायचं आता अक्षरंच तरंगतात अश्रूंवर आता कसं वाचायचं? डोळयांसमोर झळाळतं तुमचं राजस रूप भेटत जा ना स्वप्नांत बोलत जाऊ खूप प्रत्यक्षाहूनही उत्कट तुमचे सततचे भास मन थकून जातं पण संपत नाही आस... आता कसली कोजागिरी आणि कसलं काय भरलेल्या डोळ्यांवर आठवांची साय.... डोळे उघडे असोत वा मिटलेले तुम्ही दिसता समोर थेट जीव कोसळतो कणाकणानं साहवत नाही हो अशी भेट या असल्या शिक्षेपेक्षा परवडला तुमचा राग कशानेच शांत होत नाही हो ही अंतरातली आग.....
प्रतिक्रिया
29 Dec 2016 - 2:58 pm | पद्मावति
फार सुरेख लिहिलंय.
30 Dec 2016 - 1:41 pm | वृंदा१
धन्यवाद पद्मावतिजी.
30 Dec 2016 - 1:44 pm | वृंदा१
डोळे उघडे असोत वा मिटलेले
तुम्ही दिसता समोर थेट
जीव कोसळतो कणाकणानं
साहवत नाही हो अशी भेट
30 Dec 2016 - 7:26 pm | पद्मावति
अप्रतिम लिहिता तुम्ही. एक सजेस्ट करू का? या तुमच्या लघु कविता एकेका थीम प्रमाणे ( उदाहरणार्थ वडील ) कंपाइल केल्या तर वाचायला सोपं जाईल. लिहीत राहा.
1 Jan 2017 - 1:29 pm | वृंदा१
उठल्यावर पहिला नमस्कार तुम्हाला
तो पोहोचला हे लगेच कळतं
त्याशिवाय का डोळ्यांत पाणी जमत
माझ्या वाचनाचं कौतुक
तुमच्या डोळ्यांत दिसायचं
आता अक्षरंच तरंगतात अश्रूंवर
आता कसं वाचायचं?
डोळयांसमोर झळाळतं
तुमचं राजस रूप
भेटत जा ना स्वप्नांत
बोलत जाऊ खूप
प्रत्यक्षाहूनही उत्कट
तुमचे सततचे भास
मन थकून जातं
पण संपत नाही आस...
आता कसली कोजागिरी
आणि कसलं काय
भरलेल्या डोळ्यांवर
आठवांची साय....
डोळे उघडे असोत वा मिटलेले
तुम्ही दिसता समोर थेट
जीव कोसळतो कणाकणानं
साहवत नाही हो अशी भेट
या असल्या शिक्षेपेक्षा
परवडला तुमचा राग
कशानेच शांत होत नाही हो
ही अंतरातली आग.....