फुल्ल प्रुफ पिलानः एक हसीन सपना

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in जनातलं, मनातलं
11 Jan 2017 - 6:16 pm

म्येंरें प्यारँ द्येषवाषियों,

जनता की खास मांगपर, सतत की डीमांडपर, एटीएमकी रांगपर फुल्लपुरुफ प्ल्यान लाया हूं. बोलो जाहीर करुं के नं करुं.... बोलो करुं के नं करुं.... करुं के नं करुं.... लो कर दिया.....

--------------------------------------
नोटाबंदीच करायची असती तर कशी करता आली असती तर ही एक आयडीया. मनोरंजन आहे, फिक्शन म्हणून वाचा. पण आता पर्यंतचे नोटाबंदीबद्दलचे सर्व वाचलेले विसरून वाचावे लागेल. लर्न टू अनलर्न! (पण हे अनलर्न लर्नलेले कसे अनलर्नलायचे??)

मुख्य व एकमेव उद्देशः नोटाबंदीने फक्त काळा पैसा 'नष्ट' करायचा आहे.

धोरणविचार

छत्रपती शिवराय आणि आपण

कर्रोफर नमुरा's picture
कर्रोफर नमुरा in जनातलं, मनातलं
11 Jan 2017 - 5:29 pm

चला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला पुन्हा आठवले!

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावामध्ये महाराज जोडून ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यात येणार आहे. छत्रपतींचा यथोचित मान राखणे चांगले आहे.
पण मुळात, ज्या क्षेत्राचा छत्रपती शिवाजी महाराजांशी काही संबंधच नाही, त्याला त्या राजर्षीचे नाव देण्यात रम्यत्व काय? जे महाराजांशी अंतस्थ निगडित आहेत, ते छत्रपतींचे गडकिल्ले ढासळत आहेत, त्याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही.

समाजविचार

भरली भेंडी प्रकार तिसरा (मायक्रोवेव्ह स्पेशल)

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in पाककृती
11 Jan 2017 - 3:26 pm

भरली भेंडी(मायक्रोवेव्ह स्पेशल)-प्रकार तिसरा

तो राजहंस एक !

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
11 Jan 2017 - 3:19 pm

२००४-०५ चा तो काळ. भारतीय क्रिकेट संघ बऱ्यापैकी स्थिरावलेला. आता या संघात नवीन कुणी नको असं वाटायचं. आणि तो आला ! बलाढ्य शरीर, पिंजारलेले लांब सोनेरी केस, डोळ्याला गॉगल,आणि विकेटकीपरचे हेल्मेट ह्या अवतरामुळे त्याचा चेहरा कधी नीट दिसताच नव्हता. तो म्हणे भारताचा नवीन विकेटकीपर होता. नाव -महेंद्रसिंग धोनी! भारतीय क्रिकेटला विकेटकीपरची समृद्ध आणि लांबलचक अशी परंपरा लाभली आहे. दर दोन-तीन महिन्याला नवीन कोणीतरी यायचा. त्याच कारण म्हणजे भारतात विकेटकीपर हे नेहमीच एक स्वतंत्र संस्थान असायचं. त्यांचा काम म्हणजे चेंडू थोपवणं एवढंच!

क्रीडाप्रकटन

निळावन्ती

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
11 Jan 2017 - 2:46 pm

मग निळ्या दरीतुन हाक
येताच काफिला उठला
नक्षत्रजडित रात्रीला
हु॑दका अनावर फुटला

त्या निळ्या दरीच्या गर्भी
घननीळ गूढसे काही
नि:शब्द काफिला भोगी
ती पिठुर रानभुल देही

काफिल्यात विरघळताना
गारूड निळेसे पडले
की स्वप्न निळावन्तीचे
मी माझ्यावर पा॑घरले

अद्भुतरसकविता

बोलू नकोस काही

किरण कुमार's picture
किरण कुमार in जे न देखे रवी...
11 Jan 2017 - 11:29 am

बोलू नकोस काही
मज कळतात भावना त्या
नको आठवू पुन्हा
मज स्मरतात यातना त्या

तू शब्द होवूनी यावे
मजसंगे बोलायाला
मी स्तब्ध उभा केव्हाचा
तूजसंगे चालायाला

तू गीत होवूनी यावे
त्या माझ्या वाटेवरती
मी आतूर उभा केव्हाचा
अन काटे अवतीभवती

मी झिजलो आहे येथे
भिजण्याच्या त्या आशेने
मी रडलो आहे येथे
विरहाच्या त्या भाषेने

येणा-या झुळकेपाठी
मी असाच का मग फसतो
पाहूनी माझी प्रतिमा
मज भास तूझा हा असतो

प्रेमकाव्य

हवा हवाई कुसकूस- किनवा टिक्की

लीना कनाटा's picture
लीना कनाटा in पाककृती
11 Jan 2017 - 7:54 am

उपकरण : एयर फ्रायर

कृती :

कुसकूस (गरम पाण्यात भिजवून), किनवा (शिजवून), मॅश्ड पोटॅटो, हिरवे वाटणे, मक्याचे दाणे, धने - जिरे पूड, लाल तिखट, मीठ स्वादानुसार, कोथंबीर एकत्र मळून घ्यावे. त्यात चवी प्रमाणे थाई रेड चिली सॉस आणि किसलेले चीज टाकावे.

आता या मिश्रणाच्या टिक्क्या कराव्यात. त्या ब्रेड क्रम्प्स मध्ये घोळवून घ्याव्यात.

तेलात तळण्या ऐवजी हवेवर एका बाजूने १५ मिनिटे तर दुसऱ्या बाजूने साधारणतः १२ मिनिटे तांबूस सोनेरी होई पर्यंत तळाव्यात.

बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट हवा हवाई कुसकूस- किनवा टिक्कीज तयार.

दक्षिण घळ: भाग २

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
11 Jan 2017 - 12:14 am

दक्षिण घळ : भाग १

"म्हणजे नक्की काय बघणार आहेस तू आप्पा?" दाजींनी त्याला विचारल.

"दाजी आपली दक्षिण वेसेकडची घळ आहे ना तिथल्या दरीत मी एक लहानसं खोपट केलं आहे. तसंही गावकरी त्याबाजूला जात नाहीत. उगाच तिथे भुताचा वावर आहे अस कधीतरी कोणीतरी पिकवून दिल आहे. त्याचा फायदा घेऊन मी तिथली जागा निवडली आहे. काल कोण कोण आलेत मला माहित नाही. कारण त्याची वर्दी मला नव्हती. पण तुम्ही काळजी करू नका. आपल्या गावात कोणालाही माझ्या या कामाची खबर नाही. त्यामुळे आज रात्री मी त्याना तिघाना त्या खोपटाकडे हलवतो." आप्पा म्हणाला.

कथा

महाराष्ट्राचे दुर्गसंवर्धन आणि आपण

कर्रोफर नमुरा's picture
कर्रोफर नमुरा in जनातलं, मनातलं
11 Jan 2017 - 12:06 am

महाराष्ट्र सारखा ज्वलंत इतिहास आणि ऐतिहासिक वारसा क्वचितच कुठल्या राज्याला लाभला असेल. क्षेत्रफळाचा विचार करता एकट्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण एवढे किल्ले जरी मोजले तरी त्याच्या अर्धे किल्लेही दुसऱ्या राज्यात नसतील. पण, कर्नाटक, गोवा, राजस्थान, तामीळनाडू व इतर राज्यात जशी जोपासना किल्ल्यांची आणि इतर ऐतिहासिक वारशांची झाली तशी ती महाराष्ट्रात होत नाही. हा आपला कर्मदरिद्रीपणाच म्हणावा लागेल. समाज आणि प्रशासन दोन्ही आघाड्यांवर आपण अपयशी ठरलोय. राज्य सरकारने तर मुंबई उच्च न्यायालयात एका जनहीत याचिकेच्या सुनावणी वेळी, ऊन-पाऊस-वाऱ्यामुळे किल्ल्यांची वाताहात झाली असे प्रतिज्ञापत्र दाखल केले.

इतिहासविचार