Skip to main content

बोलू नकोस काही

लेखक किरण कुमार यांनी बुधवार, 11/01/2017 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
बोलू नकोस काही मज कळतात भावना त्या नको आठवू पुन्हा मज स्मरतात यातना त्या तू शब्द होवूनी यावे मजसंगे बोलायाला मी स्तब्ध उभा केव्हाचा तूजसंगे चालायाला तू गीत होवूनी यावे त्या माझ्या वाटेवरती मी आतूर उभा केव्हाचा अन काटे अवतीभवती मी झिजलो आहे येथे भिजण्याच्या त्या आशेने मी रडलो आहे येथे विरहाच्या त्या भाषेने येणा-या झुळकेपाठी मी असाच का मग फसतो पाहूनी माझी प्रतिमा मज भास तूझा हा असतो आता उगाच क्षणभर मी डोळे मीटूनी बसतो ह्रदय खोलूनी माझे मी तूला भेटूनी हसतो
लेखनविषय:

वाचने 2047
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

ॲनी वे, छान कविता! या कडव्यात...
तू गीत होवूनी यावे त्या माझ्या वाटेवरती मी आतूर उभा केव्हाचा अन काटे अवतीभवती
. . .
तू गीत होवूनी यावे मी आतूर वाटेवरती उभा, माझ्या घेऊन काटे अवतीभवती
असा बदल करून पहा...नॉट जबरदस्ती! Sandy

रचना आणि आशय दोन्ही खुपच छान आहे. नकळतच "मी झिजलो आहे येथे" या कडव्यामुळे मला कवीवर्य सुरेश भट यांच्या "इतकेच मला जाताना सरणावर कळले होते" या गझलची आठवण झाली!

नितांत सुंदर रचना, खूप आवडली. सौमित्रच्या "पाऊस पडून गेल्यावर.." च्या चालीवर म्हणून पहिली:)...व्वा!