लकुंडी-हंपी-ताडपत्री-बेलमच्या गुहा-यागंती-गंडीकोट-ऐहोळे-पट्टडकालू-बदामी ....भाग - ३
आज या भागात आपण भारवाहकांबद्दल वाचणार आहोत. देवळांचा सर्वात खालच्या थरांनंतर भितींच्या टोकावर यांची शिल्पे सर्व देवळांवर आढळतात. ज्याठिकाणी तुळया येतात किंवा खांबावर छताचा भाग येतो त्यावर हे शिल्प आढळतेच. नुसता सांधा ठेवण्यापेक्षा हे वजन कोणीतरी उचलते आहे ही कल्पना करुन हे शिल्प तेथे लावणे ही कल्पनाच मला मोठी रम्य वाटते. सगळ्यात दुर्लक्षित अशी ही मूर्ती. सगळ्यात अभ्यासावेत तर त्यांच्या चेहर्यावरील हावभाव. सगळ्यात खाली असतात त्यांच्या चेहर्यावर जरा त्रासिक भाव मला आढळतो तर जसे जसे वर जात जाऊ तसे वजन हलके झाल्यामुळे त्यांच्या चेहर्यावरील भाव सौम्य व प्रसन्न होत जातात.