अंजलीची गोष्ट - थेरपी

aanandinee's picture
aanandinee in जनातलं, मनातलं
14 Mar 2017 - 10:08 am

वैधानिक इशारा : गोष्टीची वैद्यकीय पार्श्वभूमी आणि माझी लेखनशैली या दोन्हीमुळे माझ्या लिखाणात इंग्रजी शब्दांचा वापर अधिक असणार आहे. आपल्याला ते खटकत असेल तर कृपया या गोष्टी वाचण्यात वेळ वाया घालवूच नका .

कथालेखविरंगुळा

वर्ल्डकप क्लासिक्स - १९७५ ते २०१५ - जायंट किलर्स

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
13 Mar 2017 - 10:23 pm

वर्ल्डकपच्या इतिहासात अनेक अविस्मरणीय आणि थरारक मॅचेसबरोबरच काही कमालीच्या कंटाळवाण्या आणि एकतर्फी मॅचेसही अनेकदा झालेल्या आहेत. खासकरुन टेस्ट दर्जा असलेल्या संघांबरोबरच आयसीसीने क्रिकेटचा प्रसार करण्याच्या हेतूने टेस्ट दर्जा नसलेल्या संघांचाही वर्ल्डकपमध्ये समावेश करण्यास सुरवात केल्यावर हे प्रमाण वाढलेलं दिसून येतं, इतकं की २०१९ चा इंग्लंडमधला वर्ल्डकप हा १० देशांमध्येच खेळवण्याचा आयसीसी ने निर्णय घेतला आहे! हा निर्णय काहीसा वादग्रस्तं असला तरी निरर्थक मॅचेसची संख्या कमी होण्यास हातभार लावणारा आहे हे देखिल तितकंच खरं.

क्रीडालेख

खिडकी पलीकडचं जग

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
13 Mar 2017 - 9:37 pm

खिडकी पलीकडचं जग

भाग १

गौरी नावासारखिच गोड, मोहक आणि बड़बडया स्वभावाची मुलगी होती. लाघवी आणि मित्र-मैत्रिणींचा मोठा परिवार असलेली. कायम पहिला नंबर वगैरे नाही... पण तशी हुशार म्हणण्या सारखी. आई-बाबांची एकुलती आणि लाडकी लेक. गौरी उत्तम चित्र काढायची. त्यामुळे शाळेतून तिला वेगवेगळ्या स्पर्धाना देखील पाठवाल जायचं. अनेकदा तिने शाळेला बक्षीस मिळवून दिल होत.

kathaa

किमया

संदीप-लेले's picture
संदीप-लेले in जे न देखे रवी...
13 Mar 2017 - 9:27 pm

यान झेपावले, त्याने धरा सोडली
ते पाहण्या, जगाने मान उंचावली

शत विसुक्ष्म ग्रह, स्थिरावले कक्षी
ना उसंत, त्यांनीही मान उंचावली

डॉलर घेउनी, सेवा जगाला दिली
आज रुपयानेही मान उंचावली

अद्भुत अजब किमया पाहून ही
डोळे पाणावले नी मान उंचावली

वीररसकविता

मुळांनी जमिनीशी अबोला धरून-- संदीप चांदणे

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
13 Mar 2017 - 3:51 pm

आज सत्तरच्या आसपास वय असलेल्या पिढीतील माणसांची परिस्थिती विचित्र झाली आहे. ते लहानपणी ज्या मध्यमवर्गीय वातावरणात वाढले ते आता कल्पनेतले विश्व झाले आहे. त्यांनी लहानपणी आई-वडिलांचे फटके खाल्ले, मोठ्या भावाचे शर्ट वापरले, जुनी पाठ्यपुस्तकेच शाळेत नेली. घरातली कुठलीही गोष्ट सर्वांनी वाटून घेतली, पण यात काही गैर आहे, असे कधी त्यांना वाटलेच नाही. घरात वडीलधार्‍या माणसांचे प्रेम, थोरल्या भावा-बहिणीची माया ममता यांचे न दिसणारे पण आश्वासक असे कवच घराच्या सगळ्या वातावरणात भ्ररलेलेच असे. भांडणे, रुसवे-फुगवे असतच पण त्याची मर्यादा काय असावी हेही आपोआप कळत असे.

कविताआस्वाद

तुझे रंग

परशु सोंडगे's picture
परशु सोंडगे in जे न देखे रवी...
13 Mar 2017 - 11:49 am

तुझे रंग माझ्यात
विरघळून गेलेत
जसे स्वच्छ पाण्यात
अलगद पांगत जावेत
रंग....
आता तुझे रंग कोणते
आणि माझे रंग
कोणते मला कुठं
ओळखता येतात ?
तुझ्यात माझे विरघळलेले रंग
मलाच ओळखता येत नाही
हे तू नुसता पहात हासत
राहिलास..
तुझ्या चेह-यावर पांगत गेलेले
हासण्याचेते चावट रंग
तुला तरी कुठं लपवता आले ?
माझे तुझ्यात मिसळलेले रंग
अलिप्त करावं म्हटलं तर...
ते कुठं शक्य होतं आता.
अख्ख जाळावचं लागेल माझे मला
मी जळून जळून
गेल्यावर उरतील खाली रंग

kelkarशृंगारकविता

मिपा शिमगा २०१७ : बोंबलु नका रे ऽऽऽ ...!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
13 Mar 2017 - 10:15 am

राम राम मंडळी, सर्व मिपाकरांना, वाचकांना, मालकांना, तंत्रज्ञ आणि मिपा व्यवस्थेतील सर्वांना होळी आणि धुलीवंदनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा....!

सुभाषितेविचारप्रतिसाद

मरासिम

मिडास's picture
मिडास in जनातलं, मनातलं
13 Mar 2017 - 9:05 am

अजून पण ती रात्रं लख्ख आठवतोय मला. बाबांनी walkman घेतला होता. आणि त्याच दुकानातून जगजीत सिंग ची एक कॅस्सेट. दुकानातून बाहेर पडल्या पडल्या मी त्यांच्या हातातून walkman काढून घेतला होता. इअर प्लग कानात सारून मी प्ले चं बटण दाबलं. गिटार ची जीवघेणी सुरावट कानातून सरळ मेंदूत घुसली होती. पाठोपाठ जगजीत सिंग चा आवाज मनात हळूच शिरला.

कोई ये कैसे बतायें के वो तनहा क्यू है.

संगीतमुक्तकगझलप्रकटनआस्वादसमीक्षाअनुभव

टोरोंटो, कॅनडा इथे कोणी मिपाकर वास्तव्यास आहेत का?

ट्रेड मार्क's picture
ट्रेड मार्क in जनातलं, मनातलं
12 Mar 2017 - 11:57 pm

टोरोंटो, कॅनडा इथे कोणी मिपाकर वास्तव्यास आहेत का?

मला तिथल्या वास्तव्याविषयी थोडी माहिती पाहिजे.

जीवनमानचौकशी