आई
आई
जिचं प्रेम मोजता येत नाही ती आई...
उगवत्या सूर्याची तेज आई...
काटेरी वनातल नाजूक फुल आई...
पावसाळ्यातली छत्री, थंडीतली शाल,
उन्हाळ्यातली सावली जिच्या पदरात
आहे ती आई पहिला श्वास म्हणजे आई...
आयुष्याच्या पुस्तकातील पहिले पान आई...
घरातल्या घरात गजबजलेल गाव आई...
घराचा पाया, मंदिरातील देव आई...
समईतून उजेड देणारा धागा आई...
मायेचा फटका, जेवणातल मीठ आई...
प्रश्नाला पडलेले उत्तर आई...
बहिर्याचे कान लंगड्याचा पाय
वासराची गाय तशी लेकराची माय आई...
सरतही नाही आणि पुरतही नाही अशी