रियल रियल

Primary tabs

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
14 May 2019 - 5:16 pm

बरे झाले मीराबिरा, राधागिधा तेव्हाच होऊन गेल्या....
मिनिटाला मेसेज, तासाला कॉल, हाऊ आर यूच्या
लिक़्विड जमान्यात
प्रेमबिम, हळवेबिळवे, मनात संगत
ओहो....ते काय असते आणि?
आठवण बिठवण वेड्यांचा बाजार...
एक कॉल मारायचा
नाहीतर मेसेज धाडायचा
बात करनेका मामला खतम.

मनात आठवण, झुरणे बिरणे
अरेरे, हाताबाहेरच्या केसेस...
डिजीटल डिजीटल फिजिकल फिजिकल
एवढेच काय ते रियल रियल
बाकी जग तो मृगजल मृगजल...

मीराबाई मीराबाई,
तो तुम्हाला उन्हात भासे....
राधाबाई राधाबाई,
तो तुम्हाला जलात दिसे....
भ्रम भ्रम भ्रम भ्रम भ्रम
नुसते नुसते भ्रम.....

बरे झाले बायांनो
तुम्ही भ्रमात जगलात, भ्रमातच गेलात.
छळ झाला, नाव गेले,
तुमच्या प्रामाणिक भ्रमावर
किमान कृष्णाने तरी प्रश्न विचारला नाही...
बरे झाले थोर झाले
तेव्हाच गेलात, जेव्हा
प्रेम प्रेमच होते.

उरल्या तुमच्या दंतकथा
करू ना त्यांचे digitization
फॉरवर्ड करू फटाफट, नाही कसले हेज्जीटेशन...
मिनिटाला मेसेज, तासाला कॉल, हाऊ आर यूच्या
लिक़्विड जमान्यात
तुमचे भ्रम नव्याने जपू
पण, प्रेम म्हणताच प्रश्न विचारू....

-शिवकन्या

अनर्थशास्त्रइशाराकविता माझीकाणकोणफ्री स्टाइलभावकवितामाझी कवितामांडणीवावरसंस्कृतीकविताप्रेमकाव्यमुक्तकसाहित्यिकसमाज

प्रतिक्रिया

mrcoolguynice's picture

14 May 2019 - 5:37 pm | mrcoolguynice

अरे मनमोहना,
कळली देवा तुला, राधिका
रे राधिका
कळली राधिका रे कळल्या
गोपिका
साधी भोळी मीरा तुला
कळली नाही
तुझीमाझी प्रीत कधी
जुळली नाही

सात सुरांवर तन-मन नाचे
तालावरती मधुबन नाचे
एक अबोली होती फुलली
तिच्याकडे नजर तुझी
वळली नाही

धुंद सुगंधी यमुना लहरी
उजळून आली गोकुळ नगरी
जीवन माझे अंधाराचे
काळी काळी रात कधी टळली
नाही

उन्हात काया, मनात छाया
कशी समजावू वेडी माया
युग युग सरले, डोळे भरले
आशेची कळी कधी फुलली
नाही

गड्डा झब्बू's picture

14 May 2019 - 8:57 pm | गड्डा झब्बू

लई झ्याक.

सस्नेह's picture

14 May 2019 - 9:08 pm | सस्नेह

मार्मिक !

श्वेता२४'s picture

15 May 2019 - 8:07 am | श्वेता२४

नेहमीप्रमाणे छान कविता. आवडली