✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दाराआडची मुलगी

श — शिव कन्या, Wed, 04/03/2019 - 21:47
एक मुलगी दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? स्वत:च्या बाहेर, समुद्राच्या पार जिथे एक मुलगा बसला आहे स्तब्ध.... करत असेल का तो ही तिचा विचार? जात असेल का तो ही स्वत:च्या बाहेर, समुद्राच्या पलीकडे? मुलगी दाराआडून बाहेर येऊ शकत नाही... मग ती तिचे संपूर्ण डोळे पाठवते, ते डोळे डोळ्यात घेऊन मुलगा शांतपणे जागा राहतो.... डोळे हरवलेली मुलगी घर नसलेल्या दाराआडून बघत राहते... बघतच राहते.... -शिवकन्या

प्रतिक्रिया द्या
22058 वाचन

💬 प्रतिसाद (28)

हम्म

तुषार काळभोर
Wed, 04/03/2019 - 22:56 नवीन
काहीतरी गहन अर्थ आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद. गहन अर्थ लावू पाहताय

शिव कन्या
गुरुवार, 04/04/2019 - 08:39 नवीन
धन्यवाद. गहन अर्थ लावू पाहताय....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

गूढ गहन! एखाद्या कोड्यासारखी

सोन्या बागलाणकर
गुरुवार, 04/04/2019 - 04:42 नवीन
गूढ गहन! एखाद्या कोड्यासारखी कविता. आवडली.
  • Log in or register to post comments

सगळे डोळे तसे कोडेच ....

शिव कन्या
गुरुवार, 04/04/2019 - 08:40 नवीन
सगळे डोळे तसे कोडेच .... धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोन्या बागलाणकर

अजून तरी नाही कळाली..

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 04/04/2019 - 09:48 नवीन
ही कविता त्या चर्चिलचा सिगार आणि व्हिस्की बॉटल च्या कोड्या सारखी आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

छान!

अन्या बुद्धे
गुरुवार, 04/04/2019 - 10:47 नवीन
छान!
  • Log in or register to post comments

सुरेख

अभ्या..
गुरुवार, 04/04/2019 - 11:52 नवीन
माझ्याच डोळ्यांनी वाचली कविता भिंतीला दरवाजा नव्हता पाठवलेल्या डोळ्यांनी वाचली कविता दरवाज्याला भिंती नव्हत्या. . मस्त
  • Log in or register to post comments

????

तुषार काळभोर
गुरुवार, 04/04/2019 - 12:27 नवीन
आरं ते काय कमी गहन आहे का... तू अजून क्रिप्टीक केलंस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अभ्या भौ

शिव कन्या
गुरुवार, 04/04/2019 - 21:28 नवीन
जाणत्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

डोले

तिमा
गुरुवार, 04/04/2019 - 13:41 नवीन
मी डोलेकर, डोलेकर, डोलेकर दर्याचा राजा!
  • Log in or register to post comments

काय कळले नाही

राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 04/04/2019 - 15:37 नवीन
मुलगी कुठे बसलेय? कोकणात? मुंबईत? मुलगा कुठे बसलाय? दुबईत? साउथ आफ्रिकेत?मादागास्कर मध्ये? मुलगी दाराबाहेर का येउ शकत नाही? दाराला घर नाही म्हणजे काय? डोळे पाठविले म्हणजे काय? निस्ता राडाsssss
  • Log in or register to post comments

न समजलेल्या प्रामाणिकांनीनी

गवि
गुरुवार, 04/04/2019 - 15:58 नवीन
न समजलेल्या प्रामाणिकांनीनी इकडे रांग लावावी. अर्थाबद्दल काही हताश अंदाज: -नेत्रदान श्रेष्ठ दान -स्त्रीवरील बंधने -क्रूझ शिप कंपनी -कोडाईकॅनालचे भूछत्र -कॅनाबीज कायदेशीर करा आंदोलन -कोंकणात समुद्रकिनाऱ्यावर आपले स्वप्नातील टुमदार घर (स्वतंत्र सातबारा व N/A प्लॉट्स) की आणखी काही?
  • Log in or register to post comments

अजुन काही अंदाज

राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 04/04/2019 - 16:05 नवीन
नाणार प्रकल्पाला विरोध कोकणात किनार्‍यावर शॅक्स लावायला परवानगी सी आर झेड कायद्याचे उल्लंघन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अय्यो रामा.

गवि
गुरुवार, 04/04/2019 - 16:07 नवीन
अय्यो रामा. खरंच की. या बाजू कशा निसटल्या .. ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

उगाच गुंतागुंत होत्येय

गामा पैलवान
Fri, 04/05/2019 - 01:35 नवीन
गवि, उगाच गुंतागुंत वाढत्येय. ही एकदम सोप्पी कविता आहे. सार्वजनिक संडासात बसून मोबाईलवर च्याटिंग केलेलं दिसतंय. आ.न., -गा.पै. तळटीप : मुलगा मात्र उघड्यावर बसलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

कोंकण...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/04/2019 - 16:17 नवीन
>>>कोंकणात समुद्रकिनाऱ्यावर आपले... मलाही असंच वाटतं. समुद्रकिना-यावर वाळूत एक खोपा असावा. तो असावा, मग सोबत ''हम तूम बने एक दूजे के लीये'' गाणं असावं. किराणा आणायला तो गेलेला असल्यामुळे मुलगी बंद दाराआड़ून त्याची वाट पाहते, खूप सुंदर कल्पना आहे. -दिलीप बिरुटे (बंद दाराआड तांदूळ निसायला घेतलेला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

:)))

शिव कन्या
गुरुवार, 04/04/2019 - 21:29 नवीन
:)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

क्रिप्टिक.

प्रचेतस
गुरुवार, 04/04/2019 - 16:41 नवीन
क्रिप्टिक. कोडं सुटता सुटता परत नव्या कोड्यात अडकतंच जावं अशी.
  • Log in or register to post comments

गहन वाटतेय , शक्य झाल्यास

खिलजि
गुरुवार, 04/04/2019 - 17:00 नवीन
गहन वाटतेय , शक्य झाल्यास आपल्याला असलेला अर्थ व्यनि केला तर फार उपकार होतील .. आणि बाकीची इडंबने बघितली त्यामुळे माझेही हात जरा शिवशिवू लागले आहेत .. आधीच माफी मागून ठेवतो .. धन्यवाद
  • Log in or register to post comments

good

जव्हेरगंज
गुरुवार, 04/04/2019 - 19:37 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

सर्व रसिक वाचकांचे आभार.

शिव कन्या
गुरुवार, 04/04/2019 - 21:35 नवीन
सर्व रसिक वाचकांचे आभार. अर्थ उकलीचे अनेक प्रयत्न चालू .... चालू द्यात... सर्व विडंबनकारांचे आभार. कविता गहन असली तरी पोहोचली, छान वाटले.
  • Log in or register to post comments

सर्व रसिक वाचकांचे आभार.

शिव कन्या
गुरुवार, 04/04/2019 - 21:35 नवीन
सर्व रसिक वाचकांचे आभार. अर्थ उकलीचे अनेक प्रयत्न चालू .... चालू द्यात... सर्व विडंबनकारांचे आभार. कविता गहन असली तरी पोहोचली, छान वाटले.
  • Log in or register to post comments

कविता वाचली. आवडली.

चांदणे संदीप
Fri, 04/05/2019 - 00:31 नवीन
सर्व विडंबने वाचली सर्वच्या सर्व आवडली. कच्चा माल जितका चोख तितकी त्याची उत्पादनं दर्जेदार हेच यावरून सिद्ध होतं. Sandy
  • Log in or register to post comments

कच्चा माल जितका चोख तितकी

चौथा कोनाडा
गुरुवार, 04/11/2019 - 17:21 नवीन
कच्चा माल जितका चोख तितकी त्याची उत्पादनं दर्जेदार हेच यावरून सिद्ध होतं. +१, चांदणे संदीप अनेकांना आपाअपल्या कल्पना मांडण्यासा ठी स्फुर्ती देणारी प्रेरक कविता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

कवियत्रीने निर्मिलेला कवितेचा एक सुंदर घाट

चित्रगुप्त
Sun, 04/07/2019 - 02:32 नवीन
काही गहन अर्थ असावा, असे वाटायला लावणारी कविता आवडली. अनेकांना या कवितेने प्रेरणा देऊन काहीतरी निर्मिती करायला लावली, हे विशेष. कवियत्रीने कवितेचा एक सुंदर घाट इथे निर्मिला आहे, त्या घाटावर येऊन काव्यगंगेत डुबकी मारण्यात एक आगळीच मौज आहे. 'शिव कन्या' यांना अनेक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

शिवकन्या, सुरेख लिहिता तुम्ही

यशोधरा
Sun, 04/07/2019 - 09:49 नवीन
शिवकन्या, सुरेख लिहिता तुम्ही.
  • Log in or register to post comments

सर्व रसिक वाचकांचे आभार.

शिव कन्या
Fri, 04/19/2019 - 06:31 नवीन
सर्व रसिक वाचकांचे आभार. भलेबुरे विडंबन पाडणार्यांचेही आभार.
  • Log in or register to post comments

सर्व रसिक वाचकांचे आभार.

तुषार काळभोर
Fri, 04/19/2019 - 12:30 नवीन
ते ठीके, पण अर्थ सांगा की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा