एक मुलगी दाराआडून बघते आहे बाहेर
किती बाहेर?
स्वत:च्या बाहेर, समुद्राच्या पार
जिथे एक मुलगा बसला आहे स्तब्ध....
करत असेल का तो ही तिचा विचार?
जात असेल का तो ही
स्वत:च्या बाहेर, समुद्राच्या पलीकडे?
मुलगी दाराआडून बाहेर येऊ शकत नाही...
मग ती तिचे संपूर्ण डोळे पाठवते,
ते डोळे डोळ्यात घेऊन
मुलगा शांतपणे जागा राहतो....
डोळे हरवलेली मुलगी
घर नसलेल्या दाराआडून बघत राहते...
बघतच राहते....
-शिवकन्या
काव्यरस
वाचने
22161
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म
धन्यवाद. गहन अर्थ लावू पाहताय
In reply to हम्म by तुषार काळभोर
गूढ गहन! एखाद्या कोड्यासारखी
सगळे डोळे तसे कोडेच ....
In reply to गूढ गहन! एखाद्या कोड्यासारखी by सोन्या बागलाणकर
अजून तरी नाही कळाली..
छान!
सुरेख
????
In reply to सुरेख by अभ्या..
अभ्या भौ
In reply to सुरेख by अभ्या..
डोले
काय कळले नाही
न समजलेल्या प्रामाणिकांनीनी
अजुन काही अंदाज
In reply to न समजलेल्या प्रामाणिकांनीनी by गवि
अय्यो रामा.
In reply to अजुन काही अंदाज by राजेंद्र मेहेंदळे
उगाच गुंतागुंत होत्येय
In reply to अय्यो रामा. by गवि
कोंकण...
In reply to न समजलेल्या प्रामाणिकांनीनी by गवि
:)))
In reply to न समजलेल्या प्रामाणिकांनीनी by गवि
क्रिप्टिक.
गहन वाटतेय , शक्य झाल्यास
good
सर्व रसिक वाचकांचे आभार.
सर्व रसिक वाचकांचे आभार.
कविता वाचली. आवडली.
कच्चा माल जितका चोख तितकी
In reply to कविता वाचली. आवडली. by चांदणे संदीप
कवियत्रीने निर्मिलेला कवितेचा एक सुंदर घाट
शिवकन्या, सुरेख लिहिता तुम्ही
सर्व रसिक वाचकांचे आभार.
सर्व रसिक वाचकांचे आभार.
In reply to सर्व रसिक वाचकांचे आभार. by शिव कन्या