मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दाराआडची मुलगी

शिव कन्या · · जे न देखे रवी...
काव्यरस
एक मुलगी दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? स्वत:च्या बाहेर, समुद्राच्या पार जिथे एक मुलगा बसला आहे स्तब्ध.... करत असेल का तो ही तिचा विचार? जात असेल का तो ही स्वत:च्या बाहेर, समुद्राच्या पलीकडे? मुलगी दाराआडून बाहेर येऊ शकत नाही... मग ती तिचे संपूर्ण डोळे पाठवते, ते डोळे डोळ्यात घेऊन मुलगा शांतपणे जागा राहतो.... डोळे हरवलेली मुलगी घर नसलेल्या दाराआडून बघत राहते... बघतच राहते.... -शिवकन्या

वाचने 22157 वाचनखूण प्रतिक्रिया 28

अभ्या.. गुरुवार, 04/04/2019 - 11:52
माझ्याच डोळ्यांनी वाचली कविता भिंतीला दरवाजा नव्हता पाठवलेल्या डोळ्यांनी वाचली कविता दरवाज्याला भिंती नव्हत्या. . मस्त

तिमा गुरुवार, 04/04/2019 - 13:41
मी डोलेकर, डोलेकर, डोलेकर दर्याचा राजा!

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 04/04/2019 - 15:37
मुलगी कुठे बसलेय? कोकणात? मुंबईत? मुलगा कुठे बसलाय? दुबईत? साउथ आफ्रिकेत?मादागास्कर मध्ये? मुलगी दाराबाहेर का येउ शकत नाही? दाराला घर नाही म्हणजे काय? डोळे पाठविले म्हणजे काय? निस्ता राडाsssss

गवि गुरुवार, 04/04/2019 - 15:58
न समजलेल्या प्रामाणिकांनीनी इकडे रांग लावावी. अर्थाबद्दल काही हताश अंदाज: -नेत्रदान श्रेष्ठ दान -स्त्रीवरील बंधने -क्रूझ शिप कंपनी -कोडाईकॅनालचे भूछत्र -कॅनाबीज कायदेशीर करा आंदोलन -कोंकणात समुद्रकिनाऱ्यावर आपले स्वप्नातील टुमदार घर (स्वतंत्र सातबारा व N/A प्लॉट्स) की आणखी काही?

In reply to by गवि

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 04/04/2019 - 16:05
नाणार प्रकल्पाला विरोध कोकणात किनार्‍यावर शॅक्स लावायला परवानगी सी आर झेड कायद्याचे उल्लंघन

In reply to by गवि

गामा पैलवान Fri, 04/05/2019 - 01:35
गवि, उगाच गुंतागुंत वाढत्येय. ही एकदम सोप्पी कविता आहे. सार्वजनिक संडासात बसून मोबाईलवर च्याटिंग केलेलं दिसतंय. आ.न., -गा.पै. तळटीप : मुलगा मात्र उघड्यावर बसलाय.

In reply to by गवि

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/04/2019 - 16:17
>>>कोंकणात समुद्रकिनाऱ्यावर आपले... मलाही असंच वाटतं. समुद्रकिना-यावर वाळूत एक खोपा असावा. तो असावा, मग सोबत ''हम तूम बने एक दूजे के लीये'' गाणं असावं. किराणा आणायला तो गेलेला असल्यामुळे मुलगी बंद दाराआड़ून त्याची वाट पाहते, खूप सुंदर कल्पना आहे. -दिलीप बिरुटे (बंद दाराआड तांदूळ निसायला घेतलेला)

खिलजि गुरुवार, 04/04/2019 - 17:00
गहन वाटतेय , शक्य झाल्यास आपल्याला असलेला अर्थ व्यनि केला तर फार उपकार होतील .. आणि बाकीची इडंबने बघितली त्यामुळे माझेही हात जरा शिवशिवू लागले आहेत .. आधीच माफी मागून ठेवतो .. धन्यवाद

शिव कन्या गुरुवार, 04/04/2019 - 21:35
सर्व रसिक वाचकांचे आभार. अर्थ उकलीचे अनेक प्रयत्न चालू .... चालू द्यात... सर्व विडंबनकारांचे आभार. कविता गहन असली तरी पोहोचली, छान वाटले.

शिव कन्या गुरुवार, 04/04/2019 - 21:35
सर्व रसिक वाचकांचे आभार. अर्थ उकलीचे अनेक प्रयत्न चालू .... चालू द्यात... सर्व विडंबनकारांचे आभार. कविता गहन असली तरी पोहोचली, छान वाटले.

In reply to by चांदणे संदीप

चौथा कोनाडा गुरुवार, 04/11/2019 - 17:21
कच्चा माल जितका चोख तितकी त्याची उत्पादनं दर्जेदार हेच यावरून सिद्ध होतं. +१, चांदणे संदीप अनेकांना आपाअपल्या कल्पना मांडण्यासा ठी स्फुर्ती देणारी प्रेरक कविता !

चित्रगुप्त Sun, 04/07/2019 - 02:32
काही गहन अर्थ असावा, असे वाटायला लावणारी कविता आवडली. अनेकांना या कवितेने प्रेरणा देऊन काहीतरी निर्मिती करायला लावली, हे विशेष. कवियत्रीने कवितेचा एक सुंदर घाट इथे निर्मिला आहे, त्या घाटावर येऊन काव्यगंगेत डुबकी मारण्यात एक आगळीच मौज आहे. 'शिव कन्या' यांना अनेक धन्यवाद.