दाराआडची मुलगी
एक मुलगी दाराआडून बघते आहे बाहेर
किती बाहेर?
स्वत:च्या बाहेर, समुद्राच्या पार
जिथे एक मुलगा बसला आहे स्तब्ध....
करत असेल का तो ही तिचा विचार?
जात असेल का तो ही
स्वत:च्या बाहेर, समुद्राच्या पलीकडे?
मुलगी दाराआडून बाहेर येऊ शकत नाही...
मग ती तिचे संपूर्ण डोळे पाठवते,
ते डोळे डोळ्यात घेऊन
मुलगा शांतपणे जागा राहतो....
डोळे हरवलेली मुलगी
घर नसलेल्या दाराआडून बघत राहते...
बघतच राहते....
-शिवकन्या
हम्म
धन्यवाद. गहन अर्थ लावू पाहताय
गूढ गहन! एखाद्या कोड्यासारखी
सगळे डोळे तसे कोडेच ....
अजून तरी नाही कळाली..
छान!
सुरेख
????
अभ्या भौ
डोले
काय कळले नाही
न समजलेल्या प्रामाणिकांनीनी
अजुन काही अंदाज
अय्यो रामा.
उगाच गुंतागुंत होत्येय
कोंकण...
:)))
क्रिप्टिक.
गहन वाटतेय , शक्य झाल्यास
good
सर्व रसिक वाचकांचे आभार.
सर्व रसिक वाचकांचे आभार.
कविता वाचली. आवडली.
कच्चा माल जितका चोख तितकी
कवियत्रीने निर्मिलेला कवितेचा एक सुंदर घाट
शिवकन्या, सुरेख लिहिता तुम्ही
सर्व रसिक वाचकांचे आभार.
सर्व रसिक वाचकांचे आभार.