रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

ट्रेड मार्क's picture
ट्रेड मार्क in जनातलं, मनातलं
8 Nov 2016 - 9:38 pm

मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे.

काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे.

असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल.

मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय?

हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे.

http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-...

कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल.

धन्यवाद.

धोरणसमाजजीवनमानविचारमत

प्रतिक्रिया

पुंबा's picture

12 Nov 2016 - 7:43 pm | पुंबा

हिंजवडीला 8 ATMS आहेत त्यापैकी काल केवळ एका ATM मध्ये कॅश होती, आज एकही ATM चालू नव्हते. :-(

सस्नेह's picture

11 Nov 2016 - 10:43 am | सस्नेह

a
आज मिळाली ही नोट. चीप बीप काय दिसत नाही वरून तरी !

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Nov 2016 - 10:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

http://www.misalpav.com/comment/898363#comment-898363

आता, परत परत चिपची कहाणी ऐकून रागावलेल्या एका कायप्पाकराची तुमच्यावर "मेहेरनजर" झाली तर तो / ती तुम्हाला नोटेवरच्या मंगळयानातून सफर घडवून आणेल ! ;) =)) =))

अत्यंत प्रशंसनीय निर्णय. या निर्णयाचे दूरगामी परिणाम पाहायला मिळतील. काळ्या पैशावर अंकुश लावणे आणि बनावट चलन रोखणे असे दोन हेतू साध्य होतील असे वाटते. अर्थात अर्थव्यवस्थेतील चलनपूरवठा कमी होऊन महागाई आणि व्याजदर वाढतील त्याने उद्योगाच्या वाढीला थोडा अडथळा निर्माण होईल.
माझे दोन प्रश्न आहेत कृपया जाणकारांनी उत्तर द्यावे:
१. जरी 500 आणि 1000 च्या सध्या चलनात असलेल्या नोटांवर बंदी घातली असली तरी 1 जानेवारीपासून 2000 आणि 500 च्या नव्या नोटा चलनात येतील असे ऐकले. मोठ्या denomination च्या नोटा म्हणजे काळ्या अर्थव्यवस्थेचा कणा असतो. तेव्हा परत काळा पैसा असणाऱ्यांच्या हे पथ्यावरच पडेल. जरी ट्रेड मार्क म्हणतात त्याप्रमाणे ट्रॅकर असेल तर अतिउत्तम परन्तु त्यापेक्षा 100 च्या नोटांची अधिक मोठ्या प्रमाणात छपाई करून चलनाचा प्रश्न सोडवता आला नसता का?
२. सध्या जे काळा पैसा बाळगून आहेत ते बँकांतून त्यांच्याजवळच्या बँकेतून आहेत तेवढ्या नोटा बदलून आणू शकणार नाहीत का? बँकांना अशा प्रकारे मोठी रक्कम बदलण्याकरिता आणणाऱ्यांबद्दल काही निर्देश मिळाले असतील का? प्राप्तिकर खाते बेनामी सम्पत्ती असणाऱ्यांना कसे ट्रॅक करू शकेल?

अनुप ढेरे's picture

8 Nov 2016 - 10:23 pm | अनुप ढेरे

नोटा कोणीही बदलून आणू शकेल. फक्त बदलताना आयडी प्रूफ लागणार. आणि तेही दिवसाला ४०००रु इतकेच मिळणार. (२ आठवड्यानंतर बहुधा रोज १००००)

विनोद१८'s picture

8 Nov 2016 - 11:11 pm | विनोद१८

.... त्या सगळ्या नोटबदलूंची सरकारात नोंद राहणार आहे, म्हणजे कोणत्या व्यक्ती व कुटुंबे वा व्यावसायिक मोठ्याप्रमाणात नोटा बदलत आहेत याकडे बारकाईने लक्ष ठेवले जाउ शकते हे तर फारच महत्वाचे आहे. या सरकारचे जे म्हणणे आहे की काळ्या पैशाची निर्मितीच थांबवीर्मितीच, तसे ते करुन दाख्वीत आहेत. छानच लगाम लावलाय श्री. मोदींनी.

शाम भागवत's picture

8 Nov 2016 - 11:16 pm | शाम भागवत

मुख्य म्हणजे बँकेतील सीबीएस प्रणालीमुळे हा डाटा एकत्र करून मग त्याची छाननी करणे सोपे जाणार आहे.

प्रत्येकाला तीन लाखावर रक्कम असेल तर स्पेशल सोय रिझर्व बँकेत केलीय. तिथे झाडा झडती होईल. लालू टाईप लोक्स पिलावळ घेऊन गेले तरी एखादा कोटी पांढरा होईल.

अहाहा.. हे वाचून दिल गार्डन गार्डन झाला.. असे असेल तर मात्र हि एकच योजना 2019 ला मोदींना पुन्हा पंतप्रधान बनण्यास मदत करेल..

अंतु बर्वा's picture

9 Nov 2016 - 12:00 am | अंतु बर्वा

मला वाटतं याचा संबंध नोटेच्या छपाई करीता लागणार्या खर्चाशी असावा. १०० ची एक नोट छापायला जेवढा खर्च येतो (१०० * २०) त्यामानाने २००० ची नोट छापण्यात जास्त फायदा असावा. अर्थात हा फक्त एक अंदाज..

अर्थात अर्थव्यवस्थेतील चलनपूरवठा कमी होऊन महागाई आणि व्याजदर वाढतील त्याने उद्योगाच्या वाढीला थोडा अडथळा निर्माण होईल.

हे वाक्य चुकीचे आहे हे अधिक वाचनाने समजले. लोकांकडील पैसा कमी झाल्याने महागाई काहीशी कमी होऊ शकते, मात्र आजच्याघडीला रोख चलन मिळवण्यासाठी अधिक किंमत मोजावी लागल्याने मध्यम फळीतील विक्रेत्यांनी किमती कमी केलेल्या नाहीत. बँकांकडील तरलता वाढल्याने कर्ज अधिक स्वस्त होतील असा अंदाज आहे.
मी मोदींनी जे पाऊल उचलले आहे त्याचा समर्थक आहे मात्र, खात्यात पैसा असूनही ATM बंद असल्याने जो प्रचंड त्रास मला होतो आहे त्यावरून लोक फार काळ हे मुकाट्याने सहन करतील असे वाटत नाही. अक्षरशः 2 दिवसांपासून मी उधार उसनवारी करून व्यवहार करतो आहे सकाळपासून 8 ATM वर गेलो कोठेच कॅश नव्हती. उद्या तरी परिस्थिती सुधारावी अशी आशा आहे.

शाम भागवत's picture

8 Nov 2016 - 10:21 pm | शाम भागवत

धोरण व अंमलबजावणी दोन्हीची मस्त सांगड घातली आहे असे वाटतेय.

वेल्लाभट's picture

8 Nov 2016 - 10:26 pm | वेल्लाभट

अ‍ॅब्सोल्यूट ब्रिलियन्स ! हे आधीच मागणीवर होतं, मायजीओव्ही वर वर वगैरे वाचलेलं आहे. शिवाय नागपूरच्या एका अर्थतज्ञाने म्हणे यावरचं एक संशोधन मांडलं होतं. देशांचं सरासरी दरडोई उत्पन्न आणि त्यांचं महत्तम चलन याच्या गुणोत्तरावर आधारलेल्या या अभ्यासाबद्दल वाचलं होतं आधी.

पण हे प्रत्यक्षात होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. आणि विशेष म्हणजे ज्यांना वाटलं नव्हतं त्यांची वाट्ट लागलीय आता.

ब्रावो मोदी !

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

8 Nov 2016 - 10:27 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

प्रशंसनीय निर्णय.

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Nov 2016 - 9:35 am | llपुण्याचे पेशवेll

काय माई, यवढंच. तुमचे हे काही म्हटले नाहीत वाटतं. :)

नाखु's picture

9 Nov 2016 - 10:05 am | नाखु

नोटा बदलायला गेलेत.(येतील्च इतक्यात)

पैसा's picture

8 Nov 2016 - 10:38 pm | पैसा

देवळाना बरेच दान होईल पेटीत

देवळांतील दानपेटीत असणाऱ्या 500 1000 च्या नोटांचे काय होईल काय माहित. तसेही ते करमुक्त उत्पन्न असल्याने 300000 ची मर्यादा नसेल त्यामुळे बँकांना नोटा बदलून द्याव्याच लागतील. काळा पैसा पळून असणारे देवळात सेटिंग करून, काही कमिशन देऊन काळा पैसा त्यांच्या माध्यमातून पांढरा करून घेतील अशी भीती वाटते.

शाम भागवत's picture

8 Nov 2016 - 10:50 pm | शाम भागवत

हो पूर्वी अस झाल आहे. कोर्टात केसेसही झाल्या आहेत. निकाल देवळांच्या बाजूने लागला होता. तरी एकूण काळ्या पैशाचे प्रमाण पाहता दर्यामें खसखस.

तिरुपती संस्थानाने 500 आणि 1000 च्या नोटा स्वीकारत असल्याचे सांगितले आहे. बँकांकडून हे चलन तिरुपती संस्थान बदलून घेऊ शकेल काय? असे झाले तर या योजनेचा सम्पूर्ण उद्देशच फोल ठरत नाही काय?

सही रे सई's picture

10 Nov 2016 - 11:17 pm | सही रे सई

आज अमृतसरच्या सुवर्नामान्दिराने ५०० व १००० च्या नोटा सिवाकारल्या जाणार नाहीत असे सांगितले.
बालाजी मंदिराने क्रेडीट कार्ड चेक द्वारे दान स्वीकारले जाईल असे सांगून तशी सोय केली आहे.

आता पळापळ चालू होईल सगळीकडे......धोबीपछाड टाकला राव !

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Nov 2016 - 10:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

काळा पैसा व अतिरेकी कारवायात गुंतलेल्या पैश्याच्या मुळावर घाला घालणारे अत्यंत प्रशंसनिय पाऊल !

विशेष म्हणजे जाहीर केल्यापासून काही तासांत (आणि तेही नॉन-वर्किंग तासांत) हा नियम अमलात (आज रात्री १२ वाजता) येणार आहे, हा खरा मास्टरस्ट्रोक आहे. यामुळे, भूतकाळात नोटा रद्द केल्यावर दिली गेली तशी काळा पैसा पांढर्‍यात बदलायला मुदत मिळणार नाही.

संदीप डांगे's picture

8 Nov 2016 - 11:03 pm | संदीप डांगे

सहमत!

प्राची१२३'s picture

9 Nov 2016 - 1:53 pm | प्राची१२३

+१

गॅरी ट्रुमन's picture

8 Nov 2016 - 10:55 pm | गॅरी ट्रुमन

अर्थशास्त्राप्रमाणे पैसा म्हणजे नुसती रोख रक्कमच नाही तर देवाणघेवाण facilitate करायची क्षमता असलेली प्रत्येक गोष्ट ही पैसा आहे. आतापर्यंत ५०० आणि १००० च्या नोटांना पैसा असे का म्हटले जात होते? मी समजा एखादी गोष्ट दुकानातून विकत घेतली आणि त्यासाठी ५००/१००० च्या नोटा दिल्या तर दुकानदार त्या नोटा माझ्याकडून का घेत होता? याचे कारण त्याच नोटा वापरून अन्य कोणती वस्तू विकत घेता येईल अशी त्या दुकानदाराला खात्री वाटत होती. म्हणजेच त्या नोटांमध्ये देवाणघेवाण facilitate करायची क्षमता होती.ती क्षमता एका क्षणात काढून घेतली गेली आहे.त्यामुळे या नोटांचा 'पैसेपणा' हरवला आहे :)

पी.के चित्रपटात दाखविल्याप्रमाणे नायकाला गांधीजींचे चित्र असलेले कागद (नोटा) देऊन वस्तू घेता येतात हे समजले त्यानंतर तो गांधीजींचे चित्र असलेले कोणतेही कागद देऊन नोटा घ्यायचा प्रयत्न करू लागला. तेव्हा त्याला लोक 'पीके हो क्या' असा प्रश्न विचारू लागले. म्हणजेच वस्तू कशामुळे विकत घेता येत होत्या? तर त्या गांधीजींच्या चित्रामुळे नव्हे तर ते चित्र असलेले कागद पुढील देवाणघेवाणीचे व्यवहार facilitate करू शकतील या सर्वांना असलेल्या विश्वासामुळे.

सरकारच्या या एका निर्णयामुळे अर्थशास्त्रातील एक महत्वाचा धडा सगळ्यांना कळेल.

असो.जगातून रोख रक्कम (कॅश) पूर्णपणे नाहिशी व्हावी आणि सगळे व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनच व्हावेत आणि तो दिवस याची देही याची डोळा बघता यावा ही इच्छा.

mayu4u's picture

9 Nov 2016 - 10:11 am | mayu4u

जगातून रोख रक्कम (कॅश) पूर्णपणे नाहिशी व्हावी आणि सगळे व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनच व्हावेत आणि तो दिवस याची देही याची डोळा बघता यावा ही इच्छा.

+१

ह्या एका झटक्याने लाखो लोक paytm कडे वळले आहेत. सम्पूर्ण अर्थव्यवस्था कॅशलेस होण्याच्या दिशेने छोटे का होईना एक पाऊल पडले याचा आनंद आहे.

सतिश गावडे's picture

12 Nov 2016 - 8:04 pm | सतिश गावडे

पेटीयम हा केवळ पेमेंट गेटवे आहे त्यामुळे लोक स्पेसिफिकली पेटीयमकडे वळण्याचे कारण काय असू शकेल?

एक ऑफर प्रकार वगळता जी सुविधा पेटीयम देते ती सुविधा थेट उपलब्ध असते.

जयंत कुलकर्णी's picture

12 Nov 2016 - 8:29 pm | जयंत कुलकर्णी

पेटिएमचे तीन प्रमूख इन्व्हेस्टर्स हे चिनी आहेत.... बहुतेक..

अन्नू's picture

12 Nov 2016 - 8:37 pm | अन्नू

हेच म्हणतो. चायनाच्या अलिबाबा कंपनीने यात (इफ आय एम नॉट मिस्टेकन) ४०% गुंतवणुक केलेली आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

12 Nov 2016 - 10:00 pm | हतोळकरांचा प्रसाद

नेमके काय सुचवायचेय?

बाकी पेटीएमचे मालक भारतीय आहेत आणि मुख्य गुंतवणूक माउंटन कॅपिटल ची आहे वाटतं.

मला वाटते ऍप वापरायला सोपे आहे, हेच याचे कारण आहे.

पुंबा's picture

17 Nov 2016 - 6:19 pm | पुंबा

पेटीएम की तो निकल पडी
असो, मला तरी हे सुचिन्ह वाटते.

आज ज्याला झोप लगाल त्यो खरा शिरमन्त.......
लै जन शेकुटी ला बसतील आता :)

शाम भागवत's picture

8 Nov 2016 - 11:02 pm | शाम भागवत

आणि लाकडा ऐवजी ५०० व १००० च्या नोटांची उब मिळवतील.
:))

टुकुल's picture

8 Nov 2016 - 11:02 pm | टुकुल

अभिनंदन मोदिंचे.. खुप महत्वपुर्ण निर्णय.

संदीप डांगे's picture

8 Nov 2016 - 11:06 pm | संदीप डांगे

सगळ्यात जास्त मजा भ्रष्ट सरकारी कर्मचाऱ्यांची येणार आहे...

जाहिरात: आमच्याकडे कला पैसे पांढरा करून मिळेल, कमिशन 50 टक्के!!!

शाम भागवत's picture

8 Nov 2016 - 11:07 pm | शाम भागवत

भारतीयांचे अमेरिकेच्या निवडणूकांवरील लक्ष उडाले.
:))

विकास's picture

8 Nov 2016 - 11:08 pm | विकास

निर्णय स्वागतार्हच आहे. पण यात अजून एक मजेशीर प्रकार होणार आहे... आधी जणूकाही आपण साधे आहोत असे वागत सर्जिकल स्ट्राईक, मग एनडीटिव्हीवर बंदी, बंदी उठाव वगैरे बाता चालत असताना फिस्कल सर्जिकल स्ट्राईक...

हे सरकार उद्या काय करेल याचा विचार करत, आता विरोधकांच्या झोपा उडणार आहेत.

ट्रेड मार्क's picture

9 Nov 2016 - 12:41 am | ट्रेड मार्क

हा निर्णय असा आहे की विरोधकांना ना याला विरोध करता येईल ना पूर्ण समर्थन देता येईल. कारण बहुतांशी जनतेला हा निर्णय होईल याची आशा खूप पूर्वीपासून होती. अर्थात रागा आणि केजरीचं काही सांगता येत नाही ते कधीही कशालाही समर्थन देऊ शकतात आणि कधीही विरोध करू शकतात. पण बरेच छोटे मोठे मासे, म्हणजे बिल्डर्स, सोनार, इस्टेट एजन्ट्स, राजकारणी, वेगवेगळ्या मार्गाने पैश्याची अफरातफर करणारे, मस्त गळाला लागणार नाहीतर भिकेला लागणार.

एकूण झालेल्या घटना पाहता हे एक मोठठं जाळं विणायचं काम चालू होतं, अजूनही चालू आहे, ज्यात एक एक भक्ष्य स्वतःहून अडकत जात आहेत.

विकास's picture

8 Nov 2016 - 11:09 pm | विकास

मला वाटते या आधी जनता सरकारमधे मोरारजी देसाईंनी असाच तत्कालीन १००० रू ची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला होता. अधिक माहिती असल्यास येथे लिहावीत!

सही रे सई's picture

8 Nov 2016 - 11:12 pm | सही रे सई

मुत्सद्देगिरिचा कळस आहे हा...बाकीच्या गोष्टी तर आहेतच.. पण हा निर्णय अत्यंत गुप्त ठेवून बरोब्बर बुधवारी बँकांची बंद व्हायची वेळ पाहून त्या बंद झाल्यानंतरच हा निर्णय जाहीर केला गेला. वर परत त्याच दिवशी रात्रीपासून बंदी आणली. नन्तर २ दिवस बॅंका बंद ठेवल्या आणि तीनच दिवस जुन्या नोटा त्याही काही ठराविक ठिकाणीच चालतील असा निर्णय जाहीर केला.. तल्लखपणा असावा तर असा.

स्रुजा's picture

8 Nov 2016 - 11:21 pm | स्रुजा

अगदी , अगदी ! खणखणीत षटकार ठोकलाय .. पार स्टेडियमच्या बाहेर ! खतरनाक माणुस आहे हा. एक एक ऐतिहासिक निर्णय छातीठोकपणे घेत सुटलंय हे सरकार. आतापर्यंतच्या त्रिशंकु लोकसभांचं रेकॉर्ड ब्रेक करत, त्यांना सर्वाधिकार देणार्‍या भारतीय लोकशाहीचं मनापासून कौतुक वाटतंय. आणि लोकांनी टाकलेला विश्वास सार्थ पण ठरवतंय हे सरकार , निदान बर्‍याच अंशी. हे ही नसे थोडके. भारतीय लोकशाही प्रगल्भ झाल्याची सगळी लक्षणं आहेत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Nov 2016 - 11:13 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अजुन एक मुद्दा. ज्या काळोजीरामन लोकांनी काळा पैसा परकिय चलनामधे ठेवलाय त्याचं काय? त्यांना काय फरक पडेलसं वाटतं नाही. त्यावरही काहीतरी पाचर मारायाला हवी.

अनिरुद्ध.वैद्य's picture

8 Nov 2016 - 11:17 pm | अनिरुद्ध.वैद्य

तो भारताबाहेरच खर्च करावा लागेल. भारतात आणला तर सोर्स दाखवावा लागेल.

....मोदी काय करु शकतात याचा अनुभव आजवर येतोच आहे. असो, जे होते आहे ते देशहिताचे आहे हे नक्कीच.

विकास's picture

8 Nov 2016 - 11:55 pm | विकास

ती पाचरसुध्धा मारली जाईल पण योग्य त्या वेळीच...

आम्हाला हवे तेंव्हा आणि आम्हाला हवे तसे शत्रूंवर हल्ले केले जातील असे पर्रीकर आणि इतरही मंत्री म्हणाले होतेच. तेच या संदर्भात पण लागू होते.

दाऊद च्या संदर्भात वाचल्याचे आठवते की त्याचे ४०कोटी रुपये अचानक गहाळ झाले आणि त्याच्या माणसानेच चोरले असा आरोप होता. पण नंतर समजले की रियाध का अशाच कुठल्यातरी मध्यपुर्वेतील देशामधल्या बँकांच्या (परीणामी त्या राज्यकर्त्यांच्या) सहकार्याने ती गुप्त कारवाई होती.

अनिरुद्ध.वैद्य's picture

8 Nov 2016 - 11:19 pm | अनिरुद्ध.वैद्य

एका चर्चेत ऐकलं की जर उत्पन्नाचा सोर्स सांगता नाही आला तर ती रक्कम सरकार ताब्यात घेऊ शकते, असा कायदा आलाय म्हणे.

शाम भागवत's picture

8 Nov 2016 - 11:21 pm | शाम भागवत

शिवाय फौजदारी खटला वेगळा

तो तर आधीच केलाय बहुतेक

पिलीयन रायडर's picture

8 Nov 2016 - 11:22 pm | पिलीयन रायडर

मोदी प्लेड ट्रंप कार्ड! सारी दुनिया हिलरी हय!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Nov 2016 - 11:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

बहुतेक भारतिय अमेरिकन विळक्षण विसरून एकतर मोदींची विलक्षण स्तुती करताहेत, तर काहीजण नोटांच्या रद्दीचा बरा भाव येईल की त्या थंडीतल्या शेकोटीसाठी बर्‍या पडतील याचा हिशेब लावत बसलेत ! ;)

सही रे सई's picture

8 Nov 2016 - 11:33 pm | सही रे सई

मागच्या सर्व घटनांवर विचार केला तर अतिशय नियोजन बद्ध रीतीने ही खेळी खेळली आहे.
पहिले २ वेळा काळा पैसा वाल्यांना तो पैसा जाहीर करायची संधी देणे , मग संसदेत काळा पैसा विरोधी कायदा संमत करून घेणे ज्यात उत्पन्नाचा स्त्रोत जाहीर नसेल तर तो सरकार ताब्यात घेऊ शकेल हे कलम असणे, जास्तीत जास्त जाणते कडे बँक अकौंट असावे या साठी जनधन योजना काढणे आणि ती यशस्वीरीत्या राबवणे, आणि मगच आजचे हे धाडसी पाउल उचलणे.

जेव्हा अजून २०० वर्षांनी इतिहास लिहिला जाईल तेव्हा मला वाटत भारतीय इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असा असेल.

सही रे सई's picture

8 Nov 2016 - 11:34 pm | सही रे सई

जास्तीत जास्त जनते* कडे बँक अकौंट असावे या साठी जनधन योजना काढणे - असे वाचावे

मलाही हा निर्णय आवडला. लगेच आमलात आणलाय हेही ग्रेट.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Nov 2016 - 11:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंतप्रधान मोदीजी देशाला काय संबोधित करणार, असं वाटलं. (कधी कधी त्यांच्या भाषणाचा कंटालाही येतो, आजही तसंच काही असेल असं वाटलं)
पण त्यांनी जो निर्णय घेतला त्याचं कौतुक वाटलं. पंतप्रधान काही निर्णय घेऊ शकतो सालं आपण ते विसरून गेलो होतो.काळा पैसा बाहेर यावा, ज्यांनी गुंतवणूक करून ठेवली ते वाचतील असे वाटते. बाकी, काय काय होईल ते बघुया. धाड़सी सरकार, धाड़सी पंतप्रधान. शुभेच्छा. आम्ही तुमच्या निर्णयाबरोबर आहोत. अभिनंदन...!

-दिलीप बिरुटे

अनुप ढेरे's picture

9 Nov 2016 - 10:48 am | अनुप ढेरे

प्रा.डॉ तुम्ही खासगी कॉलेजात प्रा. आहात का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2016 - 1:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

?

-दिलीप बिरुटे

शब्दबम्बाळ's picture

8 Nov 2016 - 11:45 pm | शब्दबम्बाळ

लोकसत्ता मधली ही 2000च्या नोटेची बातमी खोटी निघाली तर यांच्यावर कारवाई होऊ शकते का??
आजकाल सोर्स द्यायचे बंद केलंय का वर्तमान पत्रांनी??

हे कोणाच्या तरी डोक्यातून निघालेले fiction दिसतेय.

विकास's picture

10 Nov 2016 - 12:10 am | विकास

व्हॉट्सअ‍ॅप वर फिरणारा संदेश बातमी म्हणून दिलेला दिसतोय. पण वास्तव खालील बातमीत कळू शकेल...

Arun Jaitley dispels rumours of 'GPS chip' in Rs 2,000 note

रामपुरी's picture

9 Nov 2016 - 12:00 am | रामपुरी

आता जो याला विरोध करेल त्याला "चोर की दाढी मे तिनका" न्याय लागू होइल - आणखी एक बूच
मस्त... मान गये मोदीजी

वरुण मोहिते's picture

9 Nov 2016 - 12:02 am | वरुण मोहिते

अनेक वर्ष हा निर्णय पेंडिंग होता. आणि हो मोरारजी आणि इंदिरा गांधीजींने पण हा निर्णय घेतला होता पण त्यावेळी कोण हजार च्या नोटा ठेवणार खिशात तो त्यामुळे त्यावेळी कालबाह्य ठरला . बाकी उद्या यु. एस निकाल आणि आज हा निर्णय हा पण खचित योगायोग नाही. मत नंतर नोंदवता येईल . पण सध्यातरी निर्णयाचं स्वागत आहे

संदीप डांगे's picture

9 Nov 2016 - 12:10 am | संदीप डांगे

वरिल विडिओ लेखात टाकता आला तर बघा संपादक, अर्थात लेखकाची परवानगी असेल तर.

ट्रेड मार्क's picture

9 Nov 2016 - 12:30 am | ट्रेड मार्क

मला ऑफिसमध्ये व्हिडीओ दिसत नाही. पण डांगेअण्णा विषयाला सोडून काही टाकतील असं वाटत नाही त्यामुळे चालेल.

संदीप डांगे's picture

9 Nov 2016 - 12:33 am | संदीप डांगे

पंतप्रधान नोटांबद्दल जी अधिकृत घोषणा करत आहेत तो व्हिडीओ आहे, अतिशय सुंदर भाषण/निवेदन/घोषणा आहे

ट्रेड मार्क's picture

9 Nov 2016 - 12:43 am | ट्रेड मार्क

संपादक मंडळ कृपया लेखामध्ये हा व्हिडीओ टाका.

शब्दबम्बाळ's picture

9 Nov 2016 - 4:33 am | शब्दबम्बाळ

RBI चे अधिकृत स्पष्टीकरण
मला व्हिडिओ शेअर कसा करायचा माहित नाही त्यामुळे लिंक देतोय.

काही ठळक मुद्दे:

1. सामान्य नागरिकांनी भूलथापांना बळी न पडता कोणालाही आपले पैसे बँकेतून बदलून घ्यायला देऊ नयेत. पैसे बदलून
घ्यायला येणाऱ्या प्रत्येक माणसाची ओळख पटवून मगच पैसे दिले जाणार आहेत त्यामुळे काळा पैसे असेल तर पकडला
जाऊ शकतो. पण अधिकृत रक्कम असेल तर मात्र काळजी करायचे कारण नाही.

2. बँकेमध्ये कॅमेऱ्याने सगळी प्रोसेस पहिली जाणार आहे त्यामुळे गैर प्रकार करणारे लोक पकडले जातील.

3. 24 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही एका दिवसात जास्तीत जास्त 4000 रुपये आणि आठवड्यात जास्तीत जास्त 20,000 रुपये
बदलून घेऊ शकता. या तारखे नंतर RBI परिस्थितीचा अंदाज घेऊन मग पुढचे धोरण ठरवेल.

4. पण तुम्ही "कितीही रकमेच्या 500 किंवा 1000 च्या नोटा तुमच्या अकाउंट मध्ये भरू (deposit ) करू शकता.
त्यावर कोणतेही बंधन नाही!"
परंतु एका ठराविक रकमेच्या वरचे व्यवहार FIU (Financial Intelligence
Unit ) किंवा इनकम टॅक्स विभागाशी शेअर केले जातील आणि ते यावर लक्ष ठेवतील. त्यामुळे जास्ती रकमेचे व्यवहार
करताना बँकदेखील काळजीपूर्वकच करतील.

5. RBI ने नोटा छापताना 2000 च्या जास्त नोटा छापल्या आहे जेणे करून 500 आणि 1000 च्या नोटा बदलून देण्यासाठी
होणाऱ्या रकमेसाठी 2000 रुपयाच्या कमी नोटा लागतील. त्यामुळे छपाईचा खर्च वाचेल.

6. सध्या बाजारात
500 च्या -- 16.5 बिलियन नोटा आहेत (नंबर ऑफ पिसेस)
1000 च्या -- 6.7 बिलियन नोटा आहेत (नंबर ऑफ पिसेस)

7. या नवीन नोटा "महात्मा गांधी न्यू सिरीज" या नावाने पब्लिश केल्या आहेत. तसेच ब्रेल लिपीमध्ये नोटेचे मूल्य नोटेवर
नोंदलेले आहे.

8. सिक्युरिटी फीचर्स मात्र सांगायचे शिताफीने टाळण्यात आले त्यामुळे GPS चा प्रश्न अर्धवट राहिला.
तसेच काही दिवसांपूर्वी 2000 रुपयाच्या नोटेचा फोटो फेसबुक वगैरे वर फिरत होता त्यामुळे काही लोकांना आजच्या
घटनेची आधीच माहिती मिळाली असेल का? या प्रश्नाचे जास्त समाधानकारक उत्तर त्यांना देता आले नाही. (चौकशी
करण्यात येईल यापलीकडे )

निल्या१'s picture

9 Nov 2016 - 9:32 pm | निल्या१

बिलियन आता ही
गणन पद्धति मान्य झाली का भारतात? मरठीत लिहिता वाचणारे मराठी विषय रुपयांचा मग गणन बिलियन मध्ये कशाला?

शब्दबम्बाळ's picture

10 Nov 2016 - 3:20 pm | शब्दबम्बाळ

बरोबर आहे हा! तुमचे मत आर. गांधी (डेप्युटी गव्हर्नर RBI ) यांना कळवा बघू... त्यांचेच वाक्य आहे हे...

ट्रेड मार्क's picture

9 Nov 2016 - 12:53 am | ट्रेड मार्क

अनिवासी भारतीयांकडे बहुतांशी थोड्याफार ५०० आणि १००० च्या नोटा असतात. ज्या भारतात गेल्यावर लगेच लागणाऱ्या गोष्टींसाठी, म्हणजे विमानतळावरून बाहेर पडल्यावर टॅक्सी वगैरेसाठी ठेवलेल्या असतात. तर अश्या नोटांचे काय करणार? प्रत्येकाकडे असे पैसे फारतर ४०००-५००० च्या आसपास असू शकतात. पण अनिवासी भारतीयांची संख्या बघता एकूण बरीच रक्कम असेल. हा काळा पैसा नाहीये पण त्या नोटा भारताबाहेर बदलून कश्या मिळणार?

IATA च्या वेबसाईटवर लिहिलंय की भारतीय चलन बाहेरून येताना भारतात आणता येत नाही. याबद्दल कोणाला काही अधिक माहिती आहे का? काही उपाय आहे का?

शब्दबम्बाळ's picture

9 Nov 2016 - 12:56 am | शब्दबम्बाळ

मार्च 2017 पर्यंत वेळ दिलेला आहे. त्या कालावधी पर्यंत जर कोणी भारतात येणार असतील तर बदलून घेता येऊ शकतील.

रेवती's picture

9 Nov 2016 - 1:01 am | रेवती

हो का? अरे वा! बरं झालं.

ट्रेड मार्क's picture

9 Nov 2016 - 1:09 am | ट्रेड मार्क

बाहेरून भारतात येताना भारतीय चलन आणणे कायद्याच्या विरुद्ध आहे. खाली वाचा

Currency rules

Currency Import regulations:

Foreign currencies : unlimited. However, amounts exceeding USD 5,000.- (or equivalent) in cash, or USD 10,000.- (or equivalent) in traveler's cheques must be declared;
Local currency (Indian Rupee-INR): Import of INR is prohibited, except for residents of India importing up to INR 7,500.-.

Foreign currencies include currency notes, traveler's cheques, cheques, drafts etc. (Re)exchange only through banks and authorized money exchange points.

शब्दबम्बाळ's picture

9 Nov 2016 - 3:21 am | शब्दबम्बाळ

पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे, बाहेरच्या देशात प्रवासाला जाणाऱ्यांसाठी किंवा बाहेरच्या देशात असणाऱ्या भारतीय प्रवाशांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर 5000 रुपयांपर्यंतच्या नोट बदलून नवीन नोट मिळण्याची सोया करून देण्यात येणार आहे.

पण लिमिट 5000 रुपये इतकेच आहे...

हि सरकारी दिवाळखोरी मला अजिबात समजत नाही. हि ५००० रुपये लिमिट कशा साठी ठेवले आहे ? जखमेवर मीठ लावण्यासाठी का ?

शब्दबम्बाळ's picture

9 Nov 2016 - 3:32 am | शब्दबम्बाळ

5000 रुपयांपेक्षा जास्त भारतीय चलन भारताबाहेर घेऊन जायला कायदेशीर परवानगी नाहीये.
त्यामुळे हा निर्णय त्या नियमानुसार योग्यच आहे...

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Nov 2016 - 10:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

आजकाल लाखभर डॉलर्स वैध मार्गांनी सहज मिळत असताना रु७५०० पेक्षा जास्त भारतिय चलन बाहेर न्यायची गरजच काय ?

याशिवाय, चलनाची तस्करी रोखण्यासाठी सर्व देशांमध्ये चलन आत-बाहेर नेण्यावर अश्या प्रकारची बंधने आहेत.

पण १००० आणि ५०० गांधी सध्या लीगल टेंडर नसल्याने त्याला चलन म्हणता येणार नाही !

मंदारपुरोहित's picture

9 Nov 2016 - 2:58 am | मंदारपुरोहित

NRI could deposit indian currency in local SBI at their country supporting with passport copy (or) can be changed at RBI with declaration as tourist. Or can change at airports. Timelimit till 31 Mar 2017

याबद्दल खात्रीशीर माहितीचा दुवा मिळू शकेल का?

किमान कॅलिफोर्निया मधील SBI पैसे घेत नाही.

आनंदी गोपाळ's picture

9 Nov 2016 - 12:56 am | आनंदी गोपाळ

याचा यू टर्न कधी येणारे?

मार्केटात कानोसा घेतल्यावर फारसं पॅनिक ऐकू आलं नाही. सीए, बँकवाले कूल होते. बँकांना कोणतेही निर्देश अजूनही नाहियेत. उद्या पोस्ट केलेल्या ऑपरेशनांना मी नाही सांगणार आहे. :)

आनंदी गोपाळ's picture

9 Nov 2016 - 1:03 am | आनंदी गोपाळ

शंभर रुपयांत पैसे दिलेत तरच करीन.

मी वैद्यकातून उपजीवीका करतो. उद्या पोस्ट केलेले "इमर्जन्सी" नाहीत.

आनंदी गोपाळ's picture

9 Nov 2016 - 1:04 am | आनंदी गोपाळ

इमर्जन्सी/लाइफसेव्हिंग आत्ताच केले जातात

असंका's picture

10 Nov 2016 - 10:37 am | असंका

=))

शब्दबम्बाळ's picture

9 Nov 2016 - 1:27 am | शब्दबम्बाळ

डॉक्टरांकडे कॅशलेस व्यवहार चालत नाहीत का?
हि यंत्रणा असली तर गोष्टी सोप्या होतील ना!

शब्दबम्बाळ's picture

9 Nov 2016 - 1:38 am | शब्दबम्बाळ

यावरून आठवलं... शक्यतो ज्यांचा छोटा दवाखाना असतो असे डॉक्टर कधी तपासायला गेल्यावर बिल देत नाहीत.
त्यांचे 100 रुपये वगैरे चार्जेस असतात आणि मग ते गोळ्या लिहून देतात तेव्हढा एकच कागद मिळतो.
मग हे पैसे कुठे मॉनिटर होतात?
आणि मग अशा डॉक्टरांकडे देखील सरकारी हिशोबात न आलेले पैसे असू शकतात का?
अर्थात ते हुशार असल्या कारणाने गुंतवत असतील म्हणा कुठेतरी, पण असाच प्रश्न पडला...