✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

ट
ट्रेड मार्क यांनी
Tue, 11/08/2016 - 21:38  ·  लेख
लेख
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे. काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे. असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल. मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय? हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे. http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-1000-notes/ कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल. धन्यवाद.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मत

प्रतिक्रिया द्या
307094 वाचन

💬 प्रतिसाद (1112)

प्रतिक्रिया

अर्थात अर्थव्यवस्थेतील

पुंबा
Sat, 11/12/2016 - 19:37 नवीन
अर्थात अर्थव्यवस्थेतील चलनपूरवठा कमी होऊन महागाई आणि व्याजदर वाढतील त्याने उद्योगाच्या वाढीला थोडा अडथळा निर्माण होईल.
हे वाक्य चुकीचे आहे हे अधिक वाचनाने समजले. लोकांकडील पैसा कमी झाल्याने महागाई काहीशी कमी होऊ शकते, मात्र आजच्याघडीला रोख चलन मिळवण्यासाठी अधिक किंमत मोजावी लागल्याने मध्यम फळीतील विक्रेत्यांनी किमती कमी केलेल्या नाहीत. बँकांकडील तरलता वाढल्याने कर्ज अधिक स्वस्त होतील असा अंदाज आहे. मी मोदींनी जे पाऊल उचलले आहे त्याचा समर्थक आहे मात्र, खात्यात पैसा असूनही ATM बंद असल्याने जो प्रचंड त्रास मला होतो आहे त्यावरून लोक फार काळ हे मुकाट्याने सहन करतील असे वाटत नाही. अक्षरशः 2 दिवसांपासून मी उधार उसनवारी करून व्यवहार करतो आहे सकाळपासून 8 ATM वर गेलो कोठेच कॅश नव्हती. उद्या तरी परिस्थिती सुधारावी अशी आशा आहे.
↩ प्रतिसाद: पुंबा

धोरण व अंमलबजावणी दोन्हीची

शाम भागवत
Tue, 11/08/2016 - 22:21 नवीन
धोरण व अंमलबजावणी दोन्हीची मस्त सांगड घातली आहे असे वाटतेय.

अ‍ॅब्सोल्यूट ब्रिलियन्स ! हे

वेल्लाभट
Tue, 11/08/2016 - 22:26 नवीन
अ‍ॅब्सोल्यूट ब्रिलियन्स ! हे आधीच मागणीवर होतं, मायजीओव्ही वर वर वगैरे वाचलेलं आहे. शिवाय नागपूरच्या एका अर्थतज्ञाने म्हणे यावरचं एक संशोधन मांडलं होतं. देशांचं सरासरी दरडोई उत्पन्न आणि त्यांचं महत्तम चलन याच्या गुणोत्तरावर आधारलेल्या या अभ्यासाबद्दल वाचलं होतं आधी. पण हे प्रत्यक्षात होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. आणि विशेष म्हणजे ज्यांना वाटलं नव्हतं त्यांची वाट्ट लागलीय आता. ब्रावो मोदी !

उत्तम

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 11/08/2016 - 22:27 नवीन
प्रशंसनीय निर्णय.

येवढंच?

llपुण्याचे पेशवेll
Wed, 11/09/2016 - 09:35 नवीन
काय माई, यवढंच. तुमचे हे काही म्हटले नाहीत वाटतं. :)
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

ते

नाखु
Wed, 11/09/2016 - 10:05 नवीन
नोटा बदलायला गेलेत.(येतील्च इतक्यात)
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

देवळाना दान होईल बरेच

पैसा
Tue, 11/08/2016 - 22:38 नवीन
देवळाना बरेच दान होईल पेटीत

देवळांतील दानपेटीत असणाऱ्या

पुंबा
Tue, 11/08/2016 - 22:45 नवीन
देवळांतील दानपेटीत असणाऱ्या 500 1000 च्या नोटांचे काय होईल काय माहित. तसेही ते करमुक्त उत्पन्न असल्याने 300000 ची मर्यादा नसेल त्यामुळे बँकांना नोटा बदलून द्याव्याच लागतील. काळा पैसा पळून असणारे देवळात सेटिंग करून, काही कमिशन देऊन काळा पैसा त्यांच्या माध्यमातून पांढरा करून घेतील अशी भीती वाटते.
↩ प्रतिसाद: पैसा

१९८१-८२ च्या सुमारास

शाम भागवत
Tue, 11/08/2016 - 22:50 नवीन
हो पूर्वी अस झाल आहे. कोर्टात केसेसही झाल्या आहेत. निकाल देवळांच्या बाजूने लागला होता. तरी एकूण काळ्या पैशाचे प्रमाण पाहता दर्यामें खसखस.
↩ प्रतिसाद: पुंबा

तिरुपती संस्थानाने 500 आणि

पुंबा
Sat, 11/12/2016 - 19:40 नवीन
तिरुपती संस्थानाने 500 आणि 1000 च्या नोटा स्वीकारत असल्याचे सांगितले आहे. बँकांकडून हे चलन तिरुपती संस्थान बदलून घेऊ शकेल काय? असे झाले तर या योजनेचा सम्पूर्ण उद्देशच फोल ठरत नाही काय?
↩ प्रतिसाद: शाम भागवत

आज अमृतसरच्या

सही रे सई
गुरुवार, 11/10/2016 - 23:17 नवीन
आज अमृतसरच्या सुवर्नामान्दिराने ५०० व १००० च्या नोटा सिवाकारल्या जाणार नाहीत असे सांगितले. बालाजी मंदिराने क्रेडीट कार्ड चेक द्वारे दान स्वीकारले जाईल असे सांगून तशी सोय केली आहे.
↩ प्रतिसाद: पैसा

पुरुषोत्तम पंतप्रधान मोदीसाहेबांचा न भूतो न भविष्यति निर्णय !

माम्लेदारचा पन्खा
Tue, 11/08/2016 - 22:44 नवीन
आता पळापळ चालू होईल सगळीकडे......धोबीपछाड टाकला राव !

काळा पैसा व अतिरेकी कारवायात

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 11/08/2016 - 22:49 नवीन
काळा पैसा व अतिरेकी कारवायात गुंतलेल्या पैश्याच्या मुळावर घाला घालणारे अत्यंत प्रशंसनिय पाऊल ! विशेष म्हणजे जाहीर केल्यापासून काही तासांत (आणि तेही नॉन-वर्किंग तासांत) हा नियम अमलात (आज रात्री १२ वाजता) येणार आहे, हा खरा मास्टरस्ट्रोक आहे. यामुळे, भूतकाळात नोटा रद्द केल्यावर दिली गेली तशी काळा पैसा पांढर्‍यात बदलायला मुदत मिळणार नाही.

सहमत!

संदीप डांगे
Tue, 11/08/2016 - 23:03 नवीन
सहमत!
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

+१

प्राची१२३
Wed, 11/09/2016 - 13:53 नवीन
+१
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अर्थशास्त्रातील महत्वाचा धडा

गॅरी ट्रुमन
Tue, 11/08/2016 - 22:55 नवीन
अर्थशास्त्राप्रमाणे पैसा म्हणजे नुसती रोख रक्कमच नाही तर देवाणघेवाण facilitate करायची क्षमता असलेली प्रत्येक गोष्ट ही पैसा आहे. आतापर्यंत ५०० आणि १००० च्या नोटांना पैसा असे का म्हटले जात होते? मी समजा एखादी गोष्ट दुकानातून विकत घेतली आणि त्यासाठी ५००/१००० च्या नोटा दिल्या तर दुकानदार त्या नोटा माझ्याकडून का घेत होता? याचे कारण त्याच नोटा वापरून अन्य कोणती वस्तू विकत घेता येईल अशी त्या दुकानदाराला खात्री वाटत होती. म्हणजेच त्या नोटांमध्ये देवाणघेवाण facilitate करायची क्षमता होती.ती क्षमता एका क्षणात काढून घेतली गेली आहे.त्यामुळे या नोटांचा 'पैसेपणा' हरवला आहे :) पी.के चित्रपटात दाखविल्याप्रमाणे नायकाला गांधीजींचे चित्र असलेले कागद (नोटा) देऊन वस्तू घेता येतात हे समजले त्यानंतर तो गांधीजींचे चित्र असलेले कोणतेही कागद देऊन नोटा घ्यायचा प्रयत्न करू लागला. तेव्हा त्याला लोक 'पीके हो क्या' असा प्रश्न विचारू लागले. म्हणजेच वस्तू कशामुळे विकत घेता येत होत्या? तर त्या गांधीजींच्या चित्रामुळे नव्हे तर ते चित्र असलेले कागद पुढील देवाणघेवाणीचे व्यवहार facilitate करू शकतील या सर्वांना असलेल्या विश्वासामुळे. सरकारच्या या एका निर्णयामुळे अर्थशास्त्रातील एक महत्वाचा धडा सगळ्यांना कळेल. असो.जगातून रोख रक्कम (कॅश) पूर्णपणे नाहिशी व्हावी आणि सगळे व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनच व्हावेत आणि तो दिवस याची देही याची डोळा बघता यावा ही इच्छा.

सहमत!

mayu4u
Wed, 11/09/2016 - 10:11 नवीन
जगातून रोख रक्कम (कॅश) पूर्णपणे नाहिशी व्हावी आणि सगळे व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनच व्हावेत आणि तो दिवस याची देही याची डोळा बघता यावा ही इच्छा. +१
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

ह्या एका झटक्याने लाखो लोक

पुंबा
Sat, 11/12/2016 - 19:55 नवीन
ह्या एका झटक्याने लाखो लोक paytm कडे वळले आहेत. सम्पूर्ण अर्थव्यवस्था कॅशलेस होण्याच्या दिशेने छोटे का होईना एक पाऊल पडले याचा आनंद आहे.
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

पेटीयम हा केवळ पेमेंट गेटवे

सतिश गावडे
Sat, 11/12/2016 - 20:04 नवीन
पेटीयम हा केवळ पेमेंट गेटवे आहे त्यामुळे लोक स्पेसिफिकली पेटीयमकडे वळण्याचे कारण काय असू शकेल? एक ऑफर प्रकार वगळता जी सुविधा पेटीयम देते ती सुविधा थेट उपलब्ध असते.
↩ प्रतिसाद: पुंबा

पेटिएमचे तीन प्रमूख

जयंत कुलकर्णी
Sat, 11/12/2016 - 20:29 नवीन
पेटिएमचे तीन प्रमूख इन्व्हेस्टर्स हे चिनी आहेत.... बहुतेक..
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

हो

अन्नू
Sat, 11/12/2016 - 20:37 नवीन
हेच म्हणतो. चायनाच्या अलिबाबा कंपनीने यात (इफ आय एम नॉट मिस्टेकन) ४०% गुंतवणुक केलेली आहे.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

नेमके काय सुचवायचेय?

हतोळकरांचा प्रसाद
Sat, 11/12/2016 - 22:00 नवीन
नेमके काय सुचवायचेय? बाकी पेटीएमचे मालक भारतीय आहेत आणि मुख्य गुंतवणूक माउंटन कॅपिटल ची आहे वाटतं.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

मला वाटते ऍप वापरायला सोपे

पुंबा
Mon, 11/14/2016 - 13:23 नवीन
मला वाटते ऍप वापरायला सोपे आहे, हेच याचे कारण आहे.
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

पेटीएम की तो निकल पडी

पुंबा
गुरुवार, 11/17/2016 - 18:19 नवीन
पेटीएम की तो निकल पडी असो, मला तरी हे सुचिन्ह वाटते.
↩ प्रतिसाद: पुंबा

आज ज्याला झोप लगाल त्यो खरा शिरमन्त.......

विखि
Tue, 11/08/2016 - 22:56 नवीन
आज ज्याला झोप लगाल त्यो खरा शिरमन्त....... लै जन शेकुटी ला बसतील आता :)

आणि लाकडा ऐवजी ५०० व १०००

शाम भागवत
Tue, 11/08/2016 - 23:02 नवीन
आणि लाकडा ऐवजी ५०० व १००० च्या नोटांची उब मिळवतील. :))
↩ प्रतिसाद: विखि

अभिनंदन मोदिंचे.. खुप

टुकुल
Tue, 11/08/2016 - 23:02 नवीन
अभिनंदन मोदिंचे.. खुप महत्वपुर्ण निर्णय.

सगळ्यात जास्त मजा भ्रष्ट

संदीप डांगे
Tue, 11/08/2016 - 23:06 नवीन
सगळ्यात जास्त मजा भ्रष्ट सरकारी कर्मचाऱ्यांची येणार आहे... जाहिरात: आमच्याकडे कला पैसे पांढरा करून मिळेल, कमिशन 50 टक्के!!!

भारतीयांचे अमेरिकेच्या

शाम भागवत
Tue, 11/08/2016 - 23:07 नवीन
भारतीयांचे अमेरिकेच्या निवडणूकांवरील लक्ष उडाले. :))

झोप...

विकास
Tue, 11/08/2016 - 23:08 नवीन
निर्णय स्वागतार्हच आहे. पण यात अजून एक मजेशीर प्रकार होणार आहे... आधी जणूकाही आपण साधे आहोत असे वागत सर्जिकल स्ट्राईक, मग एनडीटिव्हीवर बंदी, बंदी उठाव वगैरे बाता चालत असताना फिस्कल सर्जिकल स्ट्राईक... हे सरकार उद्या काय करेल याचा विचार करत, आता विरोधकांच्या झोपा उडणार आहेत.

सहमत

ट्रेड मार्क
Wed, 11/09/2016 - 00:41 नवीन
हा निर्णय असा आहे की विरोधकांना ना याला विरोध करता येईल ना पूर्ण समर्थन देता येईल. कारण बहुतांशी जनतेला हा निर्णय होईल याची आशा खूप पूर्वीपासून होती. अर्थात रागा आणि केजरीचं काही सांगता येत नाही ते कधीही कशालाही समर्थन देऊ शकतात आणि कधीही विरोध करू शकतात. पण बरेच छोटे मोठे मासे, म्हणजे बिल्डर्स, सोनार, इस्टेट एजन्ट्स, राजकारणी, वेगवेगळ्या मार्गाने पैश्याची अफरातफर करणारे, मस्त गळाला लागणार नाहीतर भिकेला लागणार. एकूण झालेल्या घटना पाहता हे एक मोठठं जाळं विणायचं काम चालू होतं, अजूनही चालू आहे, ज्यात एक एक भक्ष्य स्वतःहून अडकत जात आहेत.
↩ प्रतिसाद: विकास

जनता सरकार

विकास
Tue, 11/08/2016 - 23:09 नवीन
मला वाटते या आधी जनता सरकारमधे मोरारजी देसाईंनी असाच तत्कालीन १००० रू ची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला होता. अधिक माहिती असल्यास येथे लिहावीत!

मुत्सद्देगिरिचा कळस आहे हा..

सही रे सई
Tue, 11/08/2016 - 23:12 नवीन
मुत्सद्देगिरिचा कळस आहे हा...बाकीच्या गोष्टी तर आहेतच.. पण हा निर्णय अत्यंत गुप्त ठेवून बरोब्बर बुधवारी बँकांची बंद व्हायची वेळ पाहून त्या बंद झाल्यानंतरच हा निर्णय जाहीर केला गेला. वर परत त्याच दिवशी रात्रीपासून बंदी आणली. नन्तर २ दिवस बॅंका बंद ठेवल्या आणि तीनच दिवस जुन्या नोटा त्याही काही ठराविक ठिकाणीच चालतील असा निर्णय जाहीर केला.. तल्लखपणा असावा तर असा.

अगदी , अगदी ! खणखणीत षटकार

स्रुजा
Tue, 11/08/2016 - 23:21 नवीन
अगदी , अगदी ! खणखणीत षटकार ठोकलाय .. पार स्टेडियमच्या बाहेर ! खतरनाक माणुस आहे हा. एक एक ऐतिहासिक निर्णय छातीठोकपणे घेत सुटलंय हे सरकार. आतापर्यंतच्या त्रिशंकु लोकसभांचं रेकॉर्ड ब्रेक करत, त्यांना सर्वाधिकार देणार्‍या भारतीय लोकशाहीचं मनापासून कौतुक वाटतंय. आणि लोकांनी टाकलेला विश्वास सार्थ पण ठरवतंय हे सरकार , निदान बर्‍याच अंशी. हे ही नसे थोडके. भारतीय लोकशाही प्रगल्भ झाल्याची सगळी लक्षणं आहेत.
↩ प्रतिसाद: सही रे सई

अजुन एक मुद्दा. ज्या

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 11/08/2016 - 23:13 नवीन
अजुन एक मुद्दा. ज्या काळोजीरामन लोकांनी काळा पैसा परकिय चलनामधे ठेवलाय त्याचं काय? त्यांना काय फरक पडेलसं वाटतं नाही. त्यावरही काहीतरी पाचर मारायाला हवी.

तो भारताबाहेरच खर्च करावा

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 11/08/2016 - 23:17 नवीन
तो भारताबाहेरच खर्च करावा लागेल. भारतात आणला तर सोर्स दाखवावा लागेल.
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ती पाचरसुध्धा मारली जाईल पण योग्य त्या वेळीच...

विनोद१८
Tue, 11/08/2016 - 23:20 नवीन
....मोदी काय करु शकतात याचा अनुभव आजवर येतोच आहे. असो, जे होते आहे ते देशहिताचे आहे हे नक्कीच.
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

खरे आहे...

विकास
Tue, 11/08/2016 - 23:55 नवीन
ती पाचरसुध्धा मारली जाईल पण योग्य त्या वेळीच... आम्हाला हवे तेंव्हा आणि आम्हाला हवे तसे शत्रूंवर हल्ले केले जातील असे पर्रीकर आणि इतरही मंत्री म्हणाले होतेच. तेच या संदर्भात पण लागू होते. दाऊद च्या संदर्भात वाचल्याचे आठवते की त्याचे ४०कोटी रुपये अचानक गहाळ झाले आणि त्याच्या माणसानेच चोरले असा आरोप होता. पण नंतर समजले की रियाध का अशाच कुठल्यातरी मध्यपुर्वेतील देशामधल्या बँकांच्या (परीणामी त्या राज्यकर्त्यांच्या) सहकार्याने ती गुप्त कारवाई होती.
↩ प्रतिसाद: विनोद१८

अजून एक

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 11/08/2016 - 23:19 नवीन
एका चर्चेत ऐकलं की जर उत्पन्नाचा सोर्स सांगता नाही आला तर ती रक्कम सरकार ताब्यात घेऊ शकते, असा कायदा आलाय म्हणे.

शिवाय फौजदारी खटला वेगळा

शाम भागवत
Tue, 11/08/2016 - 23:21 नवीन
शिवाय फौजदारी खटला वेगळा
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

तो तर आधीच केलाय बहुतेक

वगिश
Tue, 11/08/2016 - 23:23 नवीन
तो तर आधीच केलाय बहुतेक
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

मोदी प्लेड ट्रंप कार्ड! सारी

पिलीयन रायडर
Tue, 11/08/2016 - 23:22 नवीन
मोदी प्लेड ट्रंप कार्ड! सारी दुनिया हिलरी हय!!

=)) =)) =))

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 11/08/2016 - 23:33 नवीन
=)) =)) =)) बहुतेक भारतिय अमेरिकन विळक्षण विसरून एकतर मोदींची विलक्षण स्तुती करताहेत, तर काहीजण नोटांच्या रद्दीचा बरा भाव येईल की त्या थंडीतल्या शेकोटीसाठी बर्‍या पडतील याचा हिशेब लावत बसलेत ! ;)
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मागच्या सर्व घटनांवर विचार

सही रे सई
Tue, 11/08/2016 - 23:33 नवीन
मागच्या सर्व घटनांवर विचार केला तर अतिशय नियोजन बद्ध रीतीने ही खेळी खेळली आहे. पहिले २ वेळा काळा पैसा वाल्यांना तो पैसा जाहीर करायची संधी देणे , मग संसदेत काळा पैसा विरोधी कायदा संमत करून घेणे ज्यात उत्पन्नाचा स्त्रोत जाहीर नसेल तर तो सरकार ताब्यात घेऊ शकेल हे कलम असणे, जास्तीत जास्त जाणते कडे बँक अकौंट असावे या साठी जनधन योजना काढणे आणि ती यशस्वीरीत्या राबवणे, आणि मगच आजचे हे धाडसी पाउल उचलणे. जेव्हा अजून २०० वर्षांनी इतिहास लिहिला जाईल तेव्हा मला वाटत भारतीय इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असा असेल.

जास्तीत जास्त जनते* कडे बँक

सही रे सई
Tue, 11/08/2016 - 23:34 नवीन
जास्तीत जास्त जनते* कडे बँक अकौंट असावे या साठी जनधन योजना काढणे - असे वाचावे
↩ प्रतिसाद: सही रे सई

मलाही हा निर्णय आवडला. लगेच

रेवती
Tue, 11/08/2016 - 23:33 नवीन
मलाही हा निर्णय आवडला. लगेच आमलात आणलाय हेही ग्रेट.

खतरनाक निर्णय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/08/2016 - 23:43 नवीन
पंतप्रधान मोदीजी देशाला काय संबोधित करणार, असं वाटलं. (कधी कधी त्यांच्या भाषणाचा कंटालाही येतो, आजही तसंच काही असेल असं वाटलं) पण त्यांनी जो निर्णय घेतला त्याचं कौतुक वाटलं. पंतप्रधान काही निर्णय घेऊ शकतो सालं आपण ते विसरून गेलो होतो.काळा पैसा बाहेर यावा, ज्यांनी गुंतवणूक करून ठेवली ते वाचतील असे वाटते. बाकी, काय काय होईल ते बघुया. धाड़सी सरकार, धाड़सी पंतप्रधान. शुभेच्छा. आम्ही तुमच्या निर्णयाबरोबर आहोत. अभिनंदन...! -दिलीप बिरुटे

प्रा.डॉ तुम्ही खासगी कॉलेजात

अनुप ढेरे
Wed, 11/09/2016 - 10:48 नवीन
प्रा.डॉ तुम्ही खासगी कॉलेजात प्रा. आहात का?
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

का बरं ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/11/2016 - 13:53 नवीन
? -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

लोकसत्ता मधली ही 2000च्या

शब्दबम्बाळ
Tue, 11/08/2016 - 23:45 नवीन
लोकसत्ता मधली ही 2000च्या नोटेची बातमी खोटी निघाली तर यांच्यावर कारवाई होऊ शकते का?? आजकाल सोर्स द्यायचे बंद केलंय का वर्तमान पत्रांनी??
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा