✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

ट
ट्रेड मार्क यांनी
Tue, 11/08/2016 - 21:38  ·  लेख
लेख
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे. काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे. असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल. मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय? हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे. http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-1000-notes/ कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल. धन्यवाद.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मत

प्रतिक्रिया द्या
307024 वाचन

💬 प्रतिसाद (1112)

प्रतिक्रिया

मृत्युन्जय जी-

विशुमित
Tue, 11/29/2016 - 14:40 नवीन
मृत्युन्जय जी- - मी कधीच ४८ च समर्थन केलेलं /करणार ही नाही. ज्यांनी त्यावेळेस हे कृत्य केले त्यांचा मी निषेधच करतो. संदीप जी- माझ्या संकुचित आणि कुजकट विचारांना सुधारण्यासाठी नक्कीच बराच वाव आहे हे मी मान्य करतो. पण गुरुजींनी "भांडारकर" चा विषय उकरून तो थंड झालेल्या राखेत ठिणगी उत्पन्न करण्याच्या प्रयत्न होता. ही आग धगधगत ठेवण्यात काय हासील? वरून परत ४८ चा भय वाटतं असे ही मागे ते म्हंटले होते. http://www.misalpav.com/comment/887772#comment-887772 अनिरुद्ध.वैद्य जी- कृपया तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझा एवढाच हेतू आहे की सामाजिक सलोखा कसा राखला जाईल यावर आपण सर्वानी विचार केला पाहिजे.
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

माझ्या संकुचित आणि कुजकट

श्रीगुरुजी
Wed, 11/30/2016 - 14:55 नवीन
माझ्या संकुचित आणि कुजकट विचारांना सुधारण्यासाठी नक्कीच बराच वाव आहे हे मी मान्य करतो. पण गुरुजींनी "भांडारकर" चा विषय उकरून तो थंड झालेल्या राखेत ठिणगी उत्पन्न करण्याच्या प्रयत्न होता. ही आग धगधगत ठेवण्यात काय हासील? वरून परत ४८ चा भय वाटतं असे ही मागे ते म्हंटले होते.
४८ चे भय वाटते हे सांगण्यात चुकीचे काय आहे? आधी ब्राह्माणांविरूद्ध ४८ झाले व नंतर दलितांविरूद्ध ७८ झाले. ९० च्या दशकात ब्रिगेडच्या स्थापनेनंतर ट्रेंड बदलला. खेडेकर, कोकाटे, पोळके इ. वेगवेगळी ब्राह्मणद्वेषी पुस्तके लिहून ब्राह्मणांविरूद्ध लिहिण्यात अत्यंत खालची पातळी गाठली. ब्राह्मण नपुसंक असतात, मराठ्यांमुळे त्यांच्या बायकांची कूस उजवते, थोरले बाजीराव यांचे खरे वडील मराठा होते अशी अत्यंत किळसवाणी भाषा वापरली गेली. इतिहासातील ब्राह्मणांचे योगदान, स्वातंत्रलढ्यातील ब्राह्मणांचे योगदान नाकारले गेले. ब्राह्मण हे या भूमीतील नसून परके आहेत असे लिहिले गेले. या पुस्तकांचा निषेध होत असताना तुमचे साहेब, त्यांचे दिव्य पुतणे, त्यांच्या सुकन्या आणि सज्जन समजले जाणारे गृहमंत्री आबा यांनी या पुस्तकांविरूद्ध चकार शब्द काढला नाही. कारवाई करण्याचे तर लांबच राहिले. जेम्स लेनच्या पुस्तकाचे निमित्त करून ब्राह्मणांविरूद्ध द्वेषी प्रचार सुरू झाला. भांडारकर संस्थेवर हल्ला करून मोडतोड केली गेली. काही ब्राह्मण इतिहासकारांच्या तोंडाला काळे फासले गेले. त्याचा फायदा २००४ च्या निवडणुकीत मिळून राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला. भांडारकर संस्थेवर हल्ला झाला. नंतर इतिहासाची मोडतोड करून इतिहासातून दादोजी कोंडदेवांचे योगदान नाकारले गेले. एवढेच नव्हे तर त्यांचा 'आदिलशहाचे हस्तक' असा उल्लेख केला गेला. ब्राह्मण असलेले संत रामदास यांच्याविरूद्ध अत्यंत गलिच्छ लिहिले गेले. सत्तेत असलेले राष्ट्रवादी व काँग्रेस या प्रकाराविरूद्ध मूग गिळून गप्प होते. २०१० दांडगाई करून जिजामाता बागेतील दादोजी कोंडदेवांचा पुतळा उखडून तो कचर्‍याच्या ट्रकमधून नेला गेला. रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याची मोडतोड केली गेली. शिवाजी महाराजांनी ४०० ढेरपोट्या ब्राह्मणांना गोळ्या घालून मारले असा तद्दन खोटा इतिहास पुस्तकात लिहिला गेला. असल्या द्वेषी प्रकाराला प्रतिबंध घालणे ही तत्कालीन राज्यकर्त्यांची कायदेशीर व घटतात्मक जबाबदारी होती. ती पार न पाडता ते मुद्दाम गप्प बसून राहिले. सुरवातीला फक्त ब्राह्मणांविरूद्ध द्वेष पसरवित असल्याने इतर जाती संभाजी ब्रिगेडला पाठिंबा देत होत्या. हरी नरके, आ. ह. साळुंके इ. मंडळी ब्रिगेडच्या व्यासपीठावर जाउन ब्रिगेडची भलामण करीत होती. २००५ मध्ये शिवधर्माचे खूळ काढले गेले. आमच्या धर्मात ब्राह्मण सोडून इतर सर्वांना प्रवेश आहे असे जाहीररित्या सांगितले गेले. सुदैवाने हे खूळ फारसे वाढलेच नाही. काही काळातच ब्रिगेडची इतर जातींविरूद्धची भूमिका प्रकाशात आल्यावर इतर जातींच्या डोक्यात प्रकाश पडला. 'वाजवा टाळी, पळवा माळी, 'वाजवा तुतारी, पळवा वंजारी' इ. घोषणा, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याला विरोध यातून त्यांची इतर जातींविरूद्धची मानसिकता स्पष्ट झाल्याने इतर जातींचे डोळे उघडले. आता मराठा मोर्चे सुरू आहेत. राखीव जागांची जोरदार मागणी आहे. राज्याचा मुख्यमंत्री ब्राह्मण आहे. जर न्यायालयाने राखीव जागांच्य विरूद्ध निर्णय दिला तर त्याचे खापर ब्राह्मण मुख्यमंत्र्यावर म्हणजेच पर्यायाने ब्राह्मणांवर फोडले जाईल अशी भीति आहे.
↩ प्रतिसाद: विशुमित

दलित 2016 पण add करा लिस्टित.

संदीप डांगे
Wed, 11/30/2016 - 19:00 नवीन
दलित 2016 पण add करा लिस्टित...
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मोर्चा अरेंज करणारे आणि नाशिक

एमी
Sun, 12/04/2016 - 11:02 नवीन
मोर्चा अरेंज करणारे आणि नाशिक दंगल करणारे हे दोन वेगवेगळे आऊटफीट(?) असल्याची चर्चा ऐसीवर वाचल्याचे आठवते. === बादवे शिवसेना, मनसेने केलेल्या राड्यांना कोणत्या 'जाती'च्या पारड्यात टाकायचे? === वर जशी मराठ्यांच्या कृष्णकृत्यांची यादी मांडलीय तशीच विहिंप, बजरंगदल, सनातन, गोराक्षस वगैरेंचीपण मांडा आणि त्याच्या पावत्या रास्वसं किंवा ब्राह्मणांच्या नावे फाडा. मग त्यावर इथल्या आयडींची काय रिअॅक्शन असेल? किंवा दलितांनी, मुस्लिमांनी आतापर्यंत केलेल्या दंगलींची यादी मांडा. त्यांच्या बचावासाठी मआंजावर कोणी येइल का माहीत नाही. राडा करणारे प्रत्येक जातीत, धर्मात, देशात असतात. तो काही केवळ मराठ्यांचा एक्सक्लुझीव प्रांत नाही. तिकडे अमेरीकेतदेखील ट्रंप जिंकला म्हणून जाळपोळ, दगडफेक करणारे आहेतच की. === एनीवे हिंसा, दंगली या निषेधाच्या मार्गांना विरोध आहेच. पण केवळ हिंसा करणारा कोण आहे हे बघून चालत नाही. त्यामागे चिथावणी देणारे, वातावरण तापवणारे, अफवा परवणारे कोण होते हेदेखील पहावे लागते. नाहीतर त्यावरचे उपाय हे केवळ तात्पुरते आणि वरवर मलमपट्टी ठरतात. === हर्क्युल प्वॉरोची 'कर्टन' वाचलीय का? 'दोन नॉर्मल व्यक्तींमधल्या नॉर्मल बेबनावाला बरोबर ओळखायचे; तापलेल्या परिस्थितीत त्यातल्या एकाला हळूच प्रोवोक करायचे; आणि त्याने हिंसा केली की मोहीम फत्ते समजून स्वतः पुढच्या कामगिरीसाठी रवाना व्हायचे' असा प्वॉरोच्या मते 'अतिशय डेंजरस' व्हिलन आहे त्यात. === असो. धाग्यावर फारच अवांतर होतंय त्यामुळे टाटा.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

वर जशी मराठ्यांच्या

संदीप डांगे
Sun, 12/04/2016 - 11:11 नवीन
वर जशी मराठ्यांच्या कृष्णकृत्यांची यादी मांडलीय तशीच विहिंप, बजरंगदल, सनातन, गोराक्षस वगैरेंचीपण मांडा आणि त्याच्या पावत्या रास्वसं किंवा ब्राह्मणांच्या नावे फाडा. मग त्यावर इथल्या आयडींची काय रिअॅक्शन असेल? किंवा दलितांनी, मुस्लिमांनी आतापर्यंत केलेल्या दंगलींची यादी मांडा. त्यांच्या बचावासाठी मआंजावर कोणी येइल का माहीत नाही. >>> आहो, मांडा की. रिअ‍ॅक्शनचा काय विचार करायचा त्यात? माझे संपूर्ण अनुमोदन तुमच्या मांडण्याला, काढा बरं धागा. राडा करणारे प्रत्येक जातीत, धर्मात, देशात असतात. तो काही केवळ मराठ्यांचा एक्सक्लुझीव प्रांत नाही. तिकडे अमेरीकेतदेखील ट्रंप जिंकला म्हणून जाळपोळ, दगडफेक करणारे आहेतच की. >> वर यादी मांडायचं म्हणताय आणि परत हे पण बोलताय की राडा करण्याचा जाती-धर्म-देशाशी संबंध नाही. विसंगती नाही काय? हिंसा, दंगली या निषेधाच्या मार्गांना विरोध आहेच. पण केवळ हिंसा करणारा कोण आहे हे बघून चालत नाही. त्यामागे चिथावणी देणारे, वातावरण तापवणारे, अफवा परवणारे कोण होते हेदेखील पहावे लागते. >>> ओके, हे तर अगदी मुस्लिम दहशतवाद्यांना भडकवण्यात येते ह्या चालीवर म्हटलेले दिसते. कोणी कितीही भडकवले तरी आपला विवेक, सारासार माणुसपणाचा विचार असतो म्हणतात. जाउ द्या, टोळीयुद्धाच्या काळातून बाहेर येणे अनेकांना अजून मान्यच नाही, त्यात तुम्ही आम्ही काय करणार.
↩ प्रतिसाद: एमी

वर यादी मांडायचं म्हणताय आणि

एमी
Sun, 12/04/2016 - 11:31 नवीन
वर यादी मांडायचं म्हणताय आणि परत हे पण बोलताय की राडा करण्याचा जाती-धर्म-देशाशी संबंध नाही. विसंगती नाही काय? >> विसंगती कशी काय?? यादी मांडायची कामं 'तुम्ही' करताय आणि मी सांगतेय की "राडा करण्याचा जाती-धर्म-देशाशी संबंध नाही." ओके, हे तर अगदी मुस्लिम दहशतवाद्यांना भडकवण्यात येते ह्या चालीवर म्हटलेले दिसते. >> असं कोणी कुठे म्हणल्याचं मीतरी कधी वाचलं नाही. कोणी कितीही भडकवले तरी आपला विवेक, सारासार माणुसपणाचा विचार असतो म्हणतात. जाउ द्या, टोळीयुद्धाच्या काळातून बाहेर येणे अनेकांना अजून मान्यच नाही, त्यात तुम्ही आम्ही काय करणार. >> वेळ लागेल हे सगळं व्हायला. होइल सावकाश.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

वेळ लागेल हे सगळं व्हायला.

संदीप डांगे
Sun, 12/04/2016 - 11:35 नवीन
वेळ लागेल हे सगळं व्हायला. होइल सावकाश. >> =)) =)) बरोबर आहे.... मोर्चे काढणे झटपट होतं...
↩ प्रतिसाद: एमी

होय का

अनिरुद्ध.वैद्य
Sun, 12/04/2016 - 19:59 नवीन
मग ठिकाय बुवा. ४८ आणि ७८ चे भय अजून ही काही लोकांना उगाच च वाटत नाही. >> ह्यातन ते काही दिसत नाही अस मला उगीचच वाटलं त्यामुळे सो सॉरी. एकंदरीत वातावरण तसलंच आहे हो. काय करणार ... आम्ची ना संख्या ना आर्थिक ताकद त्यामुळं जपुन रहावं लागत. बाकी तुम्ही संभाजी ब्रीगेडसोबत नसाल अशी अपेक्षा. धन्यवाद!!
↩ प्रतिसाद: विशुमित

४८ आणि ७८ चे भय अजून ही काही

मोदक
Tue, 11/29/2016 - 14:48 नवीन
४८ आणि ७८ चे भय अजून ही काही लोकांना उगाच च वाटत नाही. मी एक सल्ला देवू का..? तुम्ही मुक मोर्चे काढता तेच चांगले आहे. :=))
↩ प्रतिसाद: विशुमित

<<<मी एक सल्ला देवू का..?

विशुमित
Tue, 11/29/2016 - 15:01 नवीन
<<<मी एक सल्ला देवू का..? तुम्ही मुक मोर्चे काढता तेच चांगले आहे. :=))>> आता तुम्हीच सांगा अशाने काय होईल? पन्हाळ वाढतच जाईल. म्हणून 'भांडारकर' बाबत माझा पूर्ण विराम. कारण त्यावर बऱ्याच वेळा चर्चा झाली आहे आणि त्यातून काही ही हशील नाही.
↩ प्रतिसाद: मोदक

पन्हाळ तयार होण्याला राजकारण

मोदक
Tue, 11/29/2016 - 15:45 नवीन
पन्हाळ तयार होण्याला राजकारण कारणीभूत आहे आणि आपण प्रत्यक्षपणे या गोष्टीचे बळी आहोत. पन्हाळ वाढत जाऊ नये ही अपेक्षा आपण सामान्य जनतेने व्यक्त केली तरी जातीच्या ठेवींवर पिढ्यान् पिढ्या परतावा मिळत रहावा हे जातीयवादी राजकारणाचे मर्म आहे. जातीयवादी राजकारण जनता नाकारत असल्याचे स्पष्ट संदेश गेल्या कांही निवडणुकांच्या निकालातून दिसत आहेत. बघू परिस्थीती कितपत सुधारते ते..!
↩ प्रतिसाद: विशुमित

<<<पन्हाळ तयार होण्याला

विशुमित
Tue, 11/29/2016 - 16:05 नवीन
<<<पन्हाळ तयार होण्याला राजकारण कारणीभूत आहे आणि आपण प्रत्यक्षपणे या गोष्टीचे बळी आहोत.>>> -सहमत <<<< पन्हाळ वाढत जाऊ नये ही अपेक्षा आपण सामान्य जनतेने व्यक्त केली तरी>>> - सामान्य माणसाला हे राजकारण समजत नाही, पण जाणणाऱ्या लोकांनी तरी त्याला हवा देऊ नये, ही माझी माफक अपेक्षा होती. कदाचित ते माझे संकुचित आणि कुजकट विचार होते. <<<<जातीयवादी राजकारण जनता नाकारत असल्याचे स्पष्ट संदेश>>> -- हे विधान अजून तरी सरसकट सगळीकडे लागू होत नाही.
↩ प्रतिसाद: मोदक

- सामान्य माणसाला हे राजकारण

मोदक
Tue, 11/29/2016 - 21:05 नवीन
- सामान्य माणसाला हे राजकारण समजत नाही, पण जाणणाऱ्या लोकांनी तरी त्याला हवा देऊ नये, ही माझी माफक अपेक्षा होती. कदाचित ते माझे संकुचित आणि कुजकट विचार होते. अपेक्षा चुकीची नाही, फक्त अनुकरण सगळ्यांनीच करावे इतकेच (माझ्यासह)
↩ प्रतिसाद: विशुमित

व्हाय आर यू सो अमेझड

ट्रेड मार्क
Tue, 11/29/2016 - 20:53 नवीन
आणि उगाच इतरांना लेबलं कशाला लावताय? त्यानुसार तुम्ही मोदी हेटर्स मध्ये मोडता का?
↩ प्रतिसाद: एमी

सध्यातरी निर्णय चांगला वाटतोय

अभिजीत अवलिया
Tue, 11/08/2016 - 22:14 नवीन
सध्यातरी निर्णय चांगला वाटतोय. पण 500/1000 च्या नोटा बाद केल्याने आतापर्यंत ज्यांनी 500/1000 च्या 'नोटांच्या स्वरूपात' पैसा दडवलेला आहे त्यांचीच फक्त गोची होईल. ज्यांनी तो जमीन जुमला, शेअर्स वगैरे मध्ये गुंतवलाय त्यांना काही होणार नाही. पण पाकिस्तान जो भारतात 500/1000 च्या खोट्या नोटा पेरण्यात गुंतलेला होता तो 100 च्या पण खोट्या नोटा बनवेल. त्यामुळे सादर निर्णयाने चांगले पाऊल पडले असले तरी आपली करन्सी जास्तीत जास्त सुरक्षित आणि डुप्लिकेट बनवायला कठीण बनवणे हाच दूरगामी उपाय आहे.

सहमत.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 11/08/2016 - 22:15 नवीन
सहमत.
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

१०० च्या नोटात व्यवहार करणे

शाम भागवत
Tue, 11/08/2016 - 22:19 नवीन
१०० च्या नोटात व्यवहार करणे फार गैरसोयीचे आहे. मतदानाच्या आदल्या रात्री काही लाख रुपये वाटायचे व ते सुध्दा १०० च्या नोटात म्हणजे फारच अवघड आहे. उत्तरप्रदेश वगैरेच्या निवडणुकात याचा परिणाम जाणवेल असे वाटते.
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

अती बड्या धेंडांना काही होणार

अनुप ढेरे
Tue, 11/08/2016 - 22:20 नवीन
अती बड्या धेंडांना काही होणार नाही. त्यांनी अनेक वर्ष शेअर बाजारात गुंतवला आहे पैसा. मिड लेवल लोकांची गोची.
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

५०० अन दोन हजाराच्या नोटा

खेडूत
Tue, 11/08/2016 - 22:21 नवीन
५०० अन दोन हजाराच्या नोटा अधुनिक तंत्राने केलेल्या असतील. १०० च्या नकलणे शक्य आहे, पण ज्या सहजसहजतेने १ कोटी नकलले जातात ते कठीण होईल. बाजाराला प्लास्टिक आणि ई व्यवहारांची सवय लागेल हे महत्वाचे.
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

एक नंबर तुफान निर्णय, मोदींनी

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 11/08/2016 - 22:17 नवीन
एक नंबर तुफान निर्णय, मोदींनी षटकार ठोकलाय, एकाच दगडात, कितीतरी पक्षी मारले, ब्लॅक मनी, विरोधक, हे पारंपरिक खेळाडू बाद केलेच त्याशिवाय शिस्तीत काँग्रेस अन समाजवादी पार्टी धुळीत मिळवल्या :)

उ.प्र. निवडणुकांच्या तोंडावर

अनुप ढेरे
Tue, 11/08/2016 - 22:21 नवीन
उ.प्र. निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय डेडली ठरेल.
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

कोणासाठी डेडली म्हणताय?

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 11/08/2016 - 22:38 नवीन
कोणासाठी डेडली म्हणताय?
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

निवडणूकीत काळ्या पैश्याचा

शाम भागवत
Tue, 11/08/2016 - 22:43 नवीन
निवडणूकीत काळ्या पैश्याचा वापर करणारे. :))
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

मतदानाच्या आदल्या दिवशी

शाम भागवत
Tue, 11/08/2016 - 22:41 नवीन
मतदानाच्या आदल्या दिवशी कदाचित सोन्याची वळी वगैरे वाटप होईल. सोने चांदी महागणार तर. :))
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

२००० च्या नोटमधे एक चिप असणार

शाम भागवत
Tue, 11/08/2016 - 22:20 नवीन
२००० च्या नोटमधे एक चिप असणार आहे व नोट खराब न करता ती काढता येणार नाही की त्यात बदल करता येणार नाही. ही चीप नोटेचे स्थान व क्रमांक परावर्तीत करेल. त्यामुळे सॅटेलाईटच्या सहाय्याने स्थाननिश्चिती करता येईल. जेव्हा हे सिग्नल्स खूपच जोरदार असतील व ते स्थान संशयास्पद असेल तर त्याचा ठावठिकाणा लावता येईल. तसेच त्याच्या वाहतुकीवरही लक्ष ठेवून छापा घालता येईल.

असे असेल तर भारताच्या

पुंबा
Tue, 11/08/2016 - 22:23 नवीन
असे असेल तर भारताच्या इतिहासात technology चा हा सर्वोत्तम उपयोग ठरेल. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर ते यश निर्विवादपणे मोदींचेच असेल. Kudos to Mr Prime minister.
↩ प्रतिसाद: शाम भागवत

धोरण व अंमलबजावणी दोन्हीची

शाम भागवत
Tue, 11/08/2016 - 22:24 नवीन
धोरण व अंमलबजावणी दोन्हीची मस्त सांगड घातली आहे असे वाटतेय. मुख्य म्हणजे जो काळा पैसा नोटांच्या स्वरूपात नसेल तो जर कधी भविष्यात नोटामधे परावर्तीत करायचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न उघडकीस येण्याची शक्यता आहे.
↩ प्रतिसाद: शाम भागवत

कृपया असल्या अफवा पसरवू नका.

साहना
Wed, 11/09/2016 - 01:47 नवीन
कृपया असल्या अफवा पसरवू नका.
↩ प्रतिसाद: शाम भागवत

मी लोकसत्तेच्या बातमीच्या

शाम भागवत
Wed, 11/09/2016 - 08:39 नवीन
मी लोकसत्तेच्या बातमीच्या आधारावर लिहिले आहे. अर्थात लोकसत्तेचे संपादक दिलगीरी व्यक्त करून अग्रलेख मागे घेऊ शकतात तसे या बातमीचे होणारच नाही असे मी ठामपणे म्हणू शकत नाही. रिझर्व्ह बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे नोटा छापण्यासाठी एक प्रायव्हेट लि. कंपनी स्थापन केली आहे हे ऐकले होते. तसेच या पध्दतीने खर्च खूप कमी होतो असेही ऐकले होते. रूपयाच्या नोटेचा खर्च सव्वा ते दीड रूपयाच्या घरात जात असल्याने त्या नोटा बंद केल्या होत्या मात्र या आधुनिक पध्दतीने उत्पादन केल्यास हा खर्च ७५ का ७८ पैसे इतकाच येतो त्यामुळे १ रूपयाची नोटही सुरू करता येईल असे ऐकले/वाचले होते. ही जी चीप आहे तिचे संशोधन अंदाजे १० वर्षापूर्वी सुरू झाले होते. मॉल मधे गिर्‍हाईकांनी ठकल्गाडीतून सामान काऊंटरवर आणल्यावर त्या सामानाला हातही न लावता तत्क्षणी बिल तयार करणे हा त्यामागे हेतू होता. येणारा संदेश आरशाप्रमाणे परावर्तीत करणारी चीप असल्याने त्याला बॅटरी लागणार नसल्याचे अनेक वर्षांपूर्वी वाचले होते. हल्ली पाश्चात्य देशात मॉलमधे ही यंत्रणा असते असे म्हणतात. २०१६ पर्यंत या तंत्रज्ञानात नक्कीच सुधारणा झाली असणार. युरोप अमेरिकेतील कारमधील जीपीएस यंत्रणा उपग्रहाशी थेट संपर्क करून कारची स्थाननिश्चिती करू शकते. व अशा कोट्यावधी कार्स ची स्थाननिश्चिती करता येते. मात्र येथे ही यंत्रणा स्वतःहून उपग्रहाशी संपर्क साधत असल्याने विजेची गरज भासते. भारतातही दुर्गम भागात जेथे इंटरनेट किंवा मोबाईलची रेंज येत नाही तेथे मोबाईलमधील जीपीएस यंत्रणेद्वारे स्थाननिश्चिती करता येते व गुगल मॅपच्या आधारे आपण दिशादिग्दर्शन मिळवू शकतो. येथेही मोबाईल स्वतःहून संपर्क साधत असल्याने बॅटरीची आवश्यकता आहे. मात्र यासाठी आपला मोबाईल जीपीएस यंत्रणेला अनुकुल असायला हवा. आज भारताने ७ उपग्रहांची मालिका बनवून स्वतःची जीपीएस यंत्रणा उभारली आहे. नवीन सॉफ्टवेअर उभारण्यासाठी आवश्यक मनुष्यबळही भारताकडे उपलब्ध आहे. थोडक्यात जीपीएस यंत्रणा व संदेश परावर्तन करणारी नॅनो चीप यांच्या एकत्रीत उपयोगाने असे काही करता येऊ शकेल असे वाटल्याने, लोकसत्तेतील बातमी ही निव्वळ एक कविकल्पना आहे असे मला वाटले नाही. मी हे सर्व कुठेतरी वाचून कॉपी पेस्ट करत नसून फक्त तर्क लढवून टंकत आहे. तरी कृपया बातमीचा दुवा मागू नये. मात्र कोणी मला दुवा दिल्यास तो हात जोडून नम्रतापूर्वक स्विकारला जाईल. :)) तसेच माझा तर्क १०० टक्के बरोबर आहे असे माझे म्हणणे नसल्याने इतरांची मते वाचायला आवडेल
↩ प्रतिसाद: साहना

मी लोकसत्तेच्या बातमीच्या

असंका
गुरुवार, 11/10/2016 - 10:25 नवीन
मी लोकसत्तेच्या बातमीच्या आधारावर लिहिले आहे
कृपया बातमीची लिंक देताल का? मी सर्च केलं पण सापडलं नाही.
↩ प्रतिसाद: शाम भागवत

येथे लोकसत्तेतील बातमी पहा

शाम भागवत
गुरुवार, 11/10/2016 - 14:55 नवीन
येथे लोकसत्तेतील बातमी पहा<\a>
↩ प्रतिसाद: असंका

आजिबात छाननी न करता अश्या

पुंबा
Sat, 11/12/2016 - 19:51 नवीन
आजिबात छाननी न करता अश्या बातम्या देणं लोकसत्तेत होणं म्हणजे कमाल झाली. जगाला आदर्श पत्रकारिता शिकवणाऱ्या कुबेरांनी याची जबाबदारी घेऊन निदान दिलगिरी तरी व्यक्त करावी.
↩ प्रतिसाद: शाम भागवत

अफवाच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 11/10/2016 - 12:45 नवीन
दोन हजाराच्या नोटेत अशी कुठलीही चीप नाही, असे काल मंत्र्यांनी सांगितले. -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: शाम भागवत

हो

शाम भागवत
गुरुवार, 11/10/2016 - 15:13 नवीन
इकोनॉमिक्स टाईम्समधे आलेय. चीप बद्दल जेटलींनी विचारल तर त्यांनी स्पष्ट उत्तर न देता प्रतिप्रश्न केला की, "तुम्हाला हे कुठुन कळल? मी तरी अस काही ऐकल नाही."
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्हॉट्सॅपी अफवा..

चिगो
गुरुवार, 11/10/2016 - 12:39 नवीन
ही व्हॉट्सॅपीय अफवा आहे, असं वाटतं.. रिजर्व बँकेच्या सर्क्युलरमधे ह्याबद्दल काहीही लिहीलेले नाहीय..
↩ प्रतिसाद: शाम भागवत

खरं खोटं माहित नाही.

मराठी कथालेखक
गुरुवार, 11/10/2016 - 16:41 नवीन
खरं खोटं माहित नाही. काल एक शेजारी भेटला होता, त्याचा भाऊ बँकेत नोकरीला असतो. बँकेत जेव्हा त्यांना (म्हणजे या शेजार्‍याचा भाऊ आणि इतर स्टाफ) यांना नोटेची माहिती दिली गेली तेव्हा त्या चीप आहे असं सांगितलं होतं माझा हा शेजारी अफवा पसरवणारा नाही. त्याचा भाऊ पण तसा नसेल अशी आशा आहे :)
↩ प्रतिसाद: चिगो

:)

अन्नू
गुरुवार, 11/10/2016 - 16:48 नवीन
TRUTH of 2000 notes https://www.youtube.com/watch?v=m21-lIY6Zu8
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

अजून एक गोष्ट सांगतो.

मराठी कथालेखक
गुरुवार, 11/10/2016 - 18:59 नवीन
आज ATM चालू होते का ? मला तरी नाही दिसलेत. पण सरकारी निवेदनात काय म्हंटलं होतं की १० तारखेला 'काही' ATM बंद राहतील. म्हणजे निदान काहीतरी चालू असायला हवेत ना ? पण माझ्या या शेजार्‍याने मला कालच सांगितलं होतं (अर्थातच त्याच्या भावाकडून आलेल्या माहितीच्या आधारे) की 'ATM उद्याही बंद असेल' म्हणून. चिपची गोष्टही तशीच असू शकते. म्हणजे 'आतली गोष्ट' जी खरेतर बाहेर फुटणं अपेक्षित नव्हतं पण फुटली म्हणून आता नाकारली जात आहे. मला माहिती आहे की ATM बंद असणे आणि नोटेत चिप असणे या दोन गोष्टी फार भिन्न आहेत आणि त्यांची अशा प्रकारे तुलना करणं फारसं योग्य नाही तरीही एक शक्यता म्हणून विचार करायला हवा. बाकी बँकिग क्षेत्रातील कुणी इथे असल्यास अधिक माहिती देवू शकतात (वेळ मिळाला तर :)
↩ प्रतिसाद: अन्नू

आमच्या इथेही

पैसा
गुरुवार, 11/10/2016 - 19:03 नवीन
आमच्या इथेही एटीएम बंद होती. पण ती त्या त्या बँकानी बंद केलेली होती. कारण स्टेट बँकेने शंभर रुपयाच्या नोटा इतर बँकाना दिल्या नाहीत. फक्त दहा आणि विसाची बंडले दिली. साहजिकच बँका एटीएम मधे कॅश भरू शकल्या नाहीत. शंभरच्या नोटा आणि पाचशेच्या नव्या नोटा मिळू लागल्या की एटीम नीट काम करू लागतील.
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

आज ATM चालू होते का ?>>>>>>

अन्नू
गुरुवार, 11/10/2016 - 19:32 नवीन
आज ATM चालू होते का ?>>>>>> माझ्या माहितीप्रमाणे कालपासूनच काही एटीएम चालू करण्यात आले होते (सर्व ठिकाणचे नसावेत कदाचित), शिवाय त्यांना विड्रॉ पैशाची मर्यादाही होती. चिपची गोष्टही तशीच असू शकते>>>> नाही. चिपला कार्यरत करण्यासाठी पॉवर सोर्स नाही. आणि इतक्या लांबून सॅटेलाईटला सिग्नल देण्याईतपत तर नाहीच नाही. तसं करायचं जरी बोललं तर त्याला अवाजवी खर्च येऊ शकतो जो कि भारताला परवडणारा नाही. काही लोक याला मॉलमध्ये वगैरे ठिकाणी असलेल्या डिटेक्टरचं उदाहरण देऊन हे काम करेल असा दावा करतात. पण प्रत्यक्षात ते अशक्य आहे. तो डिटेक्टर शॉर्ट डिस्टन्सला काम करतो, ना कि इतक्या दूरच्या वस्तूंना. साधं लॉजिक आहे- भारतात अजुन फोरजीला नीट नेटवर्क देता येत नाही तिथे नोटेला इतका पावरफुल नेटवर्क भारत कसा उपलब्ध करेल? https://www.youtube.com/watch?v=RnW3VkPgi7M
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

हिंजवडीला 8 ATMS आहेत

पुंबा
Sat, 11/12/2016 - 19:43 नवीन
हिंजवडीला 8 ATMS आहेत त्यापैकी काल केवळ एका ATM मध्ये कॅश होती, आज एकही ATM चालू नव्हते. :-(
↩ प्रतिसाद: अन्नू

.

सस्नेह
Fri, 11/11/2016 - 10:43 नवीन
Image removed. आज मिळाली ही नोट. चीप बीप काय दिसत नाही वरून तरी !
↩ प्रतिसाद: शाम भागवत

http://www.misalpav.com

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 11/14/2016 - 22:50 नवीन
http://www.misalpav.com/comment/898363#comment-898363 आता, परत परत चिपची कहाणी ऐकून रागावलेल्या एका कायप्पाकराची तुमच्यावर "मेहेरनजर" झाली तर तो / ती तुम्हाला नोटेवरच्या मंगळयानातून सफर घडवून आणेल ! ;) =)) =))
↩ प्रतिसाद: सस्नेह

अत्यंत प्रशंसनीय निर्णय. या

पुंबा
Tue, 11/08/2016 - 22:21 नवीन
अत्यंत प्रशंसनीय निर्णय. या निर्णयाचे दूरगामी परिणाम पाहायला मिळतील. काळ्या पैशावर अंकुश लावणे आणि बनावट चलन रोखणे असे दोन हेतू साध्य होतील असे वाटते. अर्थात अर्थव्यवस्थेतील चलनपूरवठा कमी होऊन महागाई आणि व्याजदर वाढतील त्याने उद्योगाच्या वाढीला थोडा अडथळा निर्माण होईल. माझे दोन प्रश्न आहेत कृपया जाणकारांनी उत्तर द्यावे: १. जरी 500 आणि 1000 च्या सध्या चलनात असलेल्या नोटांवर बंदी घातली असली तरी 1 जानेवारीपासून 2000 आणि 500 च्या नव्या नोटा चलनात येतील असे ऐकले. मोठ्या denomination च्या नोटा म्हणजे काळ्या अर्थव्यवस्थेचा कणा असतो. तेव्हा परत काळा पैसा असणाऱ्यांच्या हे पथ्यावरच पडेल. जरी ट्रेड मार्क म्हणतात त्याप्रमाणे ट्रॅकर असेल तर अतिउत्तम परन्तु त्यापेक्षा 100 च्या नोटांची अधिक मोठ्या प्रमाणात छपाई करून चलनाचा प्रश्न सोडवता आला नसता का? २. सध्या जे काळा पैसा बाळगून आहेत ते बँकांतून त्यांच्याजवळच्या बँकेतून आहेत तेवढ्या नोटा बदलून आणू शकणार नाहीत का? बँकांना अशा प्रकारे मोठी रक्कम बदलण्याकरिता आणणाऱ्यांबद्दल काही निर्देश मिळाले असतील का? प्राप्तिकर खाते बेनामी सम्पत्ती असणाऱ्यांना कसे ट्रॅक करू शकेल?

नोटा कोणीही बदलून आणू शकेल.

अनुप ढेरे
Tue, 11/08/2016 - 22:23 नवीन
नोटा कोणीही बदलून आणू शकेल. फक्त बदलताना आयडी प्रूफ लागणार. आणि तेही दिवसाला ४०००रु इतकेच मिळणार. (२ आठवड्यानंतर बहुधा रोज १००००)
↩ प्रतिसाद: पुंबा

बरोबर आहे ते, पण......

विनोद१८
Tue, 11/08/2016 - 23:11 नवीन
.... त्या सगळ्या नोटबदलूंची सरकारात नोंद राहणार आहे, म्हणजे कोणत्या व्यक्ती व कुटुंबे वा व्यावसायिक मोठ्याप्रमाणात नोटा बदलत आहेत याकडे बारकाईने लक्ष ठेवले जाउ शकते हे तर फारच महत्वाचे आहे. या सरकारचे जे म्हणणे आहे की काळ्या पैशाची निर्मितीच थांबवीर्मितीच, तसे ते करुन दाख्वीत आहेत. छानच लगाम लावलाय श्री. मोदींनी.
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

मुख्य म्हणजे बँकेतील सीबीएस

शाम भागवत
Tue, 11/08/2016 - 23:16 नवीन
मुख्य म्हणजे बँकेतील सीबीएस प्रणालीमुळे हा डाटा एकत्र करून मग त्याची छाननी करणे सोपे जाणार आहे.
↩ प्रतिसाद: विनोद१८

प्रत्येकाला तीन लाखावर रक्कम

खेडूत
Tue, 11/08/2016 - 22:28 नवीन
प्रत्येकाला तीन लाखावर रक्कम असेल तर स्पेशल सोय रिझर्व बँकेत केलीय. तिथे झाडा झडती होईल. लालू टाईप लोक्स पिलावळ घेऊन गेले तरी एखादा कोटी पांढरा होईल.
↩ प्रतिसाद: पुंबा

अहाहा.. हे वाचून दिल गार्डन

पुंबा
Tue, 11/08/2016 - 22:41 नवीन
अहाहा.. हे वाचून दिल गार्डन गार्डन झाला.. असे असेल तर मात्र हि एकच योजना 2019 ला मोदींना पुन्हा पंतप्रधान बनण्यास मदत करेल..
↩ प्रतिसाद: खेडूत

मला वाटतं याचा संबंध नोटेच्या

अंतु बर्वा
Wed, 11/09/2016 - 00:00 नवीन
मला वाटतं याचा संबंध नोटेच्या छपाई करीता लागणार्या खर्चाशी असावा. १०० ची एक नोट छापायला जेवढा खर्च येतो (१०० * २०) त्यामानाने २००० ची नोट छापण्यात जास्त फायदा असावा. अर्थात हा फक्त एक अंदाज..
↩ प्रतिसाद: पुंबा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा