आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव १

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
8 Nov 2014 - 4:27 pm

बरोबर वर्ष झालं. ९ नोवेंबर २०१३ रोजी चेन्नैला सामना सुरु झाला त्यावेळी आनंद आणि मॅग्नुस दोघांच्या भूमिका बरोबर विरुद्ध होत्या - मॅग्नुस आव्हानवीर होता आणि आनंद जगज्जेता!

तो सामना मॅग्नुसने हातोहात जिंकला. घरच्या मैदानावरती आनंदला अपेक्षांचे ओझे पेलता आले नव्हते. पण त्याची विजिगीषा बघा नोवेम्बरमध्ये सामना हरल्यानंतर आनंद जवळपास संपला अशीच अटकळ होती.
कँडिडेट मास्टर्समधून आनंदने अशी काही मुसंडी मारली की सगळे अवाक झाले.

आणि आज तो कार्लसनसमोर आव्हान घेऊन बसणार आहे. चला जास्ती वेळ न लावता पहिल्या सामन्याकडे वळूयात.

आनंदने ड्रॉ जिंकलाय आणि तो पांढर्‍या मोहोर्‍यांनी पहिला डाव खेळेल.

सामन्याची वेबसाईट आहे तिथे डाव बघता येईल

http://www.sochi2014.fide.com/live-games/

किंवा इथेही बघता येईल

http://www.chessdom.com/carlsen-anand-2014-live-games/

समाजविरंगुळा

प्रतिक्रिया

आनंद पहिली खेळी कोणती करणार?

माझ्यामते ई४

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Nov 2014 - 5:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तर मी डी चार म्हणतो.

-दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 5:11 pm | चतुरंग

बरोबर डी४ सुद्धा असू शकेल! :)

सामना सुरु व्हायला अजून तासभर आहे....:(
अमेरिकन डे लाईट टाइम सेविंगच्या घोळामुळे मी तासभर अलीकडची वेळ निवड्ली बहुदा...

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 4:46 pm | चतुरंग

सामन्याआधी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Nov 2014 - 4:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजुन सामना सुरु व्हायला एक्केचाळीस मिनिटं बाकी आहेत.
आरामात या. सामना सुरु झाला की आम्ही वाचत राहु.

आणि मनःपूर्वक आभार.
-दिलीप बिरुटे

चाणक्य's picture

8 Nov 2014 - 4:59 pm | चाणक्य

:-) परत एकदा. धन्यवाद चतुरंग. वाचतोय....

पहाटवारा's picture

9 Nov 2014 - 4:09 am | पहाटवारा

धाग्यबद्दल धन्यवाद !
-पहाटवारा

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Nov 2014 - 5:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

सामन्याआधिची प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे...

http://www.sochi2014.fide.com/video-archive/

त्यानंतर Opening Ceremony of the World Chess Championship 2014 होईल... वरच्याच दुव्यावर बघता येईल...

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 5:16 pm | चतुरंग

ग्रँमा. शशिकिरण कृष्णन, पोलिश ग्रँमा रादेक वोस्झेक आणि तिसरा नवीन आहे तोही पोलिश ग्रँमा.गाजेव्स्की (या पोलिश लोकांची नावं उच्चारताना जिभेला गाठ बसते राव! :()

कार्लसनने गेल्या सामन्याच्या वेळी त्याचे सेकंड्स सांगायला नकार दिला होता. त्याने यावेळी मात्र तसे नकरता सांगितले. डेन्मार्कचा पीटर हाईन नेल्सन (हा याआधी आनंदच्या सेकंड्स टीममधे होता!) आणि दुसरा गेल्यावेळचाच आहे जॉन लुडविग हॅमर.

वाटच पाहात होतो धाग्याची .
येत राहिन.
अवांतर-कुठल्या टिव्ही चॅनेल वर पाहता येईल का ?

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 5:38 pm | चतुरंग

मॅग्नुसचा किल्लेकोट राजाच्या बाजूला झालाय.

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 5:40 pm | चतुरंग

भलताच ताण आहे असे दिसते...सारखे ब्रेक होते आहे त्यामुळे सामना सलग बघता एय नाहीये :(

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 5:46 pm | चतुरंग

पहिल्या ८ खेळ्या २ मिनिटात झाल्यात त्याच्या. आठव्या खेळीला मॅग्नुसने १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेतलाय!

आणि काळ्या उंटाने एफ ३ मधल्या घोड्यावर.

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 5:56 pm | चतुरंग

जोरदार सुरुवात केली आहे. त्याचा रोख आक्रमक खेळाकडे आहे. टॅक्टिकल खेळाकडे डाव नेणे निश्चितच आहे. डाव मोकळा होत प्याद्यांकडे गेला की मॅग्नुस खूष असतो. तेच नेमके होऊ द्यायचे नाहीये.

रमताराम's picture

8 Nov 2014 - 5:59 pm | रमताराम

आज मजेशीर गोष्ट अशी दिसते की आनंद झटपट खेळी करतोय नि मॅग्नस वेळ घेतोय. डावाच्या सुरुवातीच्या टप्प्यात हे चित्र आश्चर्यजनक आहे. बहुधा मॅग्नस एन्ड गेम पर्यंत बेडरपणे वेगाने खेळतो असा अनुभव आहे. कदाचित आता दोघांच्या भूमिका बदलल्याचा परिणाम म्हणावा का?

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 5:59 pm | चतुरंग

लागलाय का? भलताच वेगाने खेळतोय तो. फक्त ४ मिनिटात बारा खेळ्या! कमॉन आनंद!!

रमताराम's picture

8 Nov 2014 - 6:01 pm | रमताराम

पहिली आश्चर्यजनक खेळी आनंदची 'लाँग कॅसल' ते ही राजाच्या नव्या जागेला प्याद्याचे संरक्षण नसताना. दोन वर्षांपूर्वी गेलफंडने असेच राजा उघडा टाकणारे कॅसल करून हरता डाव ओढून आणलेला होता त्याची आठवण झाली,

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 6:02 pm | चतुरंग

यावेळचा आनंद नक्कीच वेगळा आहे! :)

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 6:01 pm | चतुरंग

घोडा गेल्या तीन खेळ्या उड्या मारतोय..अजूनही त्याला ठाव सापडलेला नाही..आता एफ ४ प्याद्याने पुन्हा त्याला हुसकावून लावले जाईल. आनंद ईज इन ड्रायवर्स सीट!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Nov 2014 - 6:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, अजुन बर्‍याच चाली व्हायच्या आहेत पण मला फुकट म्याग्नुसचा पट भक्कम वाटतोय.

-दिलीप बिरुटे

रमताराम's picture

8 Nov 2014 - 6:03 pm | रमताराम

एफ-३ चे प्यादे बेट म्हणून ठेवलेले दिसते आनंदने. पण पुढचा सापळा काही दिसत नाही अजून.

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 6:03 pm | चतुरंग

एफ ३ वरचे प्यादे घेऊ शकत नाही कारण क्यू सी ३ अशा चेकने घोडा पडेल

रमताराम's picture

8 Nov 2014 - 6:07 pm | रमताराम

ते खरे आहे. पण त्यामुळे त्याला संभाळण्याची चिंता वजिराच्या शिरी राहते आहे.

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 6:11 pm | चतुरंग

निघाला की एकतर उंट फानचेट्टो करुन कर्णात बसेल किंवा एफ चे प्यादेच पुढे सरकेल...मग वजीर मोकळा

टाकले आहे आनंदने. आता तो ई६ खेळेल का?

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 6:13 pm | चतुरंग

टिक्टिक करत ४० मिनिटे गेलीत!! किती चालींचा विचार कर्तो आहेस बाबा? १५ खेळ्यांची काँबिनेशन्स?

रमताराम's picture

8 Nov 2014 - 6:14 pm | रमताराम

मॅग्नस आणि संभ्रम? तब्बल तीन वेळा काहीतरी मूव करण्यासाठी हात उंचावला नि खाली घेतला कार्ल्याने. जगज्जेतेपणाचे दडपण जाणवू लागले म्हणावे का?

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 6:18 pm | चतुरंग

डाव ऑलरेडी तयारीच्या बाहेर गेलाय त्याच्यासाठी. तो दडपणाखाली वाटतो आहे...वर्किंग आउट सोल्यूशन अ‍ॅट दि बोर्ड? फारच कठिण...

रमताराम's picture

8 Nov 2014 - 6:21 pm | रमताराम

पण कार्ल्या फारसा तयारीवर भरवसा ठेवणारा नाहीच, टोपीतून ससे काढणारा माणूस तो. :D

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 6:26 pm | चतुरंग

ससा मेलेला निघाला तर आनंद त्याचे कालवण करुन खाईल!!;०)

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 6:16 pm | चतुरंग

आनंद इतका आक्रमक असेल अशी मॅग्नुसची अटकळ नसावै, तशी बर्‍याच जणांची नसेल परंतु जलद खेळ आणि अंतस्फूर्तीने केलेला खेळ ही दोन वैशिष्ठ्ये जपत आनंदने खेळ केला तर तो उच्च असतो असे माझे मत.

कुठल्या टिवी चॅनेलवर चालु आहे का ?
नायतर इथे वाचुनच खुश व्हावे लागेल.

रमताराम's picture

8 Nov 2014 - 6:27 pm | रमताराम

आनलैन आहात तर इथेच बघा की. आणि टीवी म्हणाल तर डीडी स्पोर्ट्स वरच असली तर असेल. एरवी फारसा टीआरपी आणि म्हणून पैसा नसलेल्या खेळासाठी धंदेवाईक च्यानेल थोडेस स्लॉट देणार आहेत?

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 6:27 pm | चतुरंग

थेट प्रक्षेपण चालू आहे
http://www.sochi2014.fide.com/live-games/

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 6:25 pm | चतुरंग

आता हत्ती सी ८ असा प्लॅन आहे मॅग्नुसचा कारण जर क्यू सी ३ असा वजीर सरकला तर सी प्याद्याने डी प्यादे मारुन वजीर राजाला पिन करेल मॅग्नुस!!

रमताराम's picture

8 Nov 2014 - 6:35 pm | रमताराम

आम्ही पळतो. एक काम आहे. आंद्याला जिंकण्यासाठी नि तुम्हाला पार्टीसाठी शुभेच्छा.

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 6:40 pm | चतुरंग

लवकर परत या! काम होऊ देत तुमचे.

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 6:55 pm | चतुरंग

आता सी६ प्याद्याने डि ५ प्यादे घेणे जवळ्पास अनिवार्य आहे. हत्ती सी ८ मधे येऊ शकत नाही.

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 7:17 pm | चतुरंग

किंवा क्यू बी ६ अशा खेळ्या आहेत

आता आनंदला राजा बी१ मधे घेऊन वजीर मोकळा करणे आवश्यक

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 7:20 pm | चतुरंग

ठेवणे भाग आहे कारण त्याचे प्याद्यांचे स्ट्रक्चर ऑलरेडी मोडलेले आहे अणि मोकळ्या स्तंभात हत्ती आणूण पुढे सरकलेली प्यादी भक्कम करणे गरजेचे आहे नाहीतर त्याच्या हल्ल्याची लाट ओसरताच मॅग्नुस हल्ला करेल आणि पांढरा राजा तित्कासा सुरक्षित नाहीये!

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 7:23 pm | चतुरंग

खेळला!

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 7:25 pm | चतुरंग

जी ५ नधे येऊ शकत नाही. जी ५ असे प्यादे पुढे आले तर हत्ती जी १ असा येऊन पिन मारतो.

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 7:28 pm | चतुरंग

मधे अपेक्षेप्रमाणे एफ ४ प्याद्यावर हल्ला. आता हत्ती ई १ मधे आणून ई ७ प्याद्यावर हल्ला करणार का आनंक?

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 7:29 pm | चतुरंग

एफ प्याद्याला जोर लावला..

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 7:31 pm | चतुरंग

ई ६ मधे घुसेल का? आणि नंतर एच प्यादे रेटून राजाला कोंडीत पकडण्यासाठी प्रयत्न?

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 7:34 pm | चतुरंग

डाव अगदी कलत्या फळीवर आलाय! काळा वजीर एफ ६ मधे यायला बघतोय? काळा राजा पांढर्‍या वजिराच्या कर्णातून बाजूला घेऊन एफ प्यादे पुढे ढकलण्यासाठी सज्ज होते आहे का?

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 7:50 pm | चतुरंग

पांढरा वजीर डी२ मधे येऊन दोन्ही प्याद्यांना जोर देऊन आहे. आता काळा हत्ती डी ६ मधे येऊन घोडा डी८ मधे आणून पांढर्‍या उंटाला ई६ मधून हुसकावून लावेल का?

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 7:55 pm | चतुरंग

ई१ मधे आलाय, काळ्या घोड्याने हल्ला केला की उंट जी ४ मधे येईल.

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 8:04 pm | चतुरंग

उंट एच ३ मधे आणणे जास्त संयुक्तिक वाटते आहे. पण मग ई५ असे प्यादे पुढे येते एन्पासंट घेता येत नाही कारण मागे वजीर पिन झालाय!

त्याचे प्रश्ण सोडवलेले आहेत. सध्यातरी आनंदला किंचित माघार घेणे भाग आहे असे दिसते....

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 8:10 pm | चतुरंग

आनंद खेळला एफ ५, घोड्याने पांढरा उंट हत्तीने काळा घोडा अशी मारामारी होऊन प्यादे एफ ५ खेळी थोपवली आहे.

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 8:11 pm | चतुरंग

हत्ती एफ ६ आणून ई ७ वरच्या प्याद्याला जोर देतोय का हत्तींची मारामारी करुन डाव सोपा करतोय?

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 8:19 pm | चतुरंग

आणि हत्ती सी स्तंभात आणून मॅग्नुसने ताबा घेतलाय. आता आनंदची मदार पुढे गेलेल्या प्याद्यांवर आहे पण आता प्रत्येक खेळी कॅलक्यूलेटेड हवीच हवी.

वजिराने हत्ती मारता येत नाही कारण मग वजीर सी २ चेक, राजा ए १, वजीर सी १ चेक आणि पाठोपाठ हत्तीने मात होते!! गाढव मात म्हणता येईल याला...

जेपी's picture

8 Nov 2014 - 8:30 pm | जेपी

वाचतोय.
मोबल्या वर गेम पाहता येत नाही.

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 8:33 pm | चतुरंग

असा आणून ई ७ मारण्याची धमकी दिली आहे. हत्तींची मारामारी होणार..

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 8:37 pm | चतुरंग

एच २ चे प्यादे घेत्ले तर हत्तीने ई७ प्यादे मारुन चेक दिला जाऊ शकतो. वजिराने एच १ असा चेक दिला तर हत्ती परत मागे आणून चेक निघू शकतो.

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 8:43 pm | चतुरंग

प्याद्याची कमकुवत बाजू हा आता खेळाचा केंद्रबिंदू आहे. हत्ती डि ८ आणि नंतर डी ७ असा आणून त्या प्याद्याला दुहेरी जोर करणे गरजेचे..

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 8:52 pm | चतुरंग

खेळ्यांना १४ मिनिटे आहे आणि आनंदला १३ खेळ्यांना २३.

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 9:01 pm | चतुरंग

जायची शक्यता दिसायला लागली आहे. आनंदची दोन्ही मोहोरी पटाच्या मध्यात राहून संपूर्ण पटावर लक्ष ठेवून आहेत त्यामुळे अगदी बरोबरी नाही कारण आनंद अजूनही जिंकण्यासाठी खेळू शकतोच....

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 9:31 pm | चतुरंग

डावावर हळूहळू मिळवायला ताबा सुरुवात केली आहे! :(
आनंदला सावधपणे खेळावे लागणार...

कठीण आहे.
अवांतर :डावपेच म्हटलं की .The Other Guy Blinked की या पुस्तकाची आठवण होते.

रामदास's picture

8 Nov 2014 - 10:16 pm | रामदास

रचाकने : खेळाडू ज्या कागदावर खेळी लिहीतात त्याचा नंतर ऑक्शन वगैरे होतो का ?

चतुरंग's picture

8 Nov 2014 - 11:27 pm | चतुरंग

तशी काही बातमी वाचल्याचे आठवत नाहीये पण फिडेला ही आयडिया द्यायला हरकत नाही पेटंट घ्या! :)

डाव पाहिला नाही अद्याप, पण तुमच्या प्रतिसादांवरून मागच्या वर्षीची आठवण येतेय!

मुक्त विहारि's picture

9 Nov 2014 - 12:46 am | मुक्त विहारि

बरोबरी की आनंद जिंकला...

आनंद हरा नहीं करते...

संजय क्षीरसागर's picture

9 Nov 2014 - 1:18 am | संजय क्षीरसागर

काळी मोहोरी असून कार्लसन आक्रमक खेळला. त्याच्याकडे (या गेममधे तरी) जास्त क्लॅरिटी वाटली.

(बहुदा) फिशरनं म्हटलंय, उत्तम खेळाडू म्हणजे लॉंग-ड्रॉन काँप्लिकेटेड स्ट्रॅटजी नाही, त्याच्याकडे साधे-सोपे पण अचूकपणे आमलात येणारे प्लान्स असतात!

संजय क्षीरसागर's picture

9 Nov 2014 - 2:50 am | संजय क्षीरसागर

Anand seemed to have taken cues from the 2013 championship loss where his slow, defensive play was said to be the reason behind his defeat. He started off aggressively and both players showed intent for a result instead of playing for a draw.

But things started turning sour for the Indian Grand Master after the first twenty moves. Carlsen, who initially looked flummoxed, soon pulled himself together and played a set of brilliant moves and wrested back momentum.

After the first twenty moves, Magnus losing the game was out of question.

From then on, it went from bad to worse for Anand becasue Magnus as usual started pressing for a win. On top of that, Anand started committing small errors too. From moves 30 to 40 Vishy's decisions were not prudent, thus leading to complications in the end-game.

Anand used this narrow lee-way from Carlsen and at the end put his queen to good use to force a draw. Especially his 44th move Qh1 was appreciated by all the chess experts who were following the game as the best move of the game.

आणि आनंदची ही पोस्ट मॅच कबुली :

Anand when asked what went wrong in the middle, "Somehow I did some careless moves and got wobbly in the middle, on the 34th move I got into a spot of bother and the time was pressing too. I'm a little bit relieved yes."

मला आता या आनंद वि॰कार्लसन यांच्यातल्या खेळाची तुलना पूर्वी झालेल्या ब्रझील वि॰ फ्रान्स (फिफा फाइनल)फुटबॉल खेळाशी करावीशी वाटतेय.
आक्रमक खेळाडूची हल्लाचाल अयशस्वी झाली तर संरक्षणात्मक खेळाडू त्याला हरवू शकतो कारण त्याचे सर्व मोहरे एकमेकाची पाठराखण करत असतात तर आक्रमकाचे पुढे गेलेले मोहरे अडकतात आणि मागच्या मोहऱ्यांकडे दुर्लक्ष झालेलं असतं.

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 8:23 am | चतुरंग

एकूण चांगला झाला. आनंदने आक्रमक सुरुवात केली. वरती म्हटल्याप्रमाणे वीस चालींपर्यंत त्याचा वरचष्मा होता. घड्याळात सुद्धा तो बराच पुढे होता. त्यानंतर मात्र मॅग्नुसने त्याचे आडाखे चुकीचे ठरवले.
माझ्यामते मॅग्नुसचे सगळ्यात मोठे शक्तिस्थान आहे त्याचा अत्यंत साधा खेळ, एकावेळी एकच खेळी हे सूत्र तो कटाक्षाने पाळतो. उदा. आजच्या सामन्यात सत्ताविसाव्या खेळीच्या आसपास पटाच्या मध्यात आनंदचा वजीर आणि हत्ती अतिशय प्रबळ वाटत होते त्यानंतर दहा चालींमध्ये आनंदची दोन्ही मोहोरी पहिल्या ओळीत राजाला वाचवायला धडपडत होती!
मॅग्नुसच्या अत्यंत अचूक खेळ्या हे बघण्यासारखे असते. बत्तिसाव्या खेळीपासून पुढे सलग सहा खेळ्या त्याने फक्त वजिराच्या केल्या आहेत. बघताना वजीर नुसता इकडून तिकडे हलवलाह्जातोय की काय असे दिसते आहे पण प्रत्येक खेळी ही अत्यंत लॉजिकल आणि डाव कणाकणाने पुढे नेणारी आहे.
दोन मोठ्या खेळ्यांच्या मधे तो एखादी प्रॉफिलॅक्टिक (प्रतिस्पर्ध्याच्या प्रभावाला रोखून धरणारी) खेळी करतो.
आजच्या डावात मला मॅग्नुसचा खेळ प्रभावी वाटला. आनंदला जर ४१ वी आणि ४४ वी चाल सापडली नसती तर त्याचे काही खरे नव्हते.