✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता
  • नवीन लेखन
  • पाककृती
  • भटकंती
  • विशेषांक

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव १

च
चतुरंग यांनी
Sat, 11/08/2014 - 16:27  ·  लेख
लेख
बरोबर वर्ष झालं. ९ नोवेंबर २०१३ रोजी चेन्नैला सामना सुरु झाला त्यावेळी आनंद आणि मॅग्नुस दोघांच्या भूमिका बरोबर विरुद्ध होत्या - मॅग्नुस आव्हानवीर होता आणि आनंद जगज्जेता! तो सामना मॅग्नुसने हातोहात जिंकला. घरच्या मैदानावरती आनंदला अपेक्षांचे ओझे पेलता आले नव्हते. पण त्याची विजिगीषा बघा नोवेम्बरमध्ये सामना हरल्यानंतर आनंद जवळपास संपला अशीच अटकळ होती. कँडिडेट मास्टर्समधून आनंदने अशी काही मुसंडी मारली की सगळे अवाक झाले. आणि आज तो कार्लसनसमोर आव्हान घेऊन बसणार आहे. चला जास्ती वेळ न लावता पहिल्या सामन्याकडे वळूयात. आनंदने ड्रॉ जिंकलाय आणि तो पांढर्‍या मोहोर्‍यांनी पहिला डाव खेळेल. सामन्याची वेबसाईट आहे तिथे डाव बघता येईल http://www.sochi2014.fide.com/live-games/ किंवा इथेही बघता येईल http://www.chessdom.com/carlsen-anand-2014-live-games/
  • आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव २
  • आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव ३
  • आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ४
  • आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ५
  • आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ६
  • आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ७
  • आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ८
  • आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ९
  • आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव १०
  • आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ११

Book traversal links for आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव १

  • आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
24936 वाचन

💬 प्रतिसाद (73)

प्रतिक्रिया

आता पांढरा हत्ती

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 19:55 नवीन
ई१ मधे आलाय, काळ्या घोड्याने हल्ला केला की उंट जी ४ मधे येईल.
  • Log in or register to post comments

आनंद विचारात आहे

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 20:04 नवीन
उंट एच ३ मधे आणणे जास्त संयुक्तिक वाटते आहे. पण मग ई५ असे प्यादे पुढे येते एन्पासंट घेता येत नाही कारण मागे वजीर पिन झालाय!
  • Log in or register to post comments

मॅग्नुसने नेहेमीप्रमाणेच

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 20:08 नवीन
त्याचे प्रश्ण सोडवलेले आहेत. सध्यातरी आनंदला किंचित माघार घेणे भाग आहे असे दिसते....
  • Log in or register to post comments

ओह..

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 20:10 नवीन
आनंद खेळला एफ ५, घोड्याने पांढरा उंट हत्तीने काळा घोडा अशी मारामारी होऊन प्यादे एफ ५ खेळी थोपवली आहे.
  • Log in or register to post comments

आता मॅग्नुस

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 20:11 नवीन
हत्ती एफ ६ आणून ई ७ वरच्या प्याद्याला जोर देतोय का हत्तींची मारामारी करुन डाव सोपा करतोय?
  • Log in or register to post comments

वजीर

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 20:19 नवीन
आणि हत्ती सी स्तंभात आणून मॅग्नुसने ताबा घेतलाय. आता आनंदची मदार पुढे गेलेल्या प्याद्यांवर आहे पण आता प्रत्येक खेळी कॅलक्यूलेटेड हवीच हवी.
  • Log in or register to post comments

आता हत्तीने डि५ प्यादे मारण्यची धमकी आहे

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 20:29 नवीन
वजिराने हत्ती मारता येत नाही कारण मग वजीर सी २ चेक, राजा ए १, वजीर सी १ चेक आणि पाठोपाठ हत्तीने मात होते!! गाढव मात म्हणता येईल याला...
  • Log in or register to post comments

वाचतोय.

जेपी
Sat, 11/08/2014 - 20:30 नवीन
वाचतोय. मोबल्या वर गेम पाहता येत नाही.
  • Log in or register to post comments

आनंदने हत्ती ई १

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 20:33 नवीन
असा आणून ई ७ मारण्याची धमकी दिली आहे. हत्तींची मारामारी होणार..
  • Log in or register to post comments

आता वजिराने

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 20:37 नवीन
एच २ चे प्यादे घेत्ले तर हत्तीने ई७ प्यादे मारुन चेक दिला जाऊ शकतो. वजिराने एच १ असा चेक दिला तर हत्ती परत मागे आणून चेक निघू शकतो.
  • Log in or register to post comments

काळ्याची ई७

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 20:43 नवीन
प्याद्याची कमकुवत बाजू हा आता खेळाचा केंद्रबिंदू आहे. हत्ती डि ८ आणि नंतर डी ७ असा आणून त्या प्याद्याला दुहेरी जोर करणे गरजेचे..
  • Log in or register to post comments

मॅग्नुसला १४

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 20:52 नवीन
खेळ्यांना १४ मिनिटे आहे आणि आनंदला १३ खेळ्यांना २३.
  • Log in or register to post comments

डाव बरोबरीकडे

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 21:01 नवीन
जायची शक्यता दिसायला लागली आहे. आनंदची दोन्ही मोहोरी पटाच्या मध्यात राहून संपूर्ण पटावर लक्ष ठेवून आहेत त्यामुळे अगदी बरोबरी नाही कारण आनंद अजूनही जिंकण्यासाठी खेळू शकतोच....
  • Log in or register to post comments

मॅग्नुसने

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 21:31 नवीन
डावावर हळूहळू मिळवायला ताबा सुरुवात केली आहे! :( आनंदला सावधपणे खेळावे लागणार...
  • Log in or register to post comments

पावणे पाच तास विचारच करत बसायचं ?

रामदास
Sat, 11/08/2014 - 22:09 नवीन
कठीण आहे. अवांतर :डावपेच म्हटलं की .The Other Guy Blinked की या पुस्तकाची आठवण होते.
  • Log in or register to post comments

चतुरंग

रामदास
Sat, 11/08/2014 - 22:16 नवीन
रचाकने : खेळाडू ज्या कागदावर खेळी लिहीतात त्याचा नंतर ऑक्शन वगैरे होतो का ?
  • Log in or register to post comments

अजून तरी

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 23:27 नवीन
तशी काही बातमी वाचल्याचे आठवत नाहीये पण फिडेला ही आयडिया द्यायला हरकत नाही पेटंट घ्या! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

डाव पाहिला नाही अद्याप, पण

आतिवास
Sat, 11/08/2014 - 22:17 नवीन
डाव पाहिला नाही अद्याप, पण तुमच्या प्रतिसादांवरून मागच्या वर्षीची आठवण येतेय!
  • Log in or register to post comments

काय झाले शेवटी?

मुक्त विहारि
Sun, 11/09/2014 - 00:46 नवीन
बरोबरी की आनंद जिंकला... आनंद हरा नहीं करते...
  • Log in or register to post comments

बरोबरी

संजय क्षीरसागर
Sun, 11/09/2014 - 01:18 नवीन
काळी मोहोरी असून कार्लसन आक्रमक खेळला. त्याच्याकडे (या गेममधे तरी) जास्त क्लॅरिटी वाटली. (बहुदा) फिशरनं म्हटलंय, उत्तम खेळाडू म्हणजे लॉंग-ड्रॉन काँप्लिकेटेड स्ट्रॅटजी नाही, त्याच्याकडे साधे-सोपे पण अचूकपणे आमलात येणारे प्लान्स असतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

या कमेंटस वाचनीय आहेत :

संजय क्षीरसागर
Sun, 11/09/2014 - 02:50 नवीन
Anand seemed to have taken cues from the 2013 championship loss where his slow, defensive play was said to be the reason behind his defeat. He started off aggressively and both players showed intent for a result instead of playing for a draw. But things started turning sour for the Indian Grand Master after the first twenty moves. Carlsen, who initially looked flummoxed, soon pulled himself together and played a set of brilliant moves and wrested back momentum. After the first twenty moves, Magnus losing the game was out of question. From then on, it went from bad to worse for Anand becasue Magnus as usual started pressing for a win. On top of that, Anand started committing small errors too. From moves 30 to 40 Vishy's decisions were not prudent, thus leading to complications in the end-game. Anand used this narrow lee-way from Carlsen and at the end put his queen to good use to force a draw. Especially his 44th move Qh1 was appreciated by all the chess experts who were following the game as the best move of the game. आणि आनंदची ही पोस्ट मॅच कबुली : Anand when asked what went wrong in the middle, "Somehow I did some careless moves and got wobbly in the middle, on the 34th move I got into a spot of bother and the time was pressing too. I'm a little bit relieved yes."
  • Log in or register to post comments

मला आता या आनंद वि॰कार्लसन

कंजूस
Sun, 11/09/2014 - 06:12 नवीन
मला आता या आनंद वि॰कार्लसन यांच्यातल्या खेळाची तुलना पूर्वी झालेल्या ब्रझील वि॰ फ्रान्स (फिफा फाइनल)फुटबॉल खेळाशी करावीशी वाटतेय. आक्रमक खेळाडूची हल्लाचाल अयशस्वी झाली तर संरक्षणात्मक खेळाडू त्याला हरवू शकतो कारण त्याचे सर्व मोहरे एकमेकाची पाठराखण करत असतात तर आक्रमकाचे पुढे गेलेले मोहरे अडकतात आणि मागच्या मोहऱ्यांकडे दुर्लक्ष झालेलं असतं.
  • Log in or register to post comments

आजचा डाव

चतुरंग
Sun, 11/09/2014 - 08:23 नवीन
एकूण चांगला झाला. आनंदने आक्रमक सुरुवात केली. वरती म्हटल्याप्रमाणे वीस चालींपर्यंत त्याचा वरचष्मा होता. घड्याळात सुद्धा तो बराच पुढे होता. त्यानंतर मात्र मॅग्नुसने त्याचे आडाखे चुकीचे ठरवले. माझ्यामते मॅग्नुसचे सगळ्यात मोठे शक्तिस्थान आहे त्याचा अत्यंत साधा खेळ, एकावेळी एकच खेळी हे सूत्र तो कटाक्षाने पाळतो. उदा. आजच्या सामन्यात सत्ताविसाव्या खेळीच्या आसपास पटाच्या मध्यात आनंदचा वजीर आणि हत्ती अतिशय प्रबळ वाटत होते त्यानंतर दहा चालींमध्ये आनंदची दोन्ही मोहोरी पहिल्या ओळीत राजाला वाचवायला धडपडत होती! मॅग्नुसच्या अत्यंत अचूक खेळ्या हे बघण्यासारखे असते. बत्तिसाव्या खेळीपासून पुढे सलग सहा खेळ्या त्याने फक्त वजिराच्या केल्या आहेत. बघताना वजीर नुसता इकडून तिकडे हलवलाह्जातोय की काय असे दिसते आहे पण प्रत्येक खेळी ही अत्यंत लॉजिकल आणि डाव कणाकणाने पुढे नेणारी आहे. दोन मोठ्या खेळ्यांच्या मधे तो एखादी प्रॉफिलॅक्टिक (प्रतिस्पर्ध्याच्या प्रभावाला रोखून धरणारी) खेळी करतो. आजच्या डावात मला मॅग्नुसचा खेळ प्रभावी वाटला. आनंदला जर ४१ वी आणि ४४ वी चाल सापडली नसती तर त्याचे काही खरे नव्हते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा