आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव ३

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
11 Nov 2014 - 5:41 pm

वीकांताला आनंद डाव हरला आणि १.५ वि.०.५ असा गुणांनी मागे पडला. कालचा विश्रांतीचा दिवस आज काय घेऊन येतोय बघूयात. आनंदसाठी जिंकणे अनिवार्यच आहे कारण पांढरी मोहोरी आहेत आणि पराभवाचे घाव ताजे आहेत!!
आतापर्यंत आनंद ज्याज्यावेळी डाव हरला आहे त्या त्यावेळी त्यापुढचा डाव लगेच जिंकलाय अपवाद मागची जगज्जेतेपदाची स्पर्धा! यावेळी तो अपवाद होता हे सिद्ध करु शकेल का आनंद?

कामाचा दिवस असल्याने मला सलग येणे शक्य नाही रसिकांनी डाव पुढे चालू ठेवावा.

आनंदने डी४ प्याद्याने डाव सुरु केलाय. पहिल्या ५ मिनिटातच १५ खेळ्या झाल्यात. आनंदचे सी प्यादे बघता बघता सातव्या पट्टित पोचले आणे आणि सी स्तंभ मोकळा झालाय. घोडा बी५ असा मोक्याच्या स्थानावर आलाय.

क्रीडाआस्वाद

प्रतिक्रिया

केदार-मिसळपाव's picture

11 Nov 2014 - 5:44 pm | केदार-मिसळपाव

हे काय चाल्लय आज आनंद चे... एकदम शिवसेना स्टाईल...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2014 - 5:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनन्द आज आक्रमक मुड मधे आहे (वीज भार नियमनामुळे मीही सलग म्याच नै पाहू शकत) :(

चतुरंग's picture

11 Nov 2014 - 5:51 pm | चतुरंग

डावात पट टाकता का? डाव इथेच बघता येऊ शकेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2014 - 5:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ट्राय करतो.

केदार-मिसळपाव's picture

11 Nov 2014 - 5:53 pm | केदार-मिसळपाव

चालत नहिये आज.

चतुरंग's picture

11 Nov 2014 - 5:54 pm | चतुरंग

लावलाय राव आज. किती वर्षांनी आनंद जुन्या दिवसांची आठवण करुन देतोय!
फक्त शेवटप्र्यंत नीट डाव ने म्हणजे झालं...

मी पण मोबल्यावर आहे.कुठल्याही टिवी चॅनेलवर दिसात नाय.
:-(

केदार-मिसळपाव's picture

11 Nov 2014 - 5:58 pm | केदार-मिसळपाव

की, सावकाश खेळुनसुद्धा कार्लसन शेवटी रिग्यात घेतोच, मग होउन जाउ दे.
बी-५ मधल्या घोड्याला त्याने काही मदत ठेवली नाहिये.

प्रचेतस's picture

11 Nov 2014 - 5:58 pm | प्रचेतस

हा आनंद पण किल्लेकोट का करत नाही, कार्ल्याने कसं पटकन केलं

चतुरंग's picture

11 Nov 2014 - 5:59 pm | चतुरंग

आनंदचा जी ५ वरचा घोडा घेऊ शकत नाही कारण मग बी ५ मधला घोडा डी ६ असा येतो आणि वजिराला जागा नाही. कारण वजीर बाजूला गेला की प्यादे आठव्या पट्टीत येते आणि काळा मोहोरी गमावतो..

तिसर्‍या डावाचा पट टाकायचा प्रयत्न करतो आहे:

हा दुवा बरोबर नसेल तर संपादकांनी काढावा ही विनंती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2014 - 6:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वर धाग्यात टाकतो आभार.

-दिलीप बिरुटे

केदार-मिसळपाव's picture

11 Nov 2014 - 6:02 pm | केदार-मिसळपाव

हत्ती ए-५ खेळला तर.. आनंद च्या घोड्याला वजिराने मदत पुरवावी लागेल.

केदार-मिसळपाव's picture

11 Nov 2014 - 6:04 pm | केदार-मिसळपाव

धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2014 - 6:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनंद घोड्याचं बलीदान का देतोय

चतुरंग's picture

11 Nov 2014 - 6:12 pm | चतुरंग

....

प्रचेतस's picture

11 Nov 2014 - 6:12 pm | प्रचेतस

नाही हो,
उंटाचा पाठिंबा घेतलाय की

केदार-मिसळपाव's picture

11 Nov 2014 - 6:13 pm | केदार-मिसळपाव

काळ्या उंटाला किंवा घोड्याला मारण्यासाठी. नक्की मला नाहीए कळाले.

कार्लसनची पूढची खेळी अजूनही नाही....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2014 - 6:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कार्लसनची सिष्टिम ह्यांग झाली वाटतं
उत्तम बचाव त्याचा आता सुरु झालं वाटतं

-दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

11 Nov 2014 - 6:33 pm | चतुरंग

एवढ्यात आनंद व्यक्त करु नका...

केदार-मिसळपाव's picture

11 Nov 2014 - 6:32 pm | केदार-मिसळपाव

फक्त इथे थोडे उशिरा दिसलेय.

केदार-मिसळपाव's picture

11 Nov 2014 - 6:34 pm | केदार-मिसळपाव

आता आनंद एफ-३ खेळणार का? कि नवीन चाल रचणार?

चतुरंग's picture

11 Nov 2014 - 6:38 pm | चतुरंग

आता हत्ती सहाव्या पट्टीत कधी घुसतोय ते बघायचे..

केदार-मिसळपाव's picture

11 Nov 2014 - 6:42 pm | केदार-मिसळपाव

बहुधा घोडा मागे घेइल पण आनंद उंट जी-५ ला आणु शकतो. पण तसे नाही झाले तर कार्लसन घोडा अजुन मागे इ-८ ला नेइल का?

पुढची चाल तज्ञ लोक गेस करा ना राव.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2014 - 6:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेका घोड़ा मागे घे टूक टूक

-दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

11 Nov 2014 - 6:50 pm | चतुरंग

मधे येऊ शकतो परंतु मग घोडा डी ६ मधे येऊ शकतो आणि वजिराला हुसकावून लावू शकतो.
सहाव्या पट्टीत हत्ती आणि उंट हे काही सोपे नाही काळ्याला.
पण खेळला तो हत्तीची चाल...

केदार-मिसळपाव's picture

11 Nov 2014 - 6:51 pm | केदार-मिसळपाव

पुढच्या चाली.
कदाचित घोडा - जी-३ किंवा एफ-६ किंवा सी-३?
हत्ती - ए-५

पण कार्लसन नेहमीच काहितरी नविन करतो.

केदार-मिसळपाव's picture

11 Nov 2014 - 6:53 pm | केदार-मिसळपाव

बाप्पा. काहितरी ठरवुन आलाय आनंद आज

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2014 - 6:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोघांचे घोड़मारी नक्की का ?

केदार-मिसळपाव's picture

11 Nov 2014 - 6:55 pm | केदार-मिसळपाव

किल्लेकोट शिवाय पर्याय नाही आनंदला. ... जबरी खेळलाय.

केदार-मिसळपाव's picture

11 Nov 2014 - 6:56 pm | केदार-मिसळपाव

मग किल्लेकोट बहुतेक.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2014 - 6:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वजीर इतक्या पुढे नेऊन ठेवला
हार्ट बीट वाढले ना भो माझे

-दिलीप बिरुटे

केदार-मिसळपाव's picture

11 Nov 2014 - 7:08 pm | केदार-मिसळपाव

इ-डी-५ खेळलाय आनंद.
कार्लसन आता ए-२ खेळणार का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2014 - 7:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डोके दुखी होऊ नये मागच्या टूर्नामेंटला आनन्द असाच लटकला होता.

चतुरंग's picture

11 Nov 2014 - 7:30 pm | चतुरंग

आता पुढचे दोन तास अतरी येता येणार नाही.

प्यादी पुन्हा समान झाली आहेत. आता एन्डगेम नशीबात असलाच तर तो ही रोचक व्हावा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2014 - 7:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कार्लसन कधी रिझाइन देईल ?

-दिलीप बिरुटे

प्रसाद गोडबोले's picture

11 Nov 2014 - 7:40 pm | प्रसाद गोडबोले

कार्लसन कधी रिझाइन देईल ?

>>>
माझ्या माहीती नुसार कार्लसन कधीच रिझाइन देत नाही !

प्रसाद गोडबोले's picture

11 Nov 2014 - 7:33 pm | प्रसाद गोडबोले

कोणाचं पारडं जड आहे आज ?

रामदास's picture

11 Nov 2014 - 7:40 pm | रामदास

आत्तातरी आनंदच्या बाजूने आहे.

आनंद मधे मधे पाणण्या उंचाउन प्रत्येक डावात मॅग्नसकडे पाहतो. ते मला थोडेसे नेहमी ऑकवर्ड नि नर्व्हस वाटते. आत्ता पहिल्यांदा मॅग्नसला तस्सेच आनंदकडे पाहताना पाहिले.

डाव नेहमीच शेवटपर्यंत आनंदचा वाटतो. मॅग्नस शेवटी बाजे मारतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2014 - 7:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओके :(

केदार-मिसळपाव's picture

11 Nov 2014 - 8:07 pm | केदार-मिसळपाव

एच-६ खेळणार का?

केदार-मिसळपाव's picture

11 Nov 2014 - 8:17 pm | केदार-मिसळपाव

पुन्हा कार्लसन ला खेळावे लागेल.

केदार-मिसळपाव's picture

11 Nov 2014 - 8:21 pm | केदार-मिसळपाव

बी-बी-४ काय करणार आनंद आता.. खाणार कि वेगळे खेळणार

मॅग्नसला तेराच मिनिटे राहिलीत. टाईमवर हारण्याचा गेम तर होणार नाही?

खाल्यावर त्याचा हत्ती जातो ना.

केदार-मिसळपाव's picture

11 Nov 2014 - 8:46 pm | केदार-मिसळपाव

वजीर बी-७ हवा होता.

आदूबाळ's picture

11 Nov 2014 - 8:49 pm | आदूबाळ

रक्तपात करून एंडगेमात शिरण्याऐवजी आनंदने वजीर मागे का खेचला?

केदार-मिसळपाव's picture

11 Nov 2014 - 8:49 pm | केदार-मिसळपाव

थोडेफार चांगले खेळला आनंद.

आज मॅग्नस जिंकला तर इथून पुढे आपण त्याचे फॅन.

अनुप ढेरे's picture

11 Nov 2014 - 8:50 pm | अनुप ढेरे

कॉमेंट्रीत तर Qc4 पेर्फेक्ट मूव म्हणतायत.

कमेंटरीवाला मंतोय क्वीन सी ६ बेस्ट मूव होती नि आनंद जिंकल्यात जमा आहे.

केदार-मिसळपाव's picture

11 Nov 2014 - 8:50 pm | केदार-मिसळपाव

मस्त मस्त

केदार-मिसळपाव's picture

11 Nov 2014 - 8:51 pm | केदार-मिसळपाव

आनंदने..

केदार-मिसळपाव's picture

11 Nov 2014 - 8:59 pm | केदार-मिसळपाव

युप्पिइ

प्रसाद गोडबोले's picture

11 Nov 2014 - 9:00 pm | प्रसाद गोडबोले

जिंकला रे जिंकला आपला आनंद !

केदार-मिसळपाव's picture

11 Nov 2014 - 9:00 pm | केदार-मिसळपाव

मस्त.. आनंद जिंकला आज.

arunjoshi123's picture

11 Nov 2014 - 9:01 pm | arunjoshi123

जिकला गडी.

संजय क्षीरसागर's picture

11 Nov 2014 - 9:02 pm | संजय क्षीरसागर

त्यानं इनिशिएटिव शेवटपर्यंत कायम ठेवलाय. आणि चेसमधे इनिशिएटिवच सर्व काही आहे. कार्लसन सहजी नमणारा नाही पण आनंद जोपर्यंत गेम लीड करतोयं तोपर्यंत त्याचं काही खरं नाही.

सध्या आनंदला संधी आहे हे नक्की.

संजय क्षीरसागर's picture

11 Nov 2014 - 9:06 pm | संजय क्षीरसागर

आनंद तरुणासारखं खेळला. त्याच्या सी-प्याद्यानं शवटपर्यंत कार्लसनला खेळूच दिलं नाही!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2014 - 9:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हिपिप हुर्रे हिपिप हुर्रे !!!

-दिलीप बिरुटे

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Nov 2014 - 9:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

१०० X हिपिप हुर्रे हिपिप हुर्रे !!!

आतिवास's picture

11 Nov 2014 - 9:40 pm | आतिवास

मजा आली आज.
खेळात हार- जीत चालायचीच - हे खरं असलं तरी आपला आवडता खेळाडू जिंकण्याचा आनंद वेगळाच असतो :-)
अवांतरः इतके लोक आपला विजय पाहायला इच्छुक आहेत, याची आनंदला कल्पना असेल का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2014 - 9:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज डावावर निर्विवाद वर्चस्व आनंदचच होतं. पण कार्लासनचा बचावही तितकाच भक्कम असतो तेव्हा त्याचा पराभव मला बघायला मिळाला मी खुश आहे ! :-)

चिअर्स ! :)

-दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

11 Nov 2014 - 10:00 pm | चतुरंग

तुफान खेळला आज. मी आधीच्या समालोचना मध्ये म्हंटले होते तसे, त्याचा नैसर्गिक खेळ खुला आणि झटपट आहे, त्याची अंतस्फूर्ती जबरद्स्त आहे, त्या गोष्टी डावलून अतिविचार करुन खेळणे त्याच्या स्वभावधर्मात नाही, त्याचा खेळ दडपणाखाली कृत्रिम होत जातो. आजच्या डावाने अजूनही त्याच्यात जिंकण्याची उर्मी किती जिवंत आहे याचा रोकडा प्रत्यय आला!! कार्लसनचा बचाव भेदण्यात आज आनंद यशस्वी झाला किबहुना त्याने मॅग्नुसला बचावाची संधीच दिली नाही म्हणणे जास्त योग्य राहील.
हा डाव नक्कीच त्याच्या (आणि आपल्या) फेवरिट डावांमधला एक असणार आहे!

त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले की एक डाव आपण हरलो की पुढचा लगेच जिंकतो, गेल्यावेळचा अपवाद होता हे सिद्ध झले!! आता कर्लसनवरती दडपण वाढले आहे हे नक्की.
पुढल्या डावात काय खेळायचे याचा प्लॅन आता वेगळा बनवावा लागणार त्याला! :)

अद्याप स्पर्धा बाकी आहे हे लक्षात घेऊनही, तुमचे विशेष आभार मानते. :-)
तुमच्या समालोचनामुळे सामना समजायला अधिक मदत होते. त्यात इतर मिपाकरही वेळोवेळी भर घालतात त्यामुळे अधिक मजा येते.

रमताराम's picture

11 Nov 2014 - 10:28 pm | रमताराम

मला दोन प्रसंग आठवतात. गेलफंडने प्रथम त्याला हरवले नि चवताळलेल्या आनंदने त्याला पुढच्या डावात अठरा खेळीत अस्मान दाखवले. पण दुसरा प्रसंग आठवतो तो प्रोफेशनल चेस टूर्नामेंट मधला. तिथे असा कमबॅक केला आनंदने. पण नंतर क्राम्निकने सलग दोन डाव जिंकले आणि शेवटचा डाव तर आनंद जणू पहिल्या खेळीपासून रिजाईन केल्यासारखा औपचारिकच खेळला. तसे होऊ नये अशी इच्छा व्यक्त करतो

एस's picture

11 Nov 2014 - 10:40 pm | एस

आनंदचे अभिनंदन!!!

आनंद जिकला आज कळाल.समालोचनचा बद्दल सर्वांचे आभार.

२०१३ बिल्बाओ मास्टर्स स्पर्धेत झालेला हा डाव बघा -

http://www.chessgames.com/perl/chessgame?gid=1733069

आनंद-कार्लसनचा आजचा डाव १९ व्या चालीपर्यंत तंतोतंत सारखा आहे. किंबहुना याच डावावरुन सुधारणा करुन आनंद आणि त्याच्या टीमने नवीन वेरिएशन्स शोधली आणि आनंदने ती यशस्वीरीत्या डावात वापरली.
विसाव्या चालीला घोड्यांची मारामारी आणि पुढच्या दोन चालीत वजीर सातव्या पट्टीत नेऊन ठेवणे हे भलतेच परिणामकारक झाले. आनंद आणि कार्लसन यांना हा डाव चाल अन चाल आठवत असला तरी नेमक्या कोणत्या खेळीत सुधारणा करुन कोणती लाईन निवडली जाणार आहे याचा पत्ता लागणे अवघड असते आणि तिथूनच पुढचे प्रश्न हे तिथल्यातिथे बोर्डावरच सोडवावे लागतात. सहाजिकच वेळाचे आणि क्लिष्ट विश्लेषणाचे गणित साधणे अवघड असते. आज मॅग्नुस असाच वेळेच्या आणि क्लिष्ट विश्लेषणाच्या कचाट्यात सापडला आणि हरला.
आता उद्या तो कोणते नवीन वेरिएशन घेऊन खेळायला येतो ते बघूयात. उद्याचा सामनाही आजच्या एवढाच उत्कंठावर्धक होईल याची खात्रीच आहे!

कार्लसन आनंदच्या स्टाईलनं खेळला!

रमताराम's picture

12 Nov 2014 - 10:22 am | रमताराम

तिथे घोडा वाचवण्याच्या प्रयत्नात अरोनियनने अ‍ॅड्म्सच्या वजीराला बाहेर येण्याची संधी दिली. आणि त्या वजीराला जो घोडा वाचवण्याच्या प्रयत्न केला त्यावरच मोर्चे लावता आल्याने (आणि मागच्या प्याद्याला पाठिंबा द्यायला हत्ती चटकन मिळाल्याने) अरोनियनने इनिशिएटिव गमावला. आनंदने घोडा लगेचच मटकावल्याने पीस डाउन होण्याचा धोका निर्माण केला. त्यात घोडा ताबडतोब रिक्लेम करण्याच्या नादात कार्ल्याच्या हत्तीने ए पट्टी सोडली आणि तो हत्ती आपल्याच्या प्याद्यांच्या गराड्यात विचित्र परिस्थितीत अडकला. डी प्याद्याने वजीर जेरबंद केलेला असल्याने कार्ल्याची सारीच मोहरी ठाणबंद झाली. तिकडे अ‍ॅडम्सचा वजीर बाहेर आल्याने आणि राजाकडचा हत्तीही लगेचच अ‍ॅक्टिव झाल्याने त्याला गेम वाचवता आला.

अविनाश पांढरकर's picture

12 Nov 2014 - 10:53 am | अविनाश पांढरकर

आनंद जिंकला!!! मज्जा आली.

डावात आपण गेस केलेल्या (अर्थात या लोकांच्या एक सहस्रांश अनालिसिससहित) एक चालीच्या प्रत्यक्ष पटावर दिसण्याने होणारा "आनंद" फार मजा देऊन जातो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Nov 2014 - 10:59 am | डॉ सुहास म्हात्रे

"आनंद जिंकला" याचाच खूsssप आनंद आहे.

त्यामुळे आजचा खेळ बघायला अजून खास मजा येणार आहे. या डावात मिळालेल्या उभारीचा उपयोग करून आनंदने या स्पर्धेत मॅग्नूसला चारीमुड्या चित करावे !

("कम्युनिटी चेस"चा जुना-जाणता खेळाडू) इए ;) :)

ज्यांच्या ऑफिसात व्हिडिओ दिसत नाही (स्पोर्ट साईट बॅन आहेत) तिथे लाईवस्ट्रीम डॉट कॉम चालत असेल तर मॅच पाहता येईल.

तरीही इथले समालोचन वाचायला मज्जा येते
आनंदचे हार्दिक अभिनंदन

तसा व्यक्तिशः मी कोणी हारल्या जिंकल्याने इतका एक्साईट होत नाही. पण चेन्नईमधे आनंद = ब्लंडर असे समीकरण झालेले. बाकी सगळे उत्तम पण शेवटी ब्लंडर केली म्हणून गेम गेला असे समालोचक म्हणत. शिवाय मॅग्नसला आनंदकडून याची देही याची डोळा मी पाहिलेलेच नव्हते म्हणून ही मॅच विशेष वाटलेली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Nov 2014 - 12:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी काय तज्ञ नाही पण सी पट्टीतल्या प्यादीने कार्लसनला परेशान करुन ठेवलेलं दिसलं. कार्लसनचा वजीर हललाच नाही त्याला प्यादी वजीर होईल आणि मग डावावर आनंदचं वर्चस्व राहील असे त्याला वाटत असावे का माहिती नाही. पण ती प्यादी माझ्यातरी नजरेसमोरुन जात नै ये. मजा आली.

-दिलीप बिरुटे

पिशी अबोली's picture

12 Nov 2014 - 3:14 pm | पिशी अबोली

केवळ बेसिक बुद्धिबळ माहीत असणार्‍या माझ्यासारख्यांना इथलं समालोचन वाचत पाहिल्याने खरा आनंद लुटता येतो.. :)