Skip to main content

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव १

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 08/11/2014 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
बरोबर वर्ष झालं. ९ नोवेंबर २०१३ रोजी चेन्नैला सामना सुरु झाला त्यावेळी आनंद आणि मॅग्नुस दोघांच्या भूमिका बरोबर विरुद्ध होत्या - मॅग्नुस आव्हानवीर होता आणि आनंद जगज्जेता! तो सामना मॅग्नुसने हातोहात जिंकला. घरच्या मैदानावरती आनंदला अपेक्षांचे ओझे पेलता आले नव्हते. पण त्याची विजिगीषा बघा नोवेम्बरमध्ये सामना हरल्यानंतर आनंद जवळपास संपला अशीच अटकळ होती. कँडिडेट मास्टर्समधून आनंदने अशी काही मुसंडी मारली की सगळे अवाक झाले. आणि आज तो कार्लसनसमोर आव्हान घेऊन बसणार आहे. चला जास्ती वेळ न लावता पहिल्या सामन्याकडे वळूयात. आनंदने ड्रॉ जिंकलाय आणि तो पांढर्‍या मोहोर्‍यांनी पहिला डाव खेळेल. सामन्याची वेबसाईट आहे तिथे डाव बघता येईल http://www.sochi2014.fide.com/live-games/ किंवा इथेही बघता येईल http://www.chessdom.com/carlsen-anand-2014-live-games/
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 25041
प्रतिक्रिया 73

प्रतिक्रिया

Anand seemed to have taken cues from the 2013 championship loss where his slow, defensive play was said to be the reason behind his defeat. He started off aggressively and both players showed intent for a result instead of playing for a draw. But things started turning sour for the Indian Grand Master after the first twenty moves. Carlsen, who initially looked flummoxed, soon pulled himself together and played a set of brilliant moves and wrested back momentum. After the first twenty moves, Magnus losing the game was out of question. From then on, it went from bad to worse for Anand becasue Magnus as usual started pressing for a win. On top of that, Anand started committing small errors too. From moves 30 to 40 Vishy's decisions were not prudent, thus leading to complications in the end-game. Anand used this narrow lee-way from Carlsen and at the end put his queen to good use to force a draw. Especially his 44th move Qh1 was appreciated by all the chess experts who were following the game as the best move of the game. आणि आनंदची ही पोस्ट मॅच कबुली : Anand when asked what went wrong in the middle, "Somehow I did some careless moves and got wobbly in the middle, on the 34th move I got into a spot of bother and the time was pressing too. I'm a little bit relieved yes."

मला आता या आनंद वि॰कार्लसन यांच्यातल्या खेळाची तुलना पूर्वी झालेल्या ब्रझील वि॰ फ्रान्स (फिफा फाइनल)फुटबॉल खेळाशी करावीशी वाटतेय. आक्रमक खेळाडूची हल्लाचाल अयशस्वी झाली तर संरक्षणात्मक खेळाडू त्याला हरवू शकतो कारण त्याचे सर्व मोहरे एकमेकाची पाठराखण करत असतात तर आक्रमकाचे पुढे गेलेले मोहरे अडकतात आणि मागच्या मोहऱ्यांकडे दुर्लक्ष झालेलं असतं.

एकूण चांगला झाला. आनंदने आक्रमक सुरुवात केली. वरती म्हटल्याप्रमाणे वीस चालींपर्यंत त्याचा वरचष्मा होता. घड्याळात सुद्धा तो बराच पुढे होता. त्यानंतर मात्र मॅग्नुसने त्याचे आडाखे चुकीचे ठरवले. माझ्यामते मॅग्नुसचे सगळ्यात मोठे शक्तिस्थान आहे त्याचा अत्यंत साधा खेळ, एकावेळी एकच खेळी हे सूत्र तो कटाक्षाने पाळतो. उदा. आजच्या सामन्यात सत्ताविसाव्या खेळीच्या आसपास पटाच्या मध्यात आनंदचा वजीर आणि हत्ती अतिशय प्रबळ वाटत होते त्यानंतर दहा चालींमध्ये आनंदची दोन्ही मोहोरी पहिल्या ओळीत राजाला वाचवायला धडपडत होती! मॅग्नुसच्या अत्यंत अचूक खेळ्या हे बघण्यासारखे असते. बत्तिसाव्या खेळीपासून पुढे सलग सहा खेळ्या त्याने फक्त वजिराच्या केल्या आहेत. बघताना वजीर नुसता इकडून तिकडे हलवलाह्जातोय की काय असे दिसते आहे पण प्रत्येक खेळी ही अत्यंत लॉजिकल आणि डाव कणाकणाने पुढे नेणारी आहे. दोन मोठ्या खेळ्यांच्या मधे तो एखादी प्रॉफिलॅक्टिक (प्रतिस्पर्ध्याच्या प्रभावाला रोखून धरणारी) खेळी करतो. आजच्या डावात मला मॅग्नुसचा खेळ प्रभावी वाटला. आनंदला जर ४१ वी आणि ४४ वी चाल सापडली नसती तर त्याचे काही खरे नव्हते.