Skip to main content

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव १

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 08/11/2014 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
बरोबर वर्ष झालं. ९ नोवेंबर २०१३ रोजी चेन्नैला सामना सुरु झाला त्यावेळी आनंद आणि मॅग्नुस दोघांच्या भूमिका बरोबर विरुद्ध होत्या - मॅग्नुस आव्हानवीर होता आणि आनंद जगज्जेता! तो सामना मॅग्नुसने हातोहात जिंकला. घरच्या मैदानावरती आनंदला अपेक्षांचे ओझे पेलता आले नव्हते. पण त्याची विजिगीषा बघा नोवेम्बरमध्ये सामना हरल्यानंतर आनंद जवळपास संपला अशीच अटकळ होती. कँडिडेट मास्टर्समधून आनंदने अशी काही मुसंडी मारली की सगळे अवाक झाले. आणि आज तो कार्लसनसमोर आव्हान घेऊन बसणार आहे. चला जास्ती वेळ न लावता पहिल्या सामन्याकडे वळूयात. आनंदने ड्रॉ जिंकलाय आणि तो पांढर्‍या मोहोर्‍यांनी पहिला डाव खेळेल. सामन्याची वेबसाईट आहे तिथे डाव बघता येईल http://www.sochi2014.fide.com/live-games/ किंवा इथेही बघता येईल http://www.chessdom.com/carlsen-anand-2014-live-games/
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 25063
प्रतिक्रिया 73

प्रतिक्रिया

In reply to by चतुरंग

तर मी डी चार म्हणतो. -दिलीप बिरुटे

सामना सुरु व्हायला अजून तासभर आहे....:( अमेरिकन डे लाईट टाइम सेविंगच्या घोळामुळे मी तासभर अलीकडची वेळ निवड्ली बहुदा...

अजुन सामना सुरु व्हायला एक्केचाळीस मिनिटं बाकी आहेत. आरामात या. सामना सुरु झाला की आम्ही वाचत राहु. आणि मनःपूर्वक आभार. -दिलीप बिरुटे

सामन्याआधिची प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे... http://www.sochi2014.fide.com/video-archive/ त्यानंतर Opening Ceremony of the World Chess Championship 2014 होईल... वरच्याच दुव्यावर बघता येईल...

ग्रँमा. शशिकिरण कृष्णन, पोलिश ग्रँमा रादेक वोस्झेक आणि तिसरा नवीन आहे तोही पोलिश ग्रँमा.गाजेव्स्की (या पोलिश लोकांची नावं उच्चारताना जिभेला गाठ बसते राव! :() कार्लसनने गेल्या सामन्याच्या वेळी त्याचे सेकंड्स सांगायला नकार दिला होता. त्याने यावेळी मात्र तसे नकरता सांगितले. डेन्मार्कचा पीटर हाईन नेल्सन (हा याआधी आनंदच्या सेकंड्स टीममधे होता!) आणि दुसरा गेल्यावेळचाच आहे जॉन लुडविग हॅमर.

पहिल्या ८ खेळ्या २ मिनिटात झाल्यात त्याच्या. आठव्या खेळीला मॅग्नुसने १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेतलाय!

जोरदार सुरुवात केली आहे. त्याचा रोख आक्रमक खेळाकडे आहे. टॅक्टिकल खेळाकडे डाव नेणे निश्चितच आहे. डाव मोकळा होत प्याद्यांकडे गेला की मॅग्नुस खूष असतो. तेच नेमके होऊ द्यायचे नाहीये.

आज मजेशीर गोष्ट अशी दिसते की आनंद झटपट खेळी करतोय नि मॅग्नस वेळ घेतोय. डावाच्या सुरुवातीच्या टप्प्यात हे चित्र आश्चर्यजनक आहे. बहुधा मॅग्नस एन्ड गेम पर्यंत बेडरपणे वेगाने खेळतो असा अनुभव आहे. कदाचित आता दोघांच्या भूमिका बदलल्याचा परिणाम म्हणावा का?

पहिली आश्चर्यजनक खेळी आनंदची 'लाँग कॅसल' ते ही राजाच्या नव्या जागेला प्याद्याचे संरक्षण नसताना. दोन वर्षांपूर्वी गेलफंडने असेच राजा उघडा टाकणारे कॅसल करून हरता डाव ओढून आणलेला होता त्याची आठवण झाली,

घोडा गेल्या तीन खेळ्या उड्या मारतोय..अजूनही त्याला ठाव सापडलेला नाही..आता एफ ४ प्याद्याने पुन्हा त्याला हुसकावून लावले जाईल. आनंद ईज इन ड्रायवर्स सीट!!

च्यायला, अजुन बर्‍याच चाली व्हायच्या आहेत पण मला फुकट म्याग्नुसचा पट भक्कम वाटतोय. -दिलीप बिरुटे

एफ-३ चे प्यादे बेट म्हणून ठेवलेले दिसते आनंदने. पण पुढचा सापळा काही दिसत नाही अजून.

In reply to by चतुरंग

ते खरे आहे. पण त्यामुळे त्याला संभाळण्याची चिंता वजिराच्या शिरी राहते आहे.

In reply to by रमताराम

निघाला की एकतर उंट फानचेट्टो करुन कर्णात बसेल किंवा एफ चे प्यादेच पुढे सरकेल...मग वजीर मोकळा

मॅग्नस आणि संभ्रम? तब्बल तीन वेळा काहीतरी मूव करण्यासाठी हात उंचावला नि खाली घेतला कार्ल्याने. जगज्जेतेपणाचे दडपण जाणवू लागले म्हणावे का?

In reply to by रमताराम

डाव ऑलरेडी तयारीच्या बाहेर गेलाय त्याच्यासाठी. तो दडपणाखाली वाटतो आहे...वर्किंग आउट सोल्यूशन अ‍ॅट दि बोर्ड? फारच कठिण...

आनंद इतका आक्रमक असेल अशी मॅग्नुसची अटकळ नसावै, तशी बर्‍याच जणांची नसेल परंतु जलद खेळ आणि अंतस्फूर्तीने केलेला खेळ ही दोन वैशिष्ठ्ये जपत आनंदने खेळ केला तर तो उच्च असतो असे माझे मत.

In reply to by जेपी

आनलैन आहात तर इथेच बघा की. आणि टीवी म्हणाल तर डीडी स्पोर्ट्स वरच असली तर असेल. एरवी फारसा टीआरपी आणि म्हणून पैसा नसलेल्या खेळासाठी धंदेवाईक च्यानेल थोडेस स्लॉट देणार आहेत?

आता हत्ती सी ८ असा प्लॅन आहे मॅग्नुसचा कारण जर क्यू सी ३ असा वजीर सरकला तर सी प्याद्याने डी प्यादे मारुन वजीर राजाला पिन करेल मॅग्नुस!!

आम्ही पळतो. एक काम आहे. आंद्याला जिंकण्यासाठी नि तुम्हाला पार्टीसाठी शुभेच्छा.

आता सी६ प्याद्याने डि ५ प्यादे घेणे जवळ्पास अनिवार्य आहे. हत्ती सी ८ मधे येऊ शकत नाही.

ठेवणे भाग आहे कारण त्याचे प्याद्यांचे स्ट्रक्चर ऑलरेडी मोडलेले आहे अणि मोकळ्या स्तंभात हत्ती आणूण पुढे सरकलेली प्यादी भक्कम करणे गरजेचे आहे नाहीतर त्याच्या हल्ल्याची लाट ओसरताच मॅग्नुस हल्ला करेल आणि पांढरा राजा तित्कासा सुरक्षित नाहीये!

मधे अपेक्षेप्रमाणे एफ ४ प्याद्यावर हल्ला. आता हत्ती ई १ मधे आणून ई ७ प्याद्यावर हल्ला करणार का आनंक?

डाव अगदी कलत्या फळीवर आलाय! काळा वजीर एफ ६ मधे यायला बघतोय? काळा राजा पांढर्‍या वजिराच्या कर्णातून बाजूला घेऊन एफ प्यादे पुढे ढकलण्यासाठी सज्ज होते आहे का?

पांढरा वजीर डी२ मधे येऊन दोन्ही प्याद्यांना जोर देऊन आहे. आता काळा हत्ती डी ६ मधे येऊन घोडा डी८ मधे आणून पांढर्‍या उंटाला ई६ मधून हुसकावून लावेल का?

उंट एच ३ मधे आणणे जास्त संयुक्तिक वाटते आहे. पण मग ई५ असे प्यादे पुढे येते एन्पासंट घेता येत नाही कारण मागे वजीर पिन झालाय!

आनंद खेळला एफ ५, घोड्याने पांढरा उंट हत्तीने काळा घोडा अशी मारामारी होऊन प्यादे एफ ५ खेळी थोपवली आहे.

हत्ती एफ ६ आणून ई ७ वरच्या प्याद्याला जोर देतोय का हत्तींची मारामारी करुन डाव सोपा करतोय?

आणि हत्ती सी स्तंभात आणून मॅग्नुसने ताबा घेतलाय. आता आनंदची मदार पुढे गेलेल्या प्याद्यांवर आहे पण आता प्रत्येक खेळी कॅलक्यूलेटेड हवीच हवी.

वजिराने हत्ती मारता येत नाही कारण मग वजीर सी २ चेक, राजा ए १, वजीर सी १ चेक आणि पाठोपाठ हत्तीने मात होते!! गाढव मात म्हणता येईल याला...

एच २ चे प्यादे घेत्ले तर हत्तीने ई७ प्यादे मारुन चेक दिला जाऊ शकतो. वजिराने एच १ असा चेक दिला तर हत्ती परत मागे आणून चेक निघू शकतो.

प्याद्याची कमकुवत बाजू हा आता खेळाचा केंद्रबिंदू आहे. हत्ती डि ८ आणि नंतर डी ७ असा आणून त्या प्याद्याला दुहेरी जोर करणे गरजेचे..

जायची शक्यता दिसायला लागली आहे. आनंदची दोन्ही मोहोरी पटाच्या मध्यात राहून संपूर्ण पटावर लक्ष ठेवून आहेत त्यामुळे अगदी बरोबरी नाही कारण आनंद अजूनही जिंकण्यासाठी खेळू शकतोच....

डावावर हळूहळू मिळवायला ताबा सुरुवात केली आहे! :( आनंदला सावधपणे खेळावे लागणार...

रचाकने : खेळाडू ज्या कागदावर खेळी लिहीतात त्याचा नंतर ऑक्शन वगैरे होतो का ?

In reply to by रामदास

तशी काही बातमी वाचल्याचे आठवत नाहीये पण फिडेला ही आयडिया द्यायला हरकत नाही पेटंट घ्या! :)

In reply to by मुक्त विहारि

काळी मोहोरी असून कार्लसन आक्रमक खेळला. त्याच्याकडे (या गेममधे तरी) जास्त क्लॅरिटी वाटली. (बहुदा) फिशरनं म्हटलंय, उत्तम खेळाडू म्हणजे लॉंग-ड्रॉन काँप्लिकेटेड स्ट्रॅटजी नाही, त्याच्याकडे साधे-सोपे पण अचूकपणे आमलात येणारे प्लान्स असतात!