✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव १

च
चतुरंग यांनी
Sat, 11/08/2014 - 16:27  ·  लेख
लेख
बरोबर वर्ष झालं. ९ नोवेंबर २०१३ रोजी चेन्नैला सामना सुरु झाला त्यावेळी आनंद आणि मॅग्नुस दोघांच्या भूमिका बरोबर विरुद्ध होत्या - मॅग्नुस आव्हानवीर होता आणि आनंद जगज्जेता! तो सामना मॅग्नुसने हातोहात जिंकला. घरच्या मैदानावरती आनंदला अपेक्षांचे ओझे पेलता आले नव्हते. पण त्याची विजिगीषा बघा नोवेम्बरमध्ये सामना हरल्यानंतर आनंद जवळपास संपला अशीच अटकळ होती. कँडिडेट मास्टर्समधून आनंदने अशी काही मुसंडी मारली की सगळे अवाक झाले. आणि आज तो कार्लसनसमोर आव्हान घेऊन बसणार आहे. चला जास्ती वेळ न लावता पहिल्या सामन्याकडे वळूयात. आनंदने ड्रॉ जिंकलाय आणि तो पांढर्‍या मोहोर्‍यांनी पहिला डाव खेळेल. सामन्याची वेबसाईट आहे तिथे डाव बघता येईल http://www.sochi2014.fide.com/live-games/ किंवा इथेही बघता येईल http://www.chessdom.com/carlsen-anand-2014-live-games/
  • आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव २
  • आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव ३
  • आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ४
  • आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ५
  • आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ६
  • आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ७
  • आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ८
  • आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ९
  • आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव १०
  • आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ११

Book traversal links for आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव १

  • आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
24936 वाचन

💬 प्रतिसाद (73)

प्रतिक्रिया

डाव सुरु व्हायला फक्त दोन मिनिटं राहिली आहेत

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 16:29 नवीन
आनंद पहिली खेळी कोणती करणार? माझ्यामते ई४
  • Log in or register to post comments

आता तुम्ही ई म्हणालात

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 11/08/2014 - 17:03 नवीन
तर मी डी चार म्हणतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हा हा!

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 17:11 नवीन
बरोबर डी४ सुद्धा असू शकेल! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सामन्याच्या वेळाबद्दल माझी काहीतरी गफलत झालेली दिसते!

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 16:36 नवीन
सामना सुरु व्हायला अजून तासभर आहे....:( अमेरिकन डे लाईट टाइम सेविंगच्या घोळामुळे मी तासभर अलीकडची वेळ निवड्ली बहुदा...
  • Log in or register to post comments

थोड्याच वेळात येतो

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 16:46 नवीन
सामन्याआधी.
  • Log in or register to post comments

वन्नकम सर....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 11/08/2014 - 16:49 नवीन
अजुन सामना सुरु व्हायला एक्केचाळीस मिनिटं बाकी आहेत. आरामात या. सामना सुरु झाला की आम्ही वाचत राहु. आणि मनःपूर्वक आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मेजवानी

चाणक्य
Sat, 11/08/2014 - 16:59 नवीन
:-) परत एकदा. धन्यवाद चतुरंग. वाचतोय....
  • Log in or register to post comments

+१

पहाटवारा
Sun, 11/09/2014 - 04:09 नवीन
धाग्यबद्दल धन्यवाद ! -पहाटवारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य

सामन्याआधिची प्रेस कॉन्फरन्स

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 11/08/2014 - 17:02 नवीन
सामन्याआधिची प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे... http://www.sochi2014.fide.com/video-archive/ त्यानंतर Opening Ceremony of the World Chess Championship 2014 होईल... वरच्याच दुव्यावर बघता येईल...
  • Log in or register to post comments

आनंदची सेकंड्स टीम समजली

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 17:16 नवीन
ग्रँमा. शशिकिरण कृष्णन, पोलिश ग्रँमा रादेक वोस्झेक आणि तिसरा नवीन आहे तोही पोलिश ग्रँमा.गाजेव्स्की (या पोलिश लोकांची नावं उच्चारताना जिभेला गाठ बसते राव! :() कार्लसनने गेल्या सामन्याच्या वेळी त्याचे सेकंड्स सांगायला नकार दिला होता. त्याने यावेळी मात्र तसे नकरता सांगितले. डेन्मार्कचा पीटर हाईन नेल्सन (हा याआधी आनंदच्या सेकंड्स टीममधे होता!) आणि दुसरा गेल्यावेळचाच आहे जॉन लुडविग हॅमर.
  • Log in or register to post comments

वाटच पाहात होतो धाग्याची .

जेपी
Sat, 11/08/2014 - 17:31 नवीन
वाटच पाहात होतो धाग्याची . येत राहिन. अवांतर-कुठल्या टिव्ही चॅनेल वर पाहता येईल का ?
  • Log in or register to post comments

डी४ ने सुरवात केली

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 17:38 नवीन
मॅग्नुसचा किल्लेकोट राजाच्या बाजूला झालाय.
  • Log in or register to post comments

नेटवर्क वरती

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 17:40 नवीन
भलताच ताण आहे असे दिसते...सारखे ब्रेक होते आहे त्यामुळे सामना सलग बघता एय नाहीये :(
  • Log in or register to post comments

आनंदची तयारी चांगली आहे

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 17:46 नवीन
पहिल्या ८ खेळ्या २ मिनिटात झाल्यात त्याच्या. आठव्या खेळीला मॅग्नुसने १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेतलाय!
  • Log in or register to post comments

आनंदने डी प्याद्याने घोड्यावर हल्ला केलाय

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 17:52 नवीन
आणि काळ्या उंटाने एफ ३ मधल्या घोड्यावर.
  • Log in or register to post comments

यावेळी आनंदने

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 17:56 नवीन
जोरदार सुरुवात केली आहे. त्याचा रोख आक्रमक खेळाकडे आहे. टॅक्टिकल खेळाकडे डाव नेणे निश्चितच आहे. डाव मोकळा होत प्याद्यांकडे गेला की मॅग्नुस खूष असतो. तेच नेमके होऊ द्यायचे नाहीये.
  • Log in or register to post comments

मजेशीर

रमताराम
Sat, 11/08/2014 - 17:59 नवीन
आज मजेशीर गोष्ट अशी दिसते की आनंद झटपट खेळी करतोय नि मॅग्नस वेळ घेतोय. डावाच्या सुरुवातीच्या टप्प्यात हे चित्र आश्चर्यजनक आहे. बहुधा मॅग्नस एन्ड गेम पर्यंत बेडरपणे वेगाने खेळतो असा अनुभव आहे. कदाचित आता दोघांच्या भूमिका बदलल्याचा परिणाम म्हणावा का?
  • Log in or register to post comments

मला जुना आनंद दिसायला

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 17:59 नवीन
लागलाय का? भलताच वेगाने खेळतोय तो. फक्त ४ मिनिटात बारा खेळ्या! कमॉन आनंद!!
  • Log in or register to post comments

पहिली

रमताराम
Sat, 11/08/2014 - 18:01 नवीन
पहिली आश्चर्यजनक खेळी आनंदची 'लाँग कॅसल' ते ही राजाच्या नव्या जागेला प्याद्याचे संरक्षण नसताना. दोन वर्षांपूर्वी गेलफंडने असेच राजा उघडा टाकणारे कॅसल करून हरता डाव ओढून आणलेला होता त्याची आठवण झाली,
  • Log in or register to post comments

येस!

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 18:02 नवीन
यावेळचा आनंद नक्कीच वेगळा आहे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

मॅग्नुसचा

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 18:01 नवीन
घोडा गेल्या तीन खेळ्या उड्या मारतोय..अजूनही त्याला ठाव सापडलेला नाही..आता एफ ४ प्याद्याने पुन्हा त्याला हुसकावून लावले जाईल. आनंद ईज इन ड्रायवर्स सीट!!
  • Log in or register to post comments

हम्म.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 11/08/2014 - 18:02 नवीन
च्यायला, अजुन बर्‍याच चाली व्हायच्या आहेत पण मला फुकट म्याग्नुसचा पट भक्कम वाटतोय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

एफ-३

रमताराम
Sat, 11/08/2014 - 18:03 नवीन
एफ-३ चे प्यादे बेट म्हणून ठेवलेले दिसते आनंदने. पण पुढचा सापळा काही दिसत नाही अजून.
  • Log in or register to post comments

मॅग्नुस

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 18:03 नवीन
एफ ३ वरचे प्यादे घेऊ शकत नाही कारण क्यू सी ३ अशा चेकने घोडा पडेल
  • Log in or register to post comments

+१

रमताराम
Sat, 11/08/2014 - 18:07 नवीन
ते खरे आहे. पण त्यामुळे त्याला संभाळण्याची चिंता वजिराच्या शिरी राहते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

आता घोडा - राजा पिन

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 18:11 नवीन
निघाला की एकतर उंट फानचेट्टो करुन कर्णात बसेल किंवा एफ चे प्यादेच पुढे सरकेल...मग वजीर मोकळा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

मॅग्नुसला रिअ‍ॅक्टिव मोड्मधे

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 18:09 नवीन
टाकले आहे आनंदने. आता तो ई६ खेळेल का?
  • Log in or register to post comments

मॅग्नुसचे घड्याळ

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 18:13 नवीन
टिक्टिक करत ४० मिनिटे गेलीत!! किती चालींचा विचार कर्तो आहेस बाबा? १५ खेळ्यांची काँबिनेशन्स?
  • Log in or register to post comments

मॅग्नस आणि संभ्रम?

रमताराम
Sat, 11/08/2014 - 18:14 नवीन
मॅग्नस आणि संभ्रम? तब्बल तीन वेळा काहीतरी मूव करण्यासाठी हात उंचावला नि खाली घेतला कार्ल्याने. जगज्जेतेपणाचे दडपण जाणवू लागले म्हणावे का?
  • Log in or register to post comments

हो. बहुदा

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 18:18 नवीन
डाव ऑलरेडी तयारीच्या बाहेर गेलाय त्याच्यासाठी. तो दडपणाखाली वाटतो आहे...वर्किंग आउट सोल्यूशन अ‍ॅट दि बोर्ड? फारच कठिण...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

ते ठीक आहे.

रमताराम
Sat, 11/08/2014 - 18:21 नवीन
पण कार्ल्या फारसा तयारीवर भरवसा ठेवणारा नाहीच, टोपीतून ससे काढणारा माणूस तो. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हो पण

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 18:26 नवीन
ससा मेलेला निघाला तर आनंद त्याचे कालवण करुन खाईल!!;०)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

पहिल्याच डावात

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 18:16 नवीन
आनंद इतका आक्रमक असेल अशी मॅग्नुसची अटकळ नसावै, तशी बर्‍याच जणांची नसेल परंतु जलद खेळ आणि अंतस्फूर्तीने केलेला खेळ ही दोन वैशिष्ठ्ये जपत आनंदने खेळ केला तर तो उच्च असतो असे माझे मत.
  • Log in or register to post comments

कुठल्या टिवी चॅनेलवर चालु आहे

जेपी
Sat, 11/08/2014 - 18:24 नवीन
कुठल्या टिवी चॅनेलवर चालु आहे का ? नायतर इथे वाचुनच खुश व्हावे लागेल.
  • Log in or register to post comments

का वो

रमताराम
Sat, 11/08/2014 - 18:27 नवीन
आनलैन आहात तर इथेच बघा की. आणि टीवी म्हणाल तर डीडी स्पोर्ट्स वरच असली तर असेल. एरवी फारसा टीआरपी आणि म्हणून पैसा नसलेल्या खेळासाठी धंदेवाईक च्यानेल थोडेस स्लॉट देणार आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

इथे

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 18:27 नवीन
थेट प्रक्षेपण चालू आहे http://www.sochi2014.fide.com/live-games/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

सी ६!

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 18:25 नवीन
आता हत्ती सी ८ असा प्लॅन आहे मॅग्नुसचा कारण जर क्यू सी ३ असा वजीर सरकला तर सी प्याद्याने डी प्यादे मारुन वजीर राजाला पिन करेल मॅग्नुस!!
  • Log in or register to post comments

चला लोक्स

रमताराम
Sat, 11/08/2014 - 18:35 नवीन
आम्ही पळतो. एक काम आहे. आंद्याला जिंकण्यासाठी नि तुम्हाला पार्टीसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

वोक्के!

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 18:40 नवीन
लवकर परत या! काम होऊ देत तुमचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

उंट एच ३

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 18:55 नवीन
आता सी६ प्याद्याने डि ५ प्यादे घेणे जवळ्पास अनिवार्य आहे. हत्ती सी ८ मधे येऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments

घोडा एफ ७

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 19:17 नवीन
किंवा क्यू बी ६ अशा खेळ्या आहेत
  • Log in or register to post comments

मी बोलेपर्यंत खेळलाच मॅग्नुस घोडा एफ ७

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 19:18 नवीन
आता आनंदला राजा बी१ मधे घेऊन वजीर मोकळा करणे आवश्यक
  • Log in or register to post comments

आनंदला आक्रमक खेळ चालू

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 19:20 नवीन
ठेवणे भाग आहे कारण त्याचे प्याद्यांचे स्ट्रक्चर ऑलरेडी मोडलेले आहे अणि मोकळ्या स्तंभात हत्ती आणूण पुढे सरकलेली प्यादी भक्कम करणे गरजेचे आहे नाहीतर त्याच्या हल्ल्याची लाट ओसरताच मॅग्नुस हल्ला करेल आणि पांढरा राजा तित्कासा सुरक्षित नाहीये!
  • Log in or register to post comments

एफ ४

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 19:23 नवीन
खेळला!
  • Log in or register to post comments

आता काळा घोडा

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 19:25 नवीन
जी ५ नधे येऊ शकत नाही. जी ५ असे प्यादे पुढे आले तर हत्ती जी १ असा येऊन पिन मारतो.
  • Log in or register to post comments

आल वजीर बी ६

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 19:28 नवीन
मधे अपेक्षेप्रमाणे एफ ४ प्याद्यावर हल्ला. आता हत्ती ई १ मधे आणून ई ७ प्याद्यावर हल्ला करणार का आनंक?
  • Log in or register to post comments

नाही वजीर डी ४

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 19:29 नवीन
एफ प्याद्याला जोर लावला..
  • Log in or register to post comments

आता पांढरा उंट

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 19:31 नवीन
ई ६ मधे घुसेल का? आणि नंतर एच प्यादे रेटून राजाला कोंडीत पकडण्यासाठी प्रयत्न?
  • Log in or register to post comments

आता

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 19:34 नवीन
डाव अगदी कलत्या फळीवर आलाय! काळा वजीर एफ ६ मधे यायला बघतोय? काळा राजा पांढर्‍या वजिराच्या कर्णातून बाजूला घेऊन एफ प्यादे पुढे ढकलण्यासाठी सज्ज होते आहे का?
  • Log in or register to post comments

वजीरड्बी ६ आला

चतुरंग
Sat, 11/08/2014 - 19:50 नवीन
पांढरा वजीर डी२ मधे येऊन दोन्ही प्याद्यांना जोर देऊन आहे. आता काळा हत्ती डी ६ मधे येऊन घोडा डी८ मधे आणून पांढर्‍या उंटाला ई६ मधून हुसकावून लावेल का?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा