✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भाषिक संपत्ती

म
मृत्युन्जय यांनी
Tue, 10/26/2010 - 17:34  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19025 वाचन

💬 प्रतिसाद (50)

प्रतिक्रिया

मस्त खुसखुशीत !!!

मितान
Tue, 10/26/2010 - 17:41 नवीन
मस्त खुसखुशीत !!!
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

बेसनलाडू
Tue, 10/26/2010 - 22:44 नवीन
मस्त, खुसखुशीत लेख. खूप मजा आली वाचताना. (वाचक)बेसनलाडू अवांतर - कंसातील वाक्ये सूचक कोपरखळ्यांसारखी असली, तरी एकंदर लेखाच्या संदर्भात विचार करता अनावश्यक वाटली. (अवांतर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

लेख मस्त !!

सूड
Tue, 10/26/2010 - 17:45 नवीन
मिपावर वाचलेल्या एका (शिवी/ अपशब्द काय म्हणू ?) शब्दासाठी मी मिलिंद बोकिलांचं 'शाळा' वाचल्याचं आठवलं. :)
  • Log in or register to post comments

हा हा भाषासौंदर्य आवडुन गेले

परिकथेतील राजकुमार
Tue, 10/26/2010 - 17:48 नवीन
हा हा भाषासौंदर्य आवडुन गेले रे एकदम. मस्त फटाके वाजवले आहेस :) हे लेखन वाचता वाचता बिकांच्या ह्या लेखाची खास आठवण येउन गेली.
  • Log in or register to post comments

आयला बिकांनी आधीच भला मोठ्ठा

मृत्युन्जय
Tue, 10/26/2010 - 17:56 नवीन
आयला बिकांनी आधीच भला मोठ्ठा लेख लिहिला आहे. हा वाचलाच नव्हता. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

(बा*** ! )मस्त खुसखुशीत लेख

कानडाऊ योगेशु
Tue, 10/26/2010 - 17:48 नवीन
(बा*** ! )मस्त खुसखुशीत लेख लिहिला आहेस (भां** )मृत्युंजया! (कंसातील शब्द ही जुन्या मालकांची मिपाला देणगी! ;) ) (शिवराळ) योगेश
  • Log in or register to post comments

पु. लं. चे 'रावसाहेब' ...

sagarparadkar
Tue, 10/26/2010 - 17:49 नवीन
>> पण आपण संस्कृती संस्कृती जी म्हणतो ती आपल्याला पुलं, शिरवाडकर, कुसुमाग्रज यांचे साहित्य वाचुन आठवेल की या शिव्या ऐकुन? काय म्हणता? << पु. लं. चे 'रावसाहेब' वाचून पण आठवेल की संस्कृती ... ते (पक्षी रावसाहेब) काय असंस्कृत होते का?
  • Log in or register to post comments

+१

Dhananjay Borgaonkar
Tue, 10/26/2010 - 17:54 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

व. पुं. चा 'भांडणारा जोशी' ...

sagarparadkar
Tue, 10/26/2010 - 17:55 नवीन
व. पुं. चा 'भांडणारा जोशी' पण एके ठिकाणी चिंता व्यक्त करतो की मराठीतल्या शिव्या आता फारच जुन्या झाल्यात, आणि नवीन शिव्या काही तयार होत नाहीत, कोण हे काम करणारेय काही कळत नाही ... :) ते ऐकून माझ्या काही 'पेठेतल्या' मित्रवर्यांनी हे काम स्वीकारले होते पण उदर्निर्वाहाची कामे इतकी वाढली कि त्यांपुढे ह्या कामाकडे मग पारच दुर्लक्ष झाले ... :-)
  • Log in or register to post comments

काही हरकत नाही. आजही भावे

मृत्युन्जय
Tue, 10/26/2010 - 17:58 नवीन
काही हरकत नाही. आजही भावे हायस्कूल किंवा नूमवि किंवा सेंट विमलीज च्या बाहेर रोज एक तास उभे राहिलात तर ज्ञानात प्रचंड भर पडेल. ते वयच तसे असते. आणि त्या वयातले सगळे मित्रही आठवणीत तसेच भ च्या बाराखडीतलेच असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

वा वा!! आमच्या शाळेची किर्ती ऐकून कान धन्य झाले..

एक
Tue, 10/26/2010 - 22:11 नवीन
आमची शाळा आहेच तशी!! आजही मित्राशी बोलताना त्याने पहिल्या ४-५ शब्दात "प्रेमळ" पणे विचारपूस केली नाही तर शंका येते कि याला काय झालं? चिडला वगैरे कि काय? वय वाढलं तसं तोंडावर मान बरेच जण द्यायला लागतात त्यावेळी जमिनीवर येण्यासाठी मित्रांचे हेच ४ "प्रेमळ" शब्द कामी येतात.. --सेंट भावियन्स..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

हॅ हॅ हॅ छान

प्रमोद्_पुणे
Tue, 10/26/2010 - 18:00 नवीन
"अच्चीत गच्ची......" ही शिवी तर फार फार पॉप्युलर अशीच एक म्हणजे "आली घुली..." शाळा फक्त मुलांची.. मुतारीमध्ये अशा काही शिव्या असायच्या की त्यावर एक पुस्तक निघेल. आणि हो काही सदस्यांच्या माहीतीसाठी ह्या शिव्यांना (देणार्‍याना आणि खाणार्‍याना) जातीचे बंधन नव्हते! बाकी लेख मस्त...
  • Log in or register to post comments

सै रे !!

अनिल हटेला
Tue, 10/26/2010 - 19:23 नवीन
:-)
  • Log in or register to post comments

ऐला!

पैसा
Tue, 10/26/2010 - 19:37 नवीन
शीर्षक वाचून धागा उघडला आणि भलतीच संपत्ती निघाली. पण मस्त खुसखुशीत लेख आहे. बरोबरच, बिकांच्या लेखाची लिंक दिल्याबद्दल पराला धन्यवाद!
  • Log in or register to post comments

_/\_

धमाल मुलगा
Tue, 10/26/2010 - 19:45 नवीन
भेटीअंती आपल्या चरणि शिंगलमाल्टचा अभिषेक करणेत येईल असे आम्ही जाहीर करतो. अरे, काय माणूस आहेस का मजा? कं लिवलंय...कं लिवलंय!
  • Log in or register to post comments

सही जवाब.... भारी लिवलंय

सविता
Tue, 10/26/2010 - 20:18 नवीन
सही जवाब.... भारी लिवलंय बघा....
  • Log in or register to post comments

आठवणी दाटतात

तिमा
Tue, 10/26/2010 - 20:19 नवीन
लेख आवडला. आम्ही वापरत असलेल्या शिव्या व प्रसिध्द गाण्यांची विडंबने आठवून डोळे पाणावले.
  • Log in or register to post comments

खुसखुशीत लेख

प्रदीप
Tue, 10/26/2010 - 20:38 नवीन
आवडला. भाषिक संपत्तिवरून मला माझ्या एका ऑस्ट्रेलियन सहकार्‍याने एकदा 'आपण पहाटे उठलो' हे 'I woke up at sparrow-fart' असे सांगितले होते, ते आठवले!
  • Log in or register to post comments

क्क्काऽऽय्य???

धमाल मुलगा
Tue, 10/26/2010 - 21:25 नवीन
>>'I woke up at sparrow-fart' Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

'I woke up at sparrow-fart'

मृत्युन्जय
Tue, 10/26/2010 - 22:21 नवीन
लै भारी. हे आवडले आपल्याला. वापरणार कधीतरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

च्यामायला! येकदम ध्वज फडकाव

नगरीनिरंजन
Tue, 10/26/2010 - 20:47 नवीन
च्यामायला! येकदम ध्वज फडकाव लेखन की रे भावा! उगंच एकमेकाला शिव्या घालून याराना दाखवायच्या वयातले दिवस आठवले. (अवांतरः ओ पुपे, तुमच्या त्या 'परायी बात खच्ची सोळा आणेच सच्ची' ला दुसरी ओळ 'अच्चीत गुच्ची...' बसतंय का बघा जरा. )
  • Log in or register to post comments

अहो ते त्यावरूनच लिहीले होते.

llपुण्याचे पेशवेll
Wed, 10/27/2010 - 18:03 नवीन
अहो ते त्यावरूनच लिहीले होते. ;) समझनेवाले को इशारा काफी है असं काहीतरी म्हणतात म्हणे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

आमि नांगरत आसतांना .. बेलाला

ईन्टरफेल
Tue, 10/26/2010 - 21:18 नवीन
आमि नांगरत आसतांना .. बेलाला बि शिव्या देतो
  • Log in or register to post comments

या वाक्यात सगळं आलं...

मिसळपाव
Tue, 10/26/2010 - 21:51 नवीन
...मित्रांशी सलगी दाखवत त्याला घातलेल्या ४ शिव्या आणि भर रस्त्यात मांडलेला भाषेचा हा बाजार यात फरक आहे. आपला मुद्दा सहजपणे, सुसंस्कृतपणे, शिव्या न वापरता समोरच्याला पटवुन देण्यात खरे कसब आहे. सगळे मुद्दे संपल्यावर गुद्दे सुरु करण्यापुर्वी वापरायची भाषा म्हणजे शिव्या. ... १०००% सहमत! हॉस्टेलच्या आपल्या खोलीबाहेर मित्रांचं टोळकं नाहि तर प्रिन्सिपल पु.ल. ना घेउन आलेले आहेत हे लक्षात न येउन एकाने 'भडव्यो, जरा थांबाल तर काय मराल?' असं लडिवाळपणे विचारल्यावर खुद्द पु.ल.नी सुद्धा त्याला 'तो पहिला शब्द कधी विसरू नको बरं का' असं सांगितलं होतं !!
  • Log in or register to post comments

_/\_ _/\_ _/\_ बाकी का माहीती

सुहास..
Tue, 10/26/2010 - 22:05 नवीन
_/\_ _/\_ _/\_ बाकी का माहीती माझ्या तोंडुन निघण जरा अवघडच हाय (न पिता..पण पिलोतरी मित्र,स्नेही, ओळखी-पाळखींच्या साठी साध हलकट निघत॑ नाय तोंडातनं (एक टिंग्या सोडुन) )
  • Log in or register to post comments

झक्कास रे

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 10/26/2010 - 22:25 नवीन
आयला, इना तू ... निरागस नव्हतास! Image removed. नाटक मात्र चांगलं करायचास हो!! Image removed. लिखाण एकदम ए१! म्हणजे नक्की काय ते चारचौघांत नको, उगाच मुलीच्या आयडीतून शिव्या पाहून तुझ्या 'निरागस' मनाला कष्ट व्हायचे!!
  • Log in or register to post comments

अगं मी तर शिव्या देताना माझे

मृत्युन्जय
Tue, 10/26/2010 - 22:40 नवीन
अगं मी तर शिव्या देताना माझे स्वतःचे कान पण बंद करुन घेतो. (शिव्या लिहिताना डोळे बंद करुन घेतो). इतका निरागस आहे मी. (हा निरागस शब्द शाळेतल्या अर्थाने घ्यावा). पण तु बोल बिन्धास्त. काय आहे की भाषिक ज्ञानात जितकी भर पडेल तितकी चांगलीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी अगदी!

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 10/26/2010 - 22:49 नवीन
अगदी अगदी! किती गुणाचा रे बाळ तू! पुढचा फुलपाखरी लेख तुझ्यावरच लिहायला सांगते लिखाळला! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

दिवाळी जवळ आलेली असताना

रेवती
Tue, 10/26/2010 - 22:26 नवीन
दिवाळी जवळ आलेली असताना शिव्यांची फटकेबाजी आवडली.
  • Log in or register to post comments

मस्त लेख!

पिवळा डांबिस
Tue, 10/26/2010 - 22:58 नवीन
विशेषतः जुना विस्वण (सॉरी, सॉरी, विषय!!) ताज्या सद्यवर्तमानपत्रात गुंडाळल्यामुळे वाचायला अधिक मजा आली!! अभिनंदन!! पण बिकाचा मूळ प्रश्न शिल्लक रहातोच... "सर, इथे शिव्या देणं अलाऊड आहे?" ;) निरागस बामण, पिडां
  • Log in or register to post comments

अलाऊड आहे पण लाऊडली नका देऊ.

llपुण्याचे पेशवेll
Wed, 10/27/2010 - 18:05 नवीन
अलाऊड आहे पण लाऊडली नका देऊ. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

अभिनंदन

रन्गराव
Wed, 10/27/2010 - 07:59 नवीन
जमलं गडया! काम फत्ते! अवांतर: जमल तर कि बोर्डवर आणि धाग्यावर गोमुत्र शिंपडून घे थोडं! ;)
  • Log in or register to post comments

जे शिंपडायचे होते ते शिंपडुन

मृत्युन्जय
Wed, 10/27/2010 - 10:07 नवीन
जे शिंपडायचे होते ते शिंपडुन झाले रन्गराव. आख्ख्या महाराष्ट्रातल्या शिव्या कोळुन प्यायलो आहे मी. सगळ्या शिव्या इथे दिल्या असत्या तर तुम्हाला फेफरे आले असते. आणि आमचे मान्यवर सुहृद श्री. परा राजवाडे म्हणतात त्याप्रमाणे एक वेगळे सेंसोर बॉर्ड उघडायला लागले असते शिव्यांच्या स्क्रीनिंगसाठी. आता कुठे गोमुत्र शिंपडायचे आणि कुठे शिवांबु ते तुमचे तुम्ही बघुन घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रन्गराव

बरोबर आहे

रन्गराव
Wed, 10/27/2010 - 11:10 नवीन
पण आयला कॉम्पलिमेंट होती ती. असो आणि कोळून पिण्याबाबतचा आपला दावा बरोबर का चुक हे ठरवायला स्पर्धा ठेवावी लागेल एक ;) मग अर्ध्याहून अधिक महाराष्ट्राला फेफरे येतील. :) सांगायचा उद्देश असा की नवीन शोध लागणे कधीही थांबत नाही आणि ज्ञान नेहमी अपूर्णच असत, तस तुम्ही लेखात म्हंटलय सुद्धा बहुतेक. असो बाकी लिहिताय मात्र मजेशीर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

जमल तर कि बोर्डवर आणि

मितभाषी
Wed, 10/27/2010 - 11:22 नवीन
जमल तर कि बोर्डवर आणि धाग्यावर गोमुत्र शिंपडून घे थोडंआयला खपलो. =)) =)) आणि अजुन एक मनातील जागे झालेले विकार जाण्यासाठी शांती करा अथवा खिशात उडीद घेवुन उंबराला तांबड्यात गरके(पक्षी : प्रदक्षिणा) घाला. ;) बाकी लेख रापचिक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रन्गराव

मस्त लेख! एकदम

प्राजु
Wed, 10/27/2010 - 08:35 नवीन
मस्त लेख! एकदम खुसखुशीत..! बर्‍याच ठिकाणी गालातल्या गालात हसू आले.. असेच लिहित रहा.
  • Log in or register to post comments

नेमक्या शब्दांत मांडलेत

शहराजाद
Wed, 10/27/2010 - 09:05 नवीन
शिव्या मायभाषेची जवळीक साधुन देतात, त्या मर्दानगीचे लक्षण आहे, ते मित्रत्वाचे प्रतीक आहे वगैरे वगैरे झूट आहे हे कळुन चुकले. गाडी चालवताना चुकुन समोरचा रिक्षावाला मध्ये घुसला की अल्लदपणे त्याच्या आइची विचारपूस होउ शकते. पण हा सुसंस्कृतपणा नाही. हा सभ्यपणा नाही. मित्रांशी सलगी दाखवत त्याला घातलेल्या ४ शिव्या आणि भर रस्त्यात मांडलेला भाषेचा हा बाजार यात फरक आहे.
अगदी नेमक्या शब्दांत मांडलेत. मात्र, मला तरी अगदी कचकावून, ह्रूदयापासून निघणारी शिवी मायबोलीतूनच घालता येते. एरवी भावना पुरेशा शुध्द स्वरूपात प्रकटल्याचे समाधान मिळत नाही.
  • Log in or register to post comments

मस्त खुसखुशीत लेख...पण

शिल्पा ब
Wed, 10/27/2010 - 10:49 नवीन
मस्त खुसखुशीत लेख...पण मुलीसुद्धा शिव्या देतात याचे आश्चर्य का वाटले तुम्हाला हे काही कळले नाही बॉ !! आम्ही जवळीक करु नये की काय? ;)
  • Log in or register to post comments

पहिल्यांदा ऐकले तेव्हा कदाचित

मृत्युन्जय
Wed, 10/27/2010 - 10:58 नवीन
पहिल्यांदा ऐकले तेव्हा कदाचित काहीतरी वेगळे वाटले असेल. पण धक्का मात्र नव्हता बसला. एका मुलीला सिगारेट फुंकताना बघुन मात्र पहिल्यांदा मला धक्का बसला होता. खुपच वेगळे वाटले होते. नंतर सवय झाली. असे बघा जेव्हा पहिल्यांदा माझ्या खुपच जवळच्या मित्राने सिगारेट ओढली तेव्हासुद्धा मला आश्चर्य वाटले होते. मुलींनी हे करावे किंवा हे करु नये अश्या अर्थाने बसलेला धक्का नव्हता तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

पंजाबी..."हलकट..."

इन्द्र्राज पवार
Wed, 10/27/2010 - 11:15 नवीन
धागाकर्ते श्री.मृत्युंजय याना माहितच असेल की, कोल्हापुरी भाषा आणि शिव्या यात तसा जास्त भेदाभेद नाही. किंबहुना एखादा कोल्हापुरी पाटील्/पवार शुध्द बोलायला लागला की, गावातील थोर्र सहकारी मित्र लगेच टोमणा (आमच्या भाषेत मंडळाची किक) मारतात, 'च्यायला, हे ब्येनं पुन्याला क्काय शिकायला गेलं, पार मात्रंच झालं की...!" "ढापण्या" आणि "बॅटरी" ही त्यातल्यात्यात 'बर्‍यापैकी' लिहिता येण्यासारखी विशेषणे आहेत. मी पंजाबच्या ग्रामीण भागात फिरलो आहे. दिल्लीत असताना काही पंजाबी मित्रही झाले होते/आहेत, त्यांच्यासमवेत एकदा गुरुदासपूरमध्ये कट्ट्याचा योग आला होता. त्यावेळी तेथील दोघांचौघांची ओळख झाल्यावर त्यातील एकाने माझ्याशी हस्तांदोलन तर केलेच पण दिल्लीच्या मित्राकडे पाहून म्हणाला, "ये इंदर पुत्तर तो हलकट दिखता भला ! क्यूं?" मी हादरलोच. मी 'हलकट'? कशामुळे? मी दिल्लीवाल्याकडे पाहिले तर तो गुरदासपूरवाल्याला सांगत होता....'नही, इंदरतुस्सी कुछ दिनसे बिमार होना !". मी त्याला बाजूला घेवून विचारले की, तो मला 'हलकट' का म्हणतोय....? तर हा बिच्चू हसला आणि म्हणाला...."अरे ऐसी कोई बात नही....पंजाबीमें हलकट का मतलब होता है "लाईट वेट". तू वजनाने थोडा कमी दिसतोस ना म्हणून तो तसे म्हणाला..." ~ मी मनी म्हणालो, 'वाहे गुरू !" पंजाबी टर्म "चक दे फट्टे...." अलिकडे इकडे फार फेमस झालेली आपण पाहतो, ऐकतो ('चक दे इंडिया' मुळे)....पण प्रत्यक्षात तिथल्या ग्रामीण भाषेत, "अरे भाड्या/अगं भवाने आवर कामं पटापट"... या अर्थानेच आई/सासूबाई वापरतात...(चक दे = उचल.... फट्टे = लाकूडसामान.... म्हणून, 'आवर आवर जेवणाची वेळ झालीय'...या अर्थाने). पंजाबी शिव्यांची फार गंमत सांगता येईल.....(पण इथे ते अवांतर होईल.) इन्द्रा
  • Log in or register to post comments

>>पंजाबी शिव्यांची फार गंमत

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 10/27/2010 - 12:43 नवीन
>>पंजाबी शिव्यांची फार गंमत सांगता येईल.....(पण इथे ते अवांतर होईल.) इथे कसे काय अवांतर होईल बुवा ?? इथेच ते मुद्द्याला धरून होईल. त्यामुळे तुम्ही इथे त्या गमती सांगाव्यात असा प्रस्ताव मी मांडतो. इथे सांगायच्या नसतील तर वेगळा लेख लिहा. पण लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

अगदी असेच

प्रदीप
Wed, 10/27/2010 - 13:08 नवीन
म्हणतो. इंदर, लिहाच तुम्ही ते येथे. बाय द वे, वरील 'हलकट' हे [हलका -हलकट-(हलकेस्ट?)] असे काहीसे असावे असे वाटते. त्यावरून (अवांतर) आठवले, आमच्या कॉलेजसमोर एक अगदी खास मराठी 'मिल्क बार' होते. ते तीन बंधू मिळून चालवायचे. मराठी रेस्टॉरंटात नेहमी होते तसे हे मालक लोक विरूद्ध नोकरचाकर असा नेहमीचा थाट तेथे असायचा. काही कारणांमुळे नोकर सदैव मालकांशी फटकून असायचे, त्याचा फायदा घेऊन कॉलेजातील टारगट मुले जे खात त्यापेक्षा कमी बिल देऊन जात असत. मालक नेहमी नोकरांवर गल्ल्यावरून ओरडत असायचे. त्या तीन भावांपैकी मधल्याने अगदी हिटलर छाप मिशा ठेवलेल्या. त्याच्या नोकरांवर डाफरणे व ह्या मिशा हे मिळून पोरांनी त्याचे नाव ठेवले- हिटलर. अर्थात धाकटा झाला 'हिट' व सर्वात मोठा झाला 'हिटलेस्ट'!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

नाय हो अवांतर नाही व्हायचं.

मृत्युन्जय
Wed, 10/27/2010 - 13:44 नवीन
नाय हो अवांतर नाही व्हायचं. तुम्ही लिहा बिन्धास्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

छान लिहील आहे.

जागु
Wed, 10/27/2010 - 13:20 नवीन
छान लिहील आहे.
  • Log in or register to post comments

मस्तं लेख रे मित्रा. बाकी

llपुण्याचे पेशवेll
Wed, 10/27/2010 - 18:09 नवीन
मस्तं लेख रे मित्रा. बाकी मायझंव हा शब्द कोकणातल्या बायका देखील अगदी सहज बोलून जातात. हे मी स्वतः ऐकलं आहे. विशेषतः म्हातार्‍या किंवा जुन्या पिढीतल्या बायका. गंमत वाटली होती पहील्यांदा ऐकून.
  • Log in or register to post comments

अगदी अगदी!

धमाल मुलगा
Wed, 10/27/2010 - 18:15 नवीन
एक एकांकिका करायला घेतली होती कालेजात असताना (हा 'मी कॉलेजात जात होतो हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न नाही, एकांकिका करत होतो हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न आहे.' ;) ), पण त्यात पावलापावलावर "अक्करमाश्या मांयझया' असे शब्द होते. आमचे गुर्जी पडले देशावरचे, त्यांना लाख समजाऊन सांगितलं, की अहो, आपल्याकडं च्यायला किंवा ए रत्ताळ्या... वगैरेसारखं अगदी सर्रास वापरले जाणारे कोकणातले शब्द आहेत ते...बाकी काही नाही झालं, आमची आयकार्डं जप्त करुन घेतली मास्तरानं. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

कोल्हापूर आणि शिव्यावरुन एक

शाहरुख
Wed, 10/27/2010 - 23:28 नवीन
कोल्हापूर आणि शिव्यावरुन एक फार जुनी गोष्ट आठवली.. मी एका शिवाजी पेठेतल्या मित्राकडे गेलो होतो..त्याच्या घरुन दोघे कुठेतरी जायला निघालो..घराबाहेर २-३ वर्षांचा एक मुलगा खेळत होता..मित्राने सहज त्याच्या डोक्यात टपली मारली..तर मुलगा म्हणाला "ए लवल्या, मालतोस का" माफ करा, शिवीत फुली घातल्यास गोष्ट कळाली नसती :-)
  • Log in or register to post comments

उत्तम.

अडगळ
गुरुवार, 10/28/2010 - 04:42 नवीन
अवांतर : ज्ञानेश्वरीतील एका मजेदार शिवीसाठी "एक महान शिवी" हा म्.वा.धोंडांचा लेख जरूर वाचावा.(ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी) ------------------------------------------ अंगावर ट्रक घालून ड्रायव्हर म्हणाला दिखता नही मादरचोद , दिखता नही ? किर्‍यानिष्ट क्लीनर (अडगळ)
  • Log in or register to post comments

वा वा

सन्जोप राव
गुरुवार, 10/28/2010 - 04:24 नवीन
शिव्यांबाबतचा हा झणझणीत लेख वाचून तोंडाची बाबळी गेली. (कोल्लापूरकरांना हे कळावे. इतरांनी माडगूळकरांचा 'हॅलो, मिस्टर डेथ' आठवून 'तोंडाची अळशी गेली' असे वाचावे). 'रांडेच्या' किंवा 'रांड्या' हा शब्द कोल्हापुरात 'अरे' या अर्थाने वापरतात. 'रांड' हा शब्द तर अतीवापराने आपला तिखटपणा हरवूनच बसला आहे. बायकोला फक्त याच शब्दाने संबोधणारा दळवींचा 'प्रवासी' आठवावा. 'उंडगी' या शिवीचेही तसेच. 'तुमचे पत्र मिळाले आणि मला चार दिवस कुठेतरी उंडगेपणाने फिरुन आल्यासारखे वाटले' असे जी.ए.कुलकर्णींनी अनंतराव कुलकर्णींना लिहीले आहे. (दोघेही कुलकर्णी हा फक्त योगायोग म्हणावा. ब्राह्मण-ब्राह्मणेतर असे काही यात शोधू नये) . 'गवतात उंडगेपणाने चरत जाणार्‍या ढोरासारखे माझे वाचन आहे' यात तर 'उंडगा' या शब्द शिवी म्हणून न येता सभ्य क्रियविशेषण म्हणूनच येतो. बाकी कोल्हापूर हे महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर असल्याने खास कानडी ढंगाच्या म्हणून ज्या मराठी शिव्या आहेत, त्या अगदी रसरशीत आहेत. 'व्हयमाले', 'हादरगित्तीच्या', 'खज्जाळीच्या', सुक्काळीच्च्या' या शिव्या या लेखामुळे अगदी सकाळी सकाळी आठवल्या आणि गुरुचरित्राचे पारायण केल्यासारखे वाटले.
  • Log in or register to post comments

माझ्या एका मामाला त्याच्या

स्पंदना
गुरुवार, 10/28/2010 - 08:39 नवीन
माझ्या एका मामाला त्याच्या आत्त्या कडुन 'शिव्यांचा पाढा ' म्हटला तरच गोळ्या( तेंव्हा चोकलेट नव्हती) मिळायच्या. कोल्हापुरी असल्यान शिव्या माहिती आहेत पण बहुतेक शिव्या आई किम्वा बहिण अश्या स्त्री नातेवाइकांवर असल्याने थोडासा निषेध. बाकी लेखा बद्दल ' च्यामारी तुम्ही तर फर्स्टक्लास लिहिलय राव'
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा