बिरादरीची माणसं - मनोहर काका

लेखनप्रकार
भामरागड पुलावरून पाणी असतांना गावातील लोकांना घरी आश्रय द्यायचा असो किंवा रणरणत्या उन्हात तेंदूपत्ता तोडतांना होरपळून गेलेल्यांची तहान शमवायची असो…… कुणाचे दुःख कमी करायचे असो की कुणाचा आनंद द्विगुणित करायचा असो…… जन्म दाखला, बँक अकाउंट, मनी विथड्रॉव्हल, किराणा, बाजार करणे.. इत्यादी लोकांच्या कुठल्याही कामासाठी आपली दुचाकी घेऊन नेहमीच तयारीत असणारी ही व्यक्ती. चांगल्या कामासाठी "नाही" हा शब्द न वापरणाऱ्या ह्या व्यक्तीचा हात बिनशर्त सदैव मदतीसाठी तयार असतो ….. हो अगदी बरोबर ओळखलं..."डॉ.

म. सु. पाटील : उत्तुंग समीक्षक आणि माणूस

लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे दिनांक 31 मे 2019 ला रात्री अकरा वाजता म. सु. पाटील सर उर्फ बाबा यांचं निधन झालं. ही दु:खद बातमी समजताच सरांशी झालेल्या पहिल्या भेटीपासून तर आतापर्यंतच्या त्यांच्या समग्र आठवणी अगदी कालच घडल्यासारख्या मनात सहज तरळून आल्या. म. सु. पाटील सरांशी माझी पहिली प्रत्यक्ष भेट मनमाडला 1985-86 च्या दरम्यान झाली. (त्या आधी सरांशी आणि पुपाजींशी मी आठवीत असतानापासून पत्रसंवाद होता. ‘अनुष्टुभ’ नियतकालिकामुळे.) मनमाड महाविद्यालयात सर प्राचार्य होते. त्यांच्या निरोपानुसार त्या रविवारी सटाण्याहून डॉ. मोहन माजगावकर दादा आणि आम्ही काही मित्र (प्रा. शं. क. कापडणीस, डॉ. एकनाथ पगार, डॉ.

स्वामि धागे घेऊन येतात

Taxonomy upgrade extras
स्वामि धागे घेऊन (का) येतात एकएक हट्टी जिलबी जिद्दीने पाडून ठेवतात, प्रत्येक जिलबीमध्ये अनेक बिनबुडाचे मुद्दे मनोरंजन म्हणून ठेवून जातात... स्वामि धागे घेऊन येतात अलंकारिक वाक्ये भिरकावून केवळ डोकेदुखी देऊन मिपाकरांच्या डोक्यात जातात ट्रोलबाजी करून मजा बघत अज्ञाताच्या अंधारात गुडूप होतात...... (दुसऱ्या दिवशी परत) स्वामि धागे घेऊन येतात.... - हे काव्यपुष्प स्वामिचरणी अर्पण

दाराआडचा पप्पू (आणि त्याची मम्मी)

एक पप्पू दाराआडून बघतो आहे बाहेर आशाळभूत नजरेने. किती बाहेर ? मम्मीच्या पदराआडच्याही बाहेर.. ल्युटियन्स झोनच्या पार, वायनाडच्याही पलिकडे... समुद्रापारच्या वाटिकनातल्या परमेश्वराच्या सर्वोच्च प्रतिनिधीकडे, हिरव्या झेंडयाच्या देशातल्या त्या हिमरानाकडे ... देतील का ते मला सिंहासन मिळवून ??? पण सिंहासनावर चौकीदार बसलेला आहे. चुस्त, मस्त, व्यस्त .... चतुर, धाडसी, जबरदस्त ... नवनव्या योजना आखत, शत्रूच्या उरात धडकी भरवत. चौकीदाराला मिठी मारून झाले ...

(दाराआडची आई)

पेरणा...अर्थातच एक आई दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध.... करत असेल का तो तिचा काही विचार? येत असेल का तो ही खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे? आईला दाराआडून बाहेर यायचं नाही... मग ती वेताची काठी हळूच चाचपते, ती काठी पाठीत घेऊन मुलगा अविश्रांत कोकलत राहतो.... काठी सापडलेली आई सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते... सुततच राहते.... -चमचमचांदन्या

नास्तिकता दिवसांच्या शुभेच्छांच्या निमीत्ताने

लेखनप्रकार
मुलतः अज्ञेय (अ‍ॅग्नॉस्टिक) राहून दर क्षणास विविध विचारधारांच्या दृश्टीकोणातून विचार करण्याचा अधिकार राखून ठेवणारा अशी स्वतःची लांबलचक व्याख्या करणारा असल्यामुळे आस्तिकांसोबतच नास्तिकांनासुद्धा (टिकेप्रमाणेच) मनापासून शुभेच्छाही देत असतो तशा या २३ मार्च २०१९ या जागतिक नास्तिकता दिवसाच्या नास्तिकांना हार्दीक शुभेच्छा. ( जे माझे लेखन प्रथमच वाचताहेत त्यांच्यासाठी मी सर्वधर्मीय आस्तिकता आणि नास्तिकता यांच्या चांगल्या बाजू आणि मर्यादा दोन्हीचीही या पुर्वी वेळोवेळी दखल घेऊन झालेली आहे.

देवा, क्लोरोफिल देतो का रे , क्लोरोफिल

देवा, क्लोरोफिल देतो का रे , क्लोरोफिल दे ना रे मजला मी कि नई छान छान खायला करून घालेन तुजला कशाला हवाय डोक्याला ताप नि तो पगार कशाला होतील चोऱ्या नि माऱ्या कुठेच पडणार नाहीत दरोडे कि होणार नाहीत कुणाचे खून लुटेल , हो फक्त लुटेल ते सूर्यनारायणाचे ऊन तू काया बनवलीस सोबतीला कमी कि काय म्हणून माया बनवलीस खायला तोंड दिलेस नि भरायला पॉट तरी बी सारे शोधत बसलेत कुठं लागतोय का ते जॅकपॉट ? झाड बघा ना, कुठंच जात नाही तिथेच राहतं नि ऊन खाऊन जेवण बनवून देतं मलाही आवडेल तसं राहायला काहीही नको , हवंय फक्त ऊन आणि ऊन लुटायला मस्तपैकी लुटून , छान छान जेवण बनवायला स्वतःच हात

कहीं दूर जब दिन ढल जाये

लेखनविषय:
लेखनप्रकार
कॅन्सरशी झुंज देत ओंकारने इहयात्रा संपवली. ओंकार माझा शाळूसोबती. घट्ट गूळपीठ ज्या मोजक्या लोकांशी जमलं त्यांच्यापैकी एक. आमची जोडी तशी गमतीदार होती. तो जगन्मित्र, मी घुम्या. तो तल्लख स्मरणशक्तीचा, मी संदर्भासाठी पुस्तक धुंडाळणारा. तो तापट आणि शीघ्रकोपी, तर आता रागवायचा हक्क मला आहे का? याच गोंधळात मी अडकलेला. पण आमच्या दोघांत एक समान दुवा म्हणजे पुस्तकप्रेम. त्याच्या घरी एन्सायक्लोपीडियाचे खंड होते. समग्र पुलं होते. दळवी होते. इतकंच काय तर गादीखाली लपवलेलं आनंदध्वजाच्या कथाही होतं. त्यामुळे किशोरावस्थेतून तारुण्यात आम्ही एकत्र प्रवेश केला. त्याला कुठलाही विषय वर्ज्य नव्हता.

पुलं "दैवत"

लेखनप्रकार
आमचं कुलदैवत ~ पुलदैवत पुलंची जन्मशताब्दी असं वाचल्यावर जरा आश्चर्यचकित झालो. पुलं आज असते तर 100 वर्षाचे झाले असते. पण झाले असते? पुलं गेलेच कुठे आहेत..ते अजूनही त्यांच्या पुस्तकातून, वेगवेगळ्या व्यक्तीरेखांतून आजूबाजूलाच आहेत. परवा कोकणात फिरतांना अंतू बरवा दिसले..हेदवी ला शिवराम गोविंद दिसले, बेळगाव- कारवार ला रावसाहेब दिसले. पुलं त्यांच्या पुस्तकांमधून, नाटकांमधून अजूनही आपल्याला भेटतातच की.

मला भेटलेले रुग्ण - १८

https://www.misalpav.com/node/42929 “डॉक्टर ईस दवा के क्या साईड इफेक्ट्स है”..... टिबीचं निदान झालं , औषधं लिहून दिली आणि एकही दिवस सोडायचं नाही असं अगदी बजावून सांगितलं मग विचारलं काही प्रश्न आहेत का अजून तर त्या पेशंटनी हा प्रश्न विचारला .... ह्यावर नेहेमीचं उत्तर देण्याआधी पेशंटचा नेमका रोख समजून घेऊन बोललो “ ईसके साईड इफेक्ट तो बहोत है लेकीन ईसका सबसे बडा जो ईफेक्ट है ना वो आपकी जान बचायेगा !!” टिबीच्या औषधांचे काही कॉमन साईड इफेक्टस म्हणजे लाल रंगाची लघवी होणे, ॲसिडीटी (उलट्या + मळमळ) वाढणे, गळून गेल्यासारखं वाटणे .
Subscribe to व्यक्तिचित्रण