रोजरोज ईज्जतिचा भाजीपाला न होऊ देता, घरमालकाकडे आंघोळीले, त्याच्या घरातून बाथरूम मदे जाण, हे काई आता जमत नॊत. त्यातल्या त्यात आमी तिघेही पयल्यान्दाच घरा बाहेर राहायले आलो होतो. मग अशात काहीतरी फालतू गोष्टी वरून, वाद होणार नाई त मंग ती दोस्ती कायची? नेहमी अनोळखी लोकांपेक्षा जे आपल्याले लय लाड करतात, जाच्यावर आपला हक्क आहे अस वाटते, अन मंग जर त्याने आपली मर्जी राखली नाई, त दुःख होऊन, राग याले लागतो, त्यातूनच भांडण होतात. अशाच कुठल्यातरी फालतू कारणामुळे, मी दुसऱ्या कुठल्यातरी मित्रांसोबत रूम शिफ्ट केली.
मनीष अन राहुल्याले, मनश्याच्या वडिलांच्या ओळखीच्या काकांन, राहायला रूम दिला.
छान झाली सिरीज. अजून येऊद्या
In reply to छान झाली सिरीज. अजून येऊद्या by प्राची अश्विनी
धन्यवाद.
छान!
In reply to छान! by Nitin Palkar
धन्यवाद.