‘मास लीडर’ सुधीर मुनगंटीवार
प्रभावी, उत्तम आणि अफाट जनसंपर्क व कुशल प्रशासन, उत्तम नियोजन, आदर्श व्यवस्थापन...
राजकारण हा प्रांतच स्पर्धेचा, दगदगीचा आणि सतत कार्यरत ठेवणारा आहे. अनेक जण वेगवेगळ्या अपेक्षांनी नेत्याकडे पाहत असतात. त्या अपेक्षा पूर्ण करण्याची आणि त्याचबरोबर कोणालाही नाराज न करण्याची खुप मोठी कसरत करावी लागते. हि कसरत पूर्ण करत असताना राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकीय पटलावर आपली अमिट छाप पाडणारे, एक सर्वसामान्य कार्यकर्ता, भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि आता अर्थमंत्री-वनमंत्री हा सुधीरभाउंचा प्रवास थक्क करणारा आणि प्रेरक आहे, रोमांचक, थरारक आहे.