Skip to main content

व्यक्तिचित्रण

मला भेटलेले रुग्ण - १५

लेखक डॉ श्रीहास यांनी शुक्रवार, 27/04/2018 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/42182 ६ वर्षाची मुलगी घेऊन आला होता , दम्याचा त्रास बराच वाढलाय म्हणून सांगीतलं आणि पुढे काय करायचं हे विचारतांना त्याला निघायची घाई झालेली होती ...... मी इन्हेलर्स कसे वाढवायचे सांगीतले आणि घाई असेल तर सवडीने या म्हणालो .... तर म्हणाला “डाॅक्टर हिच्या आईची डिलीव्हरी आहे आज म्हणून मधल्या सुटीत आलो मी , घरी एकटीच असते ही म्हणून घेऊन आलो....

मला भेटलेले रुग्ण - १४

लेखक डॉ श्रीहास यांनी बुधवार, 07/03/2018 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/42101 “आपके बेटे को अस्थमा है।” बस् एवढं म्हणायचा अवकाश आणि त्या आईच्या डोळ्यातून धारा सुरू झाल्या.... खरं तर त्या ३ वर्षाच्या मुलाला गेल्या दिड वर्षांपासून हा त्रास आहे पण ॲलर्जीचा खोकला आहे , असं सांगीतल्या गेल्यामुळे फार काही वाटलं नव्हतं पण दमा आहे म्हटल्या म्हटल्या लगेच पालकांच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलतात ....

मला भेटलेले रुग्ण - १३

लेखक डॉ श्रीहास यांनी मंगळवार, 27/02/2018 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/42057#new हि बाई नवऱ्यासोबत येते गेल्या ३ वर्षांपासून आणि आजही ही दोघं आले .... तब्येतीत चांगला फरक आहे म्हणून औषधं कमी करत करत आता फक्त एकच नियमीत आणि एक गरजेप्रमाणे असं प्रिस्क्रीपशन वर लिहून दिलं आणि पुढची व्हिसीट ३ महिन्यांनी सांगीतली, पण त्या पेशंटच्या चेहेऱ्यावरचा ताण जाणवत होता म्हणून परत विचारलं की सध्या अजून काही त्रास नाही ना ? झोप लागते का बरोबर ? .....

मला भेटलेले रूग्ण - १२

लेखक डॉ श्रीहास यांनी गुरुवार, 22/02/2018 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/41320 ओपिडी संपत आली होती, आज फारसे पेशंट नव्हते मी रिलॅक्स मुड मध्ये होतो आणि तेवढ्यात एकजण केबिन मधे शिरला .... हातात भली मोठी पिशवी , बरेच रिपोर्ट्स असावेत असा अंदाज आला.

बाप रे बाप..

लेखक ss_sameer यांनी सोमवार, 12/02/2018 या दिवशी प्रकाशित केले.
मला शाळेत एकदा विचारलेले, तुला तुझ्या वडीलांबद्दल काय वाटते? मी सांगितले, "भीती!" विचारणारा काही क्षण गोंधळून गेला. सारा वर्ग विचारणाऱ्या शिक्षकाच्या चेहऱ्याकडे पाहून फिदीफिदी हसत होता. गोंधळ इतका वाढला की पुछो मत. त्यानंतर बसण्याच्या जागेवर फुटलेल्या फटाक्यांमुळे माझे बसायचे हाल झाले. हे त्या काळचे उत्तर आहे. सध्या असे कोणी उत्तर दिले तर अमेरिकेत जसा नाईन वन वन ला फोन करतात तसाच पोलिसांना फोन करून वडिलांची(च) चौकशी करायला घेतील. पूर्वी बापास शाळेत बोलावणे म्हणजे पोराने कोणता तरी अनंत अपराध केल्याची नांदी असे.

ग्राम"पंचायत" लागली..!! - 10

लेखक विशुमित यांनी शनिवार, 27/01/2018 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.misalpav.com/node/41800 मन्या चिंगाट घराकडे सुटला. काही तासच उरले होते. त्याची अस्मिता सकाळी सकाळी पदवीची शेवटच्या वर्षाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी तिच्या माहेराला जाणार होती. ती परत दीड महिन्यांनीच येणार होती. मोठा ग्याप पडणार होता. पदवीचा विषय आहे भूगोल. भूगोलसाठी दीड महिना? मी तर आयुष्यात (म्हणजे शाळेत, १० वी पर्यंत) २ तासाच्या वर कधीच अभ्यास केला नाही भोगल्याचा. मला हर्षा भोगले आवडायचा पण भूगोल... ह्या. ती भूगोल घेऊन पुढे काय करणार आहे तो मन्याचं जाणे.

ग्राम"पंचायत" लागली..!! - 9

लेखक विशुमित यांनी शनिवार, 13/01/2018 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/41789 "माउली जय हरी ", विजूबापूनी कोपऱ्याला कोपरा जोडून लांबून नानांना हात जोडले. नानांनी पण ओठांपर्यंत हात उंचावत 'राजनीती' मधल्या मनोज बाजपेयी सारखा प्रति-नमस्कार केला. आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता आणि फायनल टच देण्याकरिता विरोधी गटाने कंबर कसली होती. संग्राम गट मात्र कमालीचा सुस्त झालेला दिसत होता. विजूबापू ग्रेट माणूस. विरोधी पक्षातला असला म्हणून काय झाले पण कर्तृत्वान व्यक्तिमत्व . घरातल्या एका खोलीत चालू केलेल्या पतपिढीचा आता वटवृक्ष झाला होता.

वाढदिवसाच्या शुभेच्छा राहुल द्रविड - The wolf who lived for the pack

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी गुरुवार, 11/01/2018 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय राहुल, ४५ व्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! वन ब्रिक अ‍ॅट अ टाईम मध्ये तुझ्या कारकीर्दीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला होता... आज जरा पुढे जाऊन मन मोकळं करावं म्हणतो. एकतर तू क्रिकेट खेळत नाहियेस हेच पटत नाही बघ. बॅटिंग करताना तू ४५ वर पोहोचेपर्यंत समोरच्या गोलंदाजांनी हत्यारं म्यान केलेली असायची. सिनेमातल्या डॉक्टरनं "अब इनको दवा की नहीं दुवा की जरूरत है" सांगितल्यावर नातेवाईकांचे होतात तसे चेहरे करून "फक्त प्रयत्न करणं आपल्या हातात आहे" असा कर्मयोगी विचार करून बिचारे गोलंदाजी करत राहायचे.

( काल रातीला सपान पडलं )

लेखक गबाळ्या यांनी सोमवार, 11/12/2017 या दिवशी प्रकाशित केले.
हा ।। गुरु महिमा ।। चाच पुढील विस्तार आहे. ( बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार विडंबन हि स्वतंत्र कविता आहे व ते स्वतंत्र धाग्यावर असावे म्हणून हा स्वतंत्र धागा. ) गेल्या काही दिवसांत मी काही कवींचे व त्यांच्या कवितांचे विडंबन केले. खरे तर एखाद्या कवीचे काव्य दुसऱ्या कोणाला नवनिर्मितीसाठी / विडंबनसाठी प्रोत्साहित करत असेल तर त्याचे श्रेय मूळ कविलाच जाते. त्यामुळे मूळ कवीचे श्रेष्ठत्व आणखीनच वाढते. मूळ कवीने विडंबन हे त्यांच्या कवितेचा अनादर आहे असे मुळीच समजू नये.