✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ट्रम्प व्हिझिट पुणे

म
महासंग्राम यांनी
Mon, 02/24/2020 - 15:07  ·  लेख
लेख
माननीय श्री डोनाल्ड ट्रम्प तात्या यांच्या TrumpIndiaVisit दरम्यान पुणे दौऱ्यातील मधील कार्यक्रम. सकाळच्या 5.30 ला येणाऱ्या महाराष्ट्र एक्सस्प्रेस ने ७ वाजता पुणे रेल्वे स्टेशन वर आगमन मका यांच्याकडून हे सुरांनो चंद्र व्हा हे फ्युजन ऐकवून स्वागत रिक्षा चालका सोबत भाड्यावरून वाद. शेवटी PMT ने शनवार पेठेतल्या खोलीकडे रवाना. ९ वाजता मोतीबागातील चहा आणि श्रीकृष्ण मिसळ यांचा नाश्ता आणि मेलानिया वाहिनी सोंबत तुळशीबागेत खरेदी. ११ वाजता पुणे मनपा मधील कर्मचायांसोबत सोबत कामचुकार पणा कसा करावा यावर २ तास चर्चा (यात फेरीवाले, वाढवलेले फुटपाथ, अवेळी सोडणारे पाण्याचे नळ इ. चा समावेश) १२.५५ ला वाडेश्वर इडली सांबार. एक ते चार झोप. ४.१५ तिलक चा चहा ४.३० वाजता कर्वे सस्त्यावर मेट्रोच्या गर्दीत ऑटोतून भव्य रोड शो द्वारे कोथरूड कडे प्रयाण. ५ वाजता कोथरूड चे निब्बा आजोबा यांच्याशी बे एरिया मधले होणारे संस्कृतीक अधपतन आणि उपाय यावर चर्चा ६ वाजता सुदामा बार अँड रेस्टॉरंट येथे लिटिल लिटिल श्रम परिहार आझाद हिंद ट्रेन ने पुणे ते नागपूर असा प्रवास नागपुरास पहाटे लोकमत चौंकातला चना पोहा खाऊन दिल्लीस प्रयाण #ट्रम्प_तात्या_जिंदाबाद टीप : आपण पण यात आपल्या परीने भर घालू शकता
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
भाषा
समाज
जीवनमान
आईस्क्रीम
आरोग्य
इंदुरी
प्रवास
भूगोल
देशांतर
राहती जागा
व्यक्तिचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
आस्वाद
शिफारस
सल्ला
माहिती
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
20765 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

फुटपाथ वरून मोटरसायकल स्वतः चालवणार.

मुक्त विहारि
Mon, 02/24/2020 - 16:07 नवीन
www.news18.com%2Fnews%2Fbuzz%2Fwatch-elderly-pune-woman-stands-on-pavement-and-scolds-bikers-riding-on-the-footpath-2511667.html
  • Log in or register to post comments

लिंक चुकली

मुक्त विहारि
Mon, 02/24/2020 - 16:11 नवीन
https://www.news18.com/news/buzz/watch-elderly-pune-woman-stands-on-pavement-and-scolds-bikers-riding-on-the-footpath-2511667.html?fbclid=IwAR1-eWEjdRKiN6jf8WYXNdrhV9tmywZCVEdJw4tq6sp13I42UhSMuKrRLI8
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हा ..... हा ...... हा ....... !

चौथा कोनाडा
Mon, 02/24/2020 - 17:13 नवीन
हा .... हा ..... हा ..... ! शिवाजीनगर स्टेशन ते आकुर्डी रेल्वेस्टेशन लोकलने प्रवास याचाही अंतर्भाव करावा ही णम्र इनंती ! _/\_ मस्त !
  • Log in or register to post comments

तिकडची मेट्रो सुरु झाल्यावरच

महासंग्राम
Tue, 02/25/2020 - 09:43 नवीन
तिकडची मेट्रो सुरु झाल्यावरच तिकडे चक्कर टाकू असं तात्यांच्या खासगी सचिवांनी कळवलंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 02/24/2020 - 17:29 नवीन
सोने खरेदीसाठी मेलेनिया/इवान्का व मुक्ता बर्वे/म्रूणाल कुलकर्णीसोबत रिक्शाने लक्ष्मी रोडला रवाना. ईवांका पु.ना. गाडगीळमध्ये तर मेलेनिया रांकामध्ये.
  • Log in or register to post comments

माई माई माई मृणाल कुलकर्णी

महासंग्राम
Tue, 02/25/2020 - 14:48 नवीन
माई माई माई मृणाल कुलकर्णी म्हणजे आमच्या आप्पांची लाडकी नात आणि माधवरावांची सिरियलीत झालेली रमाबाई तिला कुठे ट्रम्प च्या बायडीसोबत पाठवता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

१)अमृततुल्य नाही?

कंजूस
Mon, 02/24/2020 - 18:43 नवीन
१)अमृततुल्य नाही? २)महाराष्ट्र एकस्प्रेस नागपूर ते सातारा -कोल्हापूर आहे ना? डेक्कनने एमसटी डब्यात मारामारी नाही? ३)मंडईत भाजी खरेदी, अप्पा बळवंत चौकात अध्यात्मिक पुस्तक खरेदी?
  • Log in or register to post comments

महाराष्ट्र एकस्प्रेस

श्रीरंग_जोशी
Mon, 02/24/2020 - 23:22 नवीन
महाराष्ट्र एकस्प्रेस गोंदिया ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर अशी आहे. तिच्या मार्गात गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, अहमदनगर, दौंड, पुणे, मिरज, कोल्हापूर ही मोठी स्थानके आहेत. महाराष्ट्राच्या राजधानीला वगळून देखील सर्वाधिक जिल्यांतून धावणारी ही ट्रेन असावी. पूर्व व पश्चिम विदर्भ, उत्तर, पश्चिम व दक्षिण महाराष्ट्र या भागांतून जाते. केवळ कोकण व मराठवाडाच सुटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

काका फक्त १८ तास होते आमच्या

महासंग्राम
Tue, 02/25/2020 - 09:34 नवीन
काका फक्त १८ तास होते आमच्या डोनु कडे त्यामुळे इतकंच
१)अमृततुल्य नाही?
तिलक चा उल्लेख केलाय ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

खरपूस

श्रीरंग_जोशी
Mon, 02/24/2020 - 23:27 नवीन
माझीही भर - संध्याकाळी कात्रजच्या राजीव गांधी सर्पोद्यानाला भेट व तिथल्या पांढर्‍या वाघाचे दर्शन घेऊन कात्रज तलावात नौकाविहार. चि. बॅरनसाठी अप्पा बळवंत चौकातून अभ्यासाच्या पुस्तकांची खरेदी. व्हाइट हाऊस, ट्र्म्प टॉवर अन मार (ए) लागो रिसॉर्टच्या कर्मचार्‍यांसाठी चितळ्यांच्या बाकरवडीची खरेदी लोकमंगलमसमोरच्या बाजीराव रस्त्यावरील चितळ्यांच्या दुकानातून खरेदी.
  • Log in or register to post comments

हा हा हा

महासंग्राम
Tue, 02/25/2020 - 09:35 नवीन
चितळ्यांनी पिशवीचे एक्सट्रा २० रुपये घेतले का त्यांच्याकडून :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

आझाद हिंद ट्रेन

श्रीरंग_जोशी
Mon, 02/24/2020 - 23:30 नवीन
>> आझाद हिंद ट्रेन ने पुणे ते दिल्ली असा प्रवास इ नॉ चॉलबे. आमार शोनार होवरा स्टेशन सोडून आझाद हिंद एक्स्प्रेस दिल्लीला ना चॉलबे ;) .
  • Log in or register to post comments

हत्ती पाहायला केरळात ( वाइनाड

कंजूस
Tue, 02/25/2020 - 06:03 नवीन
हत्ती पाहायला केरळात ( वाइनाड)जाणार नाही. हत्तींच्या ऐवजी काळी निशाणे पाहावी लागतील.
  • Log in or register to post comments

ते ज्ञानप्रबोधिनीसमोरचे

विजुभाऊ
Tue, 02/25/2020 - 09:17 नवीन
ते ज्ञानप्रबोधिनीसमोरचे अनारसे "सामोसेवाले: जिवाला खा जिवाला खा जिवाला खा. ते राहिलेच की. झालेच तर बादशाही मेस समोरच्या पाट्यांचे वाचन पण राहिलेय.
  • Log in or register to post comments

विजुभौ विजुभौ, अहो एकच पोट

महासंग्राम
Tue, 02/25/2020 - 09:44 नवीन
विजुभौ विजुभौ, अहो एकच पोट आहे माझ्या तात्याला इतकं खाल्यावर आग्ऱ्यास ताजमहाल ऐवजी फक्त पोटच दिसलं असतं त्यामुळे तूर्तास तो बेत रहित केलाय ! इति : मेलानिया वहिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

पर्वती दर्शन

श्रीरंग_जोशी
Tue, 02/25/2020 - 09:38 नवीन
सुर्यास्ताच्यावेळी पर्वती दर्शन व नंतर दूरवर पसरलेल्या पुण्याचे मनोहारी दर्शन. मराठी आंतरजालावरचे जगप्रसिद्ध लेखक श्री अकु यांचेशी सौहार्दभेट.
  • Log in or register to post comments

जगप्रसिद्ध लेखक श्री अकु

चौथा कोनाडा
Tue, 02/25/2020 - 13:03 नवीन
जगप्रसिद्ध लेखक श्री अकु यांचेशी सौहार्दभेट.
हे तर जबरदस्त अमीष आहे, आधी कल्पना दिली असती तर तात्यांनी आवर्जून मुक्काम वाढवला असता ! @श्रीरंग_जोशी _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

सेल्फी

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 02/25/2020 - 11:45 नवीन
टिळक स्मारक मंदीरासमोर असणार्या 'व्हाईट हाउस' ह्या बिल्डिंग्समोर उभे राहून ट्रम्प ह्यांचा सेल्फी. हिंजवडीला धावती भेट.
  • Log in or register to post comments

तिलक म्हणजे अमृततुल्य माहीत

कंजूस
Tue, 02/25/2020 - 11:56 नवीन
तिलक म्हणजे अमृततुल्य माहीत नव्हते.
  • Log in or register to post comments

ह्येच का त्ये ?

चौथा कोनाडा
Tue, 02/25/2020 - 13:20 नवीन
Image removed. ह्येच का त्ये ? गेलो आहे बहुतेक इथं एकदा !
  • Log in or register to post comments

हो, हेच नाव जरी अमृततुल्य

महासंग्राम
Tue, 02/25/2020 - 14:44 नवीन
हो, हेच नाव जरी अमृततुल्य नसले तरी चव अगदी तशीच आहे. याच्याजवळच विनोदी अभिनेते स्व. शरद तळवलकर राहत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

येवले

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 02/25/2020 - 15:14 नवीन
येवले अमृततुल्य व सलगर अमृततुल्य हल्लि अनेक दिसतात. असो. वैशाली व कॅफे गुडलकचा उल्लेख झाला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

माई, तात्या वैशालीत गेले होते

महासंग्राम
Tue, 02/25/2020 - 15:47 नवीन
माई, तात्या वैशालीत गेले होते, पण तिथे हि गर्दी होती, तेव्हा वाट पाहून गर्दीत मिळण्यापेक्षा आल्या पावली परत वाडेश्वरात गेले ते. आणि गुडलक ला मीच जाऊ नका म्हंटल. पूर्वीच गुडलक राहिलं नाही आता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

हाहाहा!

जुइ
Sun, 03/01/2020 - 01:41 नवीन
भारी आहे!
  • Log in or register to post comments

घरचा फेरफटका ... राहिला?

शशिकांत ओक
Sun, 03/01/2020 - 01:56 नवीन
Image removed. विमाननगर, वडगाव शेरी भागातील ट्रंप टॉवर्स या आपल्या प्रापर्टीला भेट द्यायला विसरला!
  • Log in or register to post comments

मोठ्या आशेने बाकरवडी खरेदी

मदनबाण
Sun, 03/01/2020 - 10:23 नवीन
मोठ्या आशेने बाकरवडी खरेदी करण्यास गेलेल्या ट्रम्प तात्यांना बाकरवडी संपली ! अशी पुणेरी पाटी वाचावयास मिळाली ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मराठमोळ्या माधुरी कानिटकर देशाच्या तिसऱ्या महिला लेफ्टनंट
  • Log in or register to post comments

लव यू लवासा

गामा पैलवान
Mon, 03/02/2020 - 01:45 नवीन
तात्याबांना लवाशात जाईचं न्हाई ? लव यू लवाशा कोण म्हन्नार मंग? -गा.पै.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा