मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धर्म इथे बेताल झाला

खिलजि · · जे न देखे रवी...
धर्म इथे बेताल झाला उठतासुटता जहाल झाला वापरले कैक रंग त्याने कोथळा बाहेर येताना मात्र लालच झाला ... किती चढले सुळावर त्याच्यानावे , मारणारे गनीम आणि मरणारेही .......... पाळणारे , जाळणारे , बघणारे अन भडकवणारे पण .........जो तो हलाल झाला जन्नत नसीब झाली कुणा तर कुणी स्वर्गात पोहोचले अरे पण त्यांचे काय झाले असेल ? ज्यांच्या जाण्याने , उभे घर पोळले अपराध कुणाचा , कुणी भोगला कामकऱ्याला जागेवरी ठोकला मर्दुमकीचा झेंडा मिरवुनी हिरवा भगवा पुढे नाचला हिजडे हरामी धर्मवेडे रंगबिरंगी धर्मांमध्ये फुका पाजती विषाचा प्याला माणूस मेला ,,, धर्म राहिला , धर्म राहिला

वाचन 2953 प्रतिक्रिया 0