मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाळणा झुलू दे

पाषाणभेद ·

नात म्हणजे अप्रतिम भेट आली देवा कडून थेट नात म्हणजे दुधावरची साय आजोबा ची दुसरी माय........ अनुभवल्या बिगर कळत नाय......

वाह मस्त ! अशा कविता वाचायला मजा येते . आजकाल फार दुर्मिळ झाले आहे असले सुंदर लेखन! बाकी ही कविता लिहिताना आपल्या डोक्यात काही विशिष्ठ चाल होती का ? त्याची एखादी लिन्क असेल तर पाठवा , चालीत वाचायला अजुन मजा येईल !!

In reply to by प्रसाद गोडबोले

पाषाणभेद 29/12/2021 - 23:14
परवा सकाळी जाग येण्याच्या आधी पहिली ओळ सुचली, अन काल खर्डा लिहीला, आज पूर्ण केली. चाल वगैरेची लिंक नाही हो. आपसूक सुचत जाते. तरीही मिटरमधे गायला काही शब्द पुढे मागे करावे लागतात, मी ते लिहीले नाही.

असा झुलू दे झुलू दे पाळणा झुलू दे या पाळण्यात माझ्या बाळाला खेळू दे माझ्या या अंगणी आला ग श्रीरंग काय सांगू बाई माझ्या बाळाचे रंग किती द्वाड तो धावतो घरात आवरता आवरेना दिस जाई त्याचे संग काय काय मागतो खायला प्यायला लोणी श्रीखंड बासूंदी करंजी घेते मी कराया रव्या बेसनाचे लाडू मोतीचूर भरपूर केली खीर, कोशिंबीरी सोबतीला शेवया माझ्या या बाळाला आयुष्य उदंड लाभू दे असा झुलू दे झुलू दे पाळणा झुलू दे असा झुलू दे झुलू दे पाळणा झुलू दे या पाळण्यात माझ्या बाळाला खेळू दे - पाषाणभेद २९/१२/२०२१

कोळीगीतः समींदरा, जपून आण माझ्या घरधन्याला

पाषाणभेद ·

चित्रगुप्त 18/12/2021 - 11:44
वा पाषाणभेदराव. अतिशय र्‍हद्य, भावपूर्ण पद्यरचना. दादला दर्यावर गेल्यावर मोठीच जोखीम असते, त्यातून त्याची काहीही खबरबात मिळणे शक्य नसते. अश्या स्थितीत त्याच्या व्याकुळ पत्नीच्या मनात उसळणारे भावतरंग काय असतील, त्याची कल्पनाही आपल्यासारख्या शहरी लोकांना करता येणार नाही. ते तुम्ही त्या कोळिणीच्या जणु आंतरंगातच शिरून व्यक्त केले आहेत. खूप खूप छान. असेच लिहीत रहा, आम्ही वाचत राहू. अनेक आभार. शेवटला सोनसाखळीचा उल्लेख तसा मजेशीर वाटला, पण मनात प्रश्नचिन्हही जागवून गेला.

कदाचित तीचा घो म्हणत असेल दुर टेकडीवरी पेटती निळे ताबंडे दिवे सांगतात ते मजला आता घरी जायला हवे कुसुमाग्रज पण तीला कसे कळणार?

Bhakti 18/12/2021 - 17:29
छान आहे कोळीगीत! अशाच कोळीण स्त्रीची व्याकुळता दाखवणार माझं एक आवडत गाणं आहे. नाख्वा हो उधाण आयलया!

समींदरा रे समींदरा, तू जपून आण माझ्या घरधन्याला लई दिवसांन परतून येईल घराला ||धृ|| नको उधाण आणू तुज्या पाण्याला नको मस्ती करू देऊ वार्‍याला काय नको होवू देऊ त्याचे होडीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||२|| नारळ पौर्णिमेचा सण आता सरला तुला सोन्याचा नारल वाढवला नेल्या होड्या त्यानं मासेमारीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||३|| मी कोलीण घरला एकली सारं आवरून बाजारा निघाली म्हावरं विकून येवूदे बरकतीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||४|| एकवीरा आई माझी डोंगरावरी खणा नारळांन ओटी मी भरीन नवस केलाय मी खंडोबाला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||५|| पंधरा दिवस जायी तो समींदरात ते दिवस जातात माझे झुरण्यात

लिसा लिसा - प्रेमाचा निरागस गुंता

सिरुसेरि ·

मदनबाण 05/01/2022 - 19:55
चित्रपटाची ओळख आवडली ! ऊटीची निसर्ग रमणीय पार्श्वभुमी हे मात्र खरंय... दाक्षिणात्य चित्रपटातील अनेक गाण्यांचे शुटिंग पाहिल्यावर मला उटी आठवतेच ! याचे कारण मी यातील बर्‍याच लोकेशनवर फोटो काढलेले आहेत. माझं ऑल टाईम फेव्हरेट गाणं [ मोठ्या साईझ मध्ये ] इथे देतो, हे गाणं ज्या टेकडी / डोंगरावर शुट झालं आहे तिथे आमचा ड्रायव्हर मुद्दामुन घेउन गेला होता आणि इथेच मी काही फोटो काढले होते. मला आता या जागेच नाव आठवत नाही. :( [ तुम्हाला या जागेचे नाव माहित असल्यास नक्की सांगा ] तसेच या गाण्यात उटीचे बोटॉनिकल गार्डन देखील दिसते. [ दाक्षिणात्य चित्रपट,संगीत आणि भोजनाचा चाहता. ] :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Maai Bappa Vithala

लिसा लिसा - प्रेमाचा निरागस गुंता प्रियदर्शनचे दिग्दर्शन असलेल्या अनेक चित्रपटांतील कथा हि एखाद्या शांत , निवांत , निसर्ग रमणीय गावामधे घडते . उदाहरणार्थ हिंदीतील मुस्कुराहट , खट्टा मिठा . लिसा लिसा या २००३ मधे प्रदर्शीत झालेल्या तामीळ चित्रपटामधीलही वातावरण असेच रम्य , शहरी धकाधकीपासुन दुर आहे . कथा नायक राकेश ( शाम ) हा तरुण येथे आपले वाडवडीलोपार्जीत घर , शेती एकट्याने सांभाळतो आहे . पुढे मागे पैसे कमावण्यासाठी परदेशात जाण्यासाठीही त्याचे प्रयत्न चालु आहेत . चंद्रु हा त्याचा मित्र ( विवेक ) अनेक उद्योगांत आपले पैसे गमावुन बसला आहे .

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे

पाषाणभेद ·

In reply to by चौकस२१२

सुरसंगम 06/12/2021 - 06:55
लाल झेंडा म्हणजे? कळलं नाही कोणी स्पष्ट समजवून लिहलं काय? मुळात मराठी संमेलन असताना हिंदितुन का बरं निषेध?

साहित्य संमेलनात सरकारचा सहभाग वाढल्यामुळे, मी टाळतो .... द्रोणाचार्यांनी संजीवनी विद्या आणली, असा नविन इतिहास शिकण्यासाठी, आमची मानसिक तयारी नाही...

यंदाच्या अ .भा. मराठी साहित्य संमेलनाचा व विद्रोही साहित्य संमेलनाचा फोटो वृत्तांत आवडला. साहित्य संमेलनाच्या आयोजनातली भव्यता फोटोंतून स्पष्टपणे जाणवली. संपूर्ण भारतात साहित्याशी संबंधीत या प्रमाणातले संमेलन दर वर्षी होणारी केवळ मराठी भाषा आहे असा दावा ऐकला आहे. तो बहुधा खरा असावा कारण आजवर इतर कुठल्याही भाषेच्या अशा नियमित संमेलनाबद्दल ऐकले / वाचले नाही. फोटो वृत्तांतासाठी मनःपूर्वक धन्यवाद. वेळ मिळाल्यावर सविस्तर वृत्तांतही लिहावा ही विनंती.

चित्रगुप्त 07/12/2021 - 08:55
फोटोंवरून सासंविषयी एकंदरीत कल्पना आली परंतु प्रत्येक फोटोखाली पुन्हा पुन्हा तोच तोच मजकूर चोप्यपस्ते का केलाय हे समजले नाही. 'विद्रोही' या शब्दातून नेमके काय अभिप्रेत आहे ते जरा उलगडून सांगितले तर बरे होईल. त्या साहित्याचे वेगळे स्टॉल होते का? विद्रोही पुस्तकांचे फोटो कोणते आहेत? फोटोत नुसती माणसे बाया आणि ब्यानरच दिसत आहेत?

nutanm 12/12/2021 - 18:42
चित्रगुप्त यांच्याशी +100 सहमत. फोटोंखाली घटना उलगडून सांगायला हव्यात, लेसर लाईट्स व काठ्याकाठ्यांची सजावट समजून सांगाल काय? तसेच शांतता कोर्ट......हे ृदृश्य व ट्रेन समजत नाही.

पाषाणभेद 16/12/2021 - 00:56
@मनो आणि जे हा धागा आता नव्याने उघडतील त्यांचेसाठी:- वरील फोटो लिंक्स या फेबू वरून शेअर केल्या होत्या. फेबू चालूपणा करते. काही काळानंतर फोटोंचे टोकन बदलत राहते ते. मग काही काळानंतर टोकन जुळले नाही तर मग फोटो दिसेनासे होतात. तुम्ही आपल्या फेबूच्या मिपाकर - Mipakar या पेजवर जावून फोटो पाहू शकतात. https://www.facebook.com/groups/163835483668577/posts/4806342332751179/ https://www.facebook.com/groups/163835483668577/posts/4806341122751300/ https://www.facebook.com/groups/163835483668577/posts/4806336689418410/ https://www.facebook.com/groups/163835483668577/posts/4806332576085488/

चौथा कोनाडा 16/12/2021 - 20:40
प्रचि दिसत नाहीत. नविन खिडकीत उघडले तर "URL signature expired" असा संदेश झळकतो.

फोटो विना-फेसबुक दिसु शकणार नाहीत काय ?

चौथा कोनाडा 18/12/2021 - 16:07
धन्यू पाभे ! खिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रचि फेबु खात्यावर टाक्ल्यामुळे पहायला मिळाले ! प्रचि छानच आहेत, धन्स वन्सएकदा ! - चौको

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१ ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक,  ३ डिसेंबर २०२१, म

तिसरी घंटा

जे.पी.मॉर्गन ·

सुरिया 30/10/2021 - 07:11
अहाहा. सुरेख. अस्सल नाट्यवेड्याची आर्त आळवणी. आवडले. आवडले काय भिडलेच. बघुयात आता दीर्घ काळानंतर कोणत्या प्रयोगाने नारळ फुटतो. आम्हीही वाट पाहत होतोच.

मनोगत आवडले, फारच मनापासून लिहिले आहे. बघू नाट्यगृहात कधी पाउल टाकायला मिळते ते पैजारबुवा,

मदनबाण 30/10/2021 - 11:56
कुठल्याही "स्क्रीन" चा उबग आल्यामुळे असेल कदाचित, पण नाट्यगृहात जाऊन एखादं नाटक किंवा गाण्याचा कार्यक्रम बघायची आस लागलेली आहे. अगदी, मला पुन्हा :- पुन्हा सही रे सही बघायची खूप इच्छा आहे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Main Duniya Bhula Doonga... :- Aashiqui

सौंदाळा 30/10/2021 - 16:49
उत्कृष्ट आणि समयोचित लेख परवाच महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये पण याच विषयावर एक प्रवेश होता. नाटकं बघायला आतुर आहे.

आपण रोजचं वर्तमानपत्र वाचायला शेवटच्या पानापासून सुरुवात करणारी लोकं. आजकाल पहिल्या पानावर असतात त्या माणसाला मनुष्य "प्राणी" का म्हणतात याचा प्रत्यय देणार्‍या बातम्या. पण शेवटच्या पानावर असतात त्या माणसाच्या विजिगीषु वृत्तीच्या, अपार कष्टांच्या, लढवय्या बाण्याच्या गोष्टी. आणि त्यानंतरचं - शेवटून दुसरं किंवा तिसरं पान म्हणजे समाजाच्या सृजनाचं, कलात्मकतेचं, संवेदनशीलतेचं दर्पण - नाट्य, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जाहिरातींचं पान. कितीतरी महिन्यांनी - जवळपास पावणेदोन वर्षांनंतर ते पान पुन्हा रंगीबेरंगी जाहिरातींनी भरायला लागलं आहे.

मंत्रपुष्पांजली

Trump ·

चौथा कोनाडा 09/10/2021 - 18:21
रोचक संकलन आहे ! +१ पण, काहीही म्हणा ही लगेच आपलं वाटत नाही. यांच्या तुलनेत आपल्या कडच्या भजन पद्धती खुप साध्या आहेत, एवढी आणि आधुनिक वाद्ये आणि साउंड सिस्टीम नसतात. अति चकचकित वाटतं, सगळा डामडौल विविध वाद्ये आणि साउंड सिस्टीम यांचा !

मदनबाण 09/10/2021 - 23:37
चांगले दुवे आहेत... आताच SANSKRIT LOVE SONG TO INDIA ऐकले. काही वेळा संगीत असेलेले तर काही वेळा संगीत नसलेली स्तुती/मंत्र/कवच इ.इ.इ. ऐकायला आवडते. बर्‍याच वेळा मूळ गायना पेक्षा संगीताचा भार अधिक असलेले कंटेंट मला जास्त रुचत नाही, पण याला देखील अपवाद आहेत. :) महिशासुर मर्दिनी स्त्रोत्र अनेकांनी गायलेले आहे, कालच एका गायिकेने हे गायलेले माझ्या नजरेत आले आहे ते इथे देउन जातो :- [ माझ्या वापरात असलेला ऑडियो टेक्निका हेडफोन ती देखील वापरत आहे हे पाहुन माझा तो विकत घेण्याचा निर्णय योग्य होता याचा मला परत आनंद झाला. ] हल्ली काही काळा पासुन मला घनपाठात विशेष रुची निर्माण झालेली आहे ! ही पद्धत अतिशय कठीण / तसेच घनपाठी देखील संख्येने कमीच आहेत त्यामुळे असे ऐकावयास मिळणे म्हणजे दुर्लभ संधी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Sri Devi Sookta Maala (Disc -2) Ghanapatham

माहीशासुर मर्दिनी : गैया संस्कृत
डोळे बंद करून ऐका. It is having calming effect. बाणाने पाठवलेलं सुद्धा मधुर वाटतं ऐकायला. Harsh नाही फारसं आणि अतिशय सुस्पष्ट. मी youtube to me करून साठवून ठेवणार दोन्ही.

मदनबाण 11/10/2021 - 23:11
बराच काळ लोटला पण करवीर नगरीस जाणे झाले नाहीये... नवरात्र म्हंटले की मला दोन गाणी नेहमी आठवतात, कारण ती माझ्या मनात अढळ स्थान ठेवुन आहेत. मिपावर आधीही दिली होती आणि आजही तीच गाणी देवुन जातो... [ या पैकी बहुतेक दोन्ही चित्रपट मी पाहिल्याचे स्मरते...] आवाज अर्थातच आशा ताईंचा... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mahalakshmi Ashtakam I Uthara Unnikrishnan

मंत्रपुष्पांजली जेव्हा मन उदास असेल तेव्हा मनाला उभारी येण्यासाठी काही गोष्टी राखुन ठेवल्या आहेत. कधी तरी रविवारी ईस्कॉन मंदिरात जाणे, योगासने शिबीरात गेल्यानंतर शेवटी मंत्रोच्चार असतोच. मी काही आवडीचे दुवे तुम्हाला देत आहे. ----- माहीशासुर मर्दिनी : गैया संस्कृत https://www.youtube.com/watch?v=ryMzovUshtQ बौद्य हथा सुत्रा : गैया संस्कृत https://www.youtube.com/watch?v=FZ0w4B80uZA मधुरम : गैया संस्कृत https://www.youtube.com/watch?v=S42bzsc5R0g भरपुर गाणी आहे. पुर्ण संग्रह येथे पहा.

हॅमिल्टन-संगीत नाटक (म्युजिकल)

कॉमी ·

सिरुसेरि 25/08/2021 - 23:42
छान ओळख . पुर्वी ब्रॉडवे मधील थिएटर्समधे अनेक वर्षे सलग चालत असलेल्या लायनकिंग , द विकेड या म्युजिकल ऑपेरा / संगीत नाटकांबद्दल ऐकले आहे .

साहना 26/08/2021 - 00:38
हॅमिल्टन ह्यांनी एकूण ५१ फेडरॅलिस्ट पेपर्स लिहिले (एकूण ८५ आहेत). फेडरॅलिस्ट पेपर्स म्हणजे अमेरिकन रिपब्लिक आणि त्यांची घटना ह्यावरील चर्चा जाहीर पणे वर्तमानपत्रातून मांडली गेली. हॅमिल्टन हे त्यातल्या त्यांत डाव्या विचारसरणीचे होते म्हणजे सरकारने खूप काही करावे असे त्यांचे विचार होते तर जेफरसन हे अगदी विरुद्ध म्हणजे सरकार शक्य तितके छोटे असावे अश्या विचारसरणीचे होते. दोघांच्या ह्या भूमिकेवरून शेवटी आजचे दावे आणि उजवे पक्ष निर्माण झाले असे आम्ही म्हणू शकतो. सुदैवाने १९३० पर्यंत अमेरिकन सरकार अत्यंत छोटे होते आणि ह्याच काळांत ह्या देशाने न भूतो ना भविष्यती अशी प्रगती केली.

गॉडजिला 27/08/2021 - 03:54
नाटक अफलातूनच आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संगीतनाट्य ते ही ऐतिहासिक पार्श्वभूमीचे असून देखील rap व hip-hop वापरून ते उभे केले असल्याने आजही ते पाहताना तितकेच रोचक वाटते. रेवोल्युशन पूर्वीचा हॅमिल्टन, स्त्रियांना समान अधिकार यातून मिळू शकतात याची जाणीव असल्याने त्यांचा क्रांतीकडे कल व विचार आणि संकल्पना यांची मुक्त देवाण घेवाण आशा अनेक बाबी बघणे फार सुरेख वाटते यात डावे उजवे असे काहिच ठरवूनही ठरवता येत नाही. (भलेही मुक्त विचार स्वातंत्र्य सर्वात जास्त डावी बाजू प्रखरतेने व कधीकधी दुरुपयोग वाटावा अशी वापरते) हॅमिल्टन बाबत मला प्रथमच आणि ते ही या संगितिकेमुळे समजलें व त्याच्याबाबत माझे ब्रेन वॉशिंग अजून कोणा डाटासायंटिस्ट फौजेकडून झालेले नाही त्यामुळे डाव्यांचा पृथ्वीवर उदय होण्यापूर्वीच्या अथवा अगदी फ्रेंचराज्यक्रांति पूर्वीच्या काळात सुरू झालेल्या घटनावर आधारीत ही संगितिका मी मनमुराद एन्जॉय केली. यात जॉर्ज वॉशिंगटन एक प्रकारे स्वेच्छा निवृत्ती घेतो कारण त्याला तो नसताना देश चालु रहावा व अमेरिकेचे अध्यक्षपद ही लाईफ टाईम बाब आहे असा पायंडा पडू नये असे वाटते व त्यासाठी स्वताच्या मृत्यूची अथवा एखाद्या कारस्थानाची तो सत्ताधीश असूनही वाट बघत नाही ही बाब मला सर्वात रोचक वाटत राहिली.

फारएन्ड 31/08/2021 - 07:12
मस्त माहिती! आपल्याकडे असे काही करायला गेले तर शंभरएक महापुरूषांचे अपमान होउन, विविध लेव्हलला निषेध ते सभागृहाची तोडफोड वगैरे होईल :)

कॉमी 04/03/2022 - 23:11
हॅमिल्टन कर्त्या लिन मॅन्युअल मिरांडाचा नवा चित्रपट गेल्या वर्षी येऊन गेला- टिक... टिक... बूम! गंमत म्हणजे हा सिनेमा एका संगीत नाटककर्त्यावरच बेतला आहे, आणि सिनेमा असूनही संगीत नाटकासारखाच आहे. जोनाथन लार्सन या व्यक्तीवर हा सिनेमा आहे. जोनाथनने टिक टिक बूम, सुपर्बिया आणि सर्वात प्रसिद्ध- रेंट या संगीतिका बसवल्या. (त्यापैकी रेंट वर एकापेक्षा जास्त वेळा चित्रपट आला आहे.) ह्या सिनेमात वयाची तिशी आल्याने आलेला दबाव, मैत्रिणी सोबतचे नाते, सुपर्बिया ह्या त्याच्या पहिल्या संगीतिकेला निर्माता मिळवण्यासाठी त्याला काय काय करावे लागते- अश्या गोष्टींतून जोनाथनच्या आयुष्यातला काही काळ रंगवला आहे. भरपूर गाणी अर्थातच आहेत. अगदी वेगळा अनुभव आहे हा सिनेमा. जोनाथनची भूमिका अँड्र्यू गारफील्डने केली आहे- अतिशय उत्तम अभिनेता. अँड्र्यूने गाणी स्वतः गायली आहेत. जोनाथनचे खरेखुरे व्हिडीओ पाहिल्यावर अँड्र्यूने किती छान अभिनय केलाय हे समजते. गाण्यांची झलक- बोहो डेज- थेरपी- हे गाणे प्रेमसंबंधातल्या अडचणींवर आहे. (यातले खूप हसायला लावणारे एक वाक्य- I was afraid that you'd be afraid if I told you that I was afraid of Intimacy ! If you don't have a problem with my problem maybe the problem's simply codependency !) नेटफ्लिक्स वर आहे.

काही दिवसांपूर्वी लिन मॅन्युएल मिरांडा ह्या भन्नाट व्यक्तीने लिहीलेले, संगीत दिलेले, अभिनय केलेले आणि रॅप केलेले 'म्युजिकल', म्हणजेच संगीत नाटक पाहिले. खूप आवडले. त्याबद्दल काही. अ‍ॅलेक्झॅन्डर हॅमिल्टन म्हणजे अमेरिकेच्या फाऊंडिंग फादर्स पैकी एक.

अशा सांजवेळी...

श्रीगणेशा ·

गुल्लू दादा 22/07/2021 - 17:20
आजकाल जुबिन चे गाणे आवडायला लागलेत. त्यापैकी सध्या हे ऐकतोय 1. https://youtu.be/Z7XiKx_rj2I ओशो आणि माझा अजून तरी संबंध आला नाहीये. पण त्यासंबंधी हे गाणे ऐकायला आवडते. 2. https://youtu.be/vTnJU7UYSIg ऐश्वर्या मुजुमदार चे हे मॅशअप 3. https://youtu.be/MeUnR29j7Wg भेटले तसे ऍडवत जाईन. धन्यवाद.

एक नवीन मराठी गाणं ऐकण्यात आलं... "अशा सांजवेळी" सुंदर शब्दरचना, सुमधुर संगीत आणि तितकाच सुरेल आवाज. सर्व अगदी जुळून आलं आहे. (संगीतकारांच्याच शब्दात) बासरी आणि मोहनवीणा या वाद्यांच्या मधुर आवाजाने गाण्याची सुंदरता अजूनच बहरली आहे. गाण्याची YouTube लिंक: https://www.youtube.com/watch?v=Stcrt7_mPKY मिपाकरांनो.. एखादं भावलेलं नवीन गाणं ऐकलं असेल तर इथे नक्की सांगा.

"वैरी भेदला" या विनोदी वगनाट्याचे ई पुस्तकाचे आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशन

पाषाणभेद ·

चौथा कोनाडा 20/06/2021 - 13:07
हार्दिक अभिनंदन & शुभेच्छा, पाभे !

🌼

(ता.क.: सदर पुस्तक आपल्या मिसळपाव.कॉम तसेच येथील संचालक, सभासद यांना अर्पण केले आहे. मिपावरच याचे प्रथम लेखन आणि प्रकाशन झालेले होते याचा मला अत्यंत अभिमान आहे. )
अतिशय उचित अर्पणपत्रिका ! पाभे म्हणजे मिपाचा सेलिब्रेटी लेखक ! पुस्तक डाऊनलोडलेले आहे. मुखपृष्ठ आणि पाभे प्रस्तावना आवडली हे इथे नोंदवून ठेवतो. मित्रमंडळींना पाठवत आहेच हेवेसांनल ! यथावकाश वैरी वाचून अभिप्राय देईनच !

पाषाणभेद 20/06/2021 - 14:40
@ चौथा कोनाडा, सेलिब्रेटी संबोधून आपण मला लाजवलेले आहे. अहो, मी सामान्य आहे हो. दुसरे असे की या नाट्याचे लेखन २०११ सालीच मिपावर टप्या टप्याने केले गेले होते. २०१६ नंतर त्यात लावण्या वगैरे लिहील्या अन मग २०१७ ला पुस्तक रुपाने प्रकाशीत केले गेले. आता २०२१ मध्ये याची ईकॉपी, ईबुक हे ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित केले आहे. तशा अर्थाने हे ई बुक म्हणजे वगनाट्याची तिसरी आवृत्त्ती आहे. आपण वर उल्लेखलेली अर्पणपत्रीका तशा अर्थाने पुस्तकातील अर्पण पत्रिका नाही. पुस्तकात आहेच वाद नाही पण त्याचा येथे केवळ उल्लेख केला आहे. तेथे मिपावरील अनेक दिग्गजांचा उल्लेख करून त्यांच्या ऋणात राहण्याचा प्रयत्न केला आहे. आपले तसेच नावातकायआहे, गॉडजिला, मदनबाण तसेच हा धागावाचक, पुस्तकवाचक यांचे आभार. https://www.misalpav.com/node/17161 https://www.misalpav.com/node/39223 http://www.misalpav.com/node/48940

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/vairi_bhedala_sachin_borase.pdf येथील मुख्य पानावर "वैरी भेदला" हे विनोदी वगनाट्य असलेले माझे ई पुस्तक आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशीत झालेले आहे. सदर पुस्तक हार्डकॉपी स्वरूपात 2017 सालीच अमिगो पब्लिशरतर्फे प्रकाशीत झालेले होते.

शोध आणि धागेदोरे: Research and References

लेखनवाला ·

मनो 06/04/2021 - 01:03
एखादा गोडगोड प्रतिसाद देऊन पुढे जाणार होतो, पण तुम्ही प्रामाणिक अभिप्राय मागितल्याने आता विचार करून लिहिणे आले. खरं सांगायचं तर कथा आवडली नाही. शेवटपर्यंत न वाचता मध्येच सोडून द्यावी असे अनेकदा वाटले. काही कारणे सांगतो. तुम्ही "......" चा मुक्तहस्ते वापर केलेला आहे, तो काही पटला नाही. त्याच्या अति-वापराने तुटक छोटी वाक्ये बनली आहेत, उदाहरणच द्यायचे झाले तर या एकाच परिच्छेदात तुम्ही नायकाला टीव्ही, इस्पितळ, घर अश्या तीन ठिकाणी फिरवलं आहे. हे तीन वेगळे प्रसंग आहेत. """ 'तो' टीव्हीवर झळकला, "तर आपण आता थेट जोडले गेले आहोत...... सदानंद सोहकर... यांच्याशी..... काय भावना होत्या तुमच्या जेव्हा तुम्ही धाडस दाखवत, स्वत:चा जीव धोक्यात टाकत, त्या लहान मुलाला वाचवलतं...... तुम्ही पाहत आहात एस्क्युलिझिव मुलाखत.........". कानाला एयरफोन लावत मोबाईलच्या मदतीने सुरु असलेला इंटरव्यू एकदाचा संपला, त्या मुलाला वाचवण्याच्या धडपडीत सदानंदच्या हाताला मुका मार बसला होता, त्यामुळे त्याला सरकारी इस्पितळात दाखल केलं होतं आणि तीन-चार तासाच्या सरकारी सोपस्कारानंतर आता तो घरी आला होता, त्याच्या डाव्या हाताला प्लास्टर लावण्यात आलं होतं """ दुसरे उदाहरण - """ फक्त गाठोडं डोक्याशी ऊशी म्हणून घेत साताजन्माची झोप लागल्यासारखं निद्रिस्त झालेलं एक भिकारी जोडपं तेवढं तिथं होतं, ट्रेन येणार असल्याची उद्घोषणा फक्त त्या तिथल्या शांत माहौलाला भेदून काढत होती. त्या जोरदार डोळा लागलेल्या जोडप्यावर या आवाजाचा काही एक परिणाम जाणवत नव्हता, माहित नाही पण त्यांना या आवाजासोबत झोपण्याची सवय असावी कदाचित, ते दोघंही चिरकाल निद्रा अवस्थेतेत असल्यासारखे दिसत होते, एकूण रेल्वेकडचा गोंगाट त्यांच्यासाठी रोजचाच असणार बहुतेक…. पण आजतर रोजच्यासारखी वर्दळ नव्हती, रंगपंचमीची सुटटी असल्याकारणाने असेल, कदाचित म्हणूनच त्याचमुळे त्यांना अशी काळोखी बेफाम झोप भर सकाळी लागली होती का कोण जाणे! """ इतके तपशील खरोखर आवश्यकच आहेत का? कथेचा गाभा काय, याच्याशी ते जोडले गेले आहेत का? जर ही सगळी वाक्ये काढून टाकली तर कथेत फरक पडतो का? एखादा मुरब्बी कथाकार ३-४ शब्दात त्याच्या आईवडिलांचे लक्ष नव्हते (किंवा त्याचे आई-वडीलच त्या जागी नव्हते) ते सांगून जातो. अजून एक खटकलेली गोष्ट म्हणजे कथेतील प्रसंगाची गुंफण. सरळधोपट मार्गाने घडले तसे प्रसंग न सांगता जर अशी सुरुवात केली असती की नायक आपल्या हाताचे प्लास्टर पुन्हा-पुन्हा तपासून पाहत होता, कारण त्याचा विश्वासच बसत नव्हता. तो निघाला होता ते एका प्रकाशन संस्थेतील कार्यक्रमाला. अशी काही जर सुरुवात केली तर वाचकाला उत्कंठा निर्माण होते की नायकाच्या बाबतीत असे का झाले? त्यामुळे पुढचे वाचावे अशी इच्छा निर्माण होते. असो, एकंदर नाउमेद न होता तुम्ही पुन्हा लिहीत राहाल अशी आशा आहे. इतर मंडळी चांगले काय आहे ते सांगतीलच, पण न आवडलेले काय ते सांगावे म्हणून थोडे लिहितो आहे, गोड मानून घ्यावे ही विनंती.

लेखनवाला 06/04/2021 - 12:56
समजा तो प्रसंग पुढे जाऊन खूप महत्वाचा असेल तर त्याचं आतापासूनच काही तपशीलवार मुद्दे वाचकांसमोर मांडलेत तर जेणे करून पुढे कथानकात घडणाऱ्या प्रसंगाशी ते जोडून घेऊ शकतील अशी मला शक्यता वाटत असल्यामुळे मी तसं लिहलय. आणि ".... " हे असं लिहण्याला काही लिमिट असतं का? हे मी माहिती साठी विचारतोय. मला वाटत असं ".... " लिहण्याने एक फ्लो कायम राहतो, मग यांवर दुसरा कोणता उपाय आहे का ज्याने फ्लो कायम आहे हे दाखवता येईल. "तो निघाला होता ते एका प्रकाशन संस्थेतील कार्यक्रमाला" मूळात तो तिकडे जाताच नव्हता, त्यासाठी तुम्हाला कथा पूर्ण वाचायला लागेल.

In reply to by लेखनवाला

मनो 07/04/2021 - 04:01
तुम्ही ... बद्दल केलेली गोष्ट माझ्या हातूनही झालेली आहे, त्यामुळं माझा अनुभव सांगतो आहे. लेखकाचा लिहिण्याचा फ्लो त्यामुळे कायम राहतो, पण वाचकाला ... ने जोडलेली वाक्यं तुटक आणि असंबद्ध वाटतात. त्यामुळे जे प्रसंग हळुवारपणे खुलवायचे असतात ते पटापट ३-४ वाक्यात उरकले जातात. अश्या वेळी प्रसंग आवश्यकच असेल तर त्याला जास्त जागा देऊन खुलवावा, किंवा काढून टाकून ते तपशीलच नाहीसे करावेत.

********** माझी नवी कथा "शोध आणि धागेदोरे (Research and Refrence)" आता अमेझॉन किंडल (Amazon Kindle) वर ईबुक स्वरूपात उपलब्ध. किंडल अनलिमिटेड सेवेत मोफत (Free with Kindle Unlimited membership). https://www.amazon.in/dp/B091FD93LS त्यांची सुरवातीची काही पान मिपाकरांच्या सल्ल्यानुसार इथे वाचायला देत आहे.