मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संगीत

आमार कोलकाता – भाग ६ – बंगाली कलासंस्कृतीचा अध्वर्यु

अनिंद्य ·
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533 आमार कोलकाता - भाग ६ – बंगाली कलासंस्कृतीचा अध्वर्यु प्रत्येक भारतीय ‘जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत गातो तेव्हा तो रवींद्रनाथ टागोरांचे गीत गात असतो. भारताचेच नाही तर बांगलादेशचे राष्ट्रगीतही टागोरांनी लिहिले आहे.

आमार कोलकाता - भाग ५

अनिंद्य ·
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 आमार कोलकाता - भाग ५ कोलकाता शहराची खास अशी जी लक्षणे आहेत त्यात शहरवासियांचे नाट्यवेड हे प्रमुख आहे आणि ते बरेच जुनेही आहे. नेमका कालावधी सांगायचा तर सव्वादोनशे वर्षे जुने !! आज प्रचलित असलेल्या स्वरूपातल्या (फॉरमॅट) ‘बंगाली’ नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची कहाणी अद्भुत म्हणावी अशी.

आमार कोलकाता - भाग ४

अनिंद्य ·
८५ अँमहर्स्ट स्ट्रीट, कोलकाता  चित्रसौजन्य - राजा राममोहन रॉय मेमोरियल, कोलकाता. जुन्या कोलकात्यातील एक महालसदृश्य इमारत. जॉर्जियन वास्तुशास्त्राचा सुंदर नमुना असलेल्या शहरातील थोडक्याच इमारतींपैकी एक. फ्रान्सिस मेंडीस नामक श्रीमंत कलाप्रिय माणूस इमारतीचा मूळ मालक. १८१४ साली रंगपूरहून (सध्या बांग्लादेशात असलेले शहर) आलेल्या एका भारतीय व्यक्तीने १३००० रुपयांचा घसघशीत मोबदला देऊन फ्रान्सिसकडून हे घर विकत घेतले आणि तिथे कायमचे राहायला येण्याचे ठरवले.

आमार कोलकाता - भाग ३

अनिंद्य ·
लेखमालेचे यापूर्वीचे दोन भाग इथे वाचता येतील : आमार कोलकाता - भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 आमार कोलकाता - भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 आमार कोलकाता - भाग ३  हुगळी नदीचे पात्र, दक्षिणेश्वर, कोलकाता. १७५७ च्या प्लासीच्या लढाईपासून ते १८५७ च्या ‘गदर’पर्यंतच्या वर्षशंभरीने भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे शासन सर्वशक्तिमान होताना बघितले.

radio ga ga

क्षितिज जयकर ·
RADIO GA GA……………… ह्या लेखाचं शीर्षक जरी इंग्लिश मधून असलं तरी ते मराठीत सुद्धा तितकंच सार्थ आहे. रेडिओ गा!!!!! गा!!!!. १९८४ साली QUEEN ह्या ब्रिटिश वाद्यवृंदाने हे गाणं रचनाबद्ध केलं , ते आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा आपल्याला रेडिओ वर हमखास ऐकायला मिळतं. मला हा लेख लिहिण्यासाठी जी स्फूर्ती मिळाली ती ह्याच गीतावरून. त्यामुळे सर्वप्रथम ह्या गाण्याबद्दल थोडीशी माहिती देतो. मगाशी लिहिल्याप्रमाणे QUEEN ह्या वाद्यवृंदाचा DRUMMER (त्याला ढोल वादक म्हणणं माझ्या जीवावर येतं) रॉजर टेलर याने ते १९८३ साली प्रथम ते रचनाबद्ध केलं , आणि मग १९८४ साली ते स्वरबद्ध करून सर्वत्र प्रसिद्ध करण्यात आलं.

आमार कोलकाता - भाग २

अनिंद्य ·
लेखमालेचा पहिला भाग येथे वाचता येईल :- http://www.misalpav.com/node/45320 आमार कोलकाता - भाग २ झाशीची राणी, तात्या टोपे, बहादुरशहा जफर, मंगल पांडे..... ही मंडळी म्हणजे १८५७ सालच्या उठावाचे नायक! इंग्रजांची सत्ता उलथून टाकण्याचा एत्तद्देशीयांनी एकत्र येऊन केलेला हा जोरकस-जबर प्रयत्न १८५७ साली झाला हे आपल्यापैकी बहुतेकांनी शालेय इतिहासाच्या पुस्तकात वाचले आहे. पण त्याआधी बरोबर १०० वर्षे म्हणजे १७५७ साली एक फार महत्वाची लढाई बंगालच्या भूमीवर घडली, ती म्हणजे प्लासीची पहिली लढाई.

प्रभातरंग (आमची रविवार सकाळ)

अमर विश्वास ·
प्रभातरंग (आमची रविवार सकाळ) काल सकाळी प्रभातरंग कार्यक्रम पहिला / ऐकला. (प्रभातरंग सकाळीच असतो याची नोंद घ्यावी) कार्यक्रमाची वेळ होती सकाळी साडेसहाची.. रविवार पहाट ... आत्तापर्यंत च्या अनुभवावरून बरोब्बर ७. १० ला पोचलो.. पोचल्याबरोरबर कुठे जागा रिकामी आहे यावर एक सराईत नजर फिरवत असतानाच कानावर शब्द पडले कार्यक्रमाची सुरवात करतो .... वेळेवर आल्याबद्दल स्वतःचीच पाठ थोपटली (इथे पुन्हा तीच स्वतःची पाठ थोपटणारी बाहुली (स्मायली)अपेक्षित आहे .. पण सापडत नाहीये) साबीरभाई स्वतः च बोलत होते .. उस्ताद साबीर ख़ान साहेबांची सारंगी .. साथीला प्रशांत पांडव. पटकन एक खुर्ची पकडली.

आमार कोलकाता - भाग १

अनिंद्य ·
प्रास्ताविक आणि मनोगत :- 'शेजाऱ्याचा डामाडुमा' ह्या मी लिहिलेल्या सुदीर्घ लेखमालिकेला मिपाकरांनी उत्साहवर्धक प्रतिसाद दिला. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये लिहिलेल्या 'बोनेदी बारीर पूजो' ह्या लेखात मी कोलकात्यातील जुन्या जमीनदार कुटुंबातील दुर्गापूजेबद्दल लिहिले, त्यालाही भरभरून कौतुक मिळाले.

'तंबोरा' एक जीवलग

गौरीबाई गोवेकर नवीन ·
गाणाऱ्या व्यक्तीचा सर्वात जवळचा सखा. एक भारदस्त आणि गाण्याचं अविभाज्य अंग असलेला मैफिलीचा घटक. हिंदुस्थानी शास्त्रीय कंठसंगीताच्या अर्थातच सुरांच्या सृजनाचा अवयव. स्वरांची बीजं ज्याच्यातून उत्सर्जित होऊन गाणाऱ्याच्या मनात प्रस्थापीत होतात तिथं गाणाऱ्याची प्रतिभा आणि हे स्वरबीज यांचं मिलन होतं. कंठावाटे प्रसवतात ते निरागस सुर. तो निर्मीतीक्षम अवयव अर्थातच तंबोरा! तंबोरा एक जीवलग सुरात लावलेल्या जव्हारीदार तंबोऱ्य़ांचा झनकार गुंजत असावा.

स्वरराधा

प्राची अश्विनी ·
भैरव वा भटियार पहाट फुलवत येती, स्पर्श जणू कान्ह्याचे राधेला उठवुन जाती. ठाऊक तिला सारंग माध्यान्ही झुलवत येतो, "गंध" न त्यास स्वत:चा तरि वृंदावनी घमघमतो. यमन असा कान्ह्याचा यमुनेचे श्यामल पाणी. निनाद गोघंटांचा सांज करी कल्याणी. मालकंस वा जोग, अमृत बरसे गात्री. कान्ह्याच्या ओठी वेणू तिच्याचसाठी रात्री. कणकणात भिनली आहे मल्हाराची आस, मेघ पेटवून जातो मयूरपंखी प्यास. पण सूर भैरवीचा का राधेला माहीत नाही? युगे उलटली, अजुनी राधा तर वाटच पाही..