मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संगीत

पाळणा झुलू दे

पाषाणभेद ·
काव्यरस
असा झुलू दे झुलू दे पाळणा झुलू दे या पाळण्यात माझ्या बाळाला खेळू दे माझ्या या अंगणी आला ग श्रीरंग काय सांगू बाई माझ्या बाळाचे रंग किती द्वाड तो धावतो घरात आवरता आवरेना दिस जाई त्याचे संग काय काय मागतो खायला प्यायला लोणी श्रीखंड बासूंदी करंजी घेते मी कराया रव्या बेसनाचे लाडू मोतीचूर भरपूर केली खीर, कोशिंबीरी सोबतीला शेवया माझ्या या बाळाला आयुष्य उदंड लाभू दे असा झुलू दे झुलू दे पाळणा झुलू दे असा झुलू दे झुलू दे पाळणा झुलू दे या पाळण्यात माझ्या बाळाला खेळू दे - पाषाणभेद २९/१२/२०२१

कोळीगीतः समींदरा, जपून आण माझ्या घरधन्याला

पाषाणभेद ·
काव्यरस
समींदरा रे समींदरा, तू जपून आण माझ्या घरधन्याला लई दिवसांन परतून येईल घराला ||धृ|| नको उधाण आणू तुज्या पाण्याला नको मस्ती करू देऊ वार्‍याला काय नको होवू देऊ त्याचे होडीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||२|| नारळ पौर्णिमेचा सण आता सरला तुला सोन्याचा नारल वाढवला नेल्या होड्या त्यानं मासेमारीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||३|| मी कोलीण घरला एकली सारं आवरून बाजारा निघाली म्हावरं विकून येवूदे बरकतीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||४|| एकवीरा आई माझी डोंगरावरी खणा नारळांन ओटी मी भरीन नवस केलाय मी खंडोबाला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||५|| पंधरा दिवस जायी तो समींदरात ते दिवस जातात माझे झुरण्यात

लिसा लिसा - प्रेमाचा निरागस गुंता

सिरुसेरि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लिसा लिसा - प्रेमाचा निरागस गुंता प्रियदर्शनचे दिग्दर्शन असलेल्या अनेक चित्रपटांतील कथा हि एखाद्या शांत , निवांत , निसर्ग रमणीय गावामधे घडते . उदाहरणार्थ हिंदीतील मुस्कुराहट , खट्टा मिठा . लिसा लिसा या २००३ मधे प्रदर्शीत झालेल्या तामीळ चित्रपटामधीलही वातावरण असेच रम्य , शहरी धकाधकीपासुन दुर आहे . कथा नायक राकेश ( शाम ) हा तरुण येथे आपले वाडवडीलोपार्जीत घर , शेती एकट्याने सांभाळतो आहे . पुढे मागे पैसे कमावण्यासाठी परदेशात जाण्यासाठीही त्याचे प्रयत्न चालु आहेत . चंद्रु हा त्याचा मित्र ( विवेक ) अनेक उद्योगांत आपले पैसे गमावुन बसला आहे .

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे

पाषाणभेद ·
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१ ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक,  ३ डिसेंबर २०२१, म

तिसरी घंटा

जे.पी.मॉर्गन ·
आपण रोजचं वर्तमानपत्र वाचायला शेवटच्या पानापासून सुरुवात करणारी लोकं. आजकाल पहिल्या पानावर असतात त्या माणसाला मनुष्य "प्राणी" का म्हणतात याचा प्रत्यय देणार्‍या बातम्या. पण शेवटच्या पानावर असतात त्या माणसाच्या विजिगीषु वृत्तीच्या, अपार कष्टांच्या, लढवय्या बाण्याच्या गोष्टी. आणि त्यानंतरचं - शेवटून दुसरं किंवा तिसरं पान म्हणजे समाजाच्या सृजनाचं, कलात्मकतेचं, संवेदनशीलतेचं दर्पण - नाट्य, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जाहिरातींचं पान. कितीतरी महिन्यांनी - जवळपास पावणेदोन वर्षांनंतर ते पान पुन्हा रंगीबेरंगी जाहिरातींनी भरायला लागलं आहे.

मंत्रपुष्पांजली

Trump ·
लेखनविषय:
मंत्रपुष्पांजली जेव्हा मन उदास असेल तेव्हा मनाला उभारी येण्यासाठी काही गोष्टी राखुन ठेवल्या आहेत. कधी तरी रविवारी ईस्कॉन मंदिरात जाणे, योगासने शिबीरात गेल्यानंतर शेवटी मंत्रोच्चार असतोच. मी काही आवडीचे दुवे तुम्हाला देत आहे. ----- माहीशासुर मर्दिनी : गैया संस्कृत https://www.youtube.com/watch?v=ryMzovUshtQ बौद्य हथा सुत्रा : गैया संस्कृत https://www.youtube.com/watch?v=FZ0w4B80uZA मधुरम : गैया संस्कृत https://www.youtube.com/watch?v=S42bzsc5R0g भरपुर गाणी आहे. पुर्ण संग्रह येथे पहा.

हॅमिल्टन-संगीत नाटक (म्युजिकल)

कॉमी ·
लेखनप्रकार
काही दिवसांपूर्वी लिन मॅन्युएल मिरांडा ह्या भन्नाट व्यक्तीने लिहीलेले, संगीत दिलेले, अभिनय केलेले आणि रॅप केलेले 'म्युजिकल', म्हणजेच संगीत नाटक पाहिले. खूप आवडले. त्याबद्दल काही. अ‍ॅलेक्झॅन्डर हॅमिल्टन म्हणजे अमेरिकेच्या फाऊंडिंग फादर्स पैकी एक.

अशा सांजवेळी...

श्रीगणेशा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
एक नवीन मराठी गाणं ऐकण्यात आलं... "अशा सांजवेळी" सुंदर शब्दरचना, सुमधुर संगीत आणि तितकाच सुरेल आवाज. सर्व अगदी जुळून आलं आहे. (संगीतकारांच्याच शब्दात) बासरी आणि मोहनवीणा या वाद्यांच्या मधुर आवाजाने गाण्याची सुंदरता अजूनच बहरली आहे. गाण्याची YouTube लिंक: https://www.youtube.com/watch?v=Stcrt7_mPKY मिपाकरांनो.. एखादं भावलेलं नवीन गाणं ऐकलं असेल तर इथे नक्की सांगा.

"वैरी भेदला" या विनोदी वगनाट्याचे ई पुस्तकाचे आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशन

पाषाणभेद ·
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/vairi_bhedala_sachin_borase.pdf येथील मुख्य पानावर "वैरी भेदला" हे विनोदी वगनाट्य असलेले माझे ई पुस्तक आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशीत झालेले आहे. सदर पुस्तक हार्डकॉपी स्वरूपात 2017 सालीच अमिगो पब्लिशरतर्फे प्रकाशीत झालेले होते.

शोध आणि धागेदोरे: Research and References

लेखनवाला ·
********** माझी नवी कथा "शोध आणि धागेदोरे (Research and Refrence)" आता अमेझॉन किंडल (Amazon Kindle) वर ईबुक स्वरूपात उपलब्ध. किंडल अनलिमिटेड सेवेत मोफत (Free with Kindle Unlimited membership). https://www.amazon.in/dp/B091FD93LS त्यांची सुरवातीची काही पान मिपाकरांच्या सल्ल्यानुसार इथे वाचायला देत आहे.