काल मी श्री. समर्थां बरोबर तळ्यावर
फेरफटका मारत असताना एक प्रश्न
केला. आणि तो त्यांनाच करण्याचा
माझा उद्देश हा होता की,ते पेटी आणि व्हायोलिन वाजवतात.
त्यांच्या संगीताच्या कार्यक्रमाला मी
पूर्वी गेलो आहे.
मी त्यांना म्हणालो,
“संगीत म्हणजे काय? संगीत नसेल तर लोक कसे जीवन जगतील?
हे विचार माझ्या डोक्यात येतात
आणि हे संगीतात रस नसलेल्या लोकांना कसं लागू होतं?
ते मला म्हणाले,
“संगीताशिवाय
"जीवनातील दिवसाची"
कल्पना करूया.
संगीताशिवाय जीवन भावनाहीन, रंगहीन आणि अनावश्यकपणे रेखाटलेलं होईल .
संगीताची व्याख्या अशी करता येईल, “वेळेत आवाजाची मांडणी करण्याची कला”
म्हणजे संगीत.