Skip to main content

संगीत

एक वाद्य, तीन पिढ्या आणि दोन संगीतसंस्कृतीचे सीमोल्लंघन

लेखक सुधीर कांदळकर यांनी रविवार, 16/11/2025 या दिवशी प्रकाशित केले.
नोव्हेंबर आला कीं थंडीची चाहूल लागते आणि चित्तवृत्तीला बहर येतो. पर्यटन, परिषदा, प्रदर्शने, महोत्सव, संगीत समारोह वगैरेंच्या आठवणी मनांत रुंजी घालूं लागतात. वयानुसार फारसे कुठे जाणेयेणे होत नाहीं. आधुनिक तंत्रज्ञानाने संगणक, महाजाल, यू-ट्यूब वगैरे साधनांचा सुंदर नजराणा दिला आणि आकाश ठेंगणे झाले. जाणेयेणे नगण्य झाले तरी महाजालावरची मुशाफरी मात्र अगदी आरामखुर्चीत बसून पण करतां येते. लांबलचक घनघोर पावसाळ्यात चुकला फकीर मशिदीत तसा चुकला सुधीर यू-ट्यूबवर सापडायला लागला. वाट फुटेल तिथें फिरतांना अचानक एखादे अप्रतिम निसर्गदृश्य दिसावे तसे कधीकधी अनमोल रत्नें कानीं पडतात.

घरबसल्या यू-ट्यूबवर संगीत दिवाळी पहाट २०२५

लेखक सुधीर कांदळकर यांनी शनिवार, 18/10/2025 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याच रसिकांना दिवाळी पहाट संगीत मैफिलीने साजरी करणे आवडते. जर कोणत्याही कारणाने अशा रसिकांना मैफिलीला जाणे शक्य झाले नसेल अशांसाठी काही दुवे खाली देतो आहे. शास्त्रीय संगीतासाठी एक दुवा तर सुगम संगीतासाठी काही दुवे देतो अहे. रसिकांना यातून काहीतरी नवे सुंदर असे अवसेल अशी आशा आहे. शास्त्रीय संगीत गायन जुगलबंदी : डॉ.

'किशोर‘स्वरातील ‘साहेबा‘चे गाणे

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 02/09/2025 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी चित्रपटांमधील काही गाणी अजरामर आहेत. ती कितीही जुनी झाली तरी ताजीतवानीच राहतात आणि रसिकांना कायमच भुरळ घालतात. किशोरकुमार हे चित्रसृष्टीमधील एक आघाडीचे गायक. अनेक प्रकारांमधली गाणी गाण्यात त्यांचा हातखंडा होता. अनेक गायकांबाबत रसिकांच्या विशिष्ट आवडीनिवडी असतात. तरी पण किशोरकुमारने गायलेली कुठली ना कुठली गीते प्रत्येक गानरसिकाला आवडतातच. असेच एक गाजलेले गाणे म्हणजे सगिना चित्रपटातील साला मैं तो साहब बन गया. . . या गाण्याने गतवर्षी आपली पन्नाशी पूर्ण केलेली असल्यामुळे त्याची ही आठवण आणि त्यानिमित्ताने संबंधित मूळ चित्रपटाचा हा अल्प परिचय.

रॉय ३ - ग्लेशियरचं गाव

लेखक किल्लेदार यांनी गुरुवार, 24/07/2025 या दिवशी प्रकाशित केले.
रॉय !!! रॉय २ - सेरो तोरे फार फार पूर्वीची गोष्ट…पातागोनियाच्या विशाल डोंगराळ मुलुखात, अँडीज पर्वतांच्या सावलीत, अनेक आदिम जमाती नांदायच्या. त्यातल्याच तव्हेलचे जमातीच्या सरदाराला एक मुलगी होती, कलाफाते. अत्यंत रूपवान असलेल्या कलाफातेचं दुसऱ्या जमातीतल्या एका तरुणावर मन जडलं. हे आंतर-जमातीय प्रेम पोरीच्या बापाला काही मान्य नव्हतं. आपली लेक त्या तरुणाचा हात धरून पळून जाऊ नये म्हणून त्यानं रागाच्या भरात जादूनं तिचं एका काटेरी झुडुपात रूपांतर केलं.

भारतीय संगीतातली साथसंगत आणि कांही अनोखे प्रयोग

लेखक सुधीर कांदळकर यांनी शनिवार, 14/06/2025 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय संगीत मैफ़िलीत प्रमुख कलाकाराबरोबर साथीचे कलाकार असतात हे आपल्याला ठाऊक आहे. जसे गायकाबरोबर तानपुरा, संवादिनी, व्हायोलीन, तबला इ.इ. सादरकर्त्या कलाकारांच्या एकमेकांना पूरक अशा केलेल्या साथसंगतीमुळे मैफ़िलीतील रसिकांना अनेक अपूर्व, अविस्मरणीय असे क्षण लाभतात. भारतीय संगीतातली साथसंगत हा या लेखातला पहिला मुद्दा. तानसेनाच्या काळातले भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत हे स्वरप्रधान संगीत होते. इथे शब्द बापुडवाणे होत. संगीताच्या या दरबारात देखणे, रुबाबदार शब्द देखील गरीब बिचारे होऊन सेवकाच्या भूमिकेत जाऊन नतमस्तक होऊन जवळजवळ मूक होतात. परंतु आज जास्तीत जास्त रसिक हे सुगम संगीत ऐकतात.

गर्दी, चेंगराचेंगरी: कारणे, आकडेवारी आणि शास्त्रीय उपाय

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 06/06/2025 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना चर्चा विजयोत्सवाला गालबोट - प्रा. डॉ. दिलीप बिरुटे आरसीबीचा हा विजय साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक सरकारने संघाच्या सत्काराचा कार्यक्रमदेखील आयोजित केला होता. पण या कार्यक्रमाला चेंगराचेंगरीचं गालबोट लागले. अकरा जणांना आपल्या जीवाला नाहक मुकावं लागलं दुर्दैवी घटना. आपल्याकडे गर्दी आणि गर्दीचं नियोजन ही मोठी समस्या आहे. नियोजन नसल्यामुळे लोक वाटेल तसे जमेल तिथे गर्दी करतात. लोक ऐकत नाही आणि नियोजन कोलमडतं.

पुष्पा २: द रूल् - संक्षिप्त ओळख वगैरे

लेखक वामन देशमुख यांनी शुक्रवार, 20/12/2024 या दिवशी प्रकाशित केले.
एकाच आठवड्यात हा सिनेमा मी दोनदा पाहीला. पहिल्यांदा कुटुंबीयांसमवेत हिंदीत एका थेटरात; चार दिवसांनी मित्रांसमवेत तेलुगूत दुसऱ्या एका थेटरात. पुष्पा १: द राइज् आवडलेला होताच. पुष्पा २: द रूल् अधिकच आवडला. इतर कोणत्याही लोकप्रिय तेलुगु सिनेमातल्यासारखाच या सिनेमातही प्रचंड मसाला आहे.

सहज सुचलं म्हणून

लेखक कंजूस यांनी शुक्रवार, 20/12/2024 या दिवशी प्रकाशित केले.
सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

उस्ताद झाकीर हुसेन. एक आठवण

लेखक नीलकंठ देशमुख यांनी गुरुवार, 19/12/2024 या दिवशी प्रकाशित केले.
उस्ताद झाकीर हुसेन.   अंदाजे चाळीस वर्षांपूर्वी  झाकीर हुसेन यांना सवाई गंधर्व संगीत महोत्सवात पहिल्यांदा पाहिले.अत्यंत आकर्षक  व्यक्तीमत्व असलेले झाकीर म्हणजे प्रचंड उत्साह ,आणि चैतन्य.ते मंचावर  एकटे येत नसत .त्यांचा श्वासच जणू असलेला 'जीवलग 'तबला' दोन्ही हातात असे. त्यांच्या साठी ती निर्जीव वस्तू नव्हती.ते होते त्यांचे आराध्य दैवत! झाकीर भाई येण्याची घोषणा होताच टाळ्यांचा कडकडाट सुरू होई तो थांबतच नसे.त्या स्वागताचा स्विकार करताना तेही श्रोत्यांना अभिवादन करत मंचावरच्या त्यांच्या अस्तित्वाने सगळे वातावरण भारून जात असे.

उस्ताद झाकिर हुसेन - भावपूर्ण श्रद्धांजली

लेखक मूकवाचक यांनी मंगळवार, 17/12/2024 या दिवशी प्रकाशित केले.
उस्ताद झाकिर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना त्यांच्याविषयी नेमके काय लिहावे याचा विचार करत होतो. युट्युबवरच्या काही चित्रफितींचा क्रमबद्ध वापर करत उस्तादजींच्या अष्टपैलू तबलावादनाचा आढावा घ्यावा असे वाटले. त्या दिशेने केलेला हा प्रयत्न. एकल तबला वादनः उस्ताद झाकिर हुसेन यांचे एकल तबलावादन ऐकताना वादनाची सुरूवात ज्या पेशकार या प्रकाराने होते, त्यात दिसणारी त्यांची कल्पकत बेजोड होती.