मला अत्यंत जीवाभावाचा असा मित्र नाही. म्हणजे मित्र आहेत बरेच, पण ते सगळे नेहमीच्या भाषेत दुसऱ्या वर्तुळातले. जय-वीरू टाईप किंवा दो हंसो का जोडा टाईप मित्र आजपर्यंत तरी मला नाही. निकोप नसलेली स्पर्धा, शालेय राजकारण, संशयी वातावरण आणि या सगळयातुन हरवलेली निखळता अशी अनेक कारणे त्याला आहेत, आणि त्याची जाणीवही मला आहे. पण, तरीही असा कोणीतरी मित्र नसल्याची खंत कुठे ना कुठे तरी मला आहे, आणि का असु नये? कधीतरी वाटत आपलाही एक मित्र असावा कवी कल्पनेतला ..पण ,कल्पना आणि वास्तव यात फरक असतोच
आता खरी गंमत आहे, माझ्या फेसबुक मित्रांची संख्या आत्ताच्या घडीला १२६७ आहे व यातल्या बऱ्याच जणाशी माझ्या खुप चांगल्या गप्पा होत असतात. अगदी चांगले शेअरिंग होत असते . या मित्रपरिवारात 78 वर्षांच्या गृहस्थापासून ते आता 9 वी ला असणारे माझे ज्युनिअरदेखाल आहेत. म्हणजे तसं बघायला गेलं तर माझा मित्रपरिवार खुपच समृध्द आहे.
हा,हा,हा… गोंधळलात का? हा विरोधाभास बघुन मी स्वत:च गोंधळतो. आणि लक्षात येतं की माझ्यासाठी ”मित्राची” डेफिनेशनच बदललेली आहे. फक्त एकाच वर्गातले, एकाच बाकावरचे किंवा लंगोटी यार जरी कोणी नसलं, म्हणजेच, हक्कानं शिव्या घालणरं, आमच्या भाषेत गांडदोस्त नसलं तरी ”समानशीले समान व्यसनेषु-” टाईप मित्र मात्र प्रचंड आहेत.
आणि, त्यामुळेच आमच्या मैत्रीला वयाचं, काळाच, जागेचं कसलंच बंधन नाही. हिमांशु आणि केदार.. माझ्याहुन 10 वर्षानं मोठे, पण, आम्ही एकेरीतच हाक मारतो.. आणि बर्याच गोष्टी एकत्र करतो. हक्काने काही सांगतो देखील कारण, एकच आवड, जमणारे विचार.. माझा एक पुण्याचा मित्र आहे. ज्याला मी गेल्या दीड वर्षात बघितलेलं देखील नाही. पण, तो कोणत्याही साईट बद्दलची मदत करायला तयार असतो.. इतकचं काय, तर आमचे पैशाचे व्यवहारही झाले. मात्र यात, त्याने मला व मी त्याला न बघितल्याचा आडसर कुठेच आला नाही. याहुन गंमतीची गोष्ट, कमलेश आणि श्रीरंजन यांचे लेख वाचून मी त्याचा मित्र झालो. आम्ही आता गाढ दोस्त आहोत. शिव्या, गप्पा, चर्चा, सगळं सुरू असतं. आणि आपसुकच, फिजिकल प्रेसेन्सच महत्त्व देखील निघुन गेलेयं. बिपिनदा.. याला मी बघितलेलं नाही. पण मी अस्वस्थ झालोय म्हटल्यावर दुबईहुन एक तास माझ्याशी बोलणारा असा माझा मित्र ..
पण, तरीही हा गुंता मनात राहतोच, आणि मग आजुबाजुला पाहिल्यावर लक्षात येतं की, आपण एकटेच असे नाही आहोत. माझ्या मित्रपरिवारातले अनेक जिवलग मित्र आजकाल मित्र उरलेले नाहीत. किंवा त्यांचचं नातं सैल झालंय. मी पुढं, मी पुढं, करताना निर्माण होणारी चढाओढ हे त्यातलं प्रमुख कारण. अपरिहार्यपणे येणारी कौटुंबिक पार्श्वभुमी, इगो, चांगल्याबरोबर वाईटही सांभाळून घणं/घ्याव लागणं. जे आजच्या फास्ट लाईफ मध्ये शक्य नाही. त्यामुळे, मैत्रीच नाते सैल होऊ लागलंय..
हा, पण त्याला पर्याय दिलाय या नव्या माध्यमांनी .. कधीकाळी याच माध्यमाचा लोक आयडेंटीटी झाकून मैत्री करायला वापर करायचे. ती खऱ्या मैत्रीपासूनची पळवाट होती. पण, त्यालाही कंटाळल्यवर लोक खऱ्या नावानं पुढे आले आणि नवे बंध तयार होऊ लागले. मुळात म्हणजे, या मैत्रीला कसलेही सामाजिक बंधन नाही. स्त्री-पुरूष, जात-पात, जेवण्या-खाण्याचा, आवडीनिवडी काही नाही.. समान सांस्कृतिक, वा इतर जाणिवेनं एकत्र आलेली लोकं..बहुतांश वेळा सुजाण, वैचारिक मैत्रीसाठी आणि, मैत्रीची वीण झाली की प्रत्यक्ष भेट ओघाने येतेच, पण मैत्रीसाठी ती नीड नाही.. व्हर्च्युअल जग असल्याने टेन्शन नाही. आणि कोणीच कोणाचे मिंदे नसल्याने भांडतानादेखील दडपण नाही. आणि एखाद्याचे आपले जमत नाही म्हटल्यावर लगेच बाजुला व्हायची सोय .. आणि बोलताना समोरच्याचा स्टेटस, पत, प्रतिष्ठा कशाचा संबंध नाही..
काहीसं विचीत्र वाटु शकतं हे सारं किंवा ज्यांनी ही माध्यमे वापरलेली नाहीत त्यांना बकवासदेखील.. पण, नवे बंध फुलतायत हे नक्की आणि आजच्या ईर्षेच्या जगात हे फुलणंच महत्वाचे आहे. ’मित्र’ संकल्पना अधिक ब्रॉड होतीय.. भावनिक वीण किंचीतशी कमी झालीय, पण, सर्व बंधन तुटुन हेल्दी नाती निर्माण होत आहेत.
हयाच बंधामुळे माझे पाय आपोआपच माझ्या ई- मैत्रीणीच्या सीडी प्रकाशन समारंभाकडे ओढले जातात. अभिनय गेल्याची बातमी थेट त्यांच्या ई-मित्राकडे जाते. आणि जेंव्हा अभिनय किंवा पराग जातात. तेंव्हा त्यांना कधीही न बघितलेले मराठी/फेसबुकीय मित्र देखील दु:खात बुडून जातात..
मला वाटतं, आमच्या पिढीचं, टेक्नॉलॉजीचं हेच खरं संचित आहे.. नवा मुक्त, कृतीशील समाज घडतोय. आणि, आम्ही त्यात सहभागी आहोत. असो, आता थांबतो, कारण ही सांगण्याची नव्हे तर अनुभवण्याची गोष्ट आहे. पण, आत्ताच एका ई-मैत्रीणीचा मेसेज आलाय. आय थिंग या मैत्रीचे वर्णन करायला तो पुरेसा आहे..
Some one asked me to describe you in two words, He was expecting from me to answer, “The best” But didn’t answer I just smiled & said “Maza Mitra.”
वाचने
8568
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
नवी व्याख्या
खंरंच .. कसं काय जमतं हो कोदा
व्वा ! अफलातुन निबंधलेखन
In reply to खंरंच .. कसं काय जमतं हो कोदा by टारझन
टारझन व कोदांची मैत्री बघुन
In reply to व्वा ! अफलातुन निबंधलेखन by विनायक पाचलग
चुचुआत्ते चे दोले भरलेले
In reply to टारझन व कोदांची मैत्री बघुन by पर्नल नेने मराठे
फ्रेन्द्शिप केली
In reply to चुचुआत्ते चे दोले भरलेले by सविता
टार्या आणि विन्याची मैत्री
In reply to फ्रेन्द्शिप केली by पर्नल नेने मराठे
राजे
In reply to खंरंच .. कसं काय जमतं हो कोदा by टारझन
छान लेखन....
जिवलग मित्र व चांगली बायको
In reply to छान लेखन.... by वेताळ
जिवलग मित्र व चांगली बायको
In reply to जिवलग मित्र व चांगली बायको by विजुभाऊ
आवडला
छान लेखन. अजून येऊ
लेख आवडला
In reply to छान लेखन. अजून येऊ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
<<< बाकी, आभासी जगातील
In reply to छान लेखन. अजून येऊ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडले
चांगला मुद्दा, पण...
खर्या आयुष्यातल्या मित्रांना
In reply to चांगला मुद्दा, पण... by ज्ञानेश...
प्रस्तुत लेखकाने केलेली
In reply to खर्या आयुष्यातल्या मित्रांना by भडकमकर मास्तर
कुठेतरी मित्राची एक साधी आणि
फेस्बूकवर मीत्र न्हवेत तर फक्त कॉन्टॅक्ट्स (ओळखणारे) असतात..
मस्त लेख..
बापरे!
रां*...
किशोरी गोडबोले याणी साकारलेली
In reply to रां*... by प्यारे१
विषय चांगला आहे
फेसबुकवर १२६७ मित्र. अरे
लेखन या दृष्टीने बघीतल तर
जीवश्च कंठ्श्च मित्र लाभणे ही
जीवश्च कंठ्श्च मित्र लाभणे ही
In reply to जीवश्च कंठ्श्च मित्र लाभणे ही by वपाडाव
>>>जीवश्च कंठ्श्च मित्र ऐकिव
गंमतशीर संकल्पना ...
+१
In reply to गंमतशीर संकल्पना ... by छोटा डॉन
अजुन काही ..
In reply to +१ by गणपा
एक एक शब्दाला +१ आहे ...
In reply to अजुन काही .. by छोटा डॉन
:)
In reply to एक एक शब्दाला +१ आहे ... by टारझन
पण मैत्री मधे कधी तोडुन
In reply to एक एक शब्दाला +१ आहे ... by टारझन
माझ्या काही खर्या दोस्तांना
In reply to अजुन काही .. by छोटा डॉन
डॉन्याचे आणि इतरांचे सर्वच
In reply to अजुन काही .. by छोटा डॉन
>>>( अजुनही ऑनलाईन मैत्रीची
In reply to डॉन्याचे आणि इतरांचे सर्वच by विनायक पाचलग
बाप रे... !!!!!!!!
In reply to >>>( अजुनही ऑनलाईन मैत्रीची by प्यारे१
माझ्या फेसबुक मित्रांची