Skip to main content

साहित्यिक

क्रांतितै चे अभिनंदन

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 26/07/2011 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपाची सभासद क्रांतितै हिच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन नागपूरला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, शंकर नगर येथे संपन्न होत आहे. दि. ७-८-२०११रोजी सायंकाळी ६ वाजता,मान्यवर श्री. भीमराव पांचाळे, गझलनवाज यांच्या शुभहस्ते, श्री. गिरीश गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली "असेही-तसेही" हा गझलसंग्रह आणि "अग्निसखा" हा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे.

श्रावणमास कहाणी: वर्षभर प्रसिद्ध नारायणाची कहाणी

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 24/07/2011 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावणमास कहाणी: वर्षभर प्रसिद्ध नारायणाची कहाणी
आटपाट संकेतस्थळ होतं. आंतरजालावरती त्याचं नाव होतं. तेथे येणारा प्रत्येक सदस्य त्याचप्रमाणे सहज म्हणून येणारा पाहूणा तेथे देहभान विसरत होता. तेथील सुविधांना भुलत होता. देशोदेशातील व्यक्तींना तेथे मुक्त प्रवेश होता. म्हणूनच तेथे अनेक व्यक्तीस्वभावांचे प्रदर्शन भरले होते. असल्याच अनेक व्यक्तींपैकी राजा रवी हा एक तेथील सदस्य होता. तो मोठा पराक्रमी, मानी होता. त्याचा स्वभाव दिलदार होता. पण तो तत्वाला जागणारा होता. आपल्या तत्वाच्या बाहेर काही करण्यास त्याचा नकार असे.

स्लेजिंग झिंदाबाद

लेखक मृत्युन्जय यांनी शनिवार, 23/07/2011 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक वाईट गोष्टीची सुरुवात चांगाल्यातुन होते म्हणे. उदाहरणार्थ माफिया. माफिया सुरुवातीला शेतकर्यांची संघटना होती. असहाय्य, लुबाडल्या जाणार्या शेतकर्यांनी आपल्या बांधवांच्या हितरक्षणासाठी आणि संरक्षणासाठी सुरुवातीला हत्यार हातात घेतले आणि मग रक्ताची चटक लागलेल्या बाघाप्रमाणे हळुहळु ही प्रामाणिक संघटना गुन्हेगारीकडे वळली. मूळ उद्देश विसरला गेला आणि लोकांना लुटणे हा धर्म बनला. स्लेजिंगचे थोडेफार असेच झाले. सुरुवातीला हा खेळ खेळीमेळीच्या वातावरणातच पार पाडायचा. नंतर स्लेजिंगच्या राक्षसाने उग्र रुप धारण केले. आंतरराष्ट्रीय राजकारणात उर्मटपणाचा सगळा ठेका अमेरिकेने घेतला आहे.

भार गेला, शीण गेला, अवघा झाला आनंद.....

लेखक प्यारे१ यांनी बुधवार, 20/07/2011 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
अप्पा गेले. नाही विश्वास बसत अजून. अप्पा जाणं कसं शक्य आहे? अहो आत्ता उठतील आणि फिरायला जातील, भगवदगीतेतील श्लोक म्हणतील, नातू- नातींशी गप्पा मारतील, तब्बेतीची चौकशी करायला आलेल्याचीच काय चाललंय म्हणून चौकशी करतील, हसत हसत फिरकी घेतील, एखाद्या गोष्टीबद्दल सल्ला न मागता, न विचारता देतील, असे कसे जातील? नाही. खरंच अप्पा गेले. जीवन जगावं कसं आणि मरणाला स्वीकारावं कसं याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे अप्पा. पु ल देशपांडे म्हणाले होते, ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं असे पाय उरले नाहीत. माझं सुदैव की असे पाय मला,आम्हाला लाभले.

हैयोहैयैयो नाडी ग्रंथ ताडपट्टयातील नावाच्या उल्लेखांचे प्रात्यक्षिक दाखवणार

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 01/07/2011 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, नाडीग्रंथांवर अनेकांनी बरेच लिखाण दोन्ही बाजूनी केले आहे. या धाग्याने नाडीग्रंथांचे प्रात्याक्षिकाचा अनुभव घेणाऱ्यांसाठी माहिती.... ....आज दि, १ जुलै ला इतिहास संशोधन मंडळाच्या पोतदार सभागृहात सायंकाळी ६ वाजता भाषण आहे. त्यात हैयोहैयैयो नाडी ग्रंथ ताडपट्टयातील नावाच्या उल्लेखांचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. इच्छुकांनी नोंद घ्यावी. मिपाच्या धोरणांत अशी माहिती देणे बसणारे नसेल तर धागा काढून टाकावा.