विज्ञान लेखमाला : आवाहन

साहित्य संपादक जनातलं, मनातलं
नमस्कार मंडळी, शशक स्पर्धा, श्री गणेश लेखमाला अशा यशस्वी उपक्रमांनंतर आम्ही घेऊन येत आहोत : विज्ञान लेखमाला. आधीच्या दोन उपक्रमांप्रमाणेच याही उपक्रमाला तुमच्या सहभागाशिवाय शोभा येणार नाही. तुमच्या भरघोस आणि उत्साही प्रतिसादाची आस धरून आज आम्ही ही घोषणा करत आहोत. जगभरातले शास्त्रज्ञ, भारतीय विज्ञान परंपरा, वहिवाटीपेक्षा वेगळ्या विज्ञान कक्षा, विज्ञानातल्या गंमतीजंमती अशा अनेक विविध विषयांवर आम्हाला लेखन अपेक्षित आहे. लेखमालेचा पहिला लेख २६ जानेवारीला प्रकाशित होईल आणि लेख येण्याची शेवटची मुदत असेल १५ जानेवारी. आलेल्या प्रवेशिकांमधून लेख निवडण्याचं काम सासं मंडळ करेल. जे लेख निवडले जाणार नाहीत, त्यांना नेहमीप्रमाणेच मेन बोर्डाचं व्यासपीठ खुलं असेल. जास्तीत जास्त लेख घ्यायचा आमचा प्रयत्न राहील. प्रवेशिका आल्यावर त्याची पोच म्हणून आम्ही लेखकाला एक व्यनि करू. तुम्हाला व्यनि न आल्यास सासंमंला विचारणा करावी, म्हणजे प्रवेशिका पोहोचली नाही असं होणार नाही. या वेळी आम्ही एक गुगल फॉर्म बनवला आहे. इच्छुकांनी या प्रवेशिका आधी भरून द्याव्यात, जेणेकरून आम्हाला फॉलो अप घेणं, लेखमालेच्या आवाक्याचा अंदाज येणं, त्यासाठी अनुक्रमणिका बनवणं इत्यादी कामांना सुरुवात करता येईल. या प्रवेशिकांची अंतिम मुदत आहे २७ डिसेंबर. लेख पाठवताना ते साहित्य संपादक या आयडीवर व्यनि करून पाठवावेत. गुगल फॉर्म या दुव्यावर बघता येईल. विषयांची यादी फॉर्ममध्येदेखील बघता येईल, शिवाय इथेही डकवली आहे. १. प्राचीन आणि अर्वाचीन ऋषी (वैज्ञानिक आणि त्यांच्या सुरस कथा) २. आर्यभट्टाचे वारस (भारतीय विज्ञान परंपरा - आयुर्वेद, खगोलशास्त्र, गणित, सर्व प्रकारचे संशोधक) ३. विज्ञान सूक्त (मूलभूत विज्ञान संशोधनावरील (Pure science researchवरील) लेख प्रामुख्याने यावेत. astrophysics, chemistry, geology, maths, material sciences, oceanography, operations research, physics, statistics, agricultural science, biochemistry, bioinformatics, biomedical science / engineering, biophysics, biotechnology, botany and environmental science) ४. विज्ञानस्य कथा : (खुसखुशीत माहिती, विज्ञानातील गमतीजमती - उदा. चार्ल्स गुडइयरला लागलेला व्हल्कनाइज्ड रबरचा शोध, केक्युलेला स्वप्नामध्ये सापांची रिंग दिसल्यामुळे लागलेला बेन्झीन रिंगचा शोध इ. असे, पण काहीसे अप्रसिद्ध. सेरेंडिपिटीने लागलेले शोध वगैरे.) ५. हे माहीत आहे का? (सर्वसामान्यांना फारसे माहीत नसलेले विषय - उदा. 'इथॉलॉजी' (Ethology - प्राण्यांचं स्वभावशास्त्र) ६. समांतर वैज्ञानिक (विज्ञानप्रसार करणार्‍या व्यक्ती-संस्थांबद्दल - उदा. अरविंद गुप्ता, मराठी विज्ञान परिषद, TIFRचा 'Chai & Why' उपक्रम इ,) ७. राष्ट्र उभारणीसाठी विज्ञान ८. विज्ञानाचा भस्मासूर (वैज्ञानिक शोधांचे विध्वंसक उपयोग, उदा: अणुबाँब) ९. अद्भुत विज्ञान (पिरॅमिड्स, आश्चर्यचकित करणारी काही वास्तुशिल्पं, काही घटना, काही शोध इ.) १०. इतर चला तर मंडळी, कामाला लागू या. एकाहून एक सरस आणि सकस लेखमाला आजवर आपल्यातल्या गुणी लेखकांच्या जिवावर मिपाने सादर केल्या. ही लेखमालादेखील त्याला अपवाद नाही. तुमच्या भरघोस प्रतिसादांच्या प्रतीक्षेत, - साहित्य संपादक मंडळ
वर्गीकरण

70 टिप्पण्या 13,106 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

आतिवास नवीन

उत्तम कल्पना आहे. समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र .... या देखील शास्त्रशाखाच आहेत, त्यावरही कोणीतरी लिहील अशा अपेक्षेत.

स्रुजा नवीन

In reply to by आतिवास

नक्कीच त्या शाखांमधलं शास्त्रिय वैशिष्ट्य उठुन दिसेल अशा लेखांचं स्वागत च आहे. आम्ही म्हणुन च " इतर" हा पर्याय ठेवला आहे.

एस नवीन

एकाच विषयावर दोन लेख यायला नकोत यासाठी वरील प्रवेशिकांमध्ये ज्या नोंदी झाल्या आहेत त्या सर्वांना दिसाव्यात अशी सूचना करतो. अर्थात, सासंमंचा निर्णय अंतिम हे मान्य.

सस्नेह नवीन

In reply to by एस

एकाच विषयावर दोन लेख जरी आले तरी हरकत नाही. कारण प्रत्येक लेखकाचे ज्ञान आणि माहिती कक्षा वेगळीच असेल.

वॉल्टर व्हाईट नवीन

स्पर्धा आयोजित करतांना प्रोजेक्ट मेनेजमेण्ट विशेष लक्ष दिले आहे असे दिसतेय, हे विशेष आवडले. माहितीपूर्ण निवेदनाची ओघावती भाषा, येणार्या लेखनाची पोच देण्याची दाखवेलॆ तयारी हेही कौतुकास्पद. साहित्य संपादक मंडळास शुभेच्छा.

स्रुजा नवीन

In reply to by वॉल्टर व्हाईट

धन्यवाद. फक्त एक च छोटीशी सूचना: ही स्पर्धा अशी नाहीये. पुढे येणार्‍या काही उपक्रमांचा विचार करता लेखमाला वेळेत संपायला हवी. म्हणजे सगळ्यांना आस्वाद घेता येईल. शिवाय लेखमालेच्या नियमांत अथवा स्वभावात न बसणारे लेख घेता येणार नाहीत इतकंच. म्हणुन निवड केली जाईल.

पिलीयन रायडर नवीन

हे निवेदन आवडले. सुटसुटीत आणि छान लिहीले आहे. गुगल फॉर्म वगैरे आयडीया मस्तच. बिल्ला क्रमांक कसा पहायचा हे माहिती आहे का सगळ्यांना? मला नाही माहिती!

पिलीयन रायडर नवीन

In reply to by सस्नेह

अगं मला असं दिसतं क्लिकवलं की:- http://www.misalpav.com/user/me म्हणुनच विचारलं की कसा पहावा? तुझा कसा पहायचा ते मला माहितीये.. स्वतःचा कसा पहाय्चा ते माहित नाही..

स्रुजा नवीन

In reply to by पिलीयन रायडर

इतर ही कुणाला हा प्रश्न असला तर या इमेज मध्ये दाखवलं आहे तसं सदस्य यादीतून अथवा प्रतिसादातील स्वतःच्या सदस्यनामावरुन बिल्ला क्रमांक शोधता येतो: a

आदूबाळ नवीन

In reply to by विजुभाऊ

मराठी आणि इंग्रजीतल्या सायन्स फिक्शनचा आढावा घेणारा लेख जास्त आवडेल. (लई नाही मागणं?) फेब्रुवारी महिन्यात मराठी दिनानिमित्त कथा स्पर्धा आयोजित करायचा विचार आहे - त्यात विज्ञान कथा जास्त शोभून दिसेल.

आदूबाळ नवीन

In reply to by गुलाम

कथा स्पर्धेत चालेल. विज्ञान लेखमालेत विज्ञानाची ओळख करून देणारे लेख अपेक्षित आहेत.

सुमीत भातखंडे नवीन

उतम कल्पना. अनेक शुभेच्छा! लेखमाला मस्त होणार यात शंकाच नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

उपक्रमासाठी शुभेच्छा.सहभागी होऊच. -दिलीप बिरुटे

कंजूस नवीन

काल्पनिक आणि नवीनच्या प्रतिक्षेत. तिकडून काढलं( गुगल,विकि इत्यादी) आणि इकडं चिकटवलं असं नकोय.उदा- फोटोग्राफी तंत्रावर इत्थंभूत माहिती उपलब्ध आहे ती देण्यापेक्षा माझी वाटचाल आणि गमती जमती अपेक्षित.

कैलासवासी सोन्याबापु नवीन

मी भ्रमणध्वनी वापरून मिपावर येतो, मला टोकन क्रमांक पहायला साधत नाहिये, कोणी मदत करू शकेल का? धन्यवाद बाप्या

कंजूस नवीन

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मी भ्रमणध्वनी वापरून मिपावर येतो----- फोनवरून "राइट क्लिक " वगैरे करता येत नाही त्या ऐवजी नावावर क्लिक करून ते पेज 'बुकमार्क' करायचं की सापडतं. अगदी छोटुकला फोन असला तर "opera mini 8.1" download करा ( ४०० kb ) त्यात आहे कॅापी पेस्ट पर्याय.

पिवळा डांबिस नवीन

पण एक शंका आहे...
आलेल्या प्रवेशिकांमधून लेख निवडण्याचं काम सासं मंडळ करेल. जे लेख निवडले जाणार नाहीत, त्यांना नेहमीप्रमाणेच मेन बोर्डाचं व्यासपीठ खुलं असेल.
ज्याला काही विज्ञानविषयक लिहायचं असेल त्याला एरवीही मेन बोर्डाचं व्यासपीठ खुलं आहेच की. मग हा आधी प्रवेशिका पाठवा, त्याबर सासं मंडळ (हे कोण/काय आहे ते देवच जाणे!) त्याच्याकडून नियुक्त करून घ्या, हा सगळा उपद्व्याप कशाला? फक्त लेखापुढे 'विज्ञान लेखमाला' हे टायटल लावून घ्यायला? आणि जर ते टायटल मिळालं नाही तर तो लेख विज्ञानविषयक म्हणून गणला जाणार नाही का? :)

जातवेद नवीन

In reply to by पिवळा डांबिस

मला वाटते, निवडलेले लेख वाचनीय असतील अशी हमी मिळेल आणि त्यांची थोडीफार प्रसिद्धी असेल. शिवाय थोडेफार संपादन साहाय्य पण मिळण्याची आशा आहे. आणि स्पर्धात्मक अंगाने जाणारा उपक्रम असल्यामुळे लिहिणारे योग्य ती काळजी घेतील.

पिलीयन रायडर नवीन

In reply to by पिवळा डांबिस

तसं तर कुठल्याच लेखमालेला किंवा अंकाला काय अर्थ आहे मग काका!! मेन बोर्ड सदैव खुला आहेच की!

वॉल्टर व्हाईट नवीन

In reply to by पिवळा डांबिस

आणि जर ते टायटल मिळालं नाही तर तो लेख विज्ञानविषयक म्हणून गणला जाणार नाही का?
विज्ञानविषयक म्हणून गणला जाईल पण लेखमालेतला म्हणुन नाही. तुमच्या व्यवसायात टिम बिल्डिंग साठी काही करतच असतील ना, त्यासारखा एक्सर्साईज समजून द्या तुम्ही पण तुमचा लेख.

अभ्या.. नवीन

एखाद्या तंत्रज्ञानावर/तंत्रावर (मंत्रवाले नव्हे) लेख लिहिला तर चालल काय? तंत्रज्ञान अन विज्ञान संगतीनेच चालतात म्हणून विचारतोय?

स्रुजा नवीन

In reply to by अभ्या..

तंत्रज्ञान आणि विज्ञान मध्ये हलकासा फरक आहे. तुम्ही प्रवेशिका भरुन त्यात स्पष्ट करु शकाल का तुमच्या लेखाचा विषय? म्हणजे मग आम्हाला ही नीट अंदाज येईल.

साहित्य संपादक नवीन

In reply to by मोगा

२७ डिसेंबर ही प्रवेशिकांसाठी अंतिम मुदत आहे, लेख १५ जानेवारी पर्यंत दिला तरी चालेल. वैद्यकिय शास्त्राबद्दल लेख चालेल. प्रवेशिका पाठवुन तपशील पाठवल्यास बरं होईल.

साहित्य संपादक नवीन

मंडळी, प्रवेशिका येऊन पोहोचल्या आहेत. त्याची पोच पावती देखील गेली आहे. लेखन कुठपर्यंत आलं? लेखनास शुभेच्छा आणि १५ जानेवारी पर्यंत आपले लेख येतील अशी शुभेच्छा. कुणाला प्रवेशिका पाठवण्यात अडचण आली अथवा धागा पाहिला नाही म्हणुन प्रवेशिका पाठवता आली नसेल तर आज किंवा उद्या प्रवेशिका स्विकारल्या जातील.

Jack_Bauer नवीन

अतिशय चांगला उपक्रम परंतु काही कारणास्तव मला मीपा वर येण जमलं नाही. मी उद्या पर्यंत लेख पाठवू शकतो का ? कि आता खूप उशीर झाला आहे ?

Jack_Bauer नवीन

In reply to by साहित्य संपादक

आपल्याला लेख साहित्य संपादक या आयडीला व्यनि केला आहे. US मधल्या रात्री बर्याचदा मिपा ऑफ लाईन असल्याने उशीर झाला त्या बद्दल क्षमस्व.

Jack_Bauer नवीन

In reply to by साहित्य संपादक

लेख आपल्याला २ दिवसांपूर्वी व्यनि केला आहे. आपल्याला मिळाला असेल तर कृपया पोच द्यावी. काही कारणास्तव आपल्याला लेख मिळाला नसेल तर आपल्याला इतर कोणत्या मार्गाने लेख पाठवू या बाबतीत मार्गदर्शन करावे. धन्यवाद.

कैलासवासी सोन्याबापु नवीन

माननीय साहित्य संपादक महोदय, लेखात आकस्मिक काही एक अनालॉजी चुकल्याचा अविषकर झाल्यामुळे आता ती दुरुस्त करायच्या मागे लागलो आहे तरीही जर लेख आज सायंकाळ किंवा उद्या पर्यंत द्यायची परवानगी द्यावी अशी नम्र विनंती अन पुन्हा प्रूफ रीडिंग मधे मोठ्या चुका कमीत कमी निघतील असे लेखन करायचा मी वादा करतो (ओशाळलेला) बाप्या

साहित्य संपादक नवीन

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

हरकत नाही बापु , उद्यापर्यंत लेख द्या. नूलकर काका आपले प्रूफ रीडिंग करतीलच. तुम्हाला समाधानकारक वाटला की लेख पाठवुन द्या.

कैलासवासी सोन्याबापु नवीन

साहित्य संपादक महोदय, गूगल फॉर्म मधे नोंदवलेल्या विषयावर लेख लिहुन नुकताच पाठवला आहे, कृपया पोच व्यनि अथवा इथे कॉमेंट रुपात दिल्यास आभारी राहु (बालके) बाप्या

कंजूस नवीन

विज्ञान/गणित आपण कॅालेजात इंग्रजीत शिकतो.वैद्यकीय/गणित यातले लेख खूप विस्तृत समीकरणे शास्त्रिय नावे ( इंग्रजी /मराठी) देऊन लिहिले तर त्या शाखेतले लोक समजतील आणि यात काय नवीन म्हणतील.सामान्य लोकांसाठी लिहिले तर असे किती वाचक उत्सुकता दाखवतील हा मोठा प्रश्न पडतो.निरुपयोगी साहित्य न वाचण्याकडे फार कल असतो.तारेवरची कसरतच आहे.

चौकटराजा नवीन

एक नक्की की जे काही इथे येणार आहे ते कुणाचेही स्वत :चे नसणार आहे.रहाता राहिली मांडणी !ती उत्तम पणे आज देखील एस ,अभ्या,घासकडवी करत आहेतच की !बाकी पाकशास्त्र,वास्तूशास्त्र,मूर्तीशास्त्र ,समाजशास्त्र अर्थशास्त्र ही विद्न्याने असतील तर चालू दया मग !

चौकटराजा नवीन

In reply to by आदूबाळ

अर्थशास्त्र हे शास्त्र आहेच 1कारण त्यात पद्धतशीर अभ्यास आहे पण त्या अभ्यासाचा आवाका मानवी जगताइतपतच .पण जगात वनस्पती आहेत ,प्राणी आहेत.त्यान्च्य्याही वर्तणु कीला स्पर्श करणारे ते विज्ञ्यान. उदा सैबेरियातून थंडीत बाहेर पडणारे पक्षी व आपल्या बुद्धीच्या जोरावर स्वेटर शिवून तिथेच रहाणारा मानव हे विद्न्यानाचा आपापल्या परीने स्वीकार करताना दिसतात. पण सैबेरियातील अर्थशास्त्र फ़क्त तेथील मानवच जवळ करताना दिसेल. अशा रितीने गणित हे देखील विद्न्यान नव्हे ती मापनाची मानवी भाषा आहे.