मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजकारण

मनाचा एकांत - काळे पाणी

शिव कन्या ·
अंदमानातले काळे पाणी, कोलूबेड्याहंटरकदान्न सोबत तीव्र अपमानाचा overtime ! साम्राज्याचा उग्र दर्प अन देशाने केलेली प्रेमळ उपेक्षा....... असे सगळे, अन वरती थोडी जयहिंदची जाळी ! या जीवघेण्या विषाणूजिवाणूंमध्येही, काही काही रक्तांचे malnourishment कि काय ते झालेच नाही! उलट, तुरुंगाच्या अजस्त्र काळभिंतीही त्यांच्या जहालहळव्या लेखणीने cultured झाल्या! मातृभूमीच्या मृत्युंजय विरोत्तमांसाठी, . . . दुसरं काय होता एकांत म्हणजे तरी! - शिवकन्या

" या पुस्तकांवर बंदी आहे! "

दासबोध.कॊम ·
लेखनप्रकार
" या पुस्तकांवर बंदी आहे! ", हे वाक्य अखेरीस इंग्रज गव्हर्नराने उच्चारलेच! "काळ" च तसा होता तो! आजच्या "सकाळ" किंवा "नवा काळ" वाचणा-या पिढील न मानवेल असा! "काळ" हे एका अत्यंत ज्वलज्वलनतेजस जहाल व "अस्सल" मराठी पत्रिकेचे अथवा वृत्तपत्राचे नाव... त्याचे कर्ते होते शिवराम महादेव परांजपे!

बाप ------- हवा आहे पण कशाला?

मी कोण ·
खरे तर हा विषय अनेक दिवसांपासुन मनात होता परंतु राहुन जात होता. आज पुरुष -- हवा पण कशाला? ही चर्चा वाचल्यानंतर रहावले गेले नाही म्हणुन लगेच शुभस्य शीघ्रम!

आता मला वाटते भिती

राजेंद्र देवी ·
आता मला वाटते भिती कोठे गुंड त्रास देती कोठे पोलीस मार खाती अशा या समाजाची आता मला वाटते भिती कधी तरुणाईचे भांडण तर कधी रस्त्यावरचे भांडण सुशिक्षित समाजातले असंस्कृत जन अशा या जनाची आता मला वाटते भिती रामराज्याची अपेक्षा पण वागण्याची रावणनिती या समाजाला आता नाही कोणाची भीती अशा या समाजाची आता मला वाटते भिती या समाजाच मी एक भाग मला माझ्या सावलीची आता मला वाटते भिती राजेंद्र देवी

एक ऐतिहासिक ठेवा: मनोरंजन मासिक ( १९११ ) मधील मजेशीर जाहिराती

चित्रगुप्त ·
मुंबईतील एका मित्राकडे १९११ सालचा मनोरंजन मासिकाचा 'दिल्ली दरबार विशेषांक' बघायला मिळाला. खूप इच्छा असूनही वेळेअभावी त्यातील काहीही वाचता आले नाही, फक्त त्यातल्या मनोरंजक जाहिरातींचे पटापट फोटो काढून घेण्यावरच समाधान मानावे लागले. मुखपृष्ठ : . माझ्या लहानपणी 'सार्सापारीला' हा शब्द अनेकदा कानावर आलेला होता, परंतु हे काय गौडबंगाल आहे, हे मात्र कधीच समजले नव्हते.

अमेरीकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक आणि भारत-अमेरीका संबंध

विकास ·
लेखनप्रकार
अमेरीकतल्या निवडणुकांच्या दरम्यान भारतीयांमधे भारत-अमेरीका संबंध चर्चा होणे अपरीहार्य होत असते. त्यात डेमोक्रॅट्स आवडणारे, न आवडणारे, रिपब्लिकन्स कसे बरोबर आहेत वगैरे सांगणारे सर्वच येतात. मी देखील त्यातला एक आहेच! ह्या लेखाचा विषय प्रामुख्याने केवळ अमेरीका-भारत संबंध या संदर्भातच असल्याने या लेखादरम्यान इतर अमेरीकन राजकीय घडामोडींचा कमीत कमी अथवा शून्य संदर्भ देण्याचा प्रयत्न/हेतू आहे. ओबामाच्या विशेष करून पहील्या निवडणुकीच्या वेळेस, त्याच्यावर संशय घेत मॅकेनला पाठींबा देणारे होते आणि आत्ता देखील हिलरी ऐवजी ट्रंप (भारत-अमेरीका संदर्भात) अधिक योग्य असेल असे देखील म्हणणारे आहेत.

ब्रिटन युरोपपासून घटस्फोट घ्यायला निघालाय्-एक झलक

सुधीर काळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लेखक/संकलक: सुधीर काळे (sbkay@hotmail.com) १९७३ पासून चार दशकांपेक्षा जास्त वर्षें ब्रिटन युरोपीय महासंघाच्या एका विशाल उपक्रमात ’नांदतोय्’ खरा, पण या नांदण्याला ’नांदा सौख्यभरे’ या प्रकारचे नांदणे म्हणता येणार नाहीं! कारण इटली (लिरा), फ्रान्स (फ्रँक), जर्मनी (मार्क) यासारख्या सशक्त अर्थव्यवस्था असलेल्या राष्ट्रांनीसुद्धा आपल्या शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या चलनांना (currencies) डावलून ’यूरो’ हे नवीन सर्वमान्य चलन जसे स्वीकारले, तसे ब्रिटनने मात्र स्वीकारले नाहीं.

बलुचिस्तानची तोंडओळख

सुधीर काळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बलुचिस्तानची तोंडओळख लेखक: सुधीर काळे (sbkay@hotmail.com) हा लेख ई-सकाळच्या पैलतीर या सदरात १७ मे २०१६ रोजी प्रकाशित झालेला आहे. दुवा आहे http://www.esakal.com/Tiny.aspx?K=C6EBSx ‘बलुचिस्तानमध्ये भारताला इतके स्वारस्य का असावे‘ या प्रश्‍नाचे उत्तर ज्यांना पाकिस्तानचा इतिहास व भूगोल माहीत आहे, त्यांना सहज देता येईल. पण ज्यांना या इतिहासाची व भूगोलाची माहिती नाही त्यांना ‘असं काय वेगळं आहे बलुचिस्तानमध्ये?‘ असे वाटेल. या लेखाद्वारे मी बलुचिस्तान या पाकिस्तानमधील एका धगधगत्या प्रश्‍नाचा ढोबळ परिचय करून देणार आहे.

मंत्रिमंडळे - शैक्षणिक मिक्स अँड मॅच की मिसमॅच ?

माहितगार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
या लेखात चिकित्सा सद्य केंद्रीय भाजपा मंत्रिमंडळाची केली असली तरी आधिच्या इतर पक्षीय सरकारांमध्ये अथवा कोणत्याही पक्षीय राज्यसरकारांमध्ये वेगळी स्थिती होती/असते असे नसावे पण तो वेगळ्या अभ्यासाचा विषय असावा. तुर्तास सद्य मंत्रिमंडळाची चर्चा. मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या निवड आणि नेमणूका राजकीय हेतु डोळ्या समोर ठेऊन होतात, विशिष्ट मंत्रालयांसाठी अथवा कारभारासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ञच अथवा अनुभवी असावेत असे नाही, एखाद्या पक्षास / पंतप्रधानास नव्याने अथवा बऱ्याच वर्षांनतर जनतेचा कौल मिळतो कुणाला मंत्रि करावे हा त्यांचा अधिकार आहेच त्या बाबत दुमत नाही.

बांग्लादेशची सुरक्षास्थिती आणि भारता समोरचे आव्हान

माहितगार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बांग्लादेशात असुरक्षीतता नवीन नसावी, कडवे लोक हिंसेच्या माध्यमातून व्यवस्था हातात घेण्यास आतूर होताना दिसतात. गेल्या दोन दिवसा पुर्वी ढाक्यातील परदेशी दूतावास क्षेत्रातील परदेशी लोकांचा वावर असलेल्या बेकरीवरील दहशतवादी हल्ला, बांग्लादेशातील सुरक्षा व्यवस्थेची समस्या हाताच्या बाहेर जात नाहीए ना अशी साशंकता निर्माण करतो. सहसा कोणत्याही देशात परदेशी दूतावास असलेला एरीआ सहसा उच्चतम सेक्युरीटी दिलेला असतो आणि तिथे अतीरेक्यांचे यश हि त्या देशाची एकुण सुरक्षा व्यवस्था आतून पोघरली गेली आहे का असा प्रश्न उपस्थित करते.