Skip to main content

राजकारण

२०१९ राज ठाकरे झाले मुख्य मंत्री ,इंजिनाला ला लागले ४ हि पक्षांचे डबे ९ (फेकींग न्यूज )

लेखक हस्तर यांनी मंगळवार, 12/11/2019 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
२०१९ राज ठाकरे झाले मुख्य मंत्री ,इंजिनाला ला लागले ४ हि पक्षांचे डबे ९ (फेकींग न्यूज ) आमच्या वार्ताहराकडून हाती लागल्या बातमी नुसार राष्ट्रवादी ने सरकार बनविण्यास असमर्थता दाखवली आहे व अजित यावर छातीत सुकून (दुखून) लीलावती मध्ये ऍडमिट झाले आहेत ,भाजप चे पण विखे,राणे ह्यांच्या छातीत दुखत आहे पण हॉस्पिटल बंद करायची इच्छा नसल्याने त्यांना दाखल केले गेले नाही शेवटी राज्यपालांनी काँग्रेस ला बोलावले पण मॅडम दिल्ली हुन येणे अवघड असल्याने राज्यपाल स्वतः १० जनपथ येथे गेले व सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहे अशी चिट्ठी घेऊन आले ( गुप्त सूत्रणानुसार ह्या दररोज च्या वैताग वाडी पेक्षा मला

सरकार इडीचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी करत आहे काय?

लेखक राजे १०७ यांनी बुधवार, 25/09/2019 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
आजच शरद पवार आणि अजित दादा पवार यांच्या विरोधात इडी कारवाई करणार आहे. अशी बातमी वाचली. या अगोदर राज ठाकरे यांना नोटीस बजावली होती व चौकशी केली गेली होती. भुजबळ सुध्दा तुरुंगात होते. नेमकं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इडी तत्परतेने कारवाई करायला बघत आहे. यापाठीमागे सरकारचा हात असावा काय? नुकतेच शरद पवार मी अजून तुरुंगात गेलो नाही. असं म्हणाले होते. या त्यांच्या वक्तव्याला धरुन कारवाई होत आहे काय. मिपाकरांची मते जाणून घेण्यासाठी धागा काढला आहे. धन्यवाद.

तुझं माझं जमेना...

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 20/09/2019 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या पाच वर्षांत भाजपसोबत सत्तेत असूनही शिवसेनेने भाजपला खूप त्रासच दिला हे खरे आहे. लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारतच राहू असे म्हणत ठाकरे व त्यांच्या सेनेने अनेक मुद्द्यांवर सरकारची आणि भाजपची कोंडीच केली. सेनेच्या या आक्रमकपणामुळेच सरकारला आपले काही धोरणात्मक निर्णयही मागे घेणे किंवा रद्द करणे भाग पडले होते, तेव्हा शिवसेना विजयी वीराच्या आवेशांत सरकारवर अंकुश चालवत होती हे वास्तवच आहे. पण तरीही भाजपने किंवा फडणवीस सरकारने शिवसेनेचे आभारच मानले पाहिजेत. ते दोन गोष्टींसाठी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातींचा सर्वोच्च मुलकी पुरस्कार

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 25/08/2019 15:34 या दिवशी प्रकाशित केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातींतर्फे (युएई) त्या देशाचा, "ऑर्डर ऑफ झायेद" हा सर्वोच्च मुलकी बहुमान, २४ ऑगस्ट २०१९ रोजी, प्रदान करण्यात आला.


सुषमा स्वराजांना श्रद्धांजली

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 06/08/2019 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराजांच्या दुख्खद निधनाची बातमी येते आहे. सुषमा स्वराजांना श्रद्धांजली __/\-__

कलम ३७० रद्द करण्यासाठीचे बिल लोकसभेत सादर

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 05/08/2019 11:38 या दिवशी प्रकाशित केले.


आत्ताच काही मिनिटांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० रद्द करण्यासाठीचे बिल लोकसभेत सादर केले आहे. त्यात काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा प्रस्ताव आहे.


तिहेरी तलाकच्या उंटाला लगाम लावण्यात मोदींना यश

लेखक माहितगार यांनी बुधवार, 31/07/2019 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या डिसेंबर महिन्यात 'एका घोषात तिहेरी तलाक' विरुद्धच्या विधेयक निमीत्ताने सुप्रीया सुळेंच्या मांडणीतील निसटत्या बाजू आणि 'वों' च्या ऐस्या (निसटत्या) बाजू या दोन प्रदिर्घ लेखातून विधेयकाच्या बाजूने असलेली माझी भूमिका मांडण्याचा मी प्रयत्न केला होता. त्यावेळी विधेयक लोकसभेत पास झाले तरी राज्यसभेत बहुमताच्या अभावी मोदी सरकारला ते पास करून घेता आले नव्हते.

मोदींनी मॅन व्हर्सेस वाइल्ड मध्ये जाण्याचं काय प्रयोजन असावं?

लेखक alokhande यांनी मंगळवार, 30/07/2019 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्कव्हरी हा एक जागतिक दर्जाचा चॅनल असून तो जगभर बघिताला जातो. आणि त्याच चॅनल वर जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान या जगप्रसिद्ध शो मध्ये जाऊन काय सांगू इच्छितात. किंवा जगभरातील देशांना कोणता संदेश देत असावेत. का हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट म्हणायचा

ब्रिटनचे भावी मंत्रिमंडळ आणि तुर्कांचा / भारतीयांचा बदला

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 25/07/2019 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ बातमी Britain now has the most 'desi' Cabinet in its history ऑक्टोबर २०१९ मध्ये स्थापित होणार्‍या बोरीस जॉन्सन या ब्रिटनच्या आगामी पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात अनेक भारतीय वंशाच्या मंत्र्यांचा समावेश असेल. त्यात महत्त्वाची पदे अशी... १.

श्री. अमर्त्य सेन यांच्या लेखाचा अनुवाद व त्यावर (मराठी व इंग्रजी) प्रतिसाद

लेखक गामा पैलवान यांनी मंगळवार, 04/06/2019 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. अमर्त्य सेन यांनी भाजप व मोदींच्या निवडणुकीतल्या विजयावर वैचारिक संग्राम ही पार्श्वभूमी धरून काही भाष्य केलं आहे. या लेखाचा मी केलेला अनुवाद खाली दिला आहे. त्यावरील माझा (इंग्रजी व मराठी) प्रतिवाद धाग्याखालील टिप्पणीत आहे.