Skip to main content

राजकारण

माली पुन्हा अस्थिर

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 26/02/2022 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाकडे सध्या जगाचे लक्ष लागले आहे. पण त्याचवेळी तिकडे आफ्रिकेमध्ये मालीमधून फ्रेंच सैन्याला आपली मोहीम अर्ध्यावर सोडून माघार घ्यावी लागली आहे, तीही घटना जगात चर्चेचा विषय ठरली आहे. फ्रांसने आपली मोहीम गुंडाळण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर लगेचच तेथील जिहादी गटांच्या कारवायांनी वेग घेतला आहे. फ्रांसने पुढाकार घेऊन 2013 मध्ये सुरू केलेल्या Operation Serval नंतर मालीमधील जिहादी गटांवर काही प्रमाणात नियंत्रण आले; पण त्याचवेळी या गटांनी आपलं कार्यक्षेत्र मालीच्या आजूबाजूच्या देशांमध्येही विस्तारलं. या मोहिमेतून जिहादींविरुद्ध मोठ्या प्रमाणात आघाडी उघडली गेली.

गोष्ट 95 वर्षांच्या संसद भवनाची

लेखक पराग१२२६३ यांनी शुक्रवार, 21/01/2022 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवनाच्या उद्घाटनाला आता 95 वर्षे पूर्ण झालेली आहेत. रायसीना टेकडीच्या परिसरात वसलेले संसद भवन शंभरीकडे वाटचाल करत असतानाच त्याच्या शेजारीच नव्या संसद भवनाची उभारणी केली जात आहे. त्या नव्या इमारतीचे बांधकाम ऑक्टोबर 2022 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर भारतीय लोकशाहीचा कारभार नव्या संसद भवनातून सुरू होईल. तरीही आधीच्या संसद भवनाने भारताच्या संसदीय वाटचालीला, स्वातंत्र्यलढ्याला अगदी जवळून पाहिलेले असल्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या त्याचे महत्व कायम राहणार आहे.

ताज्या घडामोडी- जानेवारी २०२२

लेखक वामन देशमुख यांनी शनिवार, 01/01/2022 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांचे २०२२ मध्ये नववर्षाभिनंदन! या वर्षात उत्तरप्रदेशासहित इतर राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. उत्तरप्रदेशात पुन्हा एकदा भाजप सरकार बनवेल असा निष्कर्ष काढणारी एक कल चाचणी प्रसिद्ध झाली आहे. अर्थात, अशा कल चाचण्यांची विश्वासार्हता हा चर्चेचा विषय असतो.

कोणाकडुन काय घ्याल?

लेखक Trump यांनी सोमवार, 27/12/2021 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
कोणाकडुन काय घ्याल? माझे बरेचदा देशी - विदेशी लोकांशी गप्पा, चर्चा होतात. मग त्यावेळी त्यांच्या मुळ देशात कसे काय चालले आहे? येथे का आलात इ. इ. त्यांनतर मी त्यांना शेवटी विचारतो. जर तुम्हाला येथुन एकच गोष्ट तुमच्या देशात किंवा समाजात न्यायची असेल ती कोणती असेल ?

ताज्या घडामोडी- डिसेंबर २०२१ (भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी गुरुवार, 16/12/2021 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मागच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे. गोव्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. कुठ्ठाळीच्या (Cortalim) आमदार अलिना सालढाना यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पक्ष सोडायचा निर्णय घेतला आहे. अलिनांचे पती मथानी सालढाना युनायटेड गोअन्स डेमॉक्रॅटिक पार्टी या ख्रिश्चनांच्या पक्षाचे आमदार होते. २००५ मध्ये या पक्षाने मनोहर पर्रीकरांच्या सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतल्यावर मथानींनी पक्षातून बाहेर न पडता पर्रीकरांची साथ दिली होती. पुढे २०१२ मध्ये ते भाजप उमेदवार म्हणून कुठ्ठाळीतून निवडून आले.

नवी दिल्ली @ 110

लेखक पराग१२२६३ यांनी रविवार, 12/12/2021 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रिटनचे राजे जॉर्ज (पंचम) आणि राणी मेरी यांचा भारताचे सम्राट आणि सम्राज्ञी म्हणून राज्याभिषेक सोहळा 12 डिसेंबर 1911 ला दिल्लीतील निरंकारी सरोवराजवळच्या बुरारी मार्गावर पार पडला होता. त्यासाठी खास ‘दिल्ली दरबार’ भरवण्यात आला होता. ब्रिटनच्या राजा आणि राणीचा भारताचा सम्राट आणि सम्राज्ञी म्हणून राज्याभिषेक करण्यासाठी दिल्लीत भरवण्यात आलेला हा तिसरा दरबार होता. राज्याभिषेकानंतर लगेचच सम्राट जॉर्ज (पंचम) याने ब्रिटिश भारताची राजधानी कोलकत्याहून दिल्लीला स्थानांतरित केल्याचे घोषित केले.

तुम्ही डावीकडुन -> उजवीकडे का आलात ?

लेखक Trump यांनी गुरुवार, 02/12/2021 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही डावीकडुन -> उजवीकडे का आलात ? आयुष्यात आपले विचार सतत बदलत असतात; नवीन माहिती मिळते, नवीन व्यवहारीक अडचणी येतात. अशी कितीतरी कारणे असतात. मी महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण झाल्यानंतर साधारणतः सौम्य डाव्या विचारांनी प्रभावित झालो होतो. जसे जसे वाचन, प्रवास आणि संशोधन वाढत गेले तसे तथाकथीत डाव्या विचारातील (प्रचारातील ?) फोलपणा जाणवत गेला. काही प्रचलित कारणे खालीलपैकी आहेत. १. सतत एक बाजु दुसर्‍यावर अन्याय करते आहे. २. अतिशय निवडक आणि खोट्या बातम्या पसरवणे. ३. दांभिकपणा. तुमचाही असाच वैचारीक प्रवास झाला आहे का? असेल तर कारणे जाणुन घ्यायला आवडतील...

ताज्या घडामोडी नोव्हेंबर २०२१- भाग २

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी बुधवार, 17/11/2021 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५० प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे. गोव्यातील पोरी (Poriem) मतदारसंघातून २०१७ मध्ये माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणेंविरूध्द निवडणुक लढवून पराभूत झालेले भाजपचे विश्वजीत राणे यांनी भाजप सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. प्रतापसिंग राणेंच्या चिरंजीवांचे नावही विश्वजीतच आहे. ते भाजपमध्ये आहेत आणि राज्य सरकारमध्ये मंत्रीही आहेत. नामसाधर्म्यामुळे सुरवातीला वाटले होते की त्यांनीच आपमध्ये प्रवेश केला की काय. पण दुसर्‍या विश्वजीत राणेंनी पक्ष सोडला आहे. एकंदरीत गोव्यात भाजपचे तितके सोपे दिसत नाही.

महास्वार्थाचे पसरत जाणारे वर्तुळ

लेखक टीपीके यांनी रविवार, 31/10/2021 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे ३४-३५ वर्षापूर्वी दैनिक दुपारचे महानगर (हो, तेच निखिल वागळेंचे) मधे वाचलेला हा लेख. शब्दशः आठवत नसला तरी अत्यंत लहान वयात वाचलेला हा लेख मनावर कोरला गेला आहे. काही तथ्य थोडी फार वरखाली असतील तर सांभाळून घ्या ------------------------------------ तर बहुतेक ६० च्या दशकातली ही गोष्ट असावी. महाराष्ट्रात सहकारी चळवळीने पाय रोवले होते आणि नवनवीन नेते आणि सत्ताकेंद्रे उभी रहात होती त्यातील एक वजनदार नाव म्हणजे वसंतदादा पाटील. त्यांचाही एक सहकारी साखर कारखाना होता. परंतू त्यांच्या लक्षात आले की कारखान्याला म्हणावा तसा नफा होत नाहीये.

नीली वर्दीवालों का दल

लेखक पराग१२२६३ यांनी शुक्रवार, 08/10/2021 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
8 ऑक्टोबर, भारतीय हवाईदलाचा स्थापना दिवस. याच दिवशी 1932 मध्ये अवघ्या 4 वेस्टलँड विपिटी विमाने आणि 5 वैमानिकांसह भारतीय हवाईदलाने रॉयल एअर फोर्सचे सहाय्यक दल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतरच्या गेल्या 89 वर्षांमध्ये भारतीय हवाईदलाच्या क्षमतेत बरीच वाढ झालेली असून ते विविध प्रकारच्या आपत्तींच्या काळात महत्वाची भूमिका बजावत आलेले आहे आणि यापुढेही अशीच भूमिका बजावत राहील.