मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाकक्रिया

खादाडी

vcdatrange ·
लेखनप्रकार
गेल्या रविवारी गुळपीठ अन् मी दोघेच घरी होतो. आमच्या मुदपाकखान्यातील कौशल्याची मजल झक्कास म्यागी, उकडलेली अंडी, चहा या सीमांमध्ये मर्यादित आहे. दिवसभर याच सिद्धहस्त पाककृती आलटून पालटून सादर केल्यावर संध्याकाळी आम्ही भेळ खायला गेलो. गावाकडं म्हणजे संगमनेरला बराच फेमस असलेलं घुले भेळ सेंटर इकडं आंबेडकर नगर ला सुरु झालय....... घुले साहेबांशी गप्पा मारताना लहानपणी संगमनेरात मिळणारी रामदास नढे कडची ओली भेळ आठवली. शनिवारी नढे काका ओली भेळ द्यायचा नाही, कारण त्याच्या चवीची ओली भेळ बनवायला वेळ लागायचा अन बाजारच्या दिवशी हे चोचले त्याला परवडत नसत.

त्रिपुरसुन्दरी

ज्याक ऑफ ऑल ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझ्या आजवरच्या खाण्या (आणि पिण्याच्या) असंख्य Adventures पैकी हे एक . म्हणजे समजा एखाद दिवशी तुम्हाला कोणी विचारलं की बाबा “चहा मध्ये चहा मिसळून पिऊन पाहिलंयस का कधी ?” किंवा “पानात तांबूल घालून खाल्लायस का कधी ?” “अरे बघ करून मस्त लागतं !!” तर आपण त्याच्याकडे एकतर अत्यंत कुत्सित नजरेने बघू अन म्हणू “डोक्यावर पडलायस की काय ?” पण .... हा किस्सा तश्याच वळणावरून जाता जाता अचानक एका अनपेक्षित ठिकाणी आला अन त्या नंतर ही “बला” - हमे उसका कायल बना गई - हमेशा sssssss के लिये !! तर झालं असं की मी एकदा एका ठिकाणी गेलो होतो जेवायला , सणावाराचं जेवण , ते ही देशस्थांकडील .

(मी बी संत्री खाईन म्हन्तो) : सावजी रस्सा

स्वामी संकेतानंद ·
लेखनविषय:
श्री. गंगाधरजी मुटे ह्यांचा 'मी बी मंत्री होईन म्हणतो' हा नागपुरी तडका लावून आम्ही केलेला सावजी रस्सा सादर आहे.

त्या भज्याच्या पिठांमध्ये सांग तू आहेस का?

अविनाशकुलकर्णी ·
लेखनविषय:
त्या भज्याच्या पिठांमध्ये सांग तू आहेस का? भरल्या वांग्याच्या भाजीत ओतिशी तू चव का? मिसळीच्या रश्शांत सांग तू तरंगतोस का?? ओनियन उत्तप्यास सांग तुझ्याशिवाय चव का? भाजी रस्सा वरण सांबाराचा प्राण तू आहेस का? चिरताना तुला अश्रू चे घोर ते तू रूप का? शेव चिवड्यात वर्षणारा चवीचा तू मेघ का? कोथिंबीर मिरची खोबरे वाटणात नेमका हवा का? सामिष असो वा मत्स्य आहारातला प्राण तू आहेस का? कष्टणार्‍या बांधवांच्या भाकरीचा मित्र तू आहेस का? सुगरिणीच्या व्यंजना चा सांग तू अविभाज्य भाग का? असो सामिष वा शाक पाकात तिथे रे, सांग तू आहेस का

पाव भाजीची गोष्ट

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेल्या महिन्यातील गोष्ट चिंकी आणि तिची बहिण दिल्लीला येणार होती. गेल्या वेळी तिची दिल्लीची पाव भाजी खाण्याची इच्छा राहून गेली होती. तिचा फोन आला होता, काका या वेळी दिल्लीची पावभाजी टेस्ट करायची आहे. रविवारी सकाळच्या गाडीने चिंकी येणार होती. घरी पोहचता पोहचता तिला किमान ८ तरी वाजणार होते. घरा शेजारी शनी बाजार लागतो. सौ.ने हुकुम दिला पावभाजी साठी लागणार्या भाज्या घेऊन या. बाजारात भाजी घेताना, चिंकीला कसे मूर्ख बनवायचे हा विचार करू लागलो. मनातील खोडकर शैतान मुलगा जागा झाला. तिला न आवडणार्या भाज्या वापरून अश्यारितीने भाजी बनविली पाहिजे कि चिंकीला कळले हि नाही पाहिजे.

आम्रोत्सव

गणपा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

रामराम मंडळी,
मिपावर आम्रोत्सव चालू झाल्याची कुण कुण आम्हाला लागली बरं का. एकाहून एक पारंपरिक अन अभिनव पाककृती येताहेत.
या पूर्वीही अनेक आंबा पाककृती मिपावर येऊन गेल्यात. या धाग्यातून त्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करतोय.
काही माझ्या नजरेतून सुटल्याही असतील. जागरूक मिपाकर त्यांचे दुवे प्रतिसादातून जरूर देतीलच याची खात्री आहे.
 

नस्त्या उचापती- 2

अन्नू ·
लेखनप्रकार
शनिवारचा दिवस. संध्याकाळी मी नुकताच बाहेरुन आलो होतो. इतक्यात आईने- ताईचा फोन आल्याची बातमी दिली आणि त्याचबरोबर भाईंदरला जाऊन दोघा मुलांचा रिझल्ट आणण्याची आठवण पुन्हा करुन दिली. ऐकून जरा आनंद वाटला पण त्याचबरोबर थोडासा मुडही ऑफ झाला. आनंद यासाठी कि दोघांचा रिझल्ट एकाच दिवशी नव्हता. दोन वेगवेगळ्या दिवशी होता. म्हणजे अठ्ठावीस आणि एकोणतीसला. कारण भाचा सिनिअरला होता, तर भाची ज्युनिअरला! साहजिकच मला दोन दिवस भाईंदरमध्ये राहावं लागणार होतं.

< < < < मजबूरी हय > > > >

चांदणे संदीप ·
मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू!

< < मजबुरी है > >

ज्ञानोबाचे पैजार ·
हमारे दोस्तने हिंदीमे एक कविता क्या लिखी सब लोग उसका लैच कौतुक करने लगे. मेरी तो बहोत म्हणजे बहोत जलने लगी. एकदम चुलके वल्ले लकडीकी माफिक मै धुमसने लगा. बहोत धुवा निकालनेके बाद मैने सोच्या अगर वो लिख सकता है तो मै क्यो नही? फिर क्या..... निकाली अपनी पाचवी की पुस्तक और लिख डालीच ये कविता. क्या करु मजबुरी है ना…..

तेव्हा मला तू फार म्हणजे फार आवडतोस

ज्ञानोबाचे पैजार ·
मार्केटयार्डामधुन आठवड्याची भाजी घेउन येताना अचानक मला सोसायटी मधली मैत्रिण भेटते ती एकटीच आलेली असते भाजी घ्यायला दोन मोठाल्या पिशव्या हतात् घेउन, अवघडून , अर्धातास, निमुट उभा रहात, आमच्या गप्पा ऐकणार्या तुझ्या कडे तिरप्या नजरेने बघत ती म्हणते “आमचे हे काल रात्री उशिरा कामावरुन आले दमुन झोपले आहेत बिचारे.