घोस्टहंटर-१

"व्हू आर यू?" "युवर डेथ!" तो खाली कोसळला! "मनिष उठ!" एलिझाबेथ मनिषला उठवत होती. गेले काही दिवस मनिषचे झोपेचे प्रमाण वाढले होते. एलिझाबेथ याच काळजीत होती. शिवाय आताची केस तिच्या काळजीत भर घालत होती. ग्रेग मॉरिसन मर्डर केस! सर्व घोस्टहंटर यामुळे हादरले होते, कारण ग्रेग मॉरिसन हा घोस्टहंटर लोकांचा मुकुटमणी होता. जगात जिवंत लोक जेवढे भूतांना घाबरत नसतील तेवढी भुते ग्रेग मॉरिसनला घाबरत असत. "झोपू दे मला!" "अरे मूर्ख उठ!" "मी केस सॉल्व करतोय." एलिझाबेथ आता पूर्णपणे कंटाळली होती. कारण ग्रेगच्या अँत्यविधिला सर्व घोस्टहंटर हजर राहणार होते.

'श्रीमानयोगी'

लेखनविषय:
लेखनप्रकार
एक अगदी तुमच्या आमच्या सारखी सर्वसाधारण व्यक्ती, जी आयुष्यभर नोकरी करून आपला संसार चालवते, नोकरीमधून निवृत्तीचे वेध लागताच मनामध्ये कुठेतरी प्रचंड मोठा स्वप्नांचा पहाड उभा असतो...पोटा-पाण्याच्या व्यवसाया मुळे फार पूर्वी पाहिलेली काही स्वप्नं प्रत्यक्षात कशी उतारवयाची याचा सतत ध्यास घेतलेली एक व्यक्ती... ते स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत धडपड करणारी व्यक्ती... स्वप्नं होतं आयुष्यात काहीतरी भव्यदिव्य करायचं, मनात विचारांचं काहूर माजलेलं, प्रत्येकजणाचा वेगळा सल्ला, प्रत्येकाची वेगळी मतं. आणि एके दिवशी सहज 'श्रीमानयोगी' कादंबरी हातात पडली.

काकासाहेबांची चड्डी - एक टिप्पणी

लेखनविषय:
लेखनप्रकार
काही नाटकं अशी असतात की जी आपल्या मनात घर करून जातात. आणि नंतरही आपण त्यावर विचार करत रहातो. असंच एक नाटक पाहण्याचा योग काही महिन्यांपूर्वी आला, त्याबद्दल हे काही थोडं लिहिलं आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ १९९० सालानंतर समाजात जो एक चंगळवाद फोफावला आहे, त्यावर आडून आडून टिप्पणी करणारं आणि उपहासाने त्याकडे बघणारं हे नाटक म्हणजे "काकासाहेबांची चड्डी". नाटकाची पार्श्वभूमी - संदेश देऊलकर ह्या नवोदित नाटककाराने वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी हे नाटक लिहिलं. संदेशच्या आधीच्या कथा आणि कवितांमधे जी एक विखारी पण फालतू चमक जाणवते, ती ह्याही नाटकात आहे. मेकॅनिक्समधे सतत ३ वेळा के.टी.

वाडा चिरेबंदी- गॉन विथ द विंड ???

लेखनविषय:
लेखनप्रकार
वाडा चिरेबंदी- गॉन विथ द विंड ??? मध्यंतरी ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नव्या संचातील पुनरूज्जीवित 'वाडा चिरेबंदी' बघण्याचा योग आला. हे नाटक मी याआधी वाचलेले होते. परंतु नाटक वाचणे वेगळे आणि प्रत्यक्ष सादरीकरण वेगळे. मागच्या वेळेस चंद्रकांत कुलकर्णींच्यांच दिग्दर्शनात या नाटकाचे प्रयोग झाले तेव्हा मी प्राथमिक शाळेत होतो. त्यामुळे आज तिशीच्या उंबरठ्यावर असलेल्या आमच्या पिढीला भारतीय रंगभूमीच्या वाटचालीत मैलाचा दगड असलेले हे नाटक प्रत्यक्ष मंचावर पाहायला मिळेल अशी आशा नव्हती.

पुणेरी कथालेखक - २

पुनश्च गजाननाच्या आशीर्वादाने व शनिवारवाड्याच्या साक्षीने! १.तुळशीबागेत 'भेटेल' तुला मी. यातील भेटेल शब्दात अत्यंत मोठा गर्भितार्थ आहे. त्यामुळे या शब्दांवर आक्षेप घेणाऱ्यास घाणघापुरचा मेसेज पाठविण्यात येईल! २.आम्ही पुण्यातील असण्यावर आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीने शनिवारवाड्याचा प्रथम मालक कोण याचा शोध घ्यावा. (ती वास्तू आम्ही पेशव्यांना भेट दिली होती) ३."कथा ५१ भागातच का?" हा लाडिक प्रश्न विचारणार्या लोकांस 'एकीवरील आकड्यांचे महत्व' हे चा.द.रसोड यांचे पुस्तक पाठविण्यात येईल.

पुणेरी कथा - पाळावयाचे नियम

गजाननच्या आशीर्वादाने व शनिवारवाड्याच्या साक्षीने आम्ही 'तुळशीबागेत भेटेल तुला मी' या कथामालेचा शुभारंभ करत आहोत! प्रस्तुत कथा ही ५१ भागात प्रकाशित होणार आहे.तरीही ही कथा वाचताना पाळावयाची काही पथ्ये! १. ही कथा ५१ भागात असल्याने कोणीही 'लवकर भाग टाका' अशी प्रतिक्रिया देऊन आपल्या अधाशिपणाचा प्रत्यय देऊ नये. (त्यांना १ ते४ या वेळेत 'चितळे' नामक वाट कशी पहावी या शाळेत पाठवले जाईल.) २. 'पुभाप्र' नामक पळवाट वापरल्यास त्याला पुण्यात लुंगी घेण्यासाठी पाठवण्यात येईल. ३. १ ते ४ या वेळेत कथेवर प्रतिसाद टाकल्यावर आपण रिकामटेकडे आहात असा अर्थ काढण्यात येईल. ४. व्यनि करून ओळखी काढण्याचा प्रयत्न करु नये.

दोन वेडे - उपसंहार

मार्कवर देशद्रोहाचा खटला भरला गेला! त्याचा काहीही उपयोग नव्हता, कारण 'पूल ऑफ़ डेड' मधे त्याचा अंत झाला! डेड्पूल अमेरिकी सरकारच्या मानवताविरोधी कारवायांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देत होता! शेवटच्या लॉझगन्स कुठे वापरल्या जाणार हेही ठरलं होत! भारत अमेरिका युद्ध! जनरल सोन्याबापू ह्याच चिंतेत होते. कारण लॉझ्गन्स विरोधात त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते! "सर आपल्यासाठी पत्र आले आहे" बापूंनी चिंतेत पत्र हातात घेतले! "लॉझ्गन्स वर उत्तर!"पत्रात लिहिले होते! त्या पत्राबरोबर एक केमिकलची बाटली देखील होती!!!!

आला आला जिलबीवाला

काव्यरस
आला आला जिलबीवाला आला आला जिलब्यांचा धगधगता घाणा अन् पेटविला साधी जिलबी मावा जिलबी पण आहे पंजाबी की राजस्थानी देऊ बोला चांदनि चौकाची फेमस जिलबी सांगू पण भेसळमालाची देऊ खाण्याला आम्ही पाडू ती जिलबी गुपचुप खावी नाहीतर करता तुम्ही झिंगालाला जिलबीला माझ्या नावे ठेविति कोणी स्वादच नाही 'स्वामी' त्यांच्या जीभेला - स्वामी संकेतानंद जलेबीवाले

दोन वेडे -३

तो वेडा ब्रेड कापत होता. "हॅलो,मि.वेड विल्सन." मार्क म्हणाला. वेडा फक्त त्याकडे बघत होता. "१३ वर्षापूर्वी वाचलो मी. टॉमऐवजी तू मला मारायला हवं होतंस" वेडने क्षणात त्याच्याकडे चाकू फेकला. मार्कने तो शिताफीने चुकवला. "१०२२ लोकांच्या म्रुत्यूनंतर अजून एक जीव घेण्यास तू कमी करणार नाहीस. पण हॉल एकच जागा नाहीये, जिथे लॉझ बनत होतं! बारा वर्षांपूर्वी तू एका आजाराने मरायला टेकला होता.

दोन वेडे - २

लेखनप्रकार
हॉल! लॉझ बनवायची जागा! अनेक कामगार येथे काम करत. जगातली सगळी सुरक्षा अमेरिका येथे पुरवत होती. १००० सैनिक येथे तैनात होते.
Subscribe to नाट्य