बायको गेली माहेरी..

बायको गेली माहेरी,आलो मी मिपावरी परी कर्तव्याची दोरी, आता गळ्यात आहे. कळले आहे तिला, नवरा मिपा खुळा मारून एक खिळा, ती गेली आहे दिसाल जर ऑन-ला-ईनं, लगेच फोन-मारीनं! (दुत्त दुत्त! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ) आणि करिन तुमच्याशी, व्हॉट्स अप बोल-बंदी.

ठष्ट (ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट) / लेखक - दिग्दर्शक : संजय पवार

लेखनविषय:
ठष्ट (ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट) / लेखक - दिग्दर्शक : संजय पवार ठष्ट हे ज्वलंत नाटक नुकतेच बघितले. नाटक खूप भारावून टाकणारे आहे. अश्या धाडसी विषयावर नाटक लिहून समाज प्रबोधनाचा प्रयत्न केल्याबद्दल लेखकाचे मनापासून अभिनंदन. नाटकाचा विषय: नाटकाचा विषय चाकोरीबाहेरचा आहे. हा विषय खरेतर समाजाला नवीन नाही. पण उघडपणे बोलण्यावर अलिखित बंदी आहे, ह्या अर्थाने हा विषय चाकोरीबाहेरचा आहे. प्रत्येक माणसासाठी लग्न हा आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो. स्त्री साठी हा टप्पा जरा जास्तच महत्वाचा असतो. लग्न न झालेल्या मुलींची बाजू कोणी विचारात घेतच नाही.

Selfie सेल्फी / लेखक : शिल्पा नवलकर / दिग्दर्शक : अजित भुरे

लेखनविषय:
४४१) Selfie सेल्फी / लेखक : शिल्पा नवलकर / दिग्दर्शक : अजित भुरे Selfie - सेल्फी हे नाटक नुकतेच बघितले. नाटक खूप भारावून टाकणारे आहे. अश्या धाडसी विषयावर नाटक लिहून समाज प्रबोधनाचा प्रयत्न केल्याबद्दल लेखिकेचे मनापासून अभिनंदन. नाटकाचा विषय: ट्रेन वेळापत्रकानुसार धावत नसल्यामुळे एका रेल्वे स्टेशनच्या महिला वेटिंग रूम मध्ये ५ स्त्रिया अडकून पडतात. वेळ घालवण्यासाठी म्हणून एकमेकींशी ओळख करून घेतात. सहज बोलता बोलता त्या स्वत:चे आयुष्य share करतात. अनेक वेळा मनातील खोल जखम अनोळखी माणसासमोर बोलायला लाज वाटत नाही.

घोस्टहंटर- पायरेट ऑफ़ अरेबिया ३

लेखनविषय:
क्रेकन द मॉन्स्तर! क्रेकनने त्याला गिळले. आणि तो एका अंधार पोकळीत घुसला! अंधार आणि फक्त अंधार! डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही. "आलास तू?" त्या पोकळीतून धीरगंभीर आवाज आला. "हो" अरब म्हणाला. "शैतानाची कलमे लक्षात आहेत?" "हो" "वागशील त्यानुसार?" "हो" "चांगलं की वाईट?" "वाईट" "नाग की गरुड़?" "नाग" "बकरा की गाय?" "बकरा" "स्वर्ग की नरक?" "नरक" "प्रेम की द्वेष?" "द्वेष" तो हसला! "शेवटचा प्रश्न जमीन की समुद्र?" "जमीन!" "नाग आणि बकरे तुला मदत करतील." तो अंधार पोकळीतून बाहेर आला. समोर पूर्ण वाळवंट! वाळवंटात एक जहाज बाहेर येत होती. त्याच्या कानात आवाज घुमला 'तू जमीन निवडलीस' पायरेट ऑफ़ डेज़र्ट! पायरेट

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २

लेखनविषय:
घोस्टहंटर-१ www.misalpav.com/node/34123 घोस्टहंटर-२ www.misalpav.com/node/34140 घोस्टहंटर-३ www.misalpav.com/node/34145 घोस्टहंटर-४ www.misalpav.com/node/34161 घोस्टहंटर-५ www.misalpav.com/node/34185 घोस्टहंटरच्या निमित्ताने! www.misalpav.com/node/34200 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १ www.misalpav.com/node/34204 'मॉन्टेग्रो!' घोस्टहंटर सोसायटीतला अत्यंत प्रतिष्ठित हॉल ऑफ़ फेम मधील पहिल्या क्रमांकावर असलेला घोस्टहंटर! ------------------- स्लीपी होलोव! शिर नसलेल्या घोडेस्वाराचे खेडे! मात्र १९७६ मध्येच मॉन्टेग्रोने त्याचा अंत केला! एक व्यक्ति आज घोड्यावर बसून खेड्यात आली होती. "माफ करा महाशय,

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १

आर.एम.च्या बंगल्यात सगळे घोस्टहंटर जमले होते. "वेलकम मंडळी! आर.एम. म्हणाले." सगळी मंडळी जेवणाच्या टेबलावर बसली. "आपण सर्व येथे ग्रेगच्या परत येण्यानिमित्त जमलो आहोत." ग्रेगने आपला ग्लास उंचावला! "ग्रेग तू अत्यंत शूरवीर आहेस. ज्या अँद्रिआला १८व्या शतकापासून कोणी मारू शकलं नाही तिचा तू अंत केलास!" ग्रेगने मनिषकडे बघितले! मनिष मस्तपैकी खुर्चीत रेलून बसला. "तर या अत्यंत खास प्रसंगी एक खास पेय!" आर.एम.

घोस्टहंटर-५

"लेट मी अवेक!" "नाऊ!!!!" मनिष झोपेतून दचकून जागा झाला! 'ती!' "का त्रास देतेय मला?" "आमचं नातं कधीच संपलं,डेथ व्हॅलीमध्ये!" "का तिला परत यायचय?" ह्या विचारासरशी मनिषच्या अंगावर सरसरुन काटा आला! "अशक्य!!!!!" ----------------------- "हेलो आर.एम!" मनिषने समोर बसलेल्या व्यक्तीला अभिवादन केले. "हॅलो सन."ती व्यक्ति म्हणाली. "मनिष तू इथे येण्यास कारणही जबरदस्त असलं पाहिजे." "जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीला भेटण्यासाठी लोक कुठलीही कारण शोधतील." "पण तू वेगळा आहेस,मनिष!" "नाही मी वेगळा नाही." "हो तू आहेस." "बरं मला तुमच्या लायब्ररीत एंट्री मिळेल?" "त्यात फक्त दोन व्यक्तींना एंट्री आहे." "कोण?" मनिषने व

घोस्टहंटर-४

रस्त्याच्या कडेला एक जुनाट हॉटेल होती.बघणारा तिथे कधी गेलाच नसता. एक माणूस शांतपणे सिगार पीत होता! बाहेर कार येऊन थांबली. कारमधून उतरणारा सरळ हॉटेल मध्ये आला! "मनिष तुला हजारदा सांगितलंय की इथे येण्यासाठी कार वापरायची नाही!" "सॉरी ग्रेग." "तू मी दिलेले कागद वाचलेस?" "हो आणि ग्रेग ही खूपच विचित्र केस आहे." "म्हणून मी तुला इथे यायला लावलं." मनिषने कॉफीची ऑर्डर दिली आणि तो शांतपणे बोलू लागला. "पण मला याचा मार्ग सापडला आहे!" ग्रेग उडालाच! "मी जोक ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीये मनिष!" "मी जोक करत नाहीये.तुला ती अन्ड्रिआ कुठे भेटेल हे बघायच होतं ना!" "हो आणि?" "ती तुला भेटेल, मात्र एकच ठिकाणी!" कुठे?

घोस्टहंटर-३

१६६५! इंग्रज सैन्य स्पेनवर चालून गेले! काउंट ब्रॅक्स्टन या लढ्याचे नेत्रुत्व करत होता! ब्रॅक्स्टन हा अत्यंत ताकदीने लढणारा योद्धा म्हणून प्रसिद्ध होता. आजपर्यंत म्हणून तो एकाही लढ्यात हरला नव्हता! मात्र आज त्याची लढाई एका सैतानाबरोबर होती! आंद्रे!!!!! "ब्रॅक्स्टन!" "कोण?" "मी लाओ!" लाओ हा ब्रॅक्स्टनचा उजवा हात. हा अत्यंत चाणाक्ष हेर म्हणून प्रसिद्ध होता. "बोल लाओ." "ईशान्येला सैन्य हलवा!" ब्रॅक्स्टन ला कळायला वेळ लागला नाही! ईशान्येकडील दरवाजा तुटला. कीम्बहुना रखवालदार फितूर झाल्यामुळे तोडला गेला! आणि लाओने पहिला जीव घेतला.

घोस्टहंटर-२

बावीस दिवसांपूर्वी! एक तरुण रस्त्याने जात होता. त्याच्या शरीरावर अत्यंत उंची वस्त्रे होती.त्याने रस्त्यावरील एका टॅक्सीला हात दिला. "मेरीओ हॉटेल!" भरधाव वेगाने टॅक्सी निघाली. मेरीओ हॉटेल ही लंडनमधील अत्यंत उंची हॉटेल म्हणून गणली जात असे. अनेक अभिनेते,उद्योजक,नेते,या हॉटेलमध्ये विचारविनिमय करत असत.जगातल्या सर्व सुखसोयी या हॉटेलमध्ये होत्या. "हॅलो मि. ग्रेग!" तो तरुण म्हणाला. ग्रेगने मान हलविली! "मी काउंट मॉर्सेलिस. माफ करा मला थोडा उशीर झाला." "इट्स ओके!" ग्रेग हसत म्हणाला. कॉफी विदाऊट शुगर! मॉर्सेलिसने ऑर्डर दिली! "तर मी आता मुद्यावर येतो. सर्वप्रथम मला आपली ओळख करून द्यायला हवी.
Subscribe to नाट्य