अग्निशामक दल आणि आमचे "अग्निकारक प्रसंग"
प्रसंग पहिला-
स्थळ : आमचे घर
वेळ: मध्यरात्रीचे २.३०
स्वयंपाकघरात काहीतरी आवाज झाला म्हणून वडिलांना जाग आली म्हणून ते उठून बघायला गेले. तिथे मिट्ट अंधार होता . . . फक्त फ्रीजमागे एक दिव्य प्रकाश दिसत होता . काही कळायच्या आतच आमचा ६ फुटी डबल डोअर फ्रीज भसाभस पेटला . वडिलांच्या डोळ्यासमोर त्याही अवस्थेत अंधारी आली. तडक ते माझ्याकडे आले आणि मला व आईला उठवले . मी धावत स्वयंपाकघरात गेलो तर तिथे अग्नितांडव सुरू होते. माझ्या लक्षात आलं की गॅसचा सिलेंडर वाचवला पाहिजे पण तो काढणं अशक्य होतं. सिलेंडर पेटला असता तर अख्खी बिल्डींग उडाली असती . . . पण आता आयुष्य केवळ दैवाच्या हवाली होतं . . .
मिसळपाव
अपूर्व (सुव्रत जोशी) आणि तनू (सखी गोखले) रिलेशनशिपमध्ये आहेत. तो पीएचडी साठी अमेरिकेला निघाला आहे. तनू इथेच राहणार आहे. लाँग डिस्टन्स रिलेशनशिप वर्क होत नाहीत असा तिचा विश्वास आहे. त्यामुळे अपूर्व अमेरिकेला गेल्यावर आपली रिलेशनशिप संपुष्टात येईल अशी तिची खात्री आहे. तो अमेरिकेला जाण्यापूर्वीच आपली रिलेशनशिप संपवून टाकावी असे तिने ठरविले आहे. रिलेशनशिप संपविणे त्याला मान्य नाही. त्यामुळे दोघांमध्ये किरकोळ स्वरूपाचे खटके उडत राहतात.
अपूर्व अमेरिकेला जायचे या उद्देशाने उत्तेजित होण्याऐवजी नर्व्हस झालेला आहे.